इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध आणि IMEC चे भवितव्य!

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
12 Oct 2023 - 5:13 pm

७ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे सहाच्या सुमारास 'हमास' (Hamas) ह्या पॅलेस्टाईन मधील 'सत्ताधारी' दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून (Gaza Strip) अवघ्या वीस मिनिटांत सुमारे ४ ते ५ हजार रॉकेट्स डागून इस्रायलवर हल्ला केला.

एकीकडे रॉकेट हल्ला सुरु असताना हमासच्या दहशतवाद्यांनी 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) म्हणून ओळखली जाणारी, गाझा पट्टी हा पॅलेस्टाईनचा भूप्रदेश आणि इस्रायल ह्यांच्या सीमेवर बांधलेली मजबूत तटबंदी भेदून इस्रायलच्या प्रदेशात घुसखोरी करून स्डेरोट (Sderot) ह्या तटबंदीपासून सुमारे ८५० मीटर अंतरावर असलेल्या इस्त्रायली शहरात तसेच, बीरी (Be'eri) आणि नेतीव हासरा (Netiv HaAsara) अशा इस्रायलच्या सीमावर्ती भागातील कृषी वसाहतींमध्ये शिरत अंदाधुंद गोळीबार करून शेकडो नागरिक आणि सैनिकांना ठार मारले व १५० हुन अधिक इस्रायली महिला आणि लहान मुलांचे अपहरण केले.

१९४८ साली एक देश म्हणून अस्तित्वात आल्यापासूनच अक्षरशः 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असे जीवन जगणाऱ्या इस्त्रायली नागरिकांसाठी युद्ध आणि दहशतवादी हल्ले अजिबात नवे नाहीत, पण इस्रायलच्या दिशेने येणारी रॉकेट्स/क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट करणारी त्यांची 'आयर्न डोम' (Iron Dome) हि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, गाझा पट्टी ह्या पॅलेस्टाईनच्या भूप्रदेशाला दोन बाजूंनी वेढून (तिसऱ्या बाजूला इजिप्तची सीमा तर चौथ्या बाजूला भूमध्य समुद्र आहे) इस्रायलच्या सीमा सुरक्षित करणारे, 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) हे काँक्रीट आणि पोलादापासून तयार केलेले; शेकडो कॅमेरे, सेन्सर्स आणि रडार्सनी सुसज्ज असलेले आणि इस्रायल कडून 'स्मार्ट फेन्स' (Smart Fence) आणि 'आयर्न वॉल' (Iron Wall) म्हणून गौरवण्यात आलेले चाळीस मैल लांबीचे अत्यंत मजबूत असे कुंपण, आणि जगातली 'अत्यंत धाडसी, हुशार आणि सतर्क' असा नावलौकिक कमावलेली 'मोसाद' (Mossad) हि त्यांची गुप्तचर संस्था हे घटक 'हमास' ने डागलेल्या रॉकेट्स पासून तसेच जमिनीवरून तटबंदी भेदून आणि ड्रोन्स व ग्लायडर्सच्या साहाय्याने हवेतून इस्त्रायलच्या सीमावर्ती प्रदेशात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यांपासून इस्रायली नागरिकांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याने गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर ७ ऑक्टोबर रोजी झालेला हा हल्ला इस्त्रायलच्या अत्यंत जिव्हारी लागला आहे.

अर्थात हमासने 'ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म' (Operation Al-Aqsa Storm) असे नाव देऊन इस्त्रायलवर केलेल्या ह्या हल्ल्यांना अवघ्या काही तासांत चोख प्रत्युत्तर देत इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ह्यांनी हमासला "त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी अद्दल घडवू" असा सज्जड इशारा देऊन पॅलेस्टाईन विरुद्ध युद्ध घोषित केले असून संरक्षण विभागाने ह्या हल्ल्यांची तुलना '९/११' आणि 'पर्ल हार्बरच्या' हल्ल्यांशी केली आहे.

अशांत मध्यपूर्वेतील लेबनॉन, सिरीया, जॉर्डन आणि उत्तर आफ्रिकेतील इजिप्त अशा इस्लामिक देशांनी वेढलेल्या पॅलेस्टाईनच्या अरब बहुल भूप्रदेशात अस्तित्वात आलेल्या ह्या देशाला सातत्याने उद्भवणारी युद्धजन्य परिस्थिती आणि दहशतवादी हल्ले हाताळण्याचा तब्बल पंचाहत्तर वर्षांचा अनुभव आहे आणि 'रोज मरे त्याला कोण रडे' म्हणतात त्याप्रमाणे उर्वरित जगातील सर्वसामान्य नागरिकांनाही आता वारंवार होणाऱ्या ह्या घटनांच्या बातम्या विचलित करत नाहीत इतक्या त्याविषयीच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, ह्याला बहुसंख्य भारतीयही अपवाद नाहीत!

इतकी वर्षे भारताला दूर तिकडे मध्यपूर्वेत होणाऱ्या ह्या संघर्षाची प्रत्यक्ष झळ बसत नव्हती त्यामुळे कोणाचातरी थातुरमातुर निषेध नोंदवून बाकी घडामोडींपासून अलिप्तता राखणे शक्य होते पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या G-20 परिषदेत 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) हा भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर होण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे.

परंतु नुकत्याच सुरु झालेल्या इस्रायल - पॅलेस्टाईन युद्धामुळे 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' अशा देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भवितव्याविषयी चिंताजनक परिस्थिती उद्भवली असल्याने भारताच्या मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका आणि युरोपात नव्याने स्थापीत होऊ पाहणाऱ्या व्यापक हितसंबंधांना बाधा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने हे युद्ध, त्याची व्याप्ती आणि परिणाम व इतर घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आता आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे.

['इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) अस्तित्वात आल्यास 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' हे त्याचे सर्वात मोठे लाभार्थी असतील, पण त्याचा सर्वात मोठा फटका (सुवेज कालव्यातुन होणारी मालवाहतूक जवळपास नगण्य होणार असल्याने) इजिप्तला, आणि 'बेल्ट अँड रोड' (BRI ) ह्या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी असलेल्या पाकिस्तान, इराण, टर्की ह्या देशांना बसणार आहे त्यामुळे IMEC च्या निर्मितीत खोडा घालण्यासाठी सध्या सुरु असलेले हे युद्ध ओढवून घेण्यास हमासला चिथावणी देण्यामागे ह्या देशांचा हात असल्याचा संशय देशो-देशीच्या अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे!]

इस्रायल हा एक देश म्हणून जरी १९४८ साली म्हणजे पंचाहत्तर वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असला तरी इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन आणि समस्त इस्लामिक जगताच्या ह्या संघर्षाला शंभर वर्षांहून अधीक जुना इतिहास आहे, त्याची बीजे १९१७ साली रोवली गेली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी आपल्या वसाहती सोडताना जगभर ज्या पाचरी मारून ठेवल्या आहेत त्यापैकीच हि एक पाचर आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये! वरकरणी ह्या संघर्षाचे मूळ कारण जरी धार्मिक असले तरी एकंदरीत ह्या विषयाला ऐतिहासिक, भौगोलिक, राजनैतिक, आर्थिक असे अनेक पैलू आहेत आणि त्या पैलूंचे विश्लेषण करण्यासाठी हा धागा प्रपंच.

