(न्हाऊन ये त्वरेने)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
30 Jun 2023 - 3:24 am

आज लै दिसांनी मिपावर आलो अन समोरच प्राचीताईची कविता दिसली मग काय हात शिवशिवायला लागले
प्राचीताई नेहमी प्रमाणे या बालकाला उदार अंतःकरणाने क्षमा करतीलच...

चाल "ए दिल मुझे बता दे" लैच फिट बसते, नाहीतर "मेरे ढोलना सुन" थोडीफार ओढाताण करुन, किंवा "दाटून कंठ येतो" किंवा "तु सप्तसुर माझे" च्या चालीवर म्हणावी,

दिवसातुन सहा वेळा असे १०८ दिवस उच्चरवात रोज गायल्यास सातजन्माची पापे समूळ धुतली जातील.


न्हाऊन ये त्वरेने

न्हाऊन ये त्वरेने
तनू जर्द खाजणारी
काया अजून आहे
चिखलात माखलेली..

न्हाऊन ये त्वरेने
बत्तीच गुल्ल झाली,
काळीशार मळकुटी ती
खाकेत दाटलेली.

न्हाऊन ये त्वरेने
अंगांग घामलेले,
जळती अजूनी कैसे
नाकातले केसुले.

न्हाऊन ये त्वरेने
गंध आसपास,
बघ गुदमरून मेला
तो दूरचाही डास..

न्हाऊन ये त्वरेने
अंगी झणाणलेले
महिषी जाफराबादी
नखही तुझे न ओले ..

पैजारबुवा,

अविश्वसनीयअहिराणीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालगीतइंदुरीकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

कंजूस's picture

30 Jun 2023 - 5:27 am | कंजूस

न्हाऊन?

कर्नलतपस्वी's picture

30 Jun 2023 - 6:09 am | कर्नलतपस्वी

एक तर लईच दिवसानी आलात.
वाट पाहूनी जीव शिणला...

व्य नि करावा या विचारात होतो.

आलात तर आलात
एकादशीला आलात
आणी क.....
गटारी करून गेलात.

आरारा... या विडंबनाला काहीतरी दुसरा शब्द सुचवा आता.

मस्त. आवडले पण नाक दाबून वाचले.
🙂

राजेंद्र मेहेंदळे's picture

30 Jun 2023 - 6:18 am | राजेंद्र मेहेंदळे

जबरदस्त!!
"घाणेरडी कुठची!! जा पळ, आंघोळ कर आधी"--असे सकाळचे संवाद आठवले.

रच्याकने--"काळीशार मळकुटी ती " आणि "नाकातले केसुले" मीटरमध्ये येत नाहीये.

गंध आसपास,--"हा गंध आसपास"

महिषी जाफराबादी--गे महिषी जाफ्राबादी

असे बदलल्यास बसेल :)

कंजूस's picture

30 Jun 2023 - 8:27 am | कंजूस

का मिटरात?

भागो's picture

30 Jun 2023 - 3:35 pm | भागो

मी जेव्हा केव्हा रिक्षातून/टॅॅक्सी तून प्रवास करतो तेव्हा माझे पण मीटरवर बारीक लक्ष असते.

प्रचेतस's picture

30 Jun 2023 - 8:40 am | प्रचेतस

धन्य आहात माऊली

चांदणे संदीप's picture

30 Jun 2023 - 11:15 am | चांदणे संदीप

अविश्वसनीय रचना जी अहिराणी नाहीये पण काणकोण करता कोडाईकनालला जाऊन गरम पाण्याच्या कुंडात न्हाऊन इंदुरी पोह्याचा नैवेद्य कृष्णमुर्तीच्या पायावर अर्पण. कृष्णाला पोहेच गोडच लागणार. कारण एकतर ते इंदुरी आहेत. दुसरे म्हणजे बुवांच्या कढईतून आलेत.

"काहीच्या काही" राहिले म्हणून हा काहीच्या काही प्रतिसाद. =))

सं - दी - प

विवेकपटाईत's picture

30 Jun 2023 - 11:21 am | विवेकपटाईत

आवडली।

प्रसाद गोडबोले's picture

30 Jun 2023 - 11:53 am | प्रसाद गोडबोले

बेक्कार हसलो =))))

चित्रगुप्त's picture

30 Jun 2023 - 4:46 pm | चित्रगुप्त

प्राचुताईंनी 'जाफरानी' शब्द प्रचलित केल्यापासून आता 'लई भारी' ऐवजी 'जाफरानी'च सुचू लगले आहे.
"उघड्या पुन्हा जहाल्या ... (ललना पुलातल्या ... ) ची चालपण लागते आहे. मस्त जाफरानी प्रतिकविता.

खिलजि's picture

1 Jul 2023 - 6:02 pm | खिलजि

पै बु काका, येकदाम झब्राट झालेली आहे...

ऊर भ्रूण आलेला आहे...

अतिशय घुॄणास्पद कविता , वाचून ओकारीच आली.

प्राची अश्विनी's picture

3 Jul 2023 - 5:42 pm | प्राची अश्विनी

दंडवत! :):)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jul 2023 - 11:33 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

गड्डा झब्बू's picture

8 Jul 2023 - 6:01 pm | गड्डा झब्बू

ख्या ख्या ख्या :-)