भासमान

पॅपिलॉन's picture
पॅपिलॉन in जे न देखे रवी...
17 Dec 2008 - 7:56 pm

नेहेमी दिसणारी एखादी अनोळखी पण आवडणारी व्यक्ती जेव्हा अचानक दिसायची बंद होते तेव्हा तीची प्रकर्षाने आठवण येते आणि मग जळी-स्थळी त्या व्यक्तीचे भास होऊ लागतात.

अवचित कोठे, कुण्या दिशेने भासमान तू होते
हर्ष, खेद, हुरहुर, विशादीं मनास बूडवून जाते

आकृती कुठे वा नाद कुठे, नुसत्याच कुठे वा बटा
कुठे धुंद ती झाडे अथवा कुठे झिंगल्यां वाटा

गर्द वादळी तीच हवा, त्या हलक्या वर्षाधारा
रणरणत्या त्या उन्हातला वा ऊष्ण सुगंगित वारा

हसले कोणी गोड तिथे वा अडखळी ती चाल
नजर बावरी असे कुणाची, तेच शर्मिले गाल

नसे जरी तू रूपांमध्यें या, अरूप तुझी ही मूर्ती
असे चिरंतर हृदयामध्ये, दृष्यमान भोवती

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

17 Dec 2008 - 10:54 pm | अवलिया

तुमची दिलेली लिंक चुकली आहे का?
http://www.misalpav.com/node/5151 ही योग्य लिंक असावी असे मला वाटते.
जरा बघाल का? की हल्ली आपल्याला पण भास... काळजी घ्या. :)

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

दुवा दुरुस्त केलाय!

चतुरंग

बेसनलाडू's picture

18 Dec 2008 - 4:13 am | बेसनलाडू

(वाचक)बेसनलाडू

मनीषा's picture

18 Dec 2008 - 6:58 am | मनीषा

गर्द वादळी तीच हवा, त्या हलक्या वर्षाधारा
रणरणत्या त्या उन्हातला वा ऊष्ण सुगंगित वारा

मस्तच !

पॅपिलॉन's picture

18 Dec 2008 - 2:06 pm | पॅपिलॉन

कविता आवडल्याबद्दल आणि चतुरंग यांनी केलेल्या अप्रतिम विडंबनाबद्दल आभार.

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.