मिपाच्या लेखनपट्टीवर आमचं दुसरं शतक.आंकडेमोड- वाचक हो,तुमच्यासाठी!

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
26 Nov 2008 - 9:44 am

(सैनिक हो,तुमच्यासाठी ह्या गाण्याचा आधार घेऊन)

आज जणू झालो आम्ही सचीन तेंडूलकर
दोन शतके लेखनाची लिहूनी मिपावर
येती हे शब्द तुम्हा सांगण्या अमुच्या ओठी
वाचक हो, तुमच्यासाठी

लिहीत लिहीत आम्ही नित्यकर्म अवघे करतो
वाचतो अपुल्या क्षेत्री लेखनाची स्फुर्ती घेतो
परी आठव येता तुमची प्रेरणा स्फुरतसे बोटी
वाचक हो, तुमच्यासाठी

आराम विसरलो आम्ही आळसा मुळी न थारा
राहूनी पश्चिम देशी लक्ष अमुचा मायदेशा सारा
आठवणी तिकडच्या येऊनी डोळ्यात होतसे दाटी
वाचक हो, तुमच्यासाठी

उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
विषय अनेक जमती काय लिहू याची नसे खात्री
स्वपनात येऊनी कविता काळजा खुलविते देठी
वाचक हो, तुमच्यासाठी

रक्षिता लेखन स्वातंत्र्या कायदा घेऊनी हाता
तुमच्यास्तव आमुची लेखने तुमच्यास्तव कविता
एकट्या लेखकासाठी वाचने अनंत होती
वाचक हो, तुमच्यासाठी
वाचक होss तुमच्याssसाठीsss

आज २४ नो.२००८ रोजी आम्हाला मिपा वर लेखन करून २२ आठ्वडे ६ दिवस(१६०दिवस) झाले.
आमच्या २०० लेखनानंतर हे २०१ वं लेखन आहे.
दोनशे लेखनांची,
एकूण ४५,००० वाचनं झाली.
एकूण १,१६० प्रतिक्रिया दिल्या गेल्या.
एकूण १४८ लेखनावर प्रतिक्रिया होत्या.
त्याची ३५,००० वाचनं झाली
एकूण ५२ लेखनावर एकही प्रतिक्रिया दिली गेली नाही.
त्याची १०,००० वाचनं झाली.

प्रतिक्रियेच्या काही गमती आणि जमती----

अनुवादीत कवितेवर एक दोन वाचकांच्या खरमरीत टिका झाल्या.अनुवाद करूच नका इतपर्यंत.अशी प्रतिक्रिया वाचून वाईट वाटलं.बहुतेक कविता हिंदी गाण्याच्या होत्या.

अनुवादावर प्रशंसनीय प्रतिक्रियाही झाल्या.माहित नसलेल्या एक दोन मुळ कविता वाचायला आग्रह झाला.वाचून झाल्यावर
"आपली अनुवादीत कविताच जास्त आवडली "
अशी प्रतिक्रिया दिली गेली.हे वाचून अर्थात बरं वाटलं.

" मनुष्यप्राणी हा मुलतः शाकाहारी"
ह्या लेखनावर सर्वात जास्त वाचनं होती-१२०१ आणि सर्वात जास्त प्रतिक्रिया होत्या -७२
"आमची पन्नासावी लग्नगाठ"
ह्या लेखावर वाचने होती ----७१२
आणि प्रतिक्रिया होत्या---५९

बहुतेक वाचकानी खूप प्रेम केलं.खूप प्रेरणा दिल्या. त्यामुळे अधिक लेखन करायला हूरूप आला.
प्रशंसनीय प्रतिक्रिया बर्‍याच असतात.कारण कुणाची ही निर्मिती योग्य वाटल्यास प्रशंसा करणं हे चांगलं काम आहे.म्हणून चांगलं करणारे जगात नेहमीच बहूमतात असतात.

माझे सर्व वाचक आणि अन्य सर्व लेखक माझे "मायबाप " आहेत अशी माझी धारणा आहे.त्यामुळे त्यानी केलेल्या प्रशंसनीय किंवा अप्रशंसनीय प्रतिक्रियेचा मी सारखाच आदर करतो.प्रशंसनीय प्रतिक्रिया मला आनंद देतेच पण त्याबरोबरीने माझी पुढील लेखनं त्यांना अशीच आवडत राहावी यासाठी लिहिण्याची माझी जबाबदारी वाढते असं नेहमीच मी मनात आणित असतो.

