क्युट नॅनो !!!

Primary tabs

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in जनातलं, मनातलं
16 Apr 2019 - 6:51 pm

कार जेव्हढी लहान तेवढी तिची चर्चा जास्त मोठी !
काही वर्षांपुर्वी टाटांनी नॅनो बाजारात आणली होती तेव्हा तिच्यावर टीका करणारा आणि तिच्या प्रेमात असणारा मोठा वर्ग होता. एक वेगळा प्रयोग म्हणून तिच्याकडे देशाने उत्सुकतेने पहात होता. आता नॅनोचे उत्पादन थांबविले गेले आहे पण तेव्हाच माझ्या मनात विचार आला की टाटांनी नॅनोला कार म्हणून विकण्यापेक्षा रिक्षा म्हणून विकले असते तर ?? असो.

तर हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे बजाज ऑटो एक नवीन गाडी घेऊन येत आहे "बजाज क्युट" !

बहुधा नॅनोच्या अपयशापासून बोध घेत आताच त्यांनी स्पष्ट सांगीतले आहे की ही कार नाहीये. ही आहे "क्वाड्रासायकल". हा एक नवीन वाहनप्रकार भारतात येऊ घातला आहे ज्यासाठी कार किंवा ऑटोरिक्षा पेक्षा वेगळे नियम लागू होतात.

गाडी बद्दल काही महत्वाची माहिती
गाडीचे इंजिन २१६.६ सीसी आहे.
पाच पुढील बाजूला जाणारे आणि एक मागील बाजूसाठी ( रीव्हर्स) गिअर्स
वजन : अंदाजे ४५० किलो (पेट्रोल) / ५०० किलो (सीएनजी)
केवळ चार व्यक्ती बसू शकतील
कमाल वेगमर्यादा : ताशी ७० किमी
कितना देती है (मायलेज) - पेट्रोल अंदाजे ३५ किमी प्रति लिटर / सीएनजी - अंदाजे ४३ किमी प्रति किलो.
किंमत : अंदाजे ३ ते ३.५ लाख

हे एक केवळ शहरी वाहन आहे आणि कारकडून असलेल्या अपेक्षा पुर्ण होऊ शकणार नाहीत. सध्या केवळ व्यापारी उपयोगासाठी परवानगी मिळालेली आहे मात्र लवकरच वैयक्तीक वापरासाठी परवानगी मिळू शकेल असे वाटते.

आता
१. रिक्षावाले एखादा लाख जास्त मोजून ही नवी रिक्षाकार विकत घेतील काय ?
२. टॅक्सीवाले सध्या च्या ५-७ लाखाच्या टॅक्सीऐवजी हिला पसंती देणार काय ?
३. लाखाची मोटरसायकल घेण्यापेक्षा ही तेवढाच मायलेज देणारी गाडी घेणारे मोटारसायकलस्वार ह्या गाडीचे स्वागत करतील काय ?
४. टोल नाक्यावर हिला रिक्षा म्हणून वागवणार की चारचाकी म्हणून तेव्हढाच टोल घेणार ?
५. की हि पण नॅनोच्याच र स्त्याने जाणार ?
हे येणारा काळच सांगेल.

१८ एप्रिल २०१९ ला हिचे अधिकृतपणे बाजारात आगमन होईल. बहुतेक हिचा खप वाढावा म्हणून बजाज हळूहळू रिक्षाचे उत्पादन थांबवतील.

अधिक माहितीसाठी खालील युट्युब दुवे बघण्याची शिफारस करतो.
दुवा १
दुवा २
दुवा ३

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

एक व्यक्ती/ प्रवासी एक मोठी सूटकेस ओटोरिक्शातून नेऊ शकत नाही. तर अशा व्यापारी वाहनाची आवश्यकता आहे. २०० सीसी म्हणजे दहा एचपी झाले.

प्रसाद_१९८२'s picture

16 Apr 2019 - 7:36 pm | प्रसाद_१९८२

बहुतेक हिचा खप वाढावा म्हणून बजाज हळूहळू रिक्षाचे उत्पादन थांबवतील.
---
टाटांच्या क्वाड्रासायकलचा खप वाढावा म्हणून बजाज त्यांच्या ऑटोरिक्षाचे उत्पादन का थांबवतील?

शाम भागवत's picture

16 Apr 2019 - 7:42 pm | शाम भागवत

बजाजची क्वाड्रासायकल टाटा बनवणार?

धर्मराजमुटके's picture

16 Apr 2019 - 7:44 pm | धर्मराजमुटके

लिहिण्यात कोठे चुक झाली आहे काय ? टाटा नॅनो व बजाज क्युट ची तुलना / संदर्भ दिले आहेत.

प्रसाद_१९८२'s picture

16 Apr 2019 - 8:08 pm | प्रसाद_१९८२

माझीच वाचण्यात चूक झाली.
टाटा नॅनोचा उल्लेख तुमच्या लेखात इतक्यावेळा आलाय की मला वाटले, टाटाने नॅनोचे उत्पादन थांबवून हि नविन गाडी बाजारात आणली की काय.

या गाड्या उबेर ओला साठी असतील किंवा निर्यातीसाठी (आफ्रिका खंड किंवा दक्षिणपूर्व आशिया .... इंडोनेशिया ) ...
नॅनो लोकप्रिय झाली नाही त्यामुळे ही लोकप्रिय होण्याची शक्यता कमी वाटतेय ...

ashok dalvi's picture

16 Apr 2019 - 9:19 pm | ashok dalvi

nistich lokana aawadel.

ashok dalvi's picture

16 Apr 2019 - 9:19 pm | ashok dalvi

nistich lokana aawadel.

ashok dalvi's picture

16 Apr 2019 - 9:19 pm | ashok dalvi

nistich lokana aawadel.