हा विषय खूप मोठा असल्याने एका लेखात त्या सगळ्यांचा आढावा घेणे अशक्य असल्याने मालिका न लिहिता सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असावी ह्या उद्देशाने सदर धाग्यावर शक्यतो रोज एक ह्याप्रमाणे प्रतिसादरुपी लेख किंवा लघुलेखातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करण्याचा मानस आहे आणि त्या प्रतिसादांची (अपडेट होणारी) अनुक्रमणिका खाली देण्याचा प्रयोग करत आहे.

नमुन्यादाखल सध्या डोक्यात असलेले ५ मुद्दे / विषय खाली लिहिले आहेत, अजून काही मुद्दे सुचल्यास त्यांचीही भर घालण्यात येईल.

आगामी प्रतिसादरुपी लेख/लघुलेखांची अनुक्रमणिका:
(खालील प्रतिसाद प्रकाशित केल्यावर त्यांच्या लिंक्स अपडेट करण्यात येतील)

१) युद्धस्य कथा रम्या - 'तिसरा इंतिफादा' (इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध २०२३)
'युद्धस्य कथा रम्या' हि उक्ती प्रमाण मानून ह्या प्रयोगाची सुरुवात ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामूळे सुरु झालेल्या युद्धापासून करत आहे ज्यात इस्रायलच्या 'आयर्न डोम' (Iron Dome), 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) ह्या अत्याधुनिक सुरक्षाप्रणालींना चकवा देत हा हल्ला कसा झाला त्याविषयीची माहिती येणार आहे.

२) 'हमास' काय आहे आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे आणि पैसे कुठून येतात?
रॉकेट्स हे हमास ह्या दहशतवादी संघटनेचे आवडते अस्त्र, गाझा पट्टीत त्यांचे 'गावठी' रॉकेट/मिसाईल निर्मिती कारखाने आहेत, आणि त्यासाठी साहित्य म्हणून ते कशाचा वापर करतात, तसेच अन्य आधुनिक शस्त्रे, क्षेपणास्त्रे व प्रतिबंधित साहित्य तस्करीतून कशाप्रकारे मिळवले जाते हि माहिती फार रंजक आहे...

३) 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC)
'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' ह्या देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती...

४) २०२३ च्या इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रिया.

५) इस्रायलची निर्मिती आणि मुस्लिम-अरब जगताशी असलेल्या संघर्षाचा इतिहास.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

अर्थकारणलेखमाहिती

प्रतिक्रिया

भागो's picture

13 Oct 2023 - 9:55 am | भागो

टर्मीनेटर
https://www.washingtonpost.com/world/2023/israel-palestine-conflict-time...
हा लेख वाचलात तर तुमच्या विचरत कदाचित फरक पडू शकेल.
आता
१. ह्या वादात इस्रायल किंवा हमास कोणीही धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ नाहीत.
२. मी जेव्हढे वाचाल आहे त्या प्रमाणे नेत्न्याहू हा तद्दन गुंड माणूस आहे. त्याच्यावर खटला चालू आहे. त्यातून वाचण्यासाठी त्याने बरेच उपद्व्याप केले आहेत. त्याचाच हा परिपाक आहे.
३.इजिप्तच्या गुप्त हेर खात्याने इस्रायलला हमासच्या हल्ल्याची पूर्व कल्पना दिली होती पण नेतन्याहुने त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले अशा बातम्या आहेत.
४. अल अक्सा मशिदीतील पावित्र्याचा भंग हे हि एक कारण आहेच.

टर्मीनेटर's picture

17 Oct 2023 - 8:59 pm | टर्मीनेटर

भागो शेठ,
तुम्ही दिलेल्या लिंक मधली माहिती वाचली त्यात (आज वीशी-तिशीत असलेल्यांसाठी सोडून) नवीन असे फार काही अजिबात नाही!

आता तुमच्या बाकीच्या मुद्द्यांकडे वळतो,

१. ह्या वादात इस्रायल किंवा हमास कोणीही धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ नाहीत.

अगदी अगदी... इस्त्रायल हा काही साधू संतांचा देश नाही तसेच हमास ही काही सुफी संतांची संघटना नाही.

२. मी जेव्हढे वाचाल आहे त्या प्रमाणे नेत्न्याहू हा तद्दन गुंड माणूस आहे. त्याच्यावर खटला चालू आहे. त्यातून वाचण्यासाठी त्याने बरेच उपद्व्याप केले आहेत. त्याचाच हा परिपाक आहे.

इस्त्रायल सारख्या (धर्मांध) शत्रुंनी घेरलेल्या देशाचा नेता गांधींवादी किंवा 'अहिंसा परमो धर्म' वगैरे तत्वज्ञान मानणाऱ्या विचारसरणीचा असावा अशी आपली अपेक्षा आहे का?
'ठकासी असावे महाठक' म्हणतात त्याप्रमाणेच ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेल्या देशाचे नेतृत्व असावे असे माझे वैयक्तिक मत! तुमचे मत वेगळे असल्यास त्याचाही अर्थातच आदर आहे.

३.इजिप्तच्या गुप्त हेर खात्याने इस्रायलला हमासच्या हल्ल्याची पूर्व कल्पना दिली होती पण नेतन्याहुने त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले अशा बातम्या आहेत.
४. अल अक्सा मशिदीतील पावित्र्याचा भंग हे हि एक कारण आहेच.

ह्या दोन्ही मुद्द्यांचे एकत्र उत्तर देतो.
युद्धकाळात किती प्रोपगंडा चालतो हे आता सर्वज्ञात आहे त्यामुळे काय खरे आणि काय खोटे हे ठरवणे सर्वसामान्यांसाठी कठीण होऊन जाते. युक्रेन युद्धाच्या सुरुवातीच्या काळातल्या घटना आठवा, अगदी मिपावारही हा प्रोपगंडा चालवण्याचे उद्योग झालेले आहेत. त्यात पुतीन ह्यांना कुठलासा रोग झाला असल्याने ते कसे इतरांपासून अंतर ठेऊन वावरत / वागत आहेत पासून अनेक विनोदी आणि धडधडीत खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. पण ते असो...
१९६७ सालच्या सिक्स डे वॉर मध्ये झालेल्या पराभवातून इजिप्तने धडा घेऊन थोड्या कालावधीने का होईना पण इस्त्रयालला सार्वभौम राष्ट्र म्हणुन मान्यता देऊन आपला प्रदेश तर परत मिळवला होता पण इस्लामिक जगताचा रोष मात्र ओढवून घेतला होता. आणि तेव्हा शांतता करारावर स्वाक्षरी केल्या पासूनच त्याची प्रचंड कोंडी होत आहे, करारातल्या अटींचे पालन करण्यासाठी इस्त्रायल बरोबर सहकार्य करावे लागत आहे आणि एकीकडे आपण इस्लामिक - अरब जगता बरोबर आहोत हे सिद्ध होत नसले तरी तशी निदान बतावणी करावी लागत आहे.
इजिप्तची ही द्विधावस्था इस्त्रायलला पण माहिती असल्याने अशा बातम्या आल्या तरी त्यातले तथ्य संबंधितांना माहिती असले तरी बाकीच्यांनी (म्हणजे वॉर प्रपोगंडाला बळी पडणाऱ्यांनी) त्याला किती महत्व द्यावे हा त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा प्रश्न असतो....

आणि अल अक्सा मशिदीचे निमित्त करूनच तर हा 'ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म' नाव देऊन हा हल्ला केला आहे हे वर लेखात लिहिलेले आहे.