आणि अप्रशंसनीय प्रतिक्रिया मला माझ्या पुढील लेखनात सुधारणा करायला आव्हान देते.ही पण दुसर्‍या प्रकारची जबाबदारी आहे असं समजून मी माझ्या दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया देणार्‍या वाचकाबद्दल मनात आदर बाळगून असतो.

मला मिळालेल्या प्रतिक्रियेत जो टिकेचा भाग असतो,त्याला माझ्या दृष्टीने समर्पक उत्तर द्दायला मी नेहमीच प्रयत्न करतो.कधीकधी माझ्याकडून ही अवास्तव लिहलं जात असेल. पण माझे वाचक एव्हडे प्रेमळ आहेत की ते मला समजून घेतात.आणि प्रेमापोटी मला माफ करतात.हा त्यांचा मनाचा मोठेपणा असावा.

जे माझ्या लेखाला प्रतिसाद देतात ते प्रेमापोटी वेळात वेळ काढून तसं करतात.असा त्यांच्या जागी जाऊन मी विचार करतो.त्यामुळे त्यांच्या प्रतिसादाला मी प्रतिसाद दिला नाही तर मी माझ्या कर्तव्याला चूकेन आणि ती माझी त्यांच्या बद्दल बेपर्वाई होईल ह्याची मनात भिती ठेऊन तसं करतो.
मी पण इतर लेखकांच वाचन वाचतो.आणि मनस्वी लेखन आवडल्यास माझा प्रतिसाद देतो.
निव्वळ शब्दाचं वाचन बरेच वेळा अनर्थाला आमंत्रण देतं.हे चांगलं लक्षात ठेवून राहणं ही संस्थळाच्या वाचनाची क्लृप्ती आहे.
एकंदरीत जे मनात आलं ते निःशंकोच लिहिलं एव्हडंच.
मला मिपावर एव्हडं लेखन करूं दिलं त्या मिपाकारांचे मी जर आभार मानले नाहीत तर ते माझं पाप होईल.
आणि प्रा.डॉ. दिलीप बिरुट्यांनीच मला इथे लिहायला शिफारस केली त्यांना विसरून कसं चालेल.?
सूर समाधानाचा आहे,पण उत्साह स्वस्थ बसू देईल का सांगता येत नाही

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

26 Nov 2008 - 9:54 am | जैनाचं कार्ट (not verified)

अभिनंदन !

>>उत्साह स्वस्थ बसू देईल का सांगता येत नाही

स्वस्थ बसू नका !
हीच इच्छा !

जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...

आपले संकेतस्थळ

सहज's picture

26 Nov 2008 - 9:55 am | सहज

सामंतकाका[आजोबा] आपले आभिनंदन.

त्रिशतक २००८ मधेच होऊन जाउ दे या शुभेच्छा!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Nov 2008 - 9:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्रिशतक २००८ मधेच होऊन जाउ दे या शुभेच्छा!
+१
सहजरावांशी सहमत.

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Nov 2008 - 9:41 am | श्रीकृष्ण सामंत

जैनाचं कार्ट,सहज,अदिती,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

कपिल काळे's picture

26 Nov 2008 - 10:02 am | कपिल काळे

एवढी आकडेवारी कशी काय गोळा केलात .

सामंत साहेब तुम्ही ग्रेट आहात. एवढी आकडेवारी गोळा करणे म्हणजे जबरदस्त चिकाटी पाहिजे. मुळात एवढी आकडेवारी गोळा करता येइल अशी कामगिरी करणे हे पण तितकेच महत्त्वाचे. उगाचच नाही आकडेवारी जमा होत हो.

मानलं बुवा तुम्हाला. टोपी काढली टू यू.

धमाल मुलगा's picture

26 Nov 2008 - 11:43 am | धमाल मुलगा

>>मुळात एवढी आकडेवारी गोळा करता येइल अशी कामगिरी करणे हे पण तितकेच महत्त्वाचे. उगाचच नाही आकडेवारी जमा होत हो.

कपिलराव,
अगदी अगदी मनातलं बोललात.

