इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध आणि IMEC चे भवितव्य!

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
12 Oct 2023 - 5:13 pm

७ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे सहाच्या सुमारास 'हमास' (Hamas) ह्या पॅलेस्टाईन मधील 'सत्ताधारी' दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून (Gaza Strip) अवघ्या वीस मिनिटांत सुमारे ४ ते ५ हजार रॉकेट्स डागून इस्रायलवर हल्ला केला.

एकीकडे रॉकेट हल्ला सुरु असताना हमासच्या दहशतवाद्यांनी 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) म्हणून ओळखली जाणारी, गाझा पट्टी हा पॅलेस्टाईनचा भूप्रदेश आणि इस्रायल ह्यांच्या सीमेवर बांधलेली मजबूत तटबंदी भेदून इस्रायलच्या प्रदेशात घुसखोरी करून स्डेरोट (Sderot) ह्या तटबंदीपासून सुमारे ८५० मीटर अंतरावर असलेल्या इस्त्रायली शहरात तसेच, बीरी (Be'eri) आणि नेतीव हासरा (Netiv HaAsara) अशा इस्रायलच्या सीमावर्ती भागातील कृषी वसाहतींमध्ये शिरत अंदाधुंद गोळीबार करून शेकडो नागरिक आणि सैनिकांना ठार मारले व १५० हुन अधिक इस्रायली महिला आणि लहान मुलांचे अपहरण केले.

१९४८ साली एक देश म्हणून अस्तित्वात आल्यापासूनच अक्षरशः 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असे जीवन जगणाऱ्या इस्त्रायली नागरिकांसाठी युद्ध आणि दहशतवादी हल्ले अजिबात नवे नाहीत, पण इस्रायलच्या दिशेने येणारी रॉकेट्स/क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट करणारी त्यांची 'आयर्न डोम' (Iron Dome) हि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, गाझा पट्टी ह्या पॅलेस्टाईनच्या भूप्रदेशाला दोन बाजूंनी वेढून (तिसऱ्या बाजूला इजिप्तची सीमा तर चौथ्या बाजूला भूमध्य समुद्र आहे) इस्रायलच्या सीमा सुरक्षित करणारे, 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) हे काँक्रीट आणि पोलादापासून तयार केलेले; शेकडो कॅमेरे, सेन्सर्स आणि रडार्सनी सुसज्ज असलेले आणि इस्रायल कडून 'स्मार्ट फेन्स' (Smart Fence) आणि 'आयर्न वॉल' (Iron Wall) म्हणून गौरवण्यात आलेले चाळीस मैल लांबीचे अत्यंत मजबूत असे कुंपण, आणि जगातली 'अत्यंत धाडसी, हुशार आणि सतर्क' असा नावलौकिक कमावलेली 'मोसाद' (Mossad) हि त्यांची गुप्तचर संस्था हे घटक 'हमास' ने डागलेल्या रॉकेट्स पासून तसेच जमिनीवरून तटबंदी भेदून आणि ड्रोन्स व ग्लायडर्सच्या साहाय्याने हवेतून इस्त्रायलच्या सीमावर्ती प्रदेशात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यांपासून इस्रायली नागरिकांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याने गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर ७ ऑक्टोबर रोजी झालेला हा हल्ला इस्त्रायलच्या अत्यंत जिव्हारी लागला आहे.

अर्थात हमासने 'ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म' (Operation Al-Aqsa Storm) असे नाव देऊन इस्त्रायलवर केलेल्या ह्या हल्ल्यांना अवघ्या काही तासांत चोख प्रत्युत्तर देत इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ह्यांनी हमासला "त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी अद्दल घडवू" असा सज्जड इशारा देऊन पॅलेस्टाईन विरुद्ध युद्ध घोषित केले असून संरक्षण विभागाने ह्या हल्ल्यांची तुलना '९/११' आणि 'पर्ल हार्बरच्या' हल्ल्यांशी केली आहे.

