Skip to main content

हे नाक तुंबलेले (विडंबन)

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 25/11/2008 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा विडंबनाचा पहिलाच प्रयत्न आहे. आभाळ थांबलेले..... कवि : चारुदत्त दिवाण प्रतिभा आभाळ थांबलेले, मातीही थांबलेली; तेजाचे गर्भ सभोती तेजात ओढलेले. . ध्रु. येते अशी घडी की ध्यानात रानवारा; तू भरिशी चित्र असे की तेजाचे किरण नहाले. . १. जाऊ नकोस आता, सोडू नकोस हाता; नुकतेच साधनेचे ते दीप चेतलेले. . २. तू असता असा सभोती.. मातीची तुटती नाती; श्वासांचे बंध गळोनी प्राणांचे प्राण मिळाले. . ३. कवि : चारुदत्त दिवाण यांची क्षमा मागून ..... ओम नमो सरपंचाय धोंडोपंताय | ओम नमो विसोबा खेचराय | ओम नमो तात्या चेंगटाय| ओम नमो केशव कुमाराय | ओम नमो केशव सुमाराय | ओम नमो बेचव सुमाराय | ओम नमो केशव टुकाराय | हे नाक तुंबलेले हे नाक तुंबलेले, सर्दिहि थांबलेली; कंठात घट्ट अगदी, बडकेच साचलेले .ध्रु. केव्हातरी घुसावा नाकात स्वच्छ वारा; तपकीर ही भरी तू, नाकात काय हाले. .१. खाउ नकोस आता, सोडून दूध भाता; नुकतेच हे गव्हाचे ते पीठ संपलेले. .२. डोकेदु़खी सभोती . कफात तट्ट छाती; श्वासांचे बंध गळोनी प्राणांचे प्राण मिळाले. . ३.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1479
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

११७ वाचनांवर आमचे विडंबन प्रतिसादाच्या लायकीचे (आणि सुधारणा सुचवायच्या दे़खील ) लायकी चे नाही हे उमजले. सर्व वाचकांचे आभार !