सामंतकाका,
अभिनंदन.
दर वेळी प्रतिसाद देणे शक्य असतेच असे नाही, किंवा असुनही दिला जातोच असेही नाही, पण आपला एकुणच दृष्टीकोन पाहता तुमच्याकडुन बरेच काही शिकण्यासारखे आहे हे नक्की जाणवलं.

त्रिवार अभिनंदन. :)

कपिल काळे's picture

26 Nov 2008 - 10:04 am | कपिल काळे

आत्ता जर बघितल तर "नवे लेखन" मध्ये पहिले तीन विषय सामंत काकांचे आहेत.

ही मी गोळा केलेली आकडेवारी आहे

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Nov 2008 - 9:49 am | श्रीकृष्ण सामंत

कपिल काळे,धमाल मुलगा,
कुतुहल ही मेहनतीची जननी आहे.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

चित्रा's picture

26 Nov 2008 - 10:06 am | चित्रा

इतके लेखन न कंटाळता करणे सोपे नाही. आणि कोणी तुम्हाला प्रतिसाद दिला की लक्षात ठेवून त्यांना उत्तर लिहीता हेही वाखाणण्याजोगे आहे. आम्ही एका प्रतिसादात सर्वांना
गूंडाळणारे लोक - म्हणजे "प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार" असे! त्याउलट तुम्ही नावानिशी लिहीता, खरे सांगायचे तर बरे वाटते :)
एक विनंती - मिपावर कधी गंमत चाललेली असते, कधी मनासारखे प्रतिसाद येतात तर कधी चांगल्या गोष्टींकडे दुर्ल़क्षही होते. ते समजून घेऊन अजून लिहीत चला.

धन्यवाद!

चित्रा

विसोबा खेचर's picture

26 Nov 2008 - 10:59 am | विसोबा खेचर

एक विनंती - मिपावर कधी गंमत चाललेली असते, कधी मनासारखे प्रतिसाद येतात तर कधी चांगल्या गोष्टींकडे दुर्ल़क्षही होते. ते समजून घेऊन अजून लिहीत चला.

चित्रावैनींशी सहमत...

सामंतकाका, आपली खरंच कमाल वाटते...

जराही उत्साह कमी होऊ न देता आपण मिपावर लेखांचं द्विशतक झळकवलंत! आपल्याला दंडवत...

आपल्यासारख्या बुजुर्गाचा मिपावर नेहमी असाच आशीर्वाद राहो हीच इच्छा...

आपला कृपाभिलाषि,
तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Nov 2008 - 11:54 am | बिपिन कार्यकर्ते

सामंतकाका,

मी पण असेच म्हणतो. त्रिशतक होउन जाऊ द्या लवकरात लवकर. पु.ले.शु.

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

26 Nov 2008 - 2:17 pm | टारझन

मी पण असेच म्हणतो. त्रिशतक होउन जाऊ द्या लवकरात लवकर. पु.ले.शु.
असेच म्हंटले ..
- (प्लास्टिक सर्जन) डॉ. टारझन
(अवांतर : आज आम्हाला अनेक पेशंट्स दिसले .. चालू द्या)

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Nov 2008 - 10:03 am | श्रीकृष्ण सामंत

बिपिन कार्यकर्ते,टारझन,
आपल्या तोंडात साखर पडो.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Nov 2008 - 9:58 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
मी फक्त नाममात्र आहे.आपणच ह्या प्रपंच्याचे कर्ते-सवर्ते आहात हे विसरून कसं चालेल.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

नंदन's picture

26 Nov 2008 - 11:39 am | नंदन
ऋषिकेश's picture

26 Nov 2008 - 2:15 pm | ऋषिकेश

+१
-(सहमत) ऋषिकेश

धनंजय's picture

26 Nov 2008 - 10:41 pm | धनंजय

असेच म्हणतो.

