खंजीर - भाग १

हुप्प्या's picture
हुप्प्या in जनातलं, मनातलं
12 Jan 2009 - 1:34 am

काही वर्षापूर्वी मी राजस्थानात सहलीकरता गेलो होतो. आमचा मोठा ग्रुप होता. फिरताफिरता अलवार नामक शहरात आलो. एकदोन दिवस स्थळे बघण्यात गेली. शेवटचा अर्धा दिवस रिकामा होता. बरोबरची मंडळी गप्पा, आराम करत होती. मग एकटाच भटकायला निघालो. चांगला तीनचार किलोमीटर चाललो. एके ठिकाणी निवांत दोनचार दुकाने होती. बघू म्हटले काही छोटीमोठी खरेदी करता आली तर. एका पुराणवस्तूच्या दुकानात शिरलो. मला त्याचा थोडा छंद आहे. काही मोजक्याच पण (माझ्यामते) छानशा प्राचीन वस्तू माझ्याकडे आहेत. विचार केला की थोडी आपल्या संग्रहात भर पडते का बघू.
दुकानाचा मालक म्हातारा होता. पण स्वभावाने चांगला होता. बाकी कुणी गिर्‍हाईक नसल्यामुळे सगळे अगत्य माझ्या वाट्याला आले. "निवांत बघा. काही घाई नाही". राजस्थानी ढंगाच्या हिंदीत तो म्हणाला.
शोधता शोधता मला एक खंजीर दिसला. अगदी प्राचीन नाही तरी पन्नासएक वर्षे जुना असावा. पण अगदी सुबक आणि देखणा. धारदार, लखलखणारे पाते, तपकिरी चामडी मूठ. हातात अगदी फिट बसेल असा मुठीचा आकार. मला अगदी आवडून गेला तो खंजीर. तो घेऊन मी दुकानदाराकडे गेलो. त्याला विचारले "काय किंमत ह्याची?". त्याने त्याच्याकडे बघितले आणि म्हणाला "साहेब, हा विकायला नाही ठेवला. माझ्या मुलाने चुकून तो दुकानात लावला असेल.". थोड्या रागाच्या स्वरात म्हणाला, "त्याला असल्या वस्तूची पारख नाही आणि आवडही नाही. माफ करा पण मला हा नाही विकायचा". मी इतक्या सहजासहजी हार मानणारा नव्हतो. इतक्या दुर्मीळ वस्तू जमवताना ते मिळवायचे तंत्रही थोडेफार शिकलो होतो. हळूहळु गप्पा सुरु केल्या. थोडी चढी किंमत देण्याची बोली केली. म्हातारा बधत नव्हता. पण थोडा आणखी प्रयत्न केला तर कदाचित तयार झाला असता असे वाटले. गप्पा मारता मारता त्याने मला त्या खंजीराची कहाणी सांगितली. प्रथम म्हणाला ही माझ्या खानदानाची निशाणी आहे. त्याच्या मागे एक मोठा इतिहास आहे. पण तुम्ही बिझी दिसता. ही सगळी कहाणी तुम्हाला सांगून तुमचा वेळ कशाला वाया घालवू? मी म्हटले, "मला आणखी दोनचार तास तरी काही उद्योग नाही. खंजीर नाही तर नाही. निदान त्याच्यामागचा इतिहास तरी कळू द्या".
मग म्हातारा सुरु झाला. त्यांचे घराणे म्हणजे अगदी असली राजपूत. घराण्याविषयी बोलताना त्याचा जाज्वल्य अभिमान अगदी जाणवत होता. त्याला एक मोठा भाऊ होता. त्याच्यापेक्षा बराच मोठा, प्रतापभैय्या. ह्या प्रतापला एक मुलगा होता, रणजीत नावाचा. तो मिसरूड फुटायच्या वयातच क्रांतीकारक बनला होता. वयाने लहान असल्याने त्याला बाकी क्रांतीकारक लोक लहानसहान कामे देत असत. हळूहळू त्याची सचोटी, निष्ठा बघून त्याला अधिकाधिक महत्त्वाची कामे मिळू लागली. प्रतापभैयाला ब्रिटिशांचा तिटकारा. त्यामुळे आपला मुलगा असे काम करतो याचा त्याला भलताच अभिमान होता. राजपूताचा मुलगा आहे. आझादीकरता आपले रक्त सांडायची तयारी आहे त्याची. जेव्हा भेटायचा तेव्हा प्रतापभैया अगदी आवर्जून सांगायचा. अर्थात खाजगीतच. जाहीरपणे असल्या गोष्टींचा गवगवा करणे धोक्याचे होते.
क्रमशः

हे ठिकाणअनुभव

प्रतिक्रिया

शितल's picture

12 Jan 2009 - 4:37 am | शितल

छान लिहिले आहे, खंजीर भाग-२ लवकर लिहा. :)

शंकरराव's picture

12 Jan 2009 - 5:15 am | शंकरराव

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

शंकर राठोड (बार्मेर)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

12 Jan 2009 - 8:55 am | घाशीराम कोतवाल १.२

सुरुवात छान आहे पुढील भाग लवकर येउ देत राव

मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

मदनबाण's picture

12 Jan 2009 - 9:56 am | मदनबाण

पुढचा भाग लवकर येऊदे...

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

अभिरत भिरभि-या's picture

12 Jan 2009 - 5:14 pm | अभिरत भिरभि-या

लिवा बिगी बिगी
वाट बघतुय
अभिरत

अनिल हटेला's picture

12 Jan 2009 - 5:17 pm | अनिल हटेला

तुम्ही पण क्रमशः का?
हे काय बरं नाय ...
पूभाप्र...

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्राजु's picture

13 Jan 2009 - 12:04 am | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दिपक's picture

13 Jan 2009 - 9:16 am | दिपक

काय हे चांगली कथा सांगत असताना क्रमशः चा खंजीर का खुपसलात ?