भय इथले संपत नाही..

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
5 Jan 2009 - 12:31 pm

अभिमन्यु राजाध्यक्ष
"अहो, काय करायचे मग ? पाठवायचे आहे का राजसला ?" आमच्या हिने चौथ्यांदा हा प्रश्न विचारला तेंव्हा मात्र मला जाम हसायला आले. "अग म्हणजे काय ? तो काय कुठे परदेशात निघालाय का ? शहरापासुन फक्त ३० कि.मी. वर नविन लेणी सापडलियेत तिकडे जाणार आहे त्यांच्या शाळेची सहल." "अहो पण त्या जागेविषयी किती उलट सुलट कानावर येतय ते ऐकलय ना तुम्ही ? शापीत आहे म्हणे ती जागा. उगाच विषाची परिक्षा कशाला बघा ? आणी शाळेला बरी मेली असलिच ठिकाणे सापडतात लाहन्ग्यांना घेउन जायला." हिचे गुरगुरणे आणी नाराजी व्यक्त करणे. "अग, चंद्रावर गेलाय आपला भारत आणी तु काय हे खुळ्यासारखे बोलत आहेस ? अब्दुल कलामांवर पेपरात लेख लिहिला होतास तु, हे सांगुन तरी खरे वाटेल का कोणाला ?" ह्या वाक्यावर मात्र जरा चेहरा खुलला. "तसे नाहि हो, आपल्या काळजाचा तुकडा जाणार म्हणुन थोडी जास्तच काळजी वाटतिये इतकेच." "अग सकाळी ८ ला जाणार ते संध्याकाळी ५ पर्यंत परत सुध्दा येणार सगळे. उगाच काळजी करु नकोस."
ह्या सागळ्या चिंता वाद काळज्यांपासुन मुक्त असलेला आमचा राजस मात्र अगदी उत्साहाने बरोबर काय काय न्यायचे, कोणाच्या शेजारच्या सिट वर बसायचे हे ठरवण्यात अगदी मश्गुल झाला होता. आत्ता आत्ता सिनिअर के. जी. मध्ये गेलेले आमचे बाळ अगदी सहलमय झाले होते.
शेवटी एकदाचा सहलिचा दिवस उजाडला. का कोणास ठाउक आज हवामान थोडेसे कुंद होते, स्वच्छ असा सुर्यप्रकाश सकाळपासुन पडलाच न्हवता. ऑफिसच्या गडबडी मध्ये मी ८ वाजताच राजसला त्याच्या शाळेच्या बसमध्ये बसवुन आलो होतो. त्याच्यकडे निट लक्ष ठेवा वगैरे वगैरे पालक ह्या नात्यानी द्यायच्या सुचना हिनी दिल्याच त्याच्या मॅडमना. राजसची स्वारी अगदी खुशीत होती आणी घरुन फक्त पाणीच घेउन यायला सांगीतले असल्याने राजसच्या मातोश्रीही खुशीत होत्या. राजसची बस सुटली आणी आम्ही घरी परत आलो. सगळे आवरुन ९ च्या ठोक्याला मी घराबाहेर पडलो. ऑफीस मध्ये पोचताच स्वत:ला कामच्या गराड्यात गुरफटुन टाकले. "सर आज प्लिज मला घरापर्यंत लिफ्ट द्याल ?" अनघाच्या माझ्या सेक्रेटरीच्या प्रश्नाने मी भानावर आलो. "का ग ? आज काय बघायला वगैरे येणार आहेत का काय ?" मी नेहमीसारखी तिची फिरकी घेतली. "अय्या अहो असे काय हो सर. बाहेर बघाना काय मोठ्ठा पाऊस पडतोय." माझ्या वातानुकुलित आणी आवाजविरोधक कक्षाचा पडदा बाजुला करुन बघितले आणी मी हैराणच झालो. परमेश्वरा, अक्षरश: हत्तीच्या सोंडेतुन पाणी उडावे तसा धबधबा पाऊस कोसळत होता. मला सगळ्यात पहीली आठवण आली ती राजसची. मी घाईघाईने घरी फोन करायला वळलो आणी तेव्हड्यात खिशातला मोबाईल वाजायला लागला.