अशांत मध्यपूर्वेतील लेबनॉन, सिरीया, जॉर्डन आणि उत्तर आफ्रिकेतील इजिप्त अशा इस्लामिक देशांनी वेढलेल्या पॅलेस्टाईनच्या अरब बहुल भूप्रदेशात अस्तित्वात आलेल्या ह्या देशाला सातत्याने उद्भवणारी युद्धजन्य परिस्थिती आणि दहशतवादी हल्ले हाताळण्याचा तब्बल पंचाहत्तर वर्षांचा अनुभव आहे आणि 'रोज मरे त्याला कोण रडे' म्हणतात त्याप्रमाणे उर्वरित जगातील सर्वसामान्य नागरिकांनाही आता वारंवार होणाऱ्या ह्या घटनांच्या बातम्या विचलित करत नाहीत इतक्या त्याविषयीच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, ह्याला बहुसंख्य भारतीयही अपवाद नाहीत!

इतकी वर्षे भारताला दूर तिकडे मध्यपूर्वेत होणाऱ्या ह्या संघर्षाची प्रत्यक्ष झळ बसत नव्हती त्यामुळे कोणाचातरी थातुरमातुर निषेध नोंदवून बाकी घडामोडींपासून अलिप्तता राखणे शक्य होते पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या G-20 परिषदेत 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) हा भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर होण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे.

परंतु नुकत्याच सुरु झालेल्या इस्रायल - पॅलेस्टाईन युद्धामुळे 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' अशा देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भवितव्याविषयी चिंताजनक परिस्थिती उद्भवली असल्याने भारताच्या मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका आणि युरोपात नव्याने स्थापीत होऊ पाहणाऱ्या व्यापक हितसंबंधांना बाधा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने हे युद्ध, त्याची व्याप्ती आणि परिणाम व इतर घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आता आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे.

['इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) अस्तित्वात आल्यास 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' हे त्याचे सर्वात मोठे लाभार्थी असतील, पण त्याचा सर्वात मोठा फटका (सुवेज कालव्यातुन होणारी मालवाहतूक जवळपास नगण्य होणार असल्याने) इजिप्तला, आणि 'बेल्ट अँड रोड' (BRI ) ह्या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी असलेल्या पाकिस्तान, इराण, टर्की ह्या देशांना बसणार आहे त्यामुळे IMEC च्या निर्मितीत खोडा घालण्यासाठी सध्या सुरु असलेले हे युद्ध ओढवून घेण्यास हमासला चिथावणी देण्यामागे ह्या देशांचा हात असल्याचा संशय देशो-देशीच्या अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे!]

इस्रायल हा एक देश म्हणून जरी १९४८ साली म्हणजे पंचाहत्तर वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असला तरी इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन आणि समस्त इस्लामिक जगताच्या ह्या संघर्षाला शंभर वर्षांहून अधीक जुना इतिहास आहे, त्याची बीजे १९१७ साली रोवली गेली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी आपल्या वसाहती सोडताना जगभर ज्या पाचरी मारून ठेवल्या आहेत त्यापैकीच हि एक पाचर आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये! वरकरणी ह्या संघर्षाचे मूळ कारण जरी धार्मिक असले तरी एकंदरीत ह्या विषयाला ऐतिहासिक, भौगोलिक, राजनैतिक, आर्थिक असे अनेक पैलू आहेत आणि त्या पैलूंचे विश्लेषण करण्यासाठी हा धागा प्रपंच.

हा विषय खूप मोठा असल्याने एका लेखात त्या सगळ्यांचा आढावा घेणे अशक्य असल्याने मालिका न लिहिता सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असावी ह्या उद्देशाने सदर धाग्यावर शक्यतो रोज एक ह्याप्रमाणे प्रतिसादरुपी लेख किंवा लघुलेखातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करण्याचा मानस आहे आणि त्या प्रतिसादांची (अपडेट होणारी) अनुक्रमणिका खाली देण्याचा प्रयोग करत आहे.

नमुन्यादाखल सध्या डोक्यात असलेले ५ मुद्दे / विषय खाली लिहिले आहेत, अजून काही मुद्दे सुचल्यास त्यांचीही भर घालण्यात येईल.