असो, प्रतिसादसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍

IMEC बदल माहिती नव्हतं ते समजलं.
बाकी सध्या इस्त्रायली ज्यू अत्यंत हुशार इतिहासकार, मानववंश अभ्य युवल हरारीचे लेक्चर ऐकत होते.तेव्हा या देशाविषयी व्हिडिओ पाहत होते.त्यात इथे युद्ध सुरू झाले.तेव्हा चाणक्यचे धर्माधिकारी यांचेही व्हिडिओ पाहण्यात आले.अत्यंत खतरनाक धाडसी आहे इस्त्रायली!चहू बाजूला अरब असताना आपल्या धर्माची मुळे पुन्हा जगभरातून इथे आणून वसवले.मला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याच अनेक पराक्रमाची आठवण झाली.बाकी ब्रिटीशांनी ईथएपण काहीच्या काही भूमी डिस्ट्रिब्युटशन करून काड्या केल्या आहेत,हे पाहून चीड वाटली.पॅलेस्टाईनेपण गाजा पट्टी आग्रह सोडून इतर भाग घ्यावा.भारताच्या भुमी बाजूला अरब नसून चीन आहे हे कधीतरी नशीबच वाटतं. इस्त्रायलला माहिते होतं की इतरत्र वसले असतं तर सन्मानाने कधीच जगू शकले नसते.हक्काचे घर का सोडावं.गाजाला अनेक मोठ्या राष्ट्रांनी मदत केली आहे.अनेक राजकीय , आर्थिक वर्चस्वासाठी गुंतागुंतीची आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी रशिया-युक्रेन आणि आता इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धात आहे.जग तिसर्या महायुद्धाच्या वाटेवर आहे वाटतं...

विवेकपटाईत's picture

13 Oct 2023 - 10:39 am | विवेकपटाईत

१. हे युद्ध इसराइल आणि हम्मास मध्ये नाही.
२. या युद्धाची सुरुवात मक्का मध्ये असलेल्या यहूदी टोळीचा संपूर्ण नाश करून त्यांच्या बायको मुलांना गुलाम बनविण्यार्या जगातील पहिल्या जिहाद सुरू झालेली आहे.
३. जो पर्यंत यहूदी जातीचा पूर्ण विनाश होत नाही आणि इस्लामचे राज्य येत नाही जिहाद सुरू राहणार.
४. बाकी भारतात ही वेगवेगळ्या स्वरूपात हे युद्ध हजार वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. अकबर सारख्या बादशाह ने ही चित्तोड मधील सर्व ४० हजार नागरिकांची कत्तल केली होती. येत्या ५० वर्षांत याहून भयंकर दृश्य पाहायला मिळतील. ज्या प्रमाणे आज भारतीयांना भविष्याची कल्पना नाही, इजरायला ही नव्हती. यात आश्चर्य काही नाही.

विवेकपटाईत's picture

13 Oct 2023 - 10:54 am | विवेकपटाईत

१. हे युद्ध इसराइल आणि हम्मास मध्ये नाही.
२. या युद्धाची सुरुवात मक्का मध्ये असलेल्या यहूदी टोळीचा संपूर्ण नाश करून त्यांच्या बायको मुलांना गुलाम बनविण्यार्या जगातील पहिल्या जिहाद सुरू झालेली आहे.
३. जो पर्यंत यहूदी जातीचा पूर्ण विनाश होत नाही आणि इस्लामचे राज्य येत नाही जिहाद सुरू राहणार.
४. बाकी भारतात ही वेगवेगळ्या स्वरूपात हे युद्ध हजार वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. अकबर सारख्या बादशाह ने ही चित्तोड मधील सर्व ४० हजार नागरिकांची कत्तल केली होती. येत्या ५० वर्षांत याहून भयंकर दृश्य पाहायला मिळतील. ज्या प्रमाणे आज भारतीयांना भविष्याची कल्पना नाही, इजरायला ही नव्हती. यात आश्चर्य काही नाही.

प्रसाद गोडबोले's picture

13 Oct 2023 - 12:01 pm | प्रसाद गोडबोले

गट क्रं. १ आणि गट क्रं. २

आम्ही आमच्या अन्य लेखनात , प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, लोकं काय लिहितात, काय बोलतात्, ह्यावरुन त्यांचा "गट" ठरवता येतो . तेच परत एकदा ह्या युध्दातुन आणि त्यावरील चाललेल्या संवादातुन दिसुन येत आहे हे पाहुन आनंद झाला :)

तुम्ही गट क्रमांक १ मधील असाल तर तुमचा इस्त्रायलला झायॉन ला पाठिंबा असेल आणि व्हाईस वर्सा . अर्थात तुम्ही इस्त्रायलला, झायॉनला पाठिंबा देत असेल तर तुम्ही गट क्रं. १ मधील आहात असे म्हणावे लागेल.

तसेच तुम्ही पॅलेस्टाईन , हमास ला समर्थन देत असाल तर तुम्ही गट क्र. २ मधील आहात हे निश्चीत.

हा भयंकर संवेदनशील विषय असल्याने शाहु फुले आंबेडकर ह्यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ह्या विषयावर स्पष्टपणे न बोललेलेच बरं .

साहना's picture

13 Oct 2023 - 1:46 pm | साहना

> इतकी वर्षे भारताला दूर तिकडे मध्यपूर्वेत होणाऱ्या ह्या संघर्षाची प्रत्यक्ष झळ बसत नव्हती त्यामुळे कोणाचातरी थातुरमातुर निषेध नोंदवून बाकी घडामोडींपासून अलिप्तता राखणे शक्य होते पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या G-20 परिषदेत 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) हा भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर होण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे.

भारतीय सरकारची भूमिका ह्या विषयावर अत्यंत योग्य राहिली आहे. भारत सरकारने, मग कुणाचेही का असेना, पेलेस्टिनीं लोकांना जीवनावश्यक मदत केली आहे. भारताने मागील काही वर्षांत $२२ दशलक्ष डॉलर्स ची मदत ह्या लोकांना केली आहे. तुलनेने पाकिस्तान ने $८००० दिले आहेत. ह्याशिवाय विद्यार्थ्यांना मदत, एक्सचेंज प्रोग्रॅम्स, योगा दिवस असे विविध प्रकल्प वेस्ट बॅंक मध्ये राबवले आहेत. ह्यांत कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही. त्याच वेळी इस्राएल पैसे घेऊन भारताला संरक्षण सामुग्री देतो, विविध प्रकारची गोपनीय माहिती पुरवतो इत्यादी मुले इस्राएल बरोबर सुद्धा विविध सरकारांनी अत्यंत चांगले संबंध ठेवले आहेत. इस्राएल पॅलेस्टिन वर भारतीय विदेश नीती योग्य राहिली आहे.

राहिला विषय IMEC चा. G२० च्या इतर विषयाप्रमाणेच हि सुद्धा धूळफेक आहे आणि आमच्या हयातीत हा प्रकल्प फक्त चर्चिला जाईल. 'बेल्ट अँड रोड' हा प्रकल्प सुद्धा ह्याच प्रकारे पूर्णतः अपयशी ठरणार आहे. IMEC प्रकल्पाला इराण आणि रशिया विविध प्रकारे साबोटेज करतील तो विषय वेगळा.