अभ्रा राजाध्यक्ष
मला तर बाई राजसला पाठवु नये असे मनापसुन वाटत होते. पण ह्यांनी आणी राजसनी हट्टच धरल्यावर मग काय. ह्यांनी तर टिंगलच करायचा प्रयत्न केला माझ्या विचारांची. मान्य आहे मी एक आधुनिक स्त्री आहे, चांगली ग्रॅज्युएट आहे. पण ज्या जागेविषयी रोज उलट सुलट छापुन येतय, ज्या जागेवर गवत खायला म्हणुन सुद्धा जनावरे फ़िरकत नाहीत अशा ठीकाणी मुलांना घेउन जायची गरजच काय म्हणते मी ? ह्या वयात काय कळतय पोरांना सांस्कृतीक वारसा वगैरे ? आणी बाकीचे पालक हो कसे म्हणाले ? राजस तिकडे सहलीला गेलाय कळल्यावर गायतोंडे काकुंचा चेहरातर पाहण्यालायक झाला होत. "अग तुला माहितिये का ? काही दुष्ट शक्तींना कोंडुन घातले होते म्हणे आपल्या पुर्वजांनी तिथे. कसे ग आई वडील तुम्ही ? मॉडर्न मॉडर्न म्हणुन मुलाच्या जिवाशी खेळायचे का ? हे सुद्धा वर ऐकवुन गेल्या. त्यात मेले हे आजचे वातावरण. पाऊस अजुन वाढु नये म्हणजे नशीब. मगाच पासुन त्या राजसच्या सहली बरोबर गेलेल्या अनुप्रिता मॅडमचा फोन सुद्धा लागत नाहीये, काय करावे ? मन नुसते चिंतानी भरुन गेलय. ह्यांना फोन करावा का ?

अभिमन्यु राजाध्यक्ष
"हॅलो मि. अभिमन्यु राजाध्यक्ष का?" मी काहि बोलयच्या आतच पलिकडुन घाईघाईत प्रश्न विचारला गेला. "बोलतोय" मी. "हे बघा मी प्रिन्सीपल डायस बोलतोय, राजसच्या शाळेतुन. सहल ज्या लेण्यांमध्ये गेली होती तिकडे दरड कोसळल्याने मोठा अपघात झालाय. सर्व मुले सुखरुप आहेत, त्यांची काळजी करु नका. मात्र जोवर रस्ता मोकळा होत नाही तोवर त्यांना तिथुन हालता येणार नाही. तुम्ही काळजी करु नये म्हणुन हा फोन केलाय. आम्ही सतत तुमच्या संपर्कात राहुच. मी २ फोन नं. देतो तेव्हडे तुमच्याकडे लिहुन ठेवा. "अहो खरेच सगळे सुखरुप आहे ना हो ?" माझा धीर आता थोडा थोड सुटायला लागला होता. "डोंट वरी मिस्टर राजाध्यक्ष, ऑल इज फाईन. वुई आर ट्रायींग अवर बेस्ट. लवकरात लवकर आम्ही तुमची मुले तुमच्या ताब्यात सुखरुप देउ." का कोणास ठाउक मला ते बोलणे पटत न्हवते. राहुन राहुन काहितरी चुकतय, काहितरी विचित्र घडलय असे आत कुठेतरी टोचत होते. नशीब मलाच फोन केला होता, घरी फोन केला असता तर नुसता हल्लकल्लोळच उडाला असता. आता लवकरात लवकर घर गाठुन अभ्राला जमेल तेव्हड्या नाजुकपणे परिस्थीती सांगीतली पाहिजे.