आगामी प्रतिसादरुपी लेख/लघुलेखांची अनुक्रमणिका:
(खालील प्रतिसाद प्रकाशित केल्यावर त्यांच्या लिंक्स अपडेट करण्यात येतील)

१) युद्धस्य कथा रम्या - 'तिसरा इंतिफादा' (इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध २०२३)
'युद्धस्य कथा रम्या' हि उक्ती प्रमाण मानून ह्या प्रयोगाची सुरुवात ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामूळे सुरु झालेल्या युद्धापासून करत आहे ज्यात इस्रायलच्या 'आयर्न डोम' (Iron Dome), 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) ह्या अत्याधुनिक सुरक्षाप्रणालींना चकवा देत हा हल्ला कसा झाला त्याविषयीची माहिती येणार आहे.

२) 'हमास' काय आहे आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे आणि पैसे कुठून येतात?
रॉकेट्स हे हमास ह्या दहशतवादी संघटनेचे आवडते अस्त्र, गाझा पट्टीत त्यांचे 'गावठी' रॉकेट/मिसाईल निर्मिती कारखाने आहेत, आणि त्यासाठी साहित्य म्हणून ते कशाचा वापर करतात, तसेच अन्य आधुनिक शस्त्रे, क्षेपणास्त्रे व प्रतिबंधित साहित्य तस्करीतून कशाप्रकारे मिळवले जाते हि माहिती फार रंजक आहे...

३) 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC)
'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' ह्या देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती...

४) २०२३ च्या इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रिया.

५) इस्रायलची निर्मिती आणि मुस्लिम-अरब जगताशी असलेल्या संघर्षाचा इतिहास.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

अर्थकारणलेखमाहिती

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Nov 2023 - 10:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिरेकी लपवनारे निरपराध कसे ?

'हमास' या कडव्या संघटनेचं गाझापट्टीत शासन असलं तरी, हमास निरपराध लोकांना कवच म्हणून वापरते असा आरोप इस्त्रायल कायम करते. याचा अर्थ सरसकट नागरिक ’हमासच’ समर्थन करतात असा घ्यायचा ? सरसकट नागरिक अतिरेकी आहेत असे मानायचे ? गाझापट्टीतून स्थलांतर करणा-यांची संख्याही लाखांपेक्षा अधिक आहे. जर ते सगळेच अतिरेकीच असते तर, जीवावर उदार होऊन इस्त्रायलशी लढले असते आणि स्वर्गातील बहात्तर सुंदर-या मिळवल्या असत्या.

एखाद्या देशातील, लोकनियुक्त सरकारमधील एखाद्या पंतप्रधानाने किंवा अध्यक्षाने असे फ़र्मान काढले की, उद्या आठवाजेपासून रस्त्यावर यायचं नै. घरात बसून टीव्हीवरील कार्यक्रम बघायचे. किंवा अमुक धमुक तारखेला टाळ-ढोल वाजवायचे असे फ़र्मान काढले तर करावेच लागेल की नै ? गाझातील सरकार तर, ’कडव्या संघटनेचं’ आहे. हमासची नागरिकांवर काही दहशत असेल की नाही ? नागरिक कोणाचं ऐकणार अशावेळी ? एक तर सरकारचं ऐकावे लागेल किंवा इथून परागंदा झालेलं बरं असा विचार ते करीत असतील की नाही ? अशा निरपराधांबद्दल बोलतो आहे. हमासचे हल्ले त्यांचा माज आणि इस्त्रायलचे हल्ले आणि युद्धाची खुमखुमी हे दोघेही मला निरपराधांसमोर समान आहेत. इतकंच. रेश्ट माय केस.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Nov 2023 - 11:06 am | अमरेंद्र बाहुबली

सरकरा विरूध्द जनतेने बंडं केल्याचे ऊदाहरणं आहेत जगात. पण त्या निरपराध लोकांना इस्राईलविरूध्द लढायचंच असेल नी हमासला पाठिंबाच द्यायचा असेल तर कोण रोखनार बिचार्या निरपराध अतिरेक्यांना?

रंगीला रतन's picture

27 Nov 2023 - 10:44 pm | रंगीला रतन

+२७११२३

वामन देशमुख's picture

25 Nov 2023 - 6:12 pm | वामन देशमुख

इस्त्रायलच्या डोक्यावर टेंगुळ आला पण गाझापट्टीतील निरपराधांचे अमानुष बळी घेतले.

