ख फ वर एक मजेदार चर्चा वाचली. चर्चेची सुरवात अ बा नी सुरू मग गवि नी त्यात भर टाकली.
त्यातली गम्मत इथे कळावी आणि त्या गमतीत आणखी भर पडावी म्हणून हा धागा.
पुढचे शब्द गविं आहेत.
मित्रमंडळांची नावे हा रोचक विषय आहे. माझ्या कॉलेज जीवनात, म्हणजे तीसेक वर्षे मागे जा.. तेव्हा रक्तपात, युद्ध, संघर्ष याला खूप सन्मान होता.
संग्राम मित्र मंडळ, झुंजार मित्र मंडळ, क्रांती तरुण मंडळ, फायटर, तलवार, ...
एका ठिकाणी तर ब्लड ग्रुप असे नाव वाचले होते. रक्तगट नव्हे, मंडळ.
दुचाकी वाहने, विशेषत: बुलेट, हिच्यावर तर खूनखराबा किंवा टोळीयुद्ध हवेच.
माफिया असा इंग्रजी स्टिकर, कवटी चिन्ह, उगारलेला चाकू आणि त्यातून रक्ताच्या थेंबाची धार. एकमेकांना क्रॉस करणाऱ्या बंदुका वगैरे अशी प्रतीके.
हे सर्व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील निरीक्षण, पुण्यापर्यंत.
सांगलीहून कोल्हापूरला जायच्या रस्त्यावर अतिशय देवस्थान म्हणून पाटी बघितली होती.
मुंबईत चेंबूरला वाघोबा मित्रमंडळ म्हणून एक नवरात्रीचा मांडव बघितला होता ( चं सु कु)
“अचानक” मित्र मंडळ! अशी दोन मंडळे मी पाहिली, मित्रमंडळाचे नाव “ अचानक” का असावे? अचानक असे नाव असते? की अचानक ठरले मंडळ स्थापावे? म्हणून मंडळाचे नाव अचानक? :) ( अ बा.)
अ नगरला एक पाटी " अचानक तरुण मंडळ " अशी पाहिली होती.
तुम्ही पाहिली असलेली एखादी मजेशीर पाटी ( मित्र मंडळाचे नाव) सांगा.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4350
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहमदनगरला एक बोर्ड पाहिला
अचानक सारखेच मी सोलापुरात
In reply to अहमदनगरला एक बोर्ड पाहिला by विजुभाऊ
प्रतिष्ठाण
प्रतिष्ठान
In reply to प्रतिष्ठाण by राजेंद्र मेहेंदळे
लैच खत्तरनाक.................
In reply to प्रतिष्ठान by प्रसाद गोडबोले
झिरो बॉईज चौक आहे पिंपरीत
मीही `अचानक` लिहायला आलो होतो
पाटाकडील तालिम मंडळ ,
हेहेहे
In reply to पाटाकडील तालिम मंडळ , by सिरुसेरि
स्टार टेक्सासगविराज येतेत आता. त्यांची सांगली, लै लै चांगली. . पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ) म्हणजे कोल्हापूरचे बायेर्न आहे. पीटीएमची जर्सी अंगावर दुनिया घेतो शिंगावर.पीटीएम (पाटाकडील तालीम मंडळ),
In reply to हेहेहे by अभ्या..
स्टार टेक्सास
In reply to हेहेहे by अभ्या..
इचलकरंजीत
खिक्क, पुण्यामध्ये या धर्तीवर
In reply to इचलकरंजीत by श्वेता२४
हायला....
In reply to इचलकरंजीत by श्वेता२४
काय सांगता?
In reply to हायला.... by संजय पाटिल
हो!
In reply to काय सांगता? by श्वेता२४
नगर मधे " खुंट" असा काहीतरी
धुळ्यातही चौकांना खुंट असे
In reply to नगर मधे " खुंट" असा काहीतरी by विजुभाऊ
+१
In reply to धुळ्यातही चौकांना खुंट असे by अमरेंद्र बाहुबली
अचानक तरूण मंडळ पुण्यात पण
एका जिमचं नाव होतं "यश बॉडी
जाहीर निमंत्रण
मस्त करमणूक ....
कोल्हापुरात एके ठिकाणी गुगली
आमच्या इथे सार्वजनिक स्वच्छता