पॅलेस्टिनी लोकांच्या दयनीय अवस्थेबद्दल मला खरोखर वाईट वाटते. पण त्याच वेळी अत्यंत मागासलेल्या अश्या लोकांत आणखीन वेगळे काही घडले असते असे मला वाटत नाही. इस्राएल यहुदी असले तरी तेथील १०% लोकसंख्या अरब आहे. अरब लोक तिथे सुरक्षित आणि आरामात राहतात. पॅलेस्टिनी लोकांनी इराणी मदतीने हमास ला पुढे काढण्याच्या ऐवजी जर अरब राष्ट्रांची मदत घेऊन आर्थिक समृद्धीवर लक्ष केंद्रित केले असते (उदाहरणार्थ तैवान) तर शांतता पूर्ण मार्गाने ह्या प्रदेशाला इतर जगाकडून जास्त मान्यता मिळाली असती. सध्या हे लोक इतके मागासलेले आणि हिंसक आहेत कि अरब राष्ट्रे सुद्दा ह्या देशांतून पुरुष शरणार्थी घेणार नाहीत. पण ह्या प्रदेशांतील लहान मुलांबद्दल वाईट वाटते.

इस्राएल ने ह्या प्रदेशांतील प्रजनन दर २ पेक्षा खाली आणण्यावर भर दिला पाहिजे होता. तो सध्या ४ च्या आसपास आहे. भारताने काश्मीर मध्ये हा रेट १.४ म्हणजे देशांत गोवा आणि सिक्कीम च्या बरोबर आणला आहे आणि त्याचे चांगले परिणाम हळू हळू दिसत आहेतच.

बाकी इस्त्रायल, पॅलेस्टाईनशी कसे वागायचे ते मरु द्या... इथल्या अनेकांशी कसे वागायचे ते कळले. अनेकांचे मुखवटे मस्त उघडे पडलेले पाहून मजा आली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Oct 2023 - 2:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तम लेखन मांडणी. वाचत आहे. लेखन प्रतिसाद मातीपूर्ण आहेत.
पुलेशु.

-दिलीप बिरुटे

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Oct 2023 - 4:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

वर्तमान् पत्रातील बातम्या आणि तूनळीवरील चर्चा ह्यातुन मला समजले ते ईथे मांडतोय

ज्यू लोकांना कधीच स्वतःची भूमि नव्हती. दुसर्‍या महायुद्धापर्यंत ज्यू लोकांनी तन मन धनाने अमेरिकेला आणि पर्यायाने दोस्त राष्ट्रांना जी मदत केली, त्याचा मोबदला म्हणुन त्यानी एक जमिनीचा तुकडा मागितला. जेरुसलेम हे पुर्वापार त्यांचे श्रद्धास्थान असल्याने ही जमीन तिथेच कुठेतरी मिळावी ही त्यांची ईच्छा असावी(?). अमेरिकेलाही भौगोलिक दृष्टीने ते सोयीचे होते कारण लांब अंतर. मग पॅलेस्टीनी लोकांची फारशी पत्रास न बाळगता काही करार मदार करुन तिथला एक तुकडा ज्यू लोकांना च्तोडुन दिला गेला. साधारण ४४% ज्यू आणि ४८% पॅलेस्टीनी असा काहीसा करार होता. पण आधीच ज्यूनी तिथे हळूहळू आपली संख्या वाढवायला सुरुवात केली होती. इस्त्रायल देश तयार झाल्यावर वेळोवेळी आपले हात्पाय पसरुन ज्यू नी अजुन अजुन भूभाग काबीज केला. आता फक्त गाझा आणि वेस्ट बँक पॅलेस्टीन कडे आहेत. पॅलेस्टीन चे स्वतंत्र सैन्य नाही ते अगतिक आहेत, तर इस्त्रायल पुर्ण सज्ज आहे. असमान संघर्ष आहे.

भारताने युद्ध नको--ह्याच बाजुने राहणे चांगले.

रात्रीचे चांदणे's picture

13 Oct 2023 - 7:04 pm | रात्रीचे चांदणे

ज्यू लोकांनी आफ्रिकेच्या युगांडा का आणखी कोणत्या देशाकडे त्याच्यासाठी जमीन विकतही मागितलेली होती, जमीन विकत घेऊन ते त्यांचा देश तिथे स्थापन करणार होते. यूट्यूब वरील एका चर्चेत हे मी ऐकेल आहे.

रंगीला रतन's picture

13 Oct 2023 - 7:26 pm | रंगीला रतन

वाचतोय. चांगली चर्चा चालू आहे

चौथा कोनाडा's picture

14 Oct 2023 - 5:41 pm | चौथा कोनाडा

हा विषय आधी थोडा फार माहित होताच .. या छान अभ्यासपूर्ण लेखामुळे (नकाशा सहित) आणि चर्चांमुळे ज्ञानात आणखी भर पडली.
धन्यु टर्मी !

असे विषय साचत गेले की कोण जास्त बरोबर हे ति-हाईत लोक छातीठोकपणे सांगू शकत नाहीत ! कधी हा बरोबर तर कधी तो बरोबर असंच दिसतं... न्याय अन्यायाचा लढा सुरूच रहातो... युद्ध धगधगत राहतं .... आपल्यासाठी खलीस्तानचा मुद्दा धगधगत आहेच !

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !

मुक्त विहारि's picture

14 Oct 2023 - 11:26 pm | मुक्त विहारि

+1

भारत , युनायटेड स्टेट्स , संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, फ्रान्स , जर्मनी , इटली आणि युरोपियन युनियन या सरकारांद्वारे 2023 G20 नवी दिल्ली शिखर परिषदेदरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. विकिमध्ये यात इस्रायलचे नाव नाही,

व्हाईट हाऊस च्या प्रसिद्धी मध्ये ही तसा उल्लेख नाहीये.
या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन, भारतीय प्रजासत्ताक, संयुक्त अरब अमिराती (यूएई), फ्रेंच प्रजासत्ताक, जर्मनीचे फेडरल रिपब्लिक, इटालियन प्रजासत्ताक आणि संयुक्त राज्य सरकारे अमेरिका राज्ये ("सहभागी") भारत - मध्य पूर्व - युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC) स्थापन करण्यासाठी एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहेत.

इस्रायल या करारात नाहीये का?

निनाद,

इस्रायल करारात नसला तरी तुम्ही दिलेल्या धवलगृहाच्या दुव्यावर लाभार्थी म्हणून दिसतो आहे :

.... enabling goods and services to transit to, from, and between India, the UAE, Saudi Arabia, Jordan, Israel, and Europe.

- नाठाळ नठ्या

नठ्यारा's picture

16 Oct 2023 - 12:22 pm | नठ्यारा

निनाद,

मला वाटतं की इस्रायल संस्थापक नसल्यामुळे त्याने दिल्ली करारावर स्वाक्षरी केली नसावी. यथावकाश सदस्य म्हणून दाखल होईल.

- नाठाळ नठ्या

इस्त्रायलने अत्यंत घातक व्हाइट फॉस्फोरस बॉम्ब वापरल्याचा आरोप होत आहे.व्हाइट फॉस्फोरस बॉम्ब हवेतल्या ओक्सिजनच्या संपर्कात आल्यावर पेट घेऊन ८०० डिग्री पर्यंत तापमान होते.

जी माणसं आगीत होरपळून मृत पडत नाहीत, त्यांचा श्वास कोंडून जीव जातो. पाणी टाकल्यानंतरही तो सहजासहजी विझत नाही. उलट धुराचे लोट तयार करत अधिक पसरतो. फॉस्फरस बॉम्ब १३०० डिग्री सेल्सिअसपर्यंत पेटू शकतो. त्यामुळे हाडंही वितळतात. या बॉम्बच्या संपर्कात आलेली व्यक्ती सुदैवानं वाचलीच, तरीही त्याला आयुष्यभर मरणयातना सहन कराव्या लागतात. त्याला सातत्यानं गंभीर संक्रमणाचा सामना करावा लागतो. त्याचं आयुष्य कमी होतं. त्वचेवरील संसर्ग बऱ्याचदा रक्तापर्यंत पोहोचतो. त्यामुळे हृदय, यकृत, किडनीचं नुकसान होतं. यामुळे शरीरातील अनेक अवयव बंद पडण्याची शक्यता वाढते.
-मटा

रंगीला रतन's picture

16 Oct 2023 - 8:45 pm | रंगीला रतन

डेंजर काम आहे.