अत्यंत उत्तम तुलनात्मक शब्दरचना!

पुरोगामी लोकांकडून हीच अपेक्षित नाही का!

बाकी मानवता वगैरेंचा व पुरोगामींचा काय संबंध? बहात्तर सुंदरी मिळण्याशी मतलब!

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Nov 2023 - 7:17 pm | अमरेंद्र बाहुबली

पुरोगामी शब्द बदनाम करायचा विडा ऊचललाय का? की ऊगाच कुठूनही पुरोगामी शब्द धरून आणून पुरोगामी नेत्यांना बदनाम करायचे कारस्थान आहे?

वामन देशमुख's picture

27 Nov 2023 - 7:48 am | वामन देशमुख

तसं नाही अबा भौ,

इस्त्रायलच्या डोक्यावर टेंगुळ आला पण गाझापट्टीतील निरपराधांचे अमानुष बळी घेतले.

इस्राएलच्या अनेक नागरिकांवर हत्या, अपहरण, बलात्कार अन्वनित छळ असे प्रकार झाले ते म्हणजे फक्त टेंगुळ, आणि इस्राईलने प्रतिकार केला तर ते म्हणजे निरपराधांचे अमानुष बळी अशी तुलना योग्य आहे का?

इस्राएलच्या प्रतिकारी हल्ल्यात हमासचे अनेक दहशतवादी ठार झालेले आहेत, त्यांना निरपराध म्हणण्याचा प्रयत्न योग्य आहे का?

याच प्रकारचे लोक अफझलच्या न्याय्य शिक्षेला judicial killing ठरवतात, ते योग्य आहे का?

अत्यंत चलाखपणे अशी शब्द रचना करून सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा असा प्रयत्न योग्य आहे का?

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Nov 2023 - 9:05 am | अमरेंद्र बाहुबली

हो म्हणून पुरोगामी शब्द बदनाम करायचं काय काम?? त्यांना हमासप्रेमी, अतिरेकीप्रेमी म्हणा. तुम्ही तरी शब्दरचना करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाहीतर काय करताय?? आधी मा देखील पुरोगामींना असलं काहीतरी वाचून वाईट समजायचो पण पुरोगामींचं आभाळाएवढं कार्य पाहून कळाले की ते किती महान आहेत ते. त्सामुळे पुरोगामींना कुठेही गोवून बदनामी करायचं थांबवा.

सुबोध खरे's picture

27 Nov 2023 - 12:11 pm | सुबोध खरे

आजकाल स्वतःला पुरोगामी म्हणवणारे सगळे एकजात भंपक, दुटप्पी आणि हलकटच दिसतात. यामुळे पुरोगामी हा शब्द्च बदनाम झालेला आहे

यामुळे अस्सल पुरोगामी स्वतःला पुरोगामी म्हणवत नाहीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Nov 2023 - 12:57 pm | अमरेंद्र बाहुबली

मनूवादी सनातनींना आपला चातुर्वर्णव्यवस्थावादी प्रातशाखीय संघी अजेंडा पुरोगामींमूळे रेटता येत नाही म्हणून ते गल्लीतील हाणामारी ते इस्रायल पॅलेस्टाईन प्रत्येक ठिकाणी पुरोगामी शब्द गोवून चळवळ बदनाम करू इच्छितात.

वामन देशमुख's picture

27 Nov 2023 - 1:34 pm | वामन देशमुख

मागेही एक दोन-वेळा मी "पुरोगामी म्हणजे नेमके काय?", "पुरोगामी असण्याचे नेमके निकष कोणते?"

अश्या स्वरूपाचे प्रश्न विचारले होते. पण फारशी काही उत्तरे मिळाली नाहीत.

पुरोगामी शब्द बदनाम करायचा विडा ऊचललाय का?

की ऊगाच कुठूनही पुरोगामी शब्द धरून आणून पुरोगामी नेत्यांना बदनाम करायचे कारस्थान आहे?

हो म्हणून पुरोगामी शब्द बदनाम करायचं काय काम?

