मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मित्रमंडळांची नावे

विजुभाऊ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ख फ वर एक मजेदार चर्चा वाचली. चर्चेची सुरवात अ बा नी सुरू मग गवि नी त्यात भर टाकली. त्यातली गम्मत इथे कळावी आणि त्या गमतीत आणखी भर पडावी म्हणून हा धागा. पुढचे शब्द गविं आहेत. मित्रमंडळांची नावे हा रोचक विषय आहे. माझ्या कॉलेज जीवनात, म्हणजे तीसेक वर्षे मागे जा.. तेव्हा रक्तपात, युद्ध, संघर्ष याला खूप सन्मान होता. संग्राम मित्र मंडळ, झुंजार मित्र मंडळ, क्रांती तरुण मंडळ, फायटर, तलवार, ... एका ठिकाणी तर ब्लड ग्रुप असे नाव वाचले होते. रक्तगट नव्हे, मंडळ. दुचाकी वाहने, विशेषत: बुलेट, हिच्यावर तर खूनखराबा किंवा टोळीयुद्ध हवेच. माफिया असा इंग्रजी स्टिकर, कवटी चिन्ह, उगारलेला चाकू आणि त्यातून रक्ताच्या थेंबाची धार. एकमेकांना क्रॉस करणाऱ्या बंदुका वगैरे अशी प्रतीके. हे सर्व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील निरीक्षण, पुण्यापर्यंत. सांगलीहून कोल्हापूरला जायच्या रस्त्यावर अतिशय देवस्थान म्हणून पाटी बघितली होती. मुंबईत चेंबूरला वाघोबा मित्रमंडळ म्हणून एक नवरात्रीचा मांडव बघितला होता ( चं सु कु) “अचानक” मित्र मंडळ! अशी दोन मंडळे मी पाहिली, मित्रमंडळाचे नाव “ अचानक” का असावे? अचानक असे नाव असते? की अचानक ठरले मंडळ स्थापावे? म्हणून मंडळाचे नाव अचानक? :) ( अ बा.) अ नगरला एक पाटी " अचानक तरुण मंडळ " अशी पाहिली होती. तुम्ही पाहिली असलेली एखादी मजेशीर पाटी ( मित्र मंडळाचे नाव) सांगा.

वाचने 4341 वाचनखूण प्रतिक्रिया 25

विजुभाऊ Mon, 09/15/2025 - 18:37
अहमदनगरला एक बोर्ड पाहिला होता " अचानक तरुण मंडळ" वाचून खूप हसलो होतो. कदचित ज्या तरुणाना आपण तरुण झाल्याची जाणीव अचानक झाली असेल असे तरुण यात असतील यावरून एक शेर आठवला जवां होने लगे जब वो तो हमसे कर लिया परदा हया यकलख़्त आई और शबाब आहिस्ता आहिस्ता

पुण्यात "प्रतिष्ठाण" चे पेव फुटले आहे. गोल्डन ग्रुप, वाय एस ग्रुप, एस पी ग्रुप वगैरे आहेतच. गोल्डन बॉईज, यंग सर्कल वगैरेही दिसतात. पण प्रतिष्ठाण म्हटले की कसे भारदस्त वाटते. काहीतरी मोठे समाजकार्य करतोय वगैरेसे वाटुन रस्ते अडवायला, मोठयाने डी जे लावायला, मोकळीक मिळते. त्यात अजुन पिवळे , निळे, भगवे झेंडे लावले की झालेच. मग कोणी आक्षेप घ्यायलाच येत नाही आणि आलाच तर........

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रतिष्ठान एकेठिकाणी असेच काहीतरी अमुक तमुक प्रतिष्ठान असे लिहिले होते . तेही इंग्रजीत , त्यात योगायोगाने जागा कमी पडल्याने काही अक्षरे वर काही खाली असे लिहिले होते. P Ratishthan. "रतिस्थान"... ते वाचून एकदम LOL झाले . =))))

मीही `अचानक` लिहायला आलो होतो जे अबा यांनी आधीच लिहिले आहे. परंतु नंतर त्याच्या पुढच्या वर्षी `अचानक आणि भयानक मित्र मंडळ` असे बघितले होते.

In reply to by सिरुसेरि

अभ्या.. Tue, 09/16/2025 - 17:30
स्टार टेक्सास गविराज येतेत आता. त्यांची सांगली, लै लै चांगली. . पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ) म्हणजे कोल्हापूरचे बायेर्न आहे. पीटीएमची जर्सी अंगावर दुनिया घेतो शिंगावर.

In reply to by अभ्या..

रामचंद्र Tue, 09/16/2025 - 18:38
पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ), टीटीएम (तटाकडील तालीम मंडळ), केटीएम (खंडोबा तालीम मंडळ), टीएमटीएम (तुकाराम माळी तरुण मंडळ)... सर्व कोल्हापूर!

In reply to by अभ्या..

गवि Wed, 09/17/2025 - 12:16
स्टार टेक्सास गविराज येतेत आता.
तुमने पुकारा और.. आलोच. टेक्सास ओली भेळ. वाह.. मुंबईचे लोक भेळ बनवण्यात एकदम कंडम. चपटे भाजक्या पोह्यासारखे ते कुरमुरे आणि मुख्यतः शेव. फरसाण नाही.. पापडी नाही. मजा नाही. पण सांगली चांगली असली तरी आमची फारशी नव्हे. काही काळ तिथे उष्टे सांडले हे खरे आहे. पण तसे खूप इतर गावांत देखील सांडले. आमचे मूळ ठिकाण आणि ऋणानुबंध कोंकणाशी... तिकडे मित्र मंडळ प्रस्थ मी असेपर्यंत तरी जाणवले नव्हते.

In reply to by श्वेता२४

संजय पाटिल Wed, 10/08/2025 - 15:00
हो! माफ करा पण आजच बघितला प्रतिसाद. नाईक वाड्याजवळ घर आमचं... नरसोबा कट्टा... पण सध्या कोल्हापूरला असतो. आपण पण इचलकरंजी कर का?

In reply to by विजुभाऊ

धुळ्यातही चौकांना खुंट असे नाव आहे, किसन बत्तीवाला खुंट असे एक चौकाचे नाव आहे. कुणाला तरी विचारले होते खुंट हा काय प्रकार तर कळले की चौकात मोकळ्या जागेत जनावरे बांधली जायची त्यांचे खुंट तिथे होत्र म्हणून!

अनन्त्_यात्री गुरुवार, 09/18/2025 - 11:38
वॉशिंग मशीन भाजपेयी + सिंचन घोटाळी राष्ट्रवादी + खोकेसेना यांत विखुरलेल्या माझ्या काही मित्रांना एकत्र करून सर्व धर्मीय सण - समारंभ धूम धडाक्यात साजरे करण्याच्या सद् हेतूने दसऱ्याला "तीन तिगाडा मित्र मंडळ" स्थापन करीत आहे. सर्वांनी समारंभाला यायचं हं. ("हो - बहिरा डी जे मंडळाचा" डी जे अभ्यागतांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी ठेवलाय)

निमी Sat, 10/25/2025 - 10:30
कोल्हापुरात एके ठिकाणी गुगली नीट पत्ता सांगेना म्हणून पत्ता विचारायला गाडीतून खाली उतरले.. पत्ता विचारल्यावर सहज बेकरीचे नाव वाचले..ते होते 'अदृश्य बेकरी!'