कॉमी's picture

16 Oct 2023 - 9:14 pm | कॉमी

अजून तितके रीलायेबल नाहीये. ह्युमन राईट्स वॉच नामे संस्थेने ह्यावर रिपोर्ट केले आहे. इजरायल ने ह्या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यामुळे खरे काय माहीत नाही.

खरं असुदे. जन्नतमधली बिर्याणी थंड व्हायच्या आधी हरामखोर हमासवाल्यांना खायला तरी भेटेल!

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Oct 2023 - 10:27 pm | अमरेंद्र बाहुबली

+७८६

रशियाने ही २०२२ मध्ये युक्रेन विरूद्ध हा बॉम्ब वापरला होता.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Oct 2023 - 8:31 pm | अमरेंद्र बाहुबली

काही नाही. ९९ प्रतिसाद होते. १०० पुर्ण केले. :)

आपला सत्कार गाझा पट्टी चे तिकीट देऊन करायला पाहिजे .

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Oct 2023 - 10:36 pm | अमरेंद्र बाहुबली

तीथं पाणी नाय, वीज नाय, अन्न नाय. कधी इस्रायलचं राकेट येऊन पडंल ह्याचा भरवसा नाय, काय कराचं जाऊन?

निनाद's picture

18 Oct 2023 - 6:25 am | निनाद

हमास चे नेतृत्त्व हे चक्क कम्युनिस्ट आहे आणि पोलिट्ब्युरो ठरवेल तशी दिशा असते.
यांना कम्युनिझम चे नेतृत्त्व चालते?

यांना कम्युनिझम चे नेतृत्त्व चालते?

कम्युनिझम पॅलेस्टाईनमध्ये तसा नवा नाही. १९८७ साली अस्तित्वात आलेल्या हमास ह्या दहशतवादी संघटनेच्या आधी दोन दशके म्हणजे सिक्स डे वॉर नंतर अवघ्या सहा महिन्यांनी १९६७ च्या डिसेंबर महिन्यात पॅलेस्टाईन मुक्तीसाठी 'मार्क्सवादी-लेनिनिस्ट पॉप्युलर फ्रंट'ची स्थापना झाली होती. पुढच्या दशकात ह्या डाव्या गटांनी केलेले अनेक रक्तरंजित हल्ले आणि विमानांचे अपहरण अशा घटनांतून पॅलेस्टाईनकडे जगाचे लक्ष वेधून घेतले होते.

हमास हे मुस्लिम ब्रदरहूड ह्या जिहादी/दहशतवादी संघटनेचे अपत्य मानले जाते. मुस्लिम ब्रदरहूडच्या संस्थापकाच्या विचारांवर नाझीझम आणि फॅसिझमचा प्रभाव होता. हमास ह्या त्यांच्या अपत्याने 'इस्रायलचा सर्वनाश' हे आपले एकमेव ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या कार्यपद्धतीत त्या दोन विचारांबरोबरच कम्युनिस्ट कार्यपद्धतीचाही समावेश केला. पॉलिटब्युरोतील सर्वोच्च नेत्यांना स्वतः परदेशात (मुख्यत्वे टर्की मध्ये) सुरक्षित बसून स्थानिक दुय्यम नेतेमंडळी आणि आपला जीव धोक्यात घालणाऱ्या कार्यकर्ते, अनुयायी, समर्थकांना आदेश देणे छान सोयीचे पडते. ग्राउंड लेव्हलवर काहीही होवो, ही नेतेमंडळी मात्र परदेशात सुरक्षित असतात 😀

मुक्त विहारि's picture

18 Oct 2023 - 5:45 pm | मुक्त विहारि

नेतेमंडळी मात्र परदेशात सुरक्षित असतात ...

---

पटले

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Oct 2023 - 4:48 pm | अमरेंद्र बाहुबली

काय नवी खबरबात??

खबरबात तर आहे. तीच लिहायला मिपावर आलो होतो, पण ते पडले बाजुला, त्याऐवजी एक कथा टंकत बसलो आहे 😀

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Oct 2023 - 7:09 pm | अमरेंद्र बाहुबली

सांगा की.

समाज माध्यमावर ज्यू विरोध आणि हिटलरचे समर्थन करणे पडले महाग!

“No wonder why Hitler wanted to get rid of all of them,”

असे इंस्टाग्राम वरील आपल्या स्टोरी मध्ये लिहिणे 'नोजिमा हुसाइनोवा' नावाच्या पंचवीस वर्षीय तरुणीला महागात पडले आहे.
ही तरुणी सिटी बँकेची कर्मचारी होती आणि इंस्टाग्राम आणि X (पूर्वाश्रमीचे ट्वीटर) अशा समाज माध्यमंवर व्हायरल झालेल्या तिच्या ज्यू-विरोधी विचाराच्या आणि हिटलरने केलेल्या हत्याकांडाचे समर्थन करणाऱ्या पोस्ट्सवर उमटलेल्या वापरकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रियांच्या परिणामी तीला आपली नोकरी गमवावी लागली आहे.

सिटी बँकेने ह्या प्रकरणाची गंभीर दखल घेत तीला कामावरून कमी केल्याची पोस्ट X वर केली आहे.

तिच्या ह्या बेजवाबदार कॉमेंटमुळे जवळपास सर्वच समाज माध्यमांवरील तिच्या प्रोफाइल्स डिलीट करण्यात आल्या आहेत.

आपली ओळख लपवून एखाद्या टोपणनावामागे लपून वाट्टेल त्या हिडीस गोष्टींचे समर्थन करणाऱ्यांच्या पराक्रमाची तुलना ही शिखंडीच्या मागे लपून शरसंधान करणाऱ्या अर्जुनाच्या त्या निंदनीय पराक्रमाशीच होऊ शकते, परंतु आपली ओळख जाहीर असताना केलेल्या विधानाचे परिणाम भोगलेल्या ह्या तरुणीविषयी तिचे कृत्य चुकीचे असले तरी वर उल्लेख केलेल्या भेकड लोकांपेक्षा जास्त आदर वाटतो 😀

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Oct 2023 - 12:11 am | अमरेंद्र बाहुबली

पण नोकरी गेली ना. :(

रात्रीचे चांदणे's picture

21 Oct 2023 - 6:57 am | रात्रीचे चांदणे

Al-islamic Bank of... अशा कोणत्या तरी बँकेत तीला मिळेल नोकरी.

अहिरावण's picture

20 Oct 2023 - 7:04 pm | अहिरावण

>>>काय नवी खबरबात??

काही नाही. तोच गुल तीच काडी...

कधी हा पेटवतो कधी तो... कधी पेटते कधी विझते

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Oct 2023 - 7:10 pm | अमरेंद्र बाहुबली

मी इस्रायल चा साहानुभूतीदार असल्यानं काळजी वाटते.

अहिरावण's picture

21 Oct 2023 - 10:31 am | अहिरावण

आम्हाला मानवतेची काळजी वाटते.