या विधानांवरून तुम्ही पुरोगामी आहात / तुम्हाला पुरोगामींबद्धल आपुलकी / सहानुभूती आहे असे मला वाटते. (माझे असे वाटणे चुकही असू शकते.)

@अमरेंद्र बाहुबली, तुम्ही सांगा -

  1. पुरोगामीची व्याख्या काय?
  2. पुरोगामी म्हणजे नेमके काय?
  3. पुरोगामी असण्याचे नेमके निकष कोणते?
  4. या निकषांत बसणारे कोण कोण लोक आहेत?
  5. त्या लोकांनी पुरोगामी असण्याची कोणकोणती लक्षणे प्रदर्शित केलेली आहेत?
  6. पुरोगामीबद्धल इतर अतिरिक्त माहिती

मग पुढे बोलू.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Nov 2023 - 4:38 pm | अमरेंद्र बाहुबली

फुले शाहु आंबेडकर ह्यांचे विचार अंगीकारनारे पुरोगामी.

वामन देशमुख's picture

27 Nov 2023 - 4:58 pm | वामन देशमुख

कृपया सर्व प्रश्नांची उत्तरे द्या ही विनंती -

  1. पुरोगामीची व्याख्या काय?
  2. पुरोगामी म्हणजे नेमके काय?
  3. पुरोगामी असण्याचे नेमके निकष कोणते?
  4. या निकषांत बसणारे कोण कोण लोक आहेत?
  5. त्या लोकांनी पुरोगामी असण्याची कोणकोणती लक्षणे प्रदर्शित केलेली आहेत?
  6. पुरोगामीबद्धल इतर अतिरिक्त माहिती

मग पुढे बोलू.

सुबोध खरे's picture

27 Nov 2023 - 6:47 pm | सुबोध खरे

फुले शाहु आंबेडकर ह्यांचे विचार अंगीकारनारे पुरोगामी.

मग गांधीजी नेहरू ना मानणारे प्रतिगामी काय?

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Nov 2023 - 7:41 pm | अमरेंद्र बाहुबली

मुलींच्या शिक्षणाला विरोध करनारे, फुलेंना दगडं मारनारे, शाहुंवर गरळ ओकनारे, आंबेडकरांवर टिका करनारे चातुर्वर्ण व्यवस्थावादी, सनातनी, मनुवादी प्रवृत्ती ज्या आजही प्रातशाखेत जातात ते प्रतिगामी.

सुबोध खरे's picture

28 Nov 2023 - 10:46 am | सुबोध खरे

मग गांधीजी नेहरू ना मानणारे प्रतिगामी काय?
याचं उत्तर दिलेले नाही!

त्याच बरोबर स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, श्री शिवाजी महाराजांना मानणारे प्रतिगामी आहेत का?

वामन देशमुख's picture

27 Nov 2023 - 2:29 pm | वामन देशमुख

मनूवादी सनातनींना आपला चातुर्वर्णव्यवस्थावादी प्रातशाखीय संघी अजेंडा पुरोगामींमूळे रेटता येत नाही म्हणून ते गल्लीतील हाणामारी ते इस्रायल पॅलेस्टाईन प्रत्येक ठिकाणी पुरोगामी शब्द गोवून चळवळ बदनाम करू इच्छितात.

अगदी अपेक्षित!

हमास == मनुवादी

की

इज्राएली== मनुवादी

?

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Nov 2023 - 4:38 pm | अमरेंद्र बाहुबली

ह्या दोघांच्या भाडंणात पुरोगामींना बदनाम करनारे मनुवादी.

कंजूस's picture

25 Nov 2023 - 6:17 am | कंजूस

तात्पुरता युद्ध विराम.

काही इस्रायलींना सोडले.

सर टोबी's picture

27 Nov 2023 - 9:01 pm | सर टोबी

सध्याच्या सरकारचा पहिल्या राज्याभिषेक होण्याआधी जी वातावरण निर्मिती केली गेली त्या मंथनातले एक रत्न म्हणजे पुरोगामी हि वृत्ती. अजून काही रत्न म्हणजे गुलामगिरी, सत्तर वर्षातली निष्क्रियता (ज्यात भाजपा आणि मोदींची देखील वर्ष आहेत पण मोदी तेव्हा नवथर नवरीसारखे होते म्हणून काँग्रेसच त्या निष्क्रियतेचे कर्ते धर्ते), पराभूत मानसिकतेचा इतिहास वगैरे.

