भासमान
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नेहेमी दिसणारी एखादी अनोळखी पण आवडणारी व्यक्ती जेव्हा अचानक दिसायची बंद होते तेव्हा तीची प्रकर्षाने आठवण येते आणि मग जळी-स्थळी त्या व्यक्तीचे भास होऊ लागतात.
अवचित कोठे, कुण्या दिशेने भासमान तू होते
हर्ष, खेद, हुरहुर, विशादीं मनास बूडवून जाते
आकृती कुठे वा नाद कुठे, नुसत्याच कुठे वा बटा
कुठे धुंद ती झाडे अथवा कुठे झिंगल्यां वाटा
गर्द वादळी तीच हवा, त्या हलक्या वर्षाधारा
रणरणत्या त्या उन्हातला वा ऊष्ण सुगंगित वारा
हसले कोणी गोड तिथे वा अडखळी ती चाल
नजर बावरी असे कुणाची, तेच शर्मिले गाल
नसे जरी तू रूपांमध्यें या, अरूप तुझी ही मूर्ती
असे चिरंतर हृदयामध्ये, दृष्यमान भोवती
वाचने
2036
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
तुम्हाला जाणवलेले भास आम्हाला वेगळ्या प्रकारे जाणवले!
In reply to तुम्हाला जाणवलेले भास आम्हाला वेगळ्या प्रकारे जाणवले! by चतुरंग
तुमची
In reply to तुमची by अवलिया
भासातून सत्यात आणल्याबद्दल धन्यवाद!
कविता आवडली
कविता छान आहे !
धन्यवाद