मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(न्हाऊन ये त्वरेने)

ज्ञानोबाचे पैजार · · जे न देखे रवी...
आज लै दिसांनी मिपावर आलो अन समोरच प्राचीताईची कविता दिसली मग काय हात शिवशिवायला लागले प्राचीताई नेहमी प्रमाणे या बालकाला उदार अंतःकरणाने क्षमा करतीलच... चाल "ए दिल मुझे बता दे" लैच फिट बसते, नाहीतर "मेरे ढोलना सुन" थोडीफार ओढाताण करुन, किंवा "दाटून कंठ येतो" किंवा "तु सप्तसुर माझे" च्या चालीवर म्हणावी, दिवसातुन सहा वेळा असे १०८ दिवस उच्चरवात रोज गायल्यास सातजन्माची पापे समूळ धुतली जातील.

न्हाऊन ये त्वरेने

न्हाऊन ये त्वरेने तनू जर्द खाजणारी काया अजून आहे चिखलात माखलेली.. न्हाऊन ये त्वरेने बत्तीच गुल्ल झाली, काळीशार मळकुटी ती खाकेत दाटलेली. न्हाऊन ये त्वरेने अंगांग घामलेले, जळती अजूनी कैसे नाकातले केसुले. न्हाऊन ये त्वरेने गंध आसपास, बघ गुदमरून मेला तो दूरचाही डास.. न्हाऊन ये त्वरेने अंगी झणाणलेले महिषी जाफराबादी नखही तुझे न ओले .. पैजारबुवा,

वाचने 5876 वाचनखूण प्रतिक्रिया 15

एक तर लईच दिवसानी आलात. वाट पाहूनी जीव शिणला... व्य नि करावा या विचारात होतो. आलात तर आलात एकादशीला आलात आणी क..... गटारी करून गेलात. आरारा... या विडंबनाला काहीतरी दुसरा शब्द सुचवा आता. मस्त. आवडले पण नाक दाबून वाचले. 🙂

जबरदस्त!! "घाणेरडी कुठची!! जा पळ, आंघोळ कर आधी"--असे सकाळचे संवाद आठवले. रच्याकने--"काळीशार मळकुटी ती " आणि "नाकातले केसुले" मीटरमध्ये येत नाहीये. गंध आसपास,--"हा गंध आसपास" महिषी जाफराबादी--गे महिषी जाफ्राबादी असे बदलल्यास बसेल :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

भागो 30/06/2023 - 15:35
मी जेव्हा केव्हा रिक्षातून/टॅॅक्सी तून प्रवास करतो तेव्हा माझे पण मीटरवर बारीक लक्ष असते.

अविश्वसनीय रचना जी अहिराणी नाहीये पण काणकोण करता कोडाईकनालला जाऊन गरम पाण्याच्या कुंडात न्हाऊन इंदुरी पोह्याचा नैवेद्य कृष्णमुर्तीच्या पायावर अर्पण. कृष्णाला पोहेच गोडच लागणार. कारण एकतर ते इंदुरी आहेत. दुसरे म्हणजे बुवांच्या कढईतून आलेत. "काहीच्या काही" राहिले म्हणून हा काहीच्या काही प्रतिसाद. =)) सं - दी - प

चित्रगुप्त 30/06/2023 - 16:46
प्राचुताईंनी 'जाफरानी' शब्द प्रचलित केल्यापासून आता 'लई भारी' ऐवजी 'जाफरानी'च सुचू लगले आहे. "उघड्या पुन्हा जहाल्या ... (ललना पुलातल्या ... ) ची चालपण लागते आहे. मस्त जाफरानी प्रतिकविता.