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Nov 2008 - 10:06 am | श्रीकृष्ण सामंत

नंदन,ऋषिकेश,धनंजय,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Nov 2008 - 9:53 am | श्रीकृष्ण सामंत

चित्रा,
तुझं हे ऑबझरव्हेशन वाखाणण्या सारखं आहे.
प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अवलिया's picture

26 Nov 2008 - 10:13 am | अवलिया

एका अवलियाला दुस-या अवलियाचा सलाम!
असेच लिहित रहा... अन भावनांचे चंद्र फुलवत रहा...
मला आवडणारी कुसुमाग्रजांची चंद्र कविता खास तुमच्यासाठी.... काका

चंद्र

या चंद्राचे त्या चंद्राशी मुळीच नाही काही नाते
त्या चंद्रावर अंतरिक्ष-यानात बसूनी माकड,मानव, कूत्री यांना जाता येते

या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही
हा ही नभाचा मानकरी पण लक्ष मनांच्या इंद्रगुहांतून भटकत राही

नटखट मोठा ढोंगी सोंगी, लिंबोणीच्या झाडामागे कधी लपतो मुलाप्रमाणे
पीन स्तनांच्या दरेत केव्हा चुरुन जातो फुलाप्रमणे

भग्न मंदीरावरी केधवा बृहस्पतिसम करतो चिंतन
कधी बावळा तळ्यात बुडतो थरथर कापत बघतो आतून

तट घुमटावर केव्हा चढतो, कधी विदुषक पाणवठ्यावर घसरुन पडतो
कुठे घराच्या कौलारावरुनी उतरुन खाली शेजेवरती

तिथे कुणाची कमल पापणी हळूच उघडून नयनी शिरतो
कुठे कुणाच्या मूक्त मनस्वी प्रतिभेसाठी द्वारपाल होऊनी जगाच्या रहस्यतेचे दार उघडतो

अशा बिलंदर अनंतफंदी या चंद्राचे त्या चन्द्राशी कुठले नाते?
त्या चन्द्रावर अंतरिक्ष-यानात बसूनी शास्त्रज्ञांना जाता येते
रसिक मनांना या चंद्राला पळ्भर केव्हा डोळ्यात वा जळात केवळ धरता येते.

- कुसुमाग्रज

आपलाच
अवलिया

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Nov 2008 - 10:10 am | श्रीकृष्ण सामंत

अवलिया,
कुसुमाग्रजांची ही कविता माझी पण एक आवडती कविता आहे.
प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

वा! लगे रहो बडे भाई.......

आपल्या लेखनाने प्रभावित झालेला,

उम्मि.

अभिरत भिरभि-या's picture

26 Nov 2008 - 11:26 am | अभिरत भिरभि-या

अभिनंदन सामंतकाका.
आम्हा तरुणांना लाजवणारा उत्साह आहे तुमच्याकडे !!

आजानुकर्ण's picture

28 Nov 2008 - 7:07 pm | आजानुकर्ण

सामंतकाका,

हार्दिक अभिनंदन. लवकरच ३०० लेखही होऊ द्या.

तुमच्यासारखे लेखक हीच मिपाची खरी संपत्ती आहे.

आपला,
(शुभेच्छुक) आजानुकर्ण

परिकथेतील राजकुमार's picture

26 Nov 2008 - 11:35 am | परिकथेतील राजकुमार

अभिनंदन ++
यकदम संगणकीय भाषेमंदी

++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Nov 2008 - 10:14 am | श्रीकृष्ण सामंत

उम्मि,अभिरत भिरभि-या,परिकथेतील राजकुमार,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सर्किट's picture

26 Nov 2008 - 1:22 pm | सर्किट (not verified)

सूर समाधानाचा आहे,पण उत्साह स्वस्थ बसू देईल का सांगता येत नाही

तुमचा दुर्दम्य उत्साह तुम्हाला स्वस्थ कधीच बसू देणार नाही, ही खात्री,

त्रिशतकासाठी शुभेच्छा.

आत २००८ चे फक्त ३६ दिवस उरले. दिवसाला २-३ लेख टाकले, तर त्रिशतक सहज शक्य आहे !

आम्ही पॅव्हिलियन मध्ये बसून तुमची ब्याट वर जाण्यची वाट पाहतो आहे.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Nov 2008 - 10:21 am | श्रीकृष्ण सामंत

सर्किट,
केव्हडं हे आव्हान?
प्रतिक्रिये बद्दल आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

छोटा डॉन's picture

26 Nov 2008 - 1:36 pm | छोटा डॉन

आपल्या अथक आणि उत्साही लेखनातुन नेहमी नवे अनुभव वाटणार्‍या सामंतकाकांचे त्यांच्या मिपावरील लेखांच्या नाबाद द्विशतकाबद्दल अभिनंदन.
तसेच पुढील येणार्‍या त्रिशतकासाठी शुभेच्छा ...
बाकीच्या बाबतीत सर्किटभायशी सहमत ....

