श्री गणेश लेखमाला २०२३

1

(चारोळी विडंबन)-लसं....ग्रहण

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
21 Nov 2022 - 1:18 pm

पेरणा-चारोळी विडंबन

चहात इडली
चहात गुलाबजाम
चहात जिलेबी
आणि आमची चारोळी संपली

(उगाच इकडं तीकडं भटकू नये म्हनून वरीजनल चारोळी इथं डकवली आहे,अर्थात वरिजनल चारोळीकारांची इक्क्षमा मागुन)
&#128540,&#128540

वरील चारोळी खुपच हुच्च दर्जाची असावी असे वाटते म्हणून दुर्बोध वाटण्याची शक्यता आहे.

खोलवर जाऊन पाहिले तर ही चारोळी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक वाटते.

आता बघा चहा म्हणले की कुठली आठवण येते आसामची.म्हणजे इष्टर्न इण्डिया (पुर्वी भारत).

इडली म्हणले की दक्षिण भारताची आठवण येते.

तसेच, गुलाब जामुन,जलेबी म्हटंले की पश्चिम व उत्तर भारताची.

चहा हे राष्ट्रीय पेय आहे.....

तसेच माझ्या माहीती प्रमाणे जलेबी हा राष्ट्रीय पदार्थ आहे.....

(माहीती चुकीची असल्यास मी जबाबदार नाही कारण शिणीयर नागरिक ईसरभोळा असू शकतो.)

म्हणजे चहा इडली,चहा गुलाबजाम, चहा जलेबी हे एकत्र येवून प्रादेशिक व राष्ट्रीय एकात्मता जपतात असे मला वाटते.

चहा बिस्कीट हे थोडे देशविरोधी वाटते कारण बिस्कीट हा पदार्थ प्ररदेशातून आलेला आहे. चहा,इडली,जलेबी ,गुलाब जामुन एतद्देशीय पदार्थ आहेत त्यामुळेच चहा जलेबी मधे देशप्रेम ओतप्रोत भरल्या सारखे वाटते ते चहा बिस्कीटात वाटत नाही.

(मला वाटते, तुम्हाला वाटावेच असा आग्रह नाही)

इडली जलेबी हे जर सकाळच्या न्याहारीला असतील आमची मुले त्याला हेमामालिनी धर्मेंद्र ब्रेकफास्ट म्हणतात.

खाद्य संस्कृती मधे सुद्धा जो साहित्य, काव्य शोधतो असा कवी विरळाच की हो....
त्याचे कौतुक व्हायला नको!

माझ्या मते ही कविता अतीशय हुच्च दर्जाची असुन तीला एखादा राष्ट्रीय पुरस्कार देण्यासाठी शिफारस करण्यात यावी ही साहित्य संपदकांना इनंती( नाही केल्यास माझ्या बा च काय जातयं. मी आपलं उगाच असचं म्हणतोय.)

रिकामटेकडा कवय्या&#128526
कृपया हलके घ्या.

उकळीकैच्याकैकविताचारोळ्याविडंबनविनोद

प्रतिक्रिया

हलक्यात काय, नुसते घेण्याच्या सुध्दा लायकीचे लिखाण नाही हे. वेळ जात नाही म्हणून काहीही खरडायचे आणि डकवायचे.
.
ह्या नाना नानी पार्कातून मिपा जितके लवकर बाहेर पडेल तितके बरे.

कर्नलतपस्वी's picture

21 Nov 2022 - 2:40 pm | कर्नलतपस्वी

प्रतिसादाशी सहमत आहे.

लेखनात गुणवत्ता हवी यात शंकाच नाही पण कोण ठरवणार? प्रत्येकाला आपले लिखाण चांगलेच वाटते. वाचकच ते ठरवणार आणी मुळ चारोळीवर आपल्या सारखाच प्रतिसाद देणार होतो पण कवीच्या मनात या प्रकारचे विचार का आले असावेत याचा विचार करत होतो. एवढेच.

नाही पटलं तर सोडून द्या.

मिपावरील गुणवत्ता ठरवण्याची काही व्यवस्था आहे का नाही मला माहीत नाही.

मिपावर वयाची अट घाला आपोआप नाना नानी पार्क मधून मिपा बाहेर पडेल.

इथे तरी गुणवत्ता ठरवणार वाचक ओन्ली. कुणाला आवडेल, कुणाला नाही. तिथेही मेजॉरिटी वगैरे काही नाही. सगळा पर्सनल मामला.
ते उपरोल्लेखित (वॉव, किती वाट पाहिली हा शब्द वापरायची ;) ) वय लिखाणाचे आहे. लेखकाच्या वयाची अट नसतेच. प्रश्न मनोवृत्तीचा आहे.
बाकी बघा तुम्हीच, सूज्ञ आहातच वयोमानापरत्वे.

कर्नलतपस्वी's picture

21 Nov 2022 - 5:38 pm | कर्नलतपस्वी

कुणाला विनोद आवडतो तर कुणी "टवाळा आवडे विनोद" म्हणून कुचेष्टा करतात.

चंडीगढ मधे राॅक गार्डन आहे. १९५७ मधे म्युनिसिपल कर्मचारी नेकचंद यांनी चुपचाप तुटक्या फुटक्या चिनीमातीच्या कप बशा,थाळ्या,सिमेंट चे फेकलेले पाईप,मटके इत्यादी साहित्य घेऊन त्यांना आकार देण्यास सुरुवात केली. तेथील मुर्ती,प्राणी व इतर कलाकृती वेरूळ अजंठा इतक्या सुदंर नाहीत पण त्यांचे सौंदर्य वेगळेच आहे. आज ही बाग चाळीस एकर मधे आहे व जगभरातील प्रवासी याला भेट देतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

भंगार मधे सुद्धा काही उपयोगिता व सौंदर्य असू शकते हे नाकारता येत नाही.