अनुप्रिता सोहनी
"क्या यार ! ये सब आजही होना था ? बारीश तो ऐसे गीर रहि है जैसे सारी दुनिया को डुबा देगी. त्यात दरड कोसळल्याने रस्ता जाम झालाय. किती वेळ अजुन ह्या भुतिया ठिकाणी कोंडुन पडावे लागणार आहे देवाला माहित. किती उत्साहानी आपण आणी अमननी आज रात्रिच्या जेवणाचा प्लॅन बनवला होता, आता तो रागावुन बसणार ते वेगळेच. परमेश्वरा, हा पाऊस तरी थांबु दे रे. ह्या कुबट वासात नकोसे झालय. त्यात हि कार्टी, माकड बरी पण हि नको असे झालय. आणी त्यात तो राजस मगासपासुन जो टक लावुन माझ्याकडे पाहात बसलाय तो एक क्षण माझ्यावरुन नजर हलवायला तयार नाहिये. आणी त्याची ती नजर.. श्शी एखाद्या निरागस लहान मुलाची नजर अशी असु शकते ? कपडे फाडुन ति नजर आत आत घुसतीये असे वाटतय मला.
"मॅडम, चलो रास्ता एक साईडसे चालु हो गया है." चंदुचा आवाज ऐकला आणी जिव भांड्यात पडला. लगेच मुलामुलिंची रांग करायला घेतली. एक एक करुन सगळ्यांना बस मध्ये चढवले. आणी डोकी मोजायला सुरुवात केली. अरे समवन इस मिसिंग, एक डोके कमी आहे. "दिदी राजस नहि आया." गिरिष्मा म्हणाली. मागे जाउन बघितले तर तिच्या शेजारची सिट रिकामी. खाली उतरले तर चंदु ड्रायव्हरला गाडित अडकलेला कचरा साफ करायला मदत करत होता, तर रेहाना आणी श्रीधर मुलांना बरोबर आणलेले स्वेटर, जर्किन घालायला मदत करत होते.
चला, म्हणजे प्रिता बाई आता तुम्हालाच जाउन त्याला आणले पाहिजे. मी घाबरत घाबरतच मगाशी आडोसा घेतलेल्या गुहेत शिरले. दुपारी गाईड बरोबर मनमोहक वाटणार्‍या त्या मुर्ती आता मात्र एखाद्या अक्राळ विक्राळ पशु प्रमाणे भासत होत्या. "राजस , ए राजस" माझ्या आवाजाच्या प्रतिध्वनीमुळे मीच दचकले. मगाशी लावलेल्या मशालिंच्या उजेडात एका कोपर्‍यात बसलेला राजस मला दिसला. परमेश्वरा, त्या अंधारात त्याचे डोळे एखाद्या जंगली जनावराप्रमणे चमकत होते. "राजस चला, घरी मॉम, डॅड वाट बघत असतील ना बाळा ? चला चला ग्रिष्मा पण तिकडे वाट बघतिये, चला पटकन." मी थोडे अंतर राखुनच बोलत होते. राजसची ती जहरी नजर पुन्हा एकदा माझ्याकडे वळली आणी प्रत्युत्तरा दाखल त्याच्या तोंडातुन एक विचित्र प्रकारचा गुरगुराट बाहेर पडला. इतक्यावेळ शांत बसलेल्या राजसनी आता मात्र त्याची जागा सोडली आणी एखाद्या श्वापदाप्रमाणे तो गुढघे आणी तळहातवर उभा राहीला. आता मात्र माझ्या काळजानी ठाव सोडला, हे निश्चीत काहितरी अनैसर्गिक होते, काहितरी अमानवीय होते. मी भितीनी चार पावले मागे हटले आणी त्याच वेळी राजसनी एखाद्या लांडग्यासारखी माझ्यावर झेप घेतली.

क्रमश :
(संध्याकाळ पर्यंत अंतीम भाग टाकायचा प्रयत्न करतो. कामामुळे थांबावे लागतय. क्षमस्व.)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मृगनयनी's picture

5 Jan 2009 - 12:39 pm | मृगनयनी

प. रा.

भय अम्मळ वाढलंय असं वाट्टंय!!!!!
:( :(

मस्त पटकथा आहे ही...... सिरियल साठी तर अत्युत्तम!!!!!
आता खर्‍या अर्थाने उत्सुकता ताणली गेलीये...

पुढील भागासाठी उत्सुक,

मृगनयनी
:)

दिपक's picture

5 Jan 2009 - 12:44 pm | दिपक

भयानक आहे... पुढे लवकर लिहा... उत्सुकता वाढलीये

अनिल हटेला's picture

5 Jan 2009 - 12:45 pm | अनिल हटेला

काय बे ...इतका मस्त मोसम मध्ये आणुन क्रमशःटाकलेस....
ह्या मुळे सगळा मूड खराब झाला ना !!

~X( ~X-(
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Jan 2009 - 12:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चांगलं लिहितोस हे किती वेळा सांगायचं तुलाही? :-)

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

मॅन्ड्रेक's picture

5 Jan 2009 - 1:39 pm | मॅन्ड्रेक

हं ! येउ द्यात ..