मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वतःचे खरे रूप .

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
स्वतःचे स्वरूप ,पाहू दे मज डोळा नाही मी भोळा , कळेल मज . जाऊ दे मला , माझीया आत्म्याकडे अन्य कुणीकडे , कळेल निजरूप??? पहीला मी खादाड , नंतरचा आसक्त त्यानंतर अजून काही (?), भ्रम हा गेला ! आसक्ती हे मूळ , त्यावरी अनंत बांडगूळ वेगवेगळे खूळ , पोशिले मी आवडीने . ऐश्या निरंतराची , आहे मज गाठी याशिवाय पाठी , नाही काही ! आत्मा म्हणे आता , पाहूनी मूळ रुप होऊ नको तद्रूप , पुन्हा एकदा . मूळ रुप खरे , जन्मांतरीचे बरे . साफ करुनी त्याला , घडव पुन्हा . आहे ऐसी क्रिया , धुवेल मूळ रूप हाती देईल खूप , पुन्हा मातीचा गोळा . पुन्हा घडव त्याला , तव जीवनी योग आला आत्मारती तयाला , सहज विद्या सापडली . ऐका रसीकजन , बोलते माझे मन पुन्हा आणखिन , सांगीन तुम्हा काही . तुम्हीच माझे स्वर्ग , इहलोक हाची सर्ग तिकडे जायाचा मार्ग , टीका टीप्पणी तुमची ! घेतो आता विराम , स्वल्प काळापुरता काही हाती उरता , येइन पुन्हा सांगावया ! ----------------------- ( जास्ती सिरियस होऊ नका . [ मी तर कधीच नसतो . =)) ] अधिक मासात स्वतःतले उणे शोधण्यासाठी काही डाएट प्लॅन करतोय . त्याचेच हे हलक्या शब्दातले जड काव्य आहे. ) अतृप्त .. ( १५/७/२३ ) #आत्मकाव्य #आत्म्याच्या_कविता

वाचने 6644 वाचनखूण प्रतिक्रिया 11

चौथा कोनाडा गुरुवार, 07/20/2023 - 12:19
मस्त, भारी आवडली. आत्मूस गुर्जी +१
तुम्हीच माझे स्वर्ग , इहलोक हाची सर्ग तिकडे जायाचा मार्ग , टीका टीप्पणी तुमची !
मिपाकरांचा असा गौरव पाहून ड्वोले पानावले

राघव गुरुवार, 07/20/2023 - 13:50
आसक्ती हे मूळ , त्यावरी अनंत बांडगूळ वेगवेगळे खूळ , पोशिले मी आवडीने .
आमचंही काही फार वेगळं नाहीच! प्रयत्न करणं महत्त्वाचं. :-)

चित्रगुप्त गुरुवार, 07/20/2023 - 14:22
व्वा बुवा, तुमचा "आपणासि जाणावे आपण" वाला 'डाएट प्लॅन' जबरदस्तच आहे. मिपाने राजकारण-संन्यास घेतल्यापासून जुने जाणते मिपाकर पुन्हा नव्याने प्रकट होऊ लागले आहेत हे उत्तमच. यापुढील "पुन्हा आणखिन , सांगीन तुम्हा काही .... .येइन पुन्हा सांगावया" ची प्रतिक्षा आहे. सदा स्वरूपानुसंधान। हें मुख्य साधूचें लक्षण । जनीं असोन आपण । जनावेगळा ॥ ९ ॥ स्वरूपीं दृष्टी पडतां । तुटोन गेली संसारचिंता । पुढें लागली ममता । निरूपणाची ॥ १० ॥ स्वरूपीं स्वरूपचि जाला । मग तो पडोनिच राहिला । अथवा उठोनि पळाला । तरी चळेना ॥ १६ ॥ (श्री दासबोधः दशक ८, समास ९ : सिद्धलक्षण)