खरं तर ज्ञान, तर्क, आणि अनुमान याच्या आधारावर आजच्या समाजाची ज्यांनी उभारणी केली ते पुरोगामी कुणाच्या निर्भत्सनेचा विषय कसे काय होऊ शकतात? परंतु पुरोगामी जे काही करतात त्यातून नकळतपणे सनतन्यांच्या सोग्याला हात घातला जातो. त्यातून पारंपारिकपणे पुरोगामी सनातन्यांचे शत्रू होत असत. हल्ली त्यात भर पडली ती म्हणजे पुरोगाम्यांनी निस्पृह असण्याची. म्हणजे फक्त हिंदूंवर टीका नाही करायची. असा प्रश्नच खरं तर उद्भवू नये. आपल्या नद्या, हवा, माती, आणि एकूणच सामाजिक स्वास्थ्याचं जे प्रदूषण आपण बघतो आहोत त्यात सर्वात मोठा वाटा ज्यांचा आहे त्यांना दोष नाही द्यायचा तर कुणाला द्यायचा? दाभोलकरांना हा प्रश्न जेव्हा विचारला जायचा तेव्हा त्यांचं उत्तर असायचं कि जर आपण हिंदूंच्या अनिष्ट प्रथा नियंत्रित केल्या तर इतर समाजावर तशा प्रकारच्या सुधारणांचं दडपण येऊ शकतं. असो. उन्मादी वातावरणात पहिला बळी हा तर्काचाच असतो.

थोडक्यात पुरोगामी म्हणजे ज्ञान, तर्क, आणि अनुमान यांच्या कसोट्यांवर चालणारी माणसं. ती तुमच्या कौतुकासाठी आसुसले नसतात किंवा हेटाळण्यामुळे नाउमेद होणारी नसतात.

तळटीप: विनाकारण सणकेल प्रतिसादांना कुठलाही उपप्रतिसाद मिळणार नाही. तेव्हा मीच जिंकलो म्हणून छाती पिटण्यास सदर आयडी मोकळे असतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Nov 2023 - 8:45 am | अमरेंद्र बाहुबली

अत्यंत ऊत्कृष्ट प्रतिसाद टोबी सर.

सुबोध खरे's picture

28 Nov 2023 - 10:55 am | सुबोध खरे

जर आपण हिंदूंच्या अनिष्ट प्रथा नियंत्रित केल्या तर इतर समाजावर तशा प्रकारच्या सुधारणांचं दडपण येऊ शकतं.

इतका बुळबुळीत आणि भंपक उत्तर फक्त आपणच देऊ शकता.

हिंदू कोड बिल, सती बंदी, वारसा हक्क, विवाह कायदा पासून असंख्य कायदे अस्तित्वात आले.

आगरकर, स्वा सावरकर, डॉ आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारखे असंख्य समाजसुधारक हिंदू समाजात जन्माला आले तसे त्याच्या एक चतुर्थांश असलेल्या मुसलमान समाजात का आले नाहीत?

आणि ७५ वर्षे झाल्यावर सुद्धा घटनेत अंतर्भूत असलेलं मूलभूत कलाम ४४ आजतागायत कायद्यात बदलू शकलेले नाही याचे समर्पक उत्तर आपण देणार नाही याची खात्री आहे.

आजही मुसलमान स्त्रियांना कोणतेही हक्क नाहीत. वारसा हक्काने भावाच्या अर्धा हिस्सा मिळतो. तीन तलाक देण्याचा हक्क फक्त पुरुषांनाचा आहे.

पण आपण जे डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या बद्दल म्हटले आहे ते सत्य असेल तर असे भंपक निखालस असत्य आणि बुळबुळीत उत्तर देण्याबद्दल डॉ दाभोलकरांचा निषेधच करावा लागेल. (त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे अनमोल कार्य गृहीत धरूनही)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Nov 2023 - 11:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर टोबी, उत्तम प्रतिसाद. आवडला.

''पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतिवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी, मनुवादी, धर्मवादी, कर्मविपाकसिद्धान्तवादी, शब्दप्रामाण्यवादी आणि कट्टर धार्मिक नसतात. अखिल मानवजातीचं अधिक भलं कसं होईल, या दृष्टीने पुरोगामी लोक विचार करतात. त्यांना हे माहीत असतं की, या जगात 'बदल' हीच एक शाश्वत गोष्ट आहे''

(संदर्भ : पुरोगामी कोण? प्रतिगामी कोण? आपण कोण? )

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

28 Nov 2023 - 12:26 pm | सुबोध खरे

अरे वा !

मराठीत अजूनही काही विशेषणं असतील तर ती लावून टाका.

बाकी तो लेख वाचला

किती भंपक असावा याचे उत्तम उदाहरण आहे

मला तर लेख वाचताना हसू आवरत नव्हतं

असो

यातील किती विशेषणं आपल्या पुरोगामी (म्हणवणाऱ्या) राजकारण्यांना/ समाजकारण्यांना लागू पडतील हे पाहणे फार रोचक ठरेल.

सुबोध खरे's picture

28 Nov 2023 - 12:28 pm | सुबोध खरे

या लेखाचे शीर्षक खरं तर आपण कोण? आपला पगार किती? आणि आपण बोलतो किती? असं असतं तर जास्त समर्पक झालं असतं

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Nov 2023 - 1:47 pm | अमरेंद्र बाहुबली

अधोगामी/सनातनी दुटप्पी असतात. पुरोगाम्यांनी केलेल्या सुधारणांचे सर्व फायदे त्यांना ऊपटायचे असतात पण पुरोगामी चळवळीस बदनामही करायचे असते. मुलींना शाळेत पाठवायला हेच सनातनी विरोध करायचे नी आता मुलींना शाळेत पाठवतात, पण पुरोगामींच्या ऊपकाराची त्यांना जाणीव नसते. वरून प्रत्येक ठिकाणी पुरोगामी शब्द गोवून पुरोगामी चळवळ बदनाम करायची असते. हे सनातनी भारताला हिंदू तालिबान बनवून स्वत मात्र विदेशात पळ काढतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Nov 2023 - 4:39 pm | अमरेंद्र बाहुबली

चार दिवस झाले की.

रंगीला रतन's picture

2 Dec 2023 - 12:42 pm | रंगीला रतन

इस्रायल-हमास युद्ध पुन्हा सुरू
https://www.loksatta.com/desh-videsh/america-reaction-after-israel-hamas...
जन्नतमधे बिर्याणी तयार आहे :=)

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Dec 2023 - 1:36 pm | अमरेंद्र बाहुबली

साधुसंत भरलेल्या निरपराध पॅलेस्टीनी हमीसने युध्दविरामाच्या काळात हल्ला घडवून नी राॅकेट डागून ३ लोक मारलेत म्हणून दृष्ट इस्राईलने पुन्हा हल्ला केलाय. फक्त ३ लोक मारले म्हणून बिचार्या निरपराध हमाश्याना मारण्यात काही अर्थय का? दृष्ट इस्राईल.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Dec 2023 - 11:03 am | अमरेंद्र बाहुबली

दक्षीण आफ्रिकेने म्हणे इस्राईलला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचलेय. का तर गाझा वर हल्ले केले म्हणून. गाझाने इस्राईलवर हल्ला केला तेव्हा हे मुर्ख दक्षीण आफ्रीकी सरकार कोठ कडमडले होते? तेव्हा का नाही गाझाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचले?? अशी मुर्ख सरकारे असलेल्या देशांना अमेरीका इस्राइलने चांगला धडा शिकवायला हवा. भारतातही मुर्ख सरकार आहे हमासला मदत पाठवली गाझाच्या नावाखाली. गाझात गेलेली भारतीय मदत हमासच गडप करनार. ऊद्या अमेरायीका इस्राईलह्यामुळे भारताच्या ऊरावर बसले तर केवढ्याला पडेल??