काय करणार सनातनी वृत्ती आहे आमची. पिंडच असा घडला आहे.

जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो || भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें ||
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः । सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Oct 2023 - 12:52 pm | अमरेंद्र बाहुबली

मी मानवतावादी असल्यानेच मला इस्रायल ची काळजी वाटते. आजूबाजूला सर्वच शत्रू आहेत त्यांच्या.

अहिरावण's picture

21 Oct 2023 - 2:43 pm | अहिरावण

शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा। शत्रु बुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते।

खरा मानवतावादी... अर्थात फक्त आणि फक्त सनातनी.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Oct 2023 - 9:18 pm | अमरेंद्र बाहुबली

माझा सनातन प्रभातला पाठिंबा आहे.

अहिरावण's picture

22 Oct 2023 - 10:50 am | अहिरावण

तुम्ही छुपे सनातनी आहात असा संशय होताच. आता खात्री पटली.

कंजूस's picture

21 Oct 2023 - 8:23 pm | कंजूस

Canada भारत वितुष्ट

हा एक ज्वलंत प्रश्न होत आहे. कालच्या ट्रुडोच्या वक्तव्याने जाळ वाढला आहे.

टर्मीनेटर's picture

21 Oct 2023 - 11:34 pm | टर्मीनेटर

'सॅटरडे नाईट, फुल टाईट' हा आपला फंडा असल्याने ह्या विषयावर उद्या बोलतो 😀

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Oct 2023 - 9:18 pm | अमरेंद्र बाहुबली

जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फेझर यांनी घोषणा केलीय की हमासला पाठिंबा देणाऱ्यांना देशातून हद्दपार केले जाईल.

मुक्त विहारि's picture

22 Oct 2023 - 9:22 am | मुक्त विहारि

उत्तम निर्णय घेतला..

>>जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फेझर यांनी घोषणा केलीय की हमासला पाठिंबा देणाऱ्यांना देशातून हद्दपार केले जाईल.

आणि पॅलेस्टीनला पाठिंबा दिला तर?

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Oct 2023 - 11:17 am | अमरेंद्र बाहुबली

पॅलेस्टीनआड हमासला पाठिंबा दिला तर?

अहिरावण's picture

22 Oct 2023 - 7:07 pm | अहिरावण

ईस्त्रायलच्या आड अ‍ॅग्लो सॅक्सनांच्या फुटीर आणि विद्वेषी वृत्तीला पाठिंबा दिला तर?

मुक्त विहारि's picture

22 Oct 2023 - 9:52 am | मुक्त विहारि

""बसमध्ये भरून गाझाला पाठवेन"; युद्धादरम्यान आपल्या नागरिकांवरच संतापले इस्रायली अधिकारी - Marathi News | israeli police chief kobi shabtai threatens anti war protesters of israel to send gaza in buses | Latest international News at Lokmat.com" https://www.lokmat.com/international/israeli-police-chief-kobi-shabtai-t...

------

अतिशय उत्तम निर्णय....

राष्ट्र प्रथम...

भारतातून बसेस भरुन पाठवायच्या तर किती बसेस लागतील? किती डिझेल?
जाऊ द्या ! आहे तसेच राहूद्या !

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Oct 2023 - 4:56 pm | अमरेंद्र बाहुबली

गाझा नी वेस्ट बॅंक वर जोरात हल्ला चढवलाय म्हणे इस्रायलनं.
मला वाटतंय वेस्च बॅंकेतील पैसा लूटायचा असावा. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Oct 2023 - 8:16 am | अमरेंद्र बाहुबली

Israel–Hamas war: संकटात सापडलेल्या पॅलेस्टिनींसाठी भारताचा मदतीचा हात, गाझामध्ये पाठवली मोठी मदत

:)

https://www.esakal.com/global/israelhamas-war-india-helping-hand-for-pal...

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Oct 2023 - 8:40 am | अमरेंद्र बाहुबली

मुक्तविहारी काका कुठं हायती?? दिसना झालंत. :)

मुक्त विहारि's picture

23 Oct 2023 - 6:07 pm | मुक्त विहारि

भारतीय इतिहासातून काहीही शिकत नाहीत...

नको तिथे उदारमतवाद...

हीच गोष्ट, पृथ्वीराज चौहान यांनी केली होती आणि हीच चूक प्रतापराव गुजर यांनी केली होती...

पाहुण्याच्या काठीने साप मरत असेल तर, आपण सापाला वाचवायला जाऊ नये... हीच हमास नंतर भारत विरोधी कारवाया करायला मागे पुढे पाहणार नाही...

रंगीला रतन's picture

23 Oct 2023 - 6:55 pm | रंगीला रतन

सहमत.

रंगीला रतन's picture

23 Oct 2023 - 7:57 pm | रंगीला रतन

घानेरडी मूव्ह.

रंगीला रतन's picture

23 Oct 2023 - 7:59 pm | रंगीला रतन

प्रतिसाद अमरेंद्र बाहुबली यांच्या प्रतिसादावर आहे

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Oct 2023 - 10:22 pm | अमरेंद्र बाहुबली

भारतीय सरकारे बाय डिफोल्ट मुर्ख असतात हे पुन्हा सिध्द झालं मुळात जो शत्रू आहे त्याला मित्र बनवायच्या नादात जवळचा मित्र तर जाईलच पण शत्रुही शत्रुच राहील.
इस्रायल हा अमावस्येचा चंद्र आहे तो वाढतच जाणार आहे कधीच आकसनार नाहीये. आणखी शंभर दिडशे वर्षांनी लेबनान, सिरीया, जार्डन वगैरे गिळून इस्रायल अमेरीकेसारखं एक महाभलाढ्य राष्ट्र म्हणून पुढे येणार आहे.

मुक्त विहारि's picture

24 Oct 2023 - 5:22 pm | मुक्त विहारि

पाकिस्तान, बांगलादेश किंवा पॅलेस्टाईन पेक्षा.. इस्त्रायल उत्तम...

बौद्ध मूर्तींचे तोडफोड केल्या पासून, अफगाणिस्तान देखील बेभरवशी आहे..

बाकी इतर आखाती देश, आपल्या सीमेपासून दूर असल्याने, जितक्यास तितके संबंध उत्तम....

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Oct 2023 - 12:49 pm | अमरेंद्र बाहुबली

काही अपडेट?? इस्रायल सैन्य गाझाच्या वेशीवर ऊभं होतं ते आत घुसलंय की नाही?? मानवतावादी, दवाखाना संघटना (WHO) इस्रायल ला हाग्यादम भरताहेत अश्या बातम्या आल्या होत्या. हमास ने हल्ला केला तेव्हा झोपल्या होत्या का ह्या संघटना??

गेल्या २४ तासांत गाझा पट्टीतील सुमारे ४०० हमासच्या तळांवर इस्त्रायलने केलेल्या बॉम्बवर्षावात एकूण ७०४ जण (हमासचे दहशतवादी + पॅलेस्टिनी लोकं) मृत्युमुखी पडले आहेत. सध्या सुरु असलेल्या युद्धात इस्त्रायलच्या प्रतिहल्ल्यात २४ तासांत मृत्युमुखी पडणाऱ्यांचा हा आकडा आत्तापर्यंतचा सर्वात जास्त असल्याचे म्हंटले जात आहे.
सुमारे २२० ओलीसांची सुटका हमास करत नाही तोपर्यंत हे हल्ले सुरूच राहणार असून गाझा पट्टी 'हमास मुक्त' करण्याचे आमचे हे अभियान दीर्घकाळ चालेल असे इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने म्हंटले आहे!

