परिकथेतील राजकुमारी (पुर्वार्ध)

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
4 Dec 2008 - 12:58 pm

अजुनही रविवार चा तो दिवस लख्ख आठवत होत त्याला, जेंव्हा त्यानी तिला पहिल्यांदा बघितले. त्याच्याकडे नेहमी येणार्‍या होस्टेल च्या मुलींबरोबर ती आली होती. हॉस्टेल ला नविन 'भरती' दिसतिये, त्याच्या मनानी नोंद घेतली. पण आज मन त्या पेक्षा हि काही जास्ती नोंदी घेत होते, भवतेक गरजे पेक्षा जास्त ! त्या आज प्रथमच पाहत असलेल्या चेहेर्‍यात का कोणास ठाउक पण त्याची नजर गुंतुन पडली होती. कुठलाही भडक मेकप नसलेले ते साधे सात्विक सौंदर्य त्याच्या मनाला कुठेतरी आपली वेगळी नोंद घ्यायला लावत होते. अथांग सागरा सारखे ते टपोरे डोळे, सरळ चाफेकळी नाक, सुंदरसा हसरा गोलसर चेहरा, आणी हो हसताना डाव्या गालवर पडणारी ती लहानशी खळी ! वाह क्या बात है ... अगदी ती पाहताच बाला कलीजा खलास झाला.
आजवर त्याच्या 'कॅफे' मध्ये अनेक सुंदर सुंदर मुली येउन गेल्या होत्या, काहि रोज येणार्‍याही होत्या पण ह्या अशा भावना ह्या आधी कधीच जाणवल्या न्हवत्या. फक्त ग्राहक आला आणी ग्राहक गेला, तो पुरुष होता का स्त्री ह्याचे त्याच्या द्रुष्टिने काहिच महत्व नसायचे ! मग आज क बरे असे होत आहे ? आपण आणी आपले काम ह्यात अडकुन पडणारी नजर आज का पुन्हा पुन्हा मागे वळुन बघत आहे ?? अनेक क्रुत्रिम सुगंधात जसा रातराणीचा अस्सल सुगंध आपले अस्तित्व दाखवुन देतो तसेच कहिसे होते ते.
"एका कॉंप्युटर वर दोघेच बसा प्लिज, एक्स्ट्रा गेस्ट ला एक्स्ट्रा चार्ज लागेल" असे कायम नियम समजवणारा आज त्या दोघींच्या बरोबरिने बसलेल्या तिला हे सांगायचे धाडस का करत नसावा ? का ती निघुन जाइल अशी भिती वाटतिये मनाला ? काहि क्षणापुर्वी माहित हि नसलेली ति अशी एकदम कुठली अनाम ओढ लावायला लागली आहे ? काहितरी विचित्र घडतय हे मात्र नक्की.
देवा, रोज १० वेळा बोलावुन शंका विचारणार्‍या य पोरींना आज एक हि शंका कशी येत नाहिये ? जरा मला बोलवा तिकडे, काहितरी अडचण विचारा हो. पण कसले काय आज ना शंका ना कुशंका, नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर उठुन सुद्धा गेल्या त्या.
त्या दिवसापासुन तो मात्र रोज तिची वाट बघायचा, आज ना उद्या ती परत दिसेल असे मनाला समजवत राहायचा. कधी कधी त्यालाच स्तत:चे हसु यायचे, लोकांना हसता हसता आपण हि प्रेमात पडलो का काय ? छे भलतेच काय काहितरी ? ह्याला काय प्रेम म्हणतात होय ? हा काय हिंदी सिनेमा आहे का त्या मालिकेत होते तसे "पहेली नजर का प्यार" वगैरे ? मग I nfatuation ? ह्म्म असेल असेच काहि असेल.
तो त्याच्या विचारात आणी तिची वाट बघण्यात कायमच गुंग राहायला लागला, आणी एक दिवशी ती खरच आली, त्याच्या विश्वासच बसेना, "प्रिंट आउटस काढायच्या आहेत" नाजुक ओठातुन जणु मधच सांडला ! "हो हो काढाना" तो. "अय्या, अहो मला येत नाही त्यातले काही, तुम्ही मदत कराल का ?" ती. त्यानंतरची २० मिनिटे तो त्याचा असा उरलाच न्हवता, वेळ कसा सरला कळालेच नाही. आणी मग "प्रोजेक्ट" च्या निमित्ताने ती रोजच यायला लागली.
त्याच्या एकुणच व्यक्तिमत्वावर, समजावुन सांगण्याच्या पद्धतीवर ती सुद्धा भाळुन गेली. समजावता समजावता हळुच त्याने केलेला एखादा विनोद, घेतलेली फिरकी तिला हि आता आवडायला लागली होती, न्हवे खरे सांगायचे तर हवी हवीशी वाटायला लागली होती. इतर मुलींशी तो बोलताना हसताना बघुन ह्रुदयात कळ उठायला लागली होती. मग कधी डोळ्यातुन तर कधी तिरकस उत्तरातुन राग दाखवायला तिने सुरुवात हि केली होती. त्याला हे सगळे जाणवत होते, पण आपल्या मनाचे खेळ तर नसतील ना ? अशी धाकधुक ही वाटत होती.
रोजचा सहवास, कधी मुद्दाम तर कधी चुकुन झालेले स्पर्श त्यांच्यातील दुरावा अजुन कमी करत होते. आणी एक दिवस त्याने धाडस केलेच, "तु मला आवडतेस." तो अडखळत म्हणाला. हा प्रसंग कधीतरी येणार ह्याची वाट बघत असलेली ती त्या क्षणी मात्र गोंधळली, पटकन आपली बॅग़ उचलुन पळुन गेली.
काहि वेळानी त्याच्या मोबाइल वर तिचा मेसेज आला, "येव्हडे धाडस कसे काय केले बुवा एका माणसाने ? पण मला आवडले :)" "धाडस कि माणुस?" ह्याचा प्रति प्रश्न. "दोन्हिही" तिकडुन रिप्लाय आला. मग काय विचारता ? तो फक्त हवेत उडायचाच बाकी राहिला.
मग हळुहळु रोजच्या भेटि चालु झाल्या, मेसेजेस, फोन कॉल्स ह्यांना तर काही सुमारच राहीला नाही, जगाला पार विसरुन दोघे एकमेकांत हरवुन गेले होते.
तशातच एक दिवस तिने आपल्या आत्ये बहिणीला केलेला एसेमेस ह्याच्या नंबर वर येउन थडकला आणी मग दिवसभर हि मालिका चालुच राहिली. शेवटी त्याने तिला फोने केला आणी हे सर्व सांगितले. मग काय लगोलग दोघेही मोबाइल दुरुस्ती केंद्रात हजर झाले. "म्याडम कंपनीत पाठवावा लागेल मोबाइल ! तुम्ही पाठवलेले काही काही मेसेजेस दोन दोन नंबर्स वर जात आहेत." केंद्राचा अभिप्राय ! "अय्या, मग ३/४ दिवसानी आणुन देउ, परिक्षा झालि की." तिचा निर्णय. त्यानंतर दुसर्‍याच रात्री दिड-दोन च्या सुमाराला तिच्या नंबर वरुन पाठवला गेलेले एक मेसेज त्याला पण मिळाला, "आकाश नाउ नो बडी इज अराउंड, यु कॅन कम इन टु माय रुम."