जाता जाता, सामंतकाका ती आकडेवारी मनावर न घेता लिहा.
कारण कुणा एका ( इंग्लिश ) समिक्षकाने म्हटलेलेच आहे की " आकडेवारी ही स्त्रियांच्या पोहण्याच्या पोशाखासारखी ( मराठीत स्विमिंग कॉश्च्युम ) असते, जे दाखवते ते मनोरंजक असतेच पण जे लपवते ते जास्त महत्वाचे असते" ....
टीप : वरील वाक्य ( जर कुणाला ) अश्लिल आहे असे ( वरकर्णी ) दिसत असल्यास तो दोष माझा नव्हे, त्याबाबत भांडण त्या " इंग्लिश समिक्षकाशी" करावे.
आपल्यापाशी टायम नाय ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Nov 2008 - 1:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आकडेवारी मांडू तशी असते, कधी खोटं बोलण्याचं समर्थनही!
(http://en.wikipedia.org/wiki/Statistical_deception)

(याचवर्षी होणार्‍या त्रिशतकाच्या अपेक्षेत) अदिती

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Nov 2008 - 10:35 am | श्रीकृष्ण सामंत

अदिती,
हे समर्थन मात्र खरं आहे बरं का!
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Nov 2008 - 10:30 am | श्रीकृष्ण सामंत

छोटा डॉन,
आपल्या अभिनंदना बद्दल आभार.
मी आकडेवारी दिली नसती तर जाता जाता म्हटलेली ती मनोरंजक आकडेवारी कशी बरं समजली असती?
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

घाटावरचे भट's picture

26 Nov 2008 - 1:38 pm | घाटावरचे भट

वरील सर्वांशी सहमत!!! पुनश्च अभिनंदन.

सर्किट's picture

26 Nov 2008 - 1:40 pm | सर्किट (not verified)

आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !

२०० म्हण्जे मोठठा वाढदिवस !!!

पार्टी पायजे !

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

ANIMANI's picture

26 Nov 2008 - 1:46 pm | ANIMANI

सामंतकाका,
तुमच्या लेखनातून नेहमीच काहितरी बोध मिळ्तो.
अभिनंदन!!!!!

अनिल हटेला's picture

26 Nov 2008 - 1:54 pm | अनिल हटेला

>>>>वरील सर्वांशी सहमत!!! पुनश्च अभिनंदन!!!!
असेच म्हणतो ...................
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Nov 2008 - 10:41 am | श्रीकृष्ण सामंत

ANIMANI, अनिल हटेला,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

जयवी's picture

26 Nov 2008 - 1:55 pm | जयवी

सामंतकाका......तुमचं मनापासून अभिनंदन :)
इतकं सातत्याने, न कंटाळता लेखन करणं म्हणजे गंमत नाही. तुमच्या उत्साहाचा हेवा वाटतो हो .....!! तुमचं त्रिशतक लवकरच होवो !!

शितल's picture

26 Nov 2008 - 8:26 pm | शितल

जयवी ताईच्या मताशी सहमत. :)

शाल्मली's picture

26 Nov 2008 - 3:17 pm | शाल्मली

सामंतकाका,
तुमच्या लेखनाच्या द्विशतकाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन.
आणि त्रिशतकही लवकर होऊदे..
शुभेच्छा!
वरील कविताही आवडली.

--शाल्मली.