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Oct 2023 - 3:22 pm | अमरेंद्र बाहुबली

इस्रायलशी वाकडं त्याचे नदीवर लाकडं,
इस्रायलशी नीट त्याला सोन्याची वीट.

हे पण नाही...

पण, इस्त्रायलची सीमा, आपल्याला लागून नसल्याने, जमीन बळकावणे हा त्रास नाही...

शिवाय, येन केन प्रकारेण, आपला धर्म वाढवावा ही ज्यु लोकांची भूमिका आत्ता तरी नाही...

ही नेहमीचीच पद्धत आहे.

आधी खोडी काढायची आणि मग अशा संघटनांना ढाल म्हणुन पुढे करायचे.

ते नाहीच जमले तर, आपलेच उदारमतवादी ढाल म्हणुन पुढे येतातच...

हमासने हल्ला केला म्हणून फक्त निषेध व्यक्त करतील आणि हमास म्हणजे पॅलेस्टाईन नाही, अशी सारवासारव करतील.

हे म्हणजे, लष्कर ते तोयबा, म्हणजे पाकिस्तानी नाहीत, असेच म्हणण्या सारखे आहे..

जाता जाता एक उदाहरण देतो...

कसाबने हल्ला केला तेंव्हा मी कुवैतला होतो. कितीतरी पाकिस्तानी कसाबने हल्ला केल्याने खुष होते.

बरे झाले की, मी आखाती देशांत काम केले. माझे उदारमतवादी धोरण गळून गेले.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Oct 2023 - 8:27 pm | अमरेंद्र बाहुबली

काल इस्रायलच्या राजदुताने भारताला विनंती केलीय की भारताने हमास ला दहशतवादी संघटना घोषीत करावी. ( म्हणजे पहा भारतीची भूमिका किती लेचीपेची आहे.)

म्हणजे पहा भारतीची भूमिका किती लेचीपेची आहे.

भारताची पॅलेस्टाईन आणि इस्त्रायलबाबतची भूमिका पूर्वीपासूनच अत्यंत दळभद्री राहिली आहे.
१०० पेक्षा जास्ती देशांनी दहशतवादी घोषित केलेल्या आणि 'आधुनिक दहशतवादाचा जनक' म्हणवल्या जाणाऱ्या 'यासर अराफत' सारख्या पॅलेस्टिनी नेत्याला भारताने पहिल्यांदा 'नेहरू गुड-विल पुरस्कार' हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. भारताच्या ह्या कृतीमुळे त्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची 'गरिमा' इतकी वाढली होती कि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ह्या पुरस्कार सोहळ्याला मीडिया कव्हरेज देणे बंद केले होते.
हि एकच नाही, तर अशा अनंत चुका आपल्या पूर्वसुरींनी इतिहासात करून ठेवल्या आहेत पण राजकीय चर्चांना मिपावर बंदी असल्याने त्यावर भाष्य करणे टाळतो. तसेही आपल्या देशात व्यक्तिपूजक खूप लोकं जास्त असल्याने त्या निंदनीय कृतींचेही समर्थन करण्यास ते लोक मागेपुढे पाहात / पहाणार नाहीत.
फक्त भुतकाळातल्या चुकांची वर्तमानात आणि भविष्यात भारताकडुन पुनरावृत्ती होउ नये एवढीच अपेक्षा!

भुतकाळातल्या चुकांची वर्तमानात आणि भविष्यात भारताकडुन पुनरावृत्ती होउ नये एवढीच अपेक्षा!

-----

अपेक्षा ठेवून, काहीही फायदा नाही...

हिंदू इतिहासातून काहीही शिकत नाहीत. हिन्दू कधीच एकजूट झालेले नाहीत, आज ही नाहीत आणि पुढेही होणार नाहीत....

अहिरावण's picture

27 Oct 2023 - 10:57 am | अहिरावण

>>>हिंदू इतिहासातून काहीही शिकत नाहीत. हिन्दू कधीच एकजूट झालेले नाहीत, आज ही नाहीत आणि पुढेही होणार नाहीत....

तरीही मुसलमानांना पाच पन्नास वर्षात युरोप, आफ्रिकेतील पूर्ण देश मुसलमान करायला जमले ते हजार वर्षे घालवून ५० टक्के पण जमले नाही.

मुक्त विहारि's picture

27 Oct 2023 - 5:11 pm | मुक्त विहारि

लचीत बडफुकन, छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, राणा संगा हे जन्माला येत होते...

आता, कुणीही येणार नाही...

का येणार नाही? ह्याची कारणे, प्रत्येकाने आपापल्या परीने शोधावित...

एक साधे उदाहरण देतो... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजात देखील एकवाक्यता किंवा एकाच पक्षात येण्याची समान विचारधारा नाही...

अहिरावण's picture

28 Oct 2023 - 10:59 am | अहिरावण

>>आता, कुणीही येणार नाही...
लचीत बडफुकन, छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, राणा संगा जन्माला येण्याआधी सगळे असेच म्हणत होते

>> छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजात देखील एकवाक्यता किंवा एकाच पक्षात येण्याची समान विचारधारा नाही...
प्रत्येक वेळेस एकाच वंशाकडून अपेक्षा नको. मग राहुलबाबा मी पीएम होतो म्हटले तर काय चूक?

माझा मुद्दा सरळ आहे - उद्याचा भविष्यकाल कोणी पाह्यला आहे?

आजपासून ५, ५०, ५००, ५००० वर्षांनी काय स्थिती असेल ते आज सांगता येत नाही. पण म्हणून स्थिती अजून बिघडणारच आहे असे मानणे चूक राहील.

बांगलादेश आणि पाकिस्तान, हे भारताचेच भाग होते..

आणि आत्ता हे दोन्ही वेगळे देश आहेत...

हिंदू एक झाले नाहीत तर, जे पर्शिया आणि अफगानिस्तान बाबतीत झाले, ते भारतात व्हायला वेळ लागणार नाही...

जाऊ दे...

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Oct 2023 - 10:43 pm | अमरेंद्र बाहुबली

डिवायडेड बाय कांग्रेस भाजप
युनायटेड बाय दळभद्रीपणा.
:)

रंगीला रतन's picture

27 Oct 2023 - 11:33 pm | रंगीला रतन

+२७१०२०२३

अहिरावण's picture

28 Oct 2023 - 11:01 am | अहिरावण

डिवायडेड बाय कास्ट
युनायटेड बाय कल्चर
:)

कल का किसने देखा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2023 - 11:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पॅलेस्टिनी भूमितील जमीन बळकावण्याच्या इस्त्रायलच्या धोरणास विरोध करणा-या ठरावाच्या बाजूने भारताने संयुक्तराष्ट्राच्या आमसभेत मतदान केले. या धोरणाचा भारताला कसा फायदा होईल ? जाणकारांच्या मताच्या प्रतिक्षेत. ( लोकसत्ता : तोतरेपणास तिलांजली)

-दिलीप बिरुटे

टर्मीनेटर's picture

14 Nov 2023 - 11:58 am | टर्मीनेटर

बाकी काही म्हणा, लोकसत्ताचे अग्रलेख मात्र विनोदी असतात, चांगली करमणूक होते 😀
तूर्तास इतकेच लिहून थांबतो, उगाच देशी राजकारणावरील चर्चेला तोंड फुटून मिपावरचे सध्याचे उत्सवी वातावरण दूषित व्हायला नको!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2023 - 5:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकसत्ताचा लेख आपणास विनोदी वाटला असेल वाटु द्या. मतं व्यक्तीसापेक्ष विचारसापेक्ष असतात. भारत सरकारने घेतलेल्या मतावर आपली अभ्यासपूर्ण मतं वाचायला आवडतील. अर्थात, याच धाग्यात आपली दोन वेगवेगळी मतं इथेच वाचायला मिळाली आहेत. ''साधारणपणे दिडेक दशकापुर्वी पर्यंत पॅलेस्टाईन आणि पर्यायाने हमास सारख्या दह्शतवादी संघटनेचा सहानुभुतीदार होतो'' ''पण पुढे आंतरजालाच्या वाढत्या प्रसारामुळे ह्या संघर्षाची दुसरी बाजु समजु लागली'' पहिली आणि दुसरी बाजूबरोबर आणखी एक मत वाचायला आपल्याच प्रतिसादात मिळते ''विद्यमान सरकारच्या आधीच्या भूमिकेविषयी समाधानी असलो तरी (कालांतराने वाजवलेल्या) डबल ढोलकीवर पण भाष्य केले असते'' ?