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

आम्हाघरीधन's picture

4 Dec 2008 - 2:49 pm | आम्हाघरीधन

पुढे चालु ठेवा...........

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

अश्विनि३३७९'s picture

4 Dec 2008 - 2:56 pm | अश्विनि३३७९

मस्त!!

फक्त संदीप's picture

4 Dec 2008 - 3:07 pm | फक्त संदीप

मुलीचे वर्णन आवडले....
बाकी कथा फार छान आहे.....

डिझाईनींगच्या विचारात गढुन गेलेला SANDEEP

टारझन's picture

4 Dec 2008 - 4:00 pm | टारझन

उत्तर ... अजुन राजकुमार्‍या येउण द्या

(अफ्रिकन आकाश)
- टारझन

अनिल हटेला's picture

5 Dec 2008 - 8:21 am | अनिल हटेला

सॉलीड इष्टोरी.....

अशी अर्धवट नका देत जाउ राव ...

मजा किरकीरा होतो....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

श्री's picture

5 Dec 2008 - 11:09 am | श्री

अशी अर्धवट नका देत जाउ राव ...

मजा किरकीरा होतो....
===============
असेच म्हणतो.

तमसो मा ज्योर्तिगमय

श्री's picture

5 Dec 2008 - 11:09 am | श्री

अशी अर्धवट नका देत जाउ राव ...

मजा किरकीरा होतो....
===============
असेच म्हणतो.

तमसो मा ज्योर्तिगमय