लिखाळ's picture

26 Nov 2008 - 3:37 pm | लिखाळ

सामंतकाका,
द्विशतकाबद्दल अभिनंदन.. तुमचे अनेक लेख वाचनीय असतात. आणि आवडतात.
लिहित राहा..
-- (शुभेच्छुक) लिखाळ.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

26 Nov 2008 - 6:42 pm | घाशीराम कोतवाल १.२

मानल बुवा आम्ही आता १० लेखात कंटाळलो तुमी तर २०० लेख लिहिलेत मानल पाहीजे
सलाम सलाम तुम्हाला सलाम
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

चतुरंग's picture

26 Nov 2008 - 11:11 pm | चतुरंग

तुमच्या दुर्दम्य उत्साहाबद्दल तुमचे अभिनंदन! तुमच्या वाचनीय अशा प्रत्येक लिखाणाला दाद दिली जावी अशी इच्छा असते पण दरवेळी तसे जमतेच असे नाही त्याबद्दल क्षमस्व!
त्रिशतकाची वाट पहातो आहे.
(खुद के साथ बातां : रंगा, तुझ्या विडंबनांचं शतक कधी होणार रे? :W )

चतुरंग

विजुभाऊ's picture

28 Nov 2008 - 9:26 am | विजुभाऊ

सामन्त काकांच्या सातत्याला हॅट्स ऑफ

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Nov 2008 - 10:49 am | श्रीकृष्ण सामंत

जयवी,शितल,शाल्मली,लिखाळ,घाशीराम कोतवाल, विजुभाऊ, चतुरंग,
आपणासर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

मनस्वी's picture

28 Nov 2008 - 10:51 am | मनस्वी

सामंतकाका, तुमची चिकाटी भन्नाट आहे.
द्विशतकाबद्दल अभिनंदन.
आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

श्रीकृष्ण सामंत's picture

28 Nov 2008 - 11:01 am | श्रीकृष्ण सामंत

मनस्वी ,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

नि३'s picture

28 Nov 2008 - 3:54 pm | नि३

अभीनंदन......
---नि३.

नि३'s picture

28 Nov 2008 - 3:56 pm | नि३

२०१ व्या लेखनाला आतापर्यंत ४८ प्रतीसाद आणी ५९१ वाचने.....प्रिमा.....
---नि३.

विनायक प्रभू's picture

28 Nov 2008 - 3:59 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Nov 2008 - 6:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या पुढील लेखनासाठी मनःपुर्वक शुभेच्छा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवटी's picture

28 Nov 2008 - 6:40 pm | कवटी

तुमच्या या लेखाने प्रतिसादाचे अर्धशतक झळकावले. माझा ५१ वा प्रतिसाद.(वाचने:६३२)
द्विशतकाबद्दल आणि या अर्धशतकाबद्दल अभिनंदन!
त्रीशतक लवकरच होवो ही शुभेछा!

कवटी

http://www.misalpav.com/user/765

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Nov 2008 - 11:23 am | श्रीकृष्ण सामंत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,कवटी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Nov 2008 - 11:18 am | श्रीकृष्ण सामंत

नि३,विनायक प्रभू,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

चन्द्रशेखर गोखले's picture

29 Nov 2008 - 6:09 pm | चन्द्रशेखर गोखले

आपल्या विविध विषयावर अखंडपणे लिहिण्याच्या उपक्रमासाठी हार्दिक अभिनंदन.
विशेषतः आपण लिहिलेली व्यक्तिचित्रे वाचनीय असतात.

चन्द्रशेखर गोखले's picture

29 Nov 2008 - 6:09 pm | चन्द्रशेखर गोखले

आपल्या विविध विषयावर अखंडपणे लिहिण्याच्या उपक्रमासाठी हार्दिक अभिनंदन.
विशेषतः आपण लिहिलेली व्यक्तिचित्रे वाचनीय असतात.

चन्द्रशेखर गोखले's picture

29 Nov 2008 - 6:17 pm | चन्द्रशेखर गोखले

विविध विषयावरचे आपले लेख वाचनीय असतात. आपण अखंडपणे करत असलेल्या साहित्यनिर्मिती बद्दल आपले हार्दिक, हर्दिक अभिनंदन!! भविष्यातील लेखना बद्दल शुभेच्छा. चांगले निवडक सहित्य पुस्तक रुपाने प्रसिद्ध करावे ही विनंती.

सर्वसाक्षी's picture

29 Nov 2008 - 9:10 pm | सर्वसाक्षी

सामंतसाहेब,

नानाविध विषयांवर इतके सातत्यपूर्ण लेखन नक्कीच कौतुकास्पद आहे आणि प्रेरणादायकही. विषय सुचणे, त्यावर लिहिता येणे आणि ते नियमीतपणे लिहिणे हे सोपे नाही.
लेखनाच्या त्रिशतकासाठी हार्दिक शुभेच्छा!