इस्रायल पैसे घेऊन भारताला संरक्षण सामुग्री देतो, मदत करतो आपण इस्त्रायलला मदत केली आहे. आता इस्त्रायलविरोधी भुमिका घेवून भारत काय साधत आहे, आता जगमानस गाझाला मदत केली पाहिजे असे म्हणत आहे. पूर्वी औषधोपचार आणि विषयावर आपण तटस्थ राहिलो आहोत आणि आता मदतीला तयार आहोत. स्थानिकांच्या जीवनमानाचा प्रश्न लोकसत्ता विचारते ते चुक आहे किंवा विनोदी आहे ? आपण या विषयावर फार सविस्तर लिहिले आहे. लोकसत्ताचा विनोद कुठे आहे, तेही समजून घ्यायचंय आणि सध्या भारताच्या धोरणाबद्दल आपलं मतही वाचायला आवडेल.

उत्तर लिहिलेच पाहिजे असा आग्रह नाही. एक वाचक म्हणून सर्व नीट समजून घ्यायचंय इतकंच.

-दिलीप बिरुटे

उदारमतवादी असतात..

मी, लोकसत्ता मधील फक्त बातम्या वाचतो....

लोकसत्ता वाचून मी माझी मते बनवत नाही...

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Nov 2023 - 10:23 pm | अमरेंद्र बाहुबली

पुढं काय झालं??

चार दिवसांचा युध्दविराम घोषित झाला वाटत. दोन्ही बाजू एकमेकांचे काही ओलीस \ कैदी यांची सुटका करणार आहेत असे पण वाचले. लहान मुले, म्हातारी माणसे वैगैरेंची सुटका झाली तर चांगलेच आहे.
पण दक्षिण गाझाचे संपूर्ण निर्लष्करीकरण करायची इस्राईलची मागणी \ इच्छा पूर्ण होणे कठीण दिसत आहे. तरी पण ईस्राईल गाझाचा छोटा का होईना पण लचका तोडेल असे मला वाटते.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Nov 2023 - 7:10 pm | अमरेंद्र बाहुबली

नाही तोडला तर इस्राईल ला मुर्ख म्हणायल हवे. एक बरंय पण इतर देशांना भिक न घालता इस्रायल न हल्ले सुरूच ठेवले. मानवतेच्या नावाखाली इस्रायलने मुर्खपणा केला असता तर त्याचाही भारत झाला असता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2023 - 12:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निरपराध माणूस युद्धात माणूस मरतो. इस्त्रायलच्या डोक्यावर टेंगुळ आला पण गाझापट्टीतील निरपराधांचे अमानुष बळी घेतले. माणसाचे मरणे दुःखदायक असतं. कोण चुक कोण बरोबर त्यापेक्षा मानवतेचा विचार मोठा वाटतो.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Nov 2023 - 1:02 pm | अमरेंद्र बाहुबली

गाझातील लोकांना आपण निरपराध परस्पर कसे ठरवलेत?? ४८ किमीच्या चिंचोळ्या पट्टीत हमासचे लोक कुठे लपून बसलेत हे त्या बिचार्या “निरपराध” लोकांना खरंच माहीत नाही?? की त्यांनीच लपवून ठेवलेत?? इस्रायलचे लोक मेले तेव्हा ह्या निरपराध लोकांनी म्हणे आनंदत्सव साजरा केला होता. त्यावेळी मरण दुखदायक नसतं का? तेव्हा कुठे होता मानवतेचा विचार?? की फक्त गाझातील अतिरेकी लपवनारे गाझावासी मेले की मानवतेची आठवण येते?? इस्रायलचे ज्यू मेले तेव्हा मानवता कुठे जाते?? की इस्राईलच्या लोकांना माणूस मानलं जात नाही??
गाझात एकूण एक अतिरेकी आहे, त्यांनीच हमासला निवडूण दिलंय नी तेच लोक हमासचे कमांडर वगैरे लपवून ठेवतात, इस्राइलचे लोक मेले की आनंदोत्सव साजरा करतात नी इस्राईलने चांगलं झोडपून काढलं की मग जगासमोर गळे काढायला मोकळे.

एक छोटीशी शंका आहे. हमास इस्राएलच्या स्थापनेची प्रतिक्रिया म्हणून जन्माला आली कि काही उडाणटप्पू, चेंडू ऐवजी हॅन्डग्रेनेड शी खेळणाऱ्या लोकांमुळे जन्माला आली?

बाकी हिंदू, त्यातही भारत आणि महाराष्ट्रात जाणीवपूर्वक जन्म घेतला त्या सर्वांविषयी मला खूपच आदर आहे. हे असं ठरवून कसा जन्म घेता येतो ये कळले तर बरे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2023 - 3:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिरेकी गाझात असू दे की इस्रायलमधे अतिरेकी संपवायचे म्हणून निरपराध लोक मरू नयेत..मग ते इस्रायलचे ज्यु असोत की गाझातले नागरिक. दोन्हीकडील सामान्य लोक मरणे हे दुःखदायक.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

25 Nov 2023 - 6:24 pm | सुबोध खरे

गाझा पट्टीतील सामान्य माणसे अतिरेक्यांना आधार आणि सहाय्य्य करत असतील तर ते संपूर्णपणे निर्दोषी आणि निरपराध मानता येईल का?

इस्रायली स्त्रियांवर बलात्कार होताना किंवा अर्भकांवर अत्याचार होताना हि माणसे अमानुषपणे नाचणार असतील तर त्यांच्य्याबद्दल जगाला सहानुभूती वाटेल का?

According to the Organization for Economic Cooperation and Development, aid to Palestinians totaled over $40 billion between 1994 and 2020.

तीन लाख वीस हजार कोटी रुपये ईतकी मानवतावादासाठी दिलेली मदत जर केवळ भुयारे/ तळघरे खणण्यात आणि क्षेपणास्त्रे अन अग्नीबाण बनवण्यात जाणार असेल तर जगातील लोकांनी नक्की विचार करायला हवा कि आपले दान सत्पात्री आहे का?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Nov 2023 - 7:18 pm | अमरेंद्र बाहुबली

हेच तर मी सांगतोय, हजारो करोडोची मदत घेऊनही गाझावासी भिक मागत फिरतात नी इस्राइलच्या नावाने बोटे मोडतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Nov 2023 - 7:53 pm | अमरेंद्र बाहुबली

अतिरेकी लपवनारे निरपराध कसे?