अभ्या..'s picture

16 Apr 2019 - 10:30 pm | अभ्या..

खरेतर हा प्रयोग महिन्द्राने आधीच जिओ नावाने केला होता. बजाजने फक्त दारे बसवलीत ह्याला.
m
हि डिसकंटीन्यु केली महिन्द्राने.
कारणे तुम्ही विचारलेल्या प्रश्नात आहेत.

१. रिक्षावाले एखादा लाख जास्त मोजून ही नवी रिक्षाकार विकत घेतील काय ?

रिक्शावल्यांसाठी बजाज आरई किंवा कोम्पॅक्ट ह्याला पसंती असते ती कमी टर्निंग रेडियस आणी चालवण्यासाठी सोपी म्हणून. स्कूटरटाईप हॅन्डल त्याना स्टेअरिंगपेक्षा सुलभ वाटते. क्युट पॉवर स्टेअरिंग देउ शकणार नाही तेंव्हा टर्निंग ह्या एका मुद्द्यावर क्युट मागे पडणार. रिक्शावाल्यांचे दुसरे कारण म्हणजे ओपन वेहिकल ही कन्सेप्ट सोपी वाटते. दार उघडून बसणे आणि डायरेक्ट बसणे हे छोट्या अंतरासाठी मॅटर करते. पॅक्ड वेहिकल लहान अंतराला योग्य नव्हेच. बजाज आरई ची पूर्ण स्टील बॉडी तशी म्हणले तरी बरीच मजबूत असते. नव्या क्युटची बॉडी आणि बरेच पार्ट तकलादू वाटतात. रिक्शावाल्यांनी अशा तकलादू पार्टच्या थ्रीव्हीलर्स नाकारायची भरपूर उदाहरणे आहेत. अतुलशक्ती, विक्रम, टीव्हिएस किंग, महिन्द्रा अशा बर्‍याच थ्रीव्हीलर्स बजाज आरई समोर टिकाव धरु शकल्या नाहीत.(अपवाद आपे पिआजिओचा)

२. टॅक्सीवाले सध्या च्या ५-७ लाखाच्या टॅक्सीऐवजी हिला पसंती देणार काय ?

नाही. एक दोन लाख कमी टाकून कुणीही स्विफ्ट डिझ्झयर, वॅगनार, अ‍ॅसेंट, झेस्ट ह्या कॅब स्पेशल गाड्यांची मजबुती, कम्फर्ट, सुविधा, डौल, वेग, स्टेटस ह्या गोष्टी टाळणार नाही. कॅबसाठी खास बनवलेल्या डिझायर टूर, अ‍ॅक्सेंट प्राईम, केयुव्ही ट्रीप आणि झेस्ट ह्या गाड्यांची किंमत ५ लाखापेक्षा कमी असलेने टॅक्सीवाले ह्याच मॉडेल्स ना प्रेफर करणार. क्युट त्यांच्यासमोर खूप ओबडधोबड आणि प्राथमिक वाटते. नॅनो निदान डिझाईन आणि लुक्स मामल्यात भारी होती. क्युटकडे तेही नाही.

३. लाखाची मोटरसायकल घेण्यापेक्षा ही तेवढाच मायलेज देणारी गाडी घेणारे मोटारसायकलस्वार ह्या गाडीचे स्वागत करतील काय?

कधीच नाही. नॅनोने ते सिध्द केले आहे. नॅनोयुगातच वाढलेला रॉयल एन्फिल्ड आणि जावासारख्या हेवी इंजिन बाईक्सचा आणि केटीएम, डोमिनर, यामाहा सारख्या महागड्या परफॉर्मन्स बाईक्सचा खप हेच दाखवतो की लोकॉस्ट फोरव्हीलर स्वत:कडे महाग बाईकचा ग्राहक फिरवू शकत नाही.

४. टोल नाक्यावर हिला रिक्षा म्हणून वागवणार की चारचाकी म्हणून तेव्हढाच टोल घेणार ?

हे काय सांगू शकत नाही. नॅनोला कारचाच टोल आकारला जातो. क्युटला पण तेच करणार.

५. की हि पण नॅनोच्याच र स्त्याने जाणार ?

अर्थात आणि अर्थातच. सध्या इलेक्ट्रिक रिक्षा, सीएनजी रिक्षा, सीएनजी टमटम अशी सक्सेस उदाहरणे अन त्यांना सोयीची बाजारपेठ आहे. महिन्द्रा जिओ, आयशर पोलॅरिसची मल्टिक्स ही अल्ट्राफ्लॉप दोन उदाहरणे असताना तशीच क्युट बाजारात आणणे हे बजाजचे धाडसच म्हणावे.

सिक्रेटसुपरस्टार's picture

17 Apr 2019 - 2:16 am | सिक्रेटसुपरस्टार

नवीन माहिती मिळाली. पण गाडीत बसायचंच तर रिक्षासारख्या दिसणाऱ्या गाडीत काय बसायचं ही शंका मनात आली. असो. आवड ज्याची त्याची.

धर्मराजमुटके's picture

17 Apr 2019 - 9:41 am | धर्मराजमुटके

आता साधारण ५० ते ७० वयाच्या गटातील बायका ह्या गाडीत बसतील की नाही ती पण एक शंका आहे. पुर्वी ह्या बायका एकटीने रिक्षा / टॅक्सीत बसायला घाबरायच्या. प्रत्येक रिक्षा / टॅक्सीवाला आपल्याशी वाईटच वागणार अशी ह्यांची ठाम समजूत होती. त्यातल्या त्यात वेळ पडली तर रिक्षा बरी कारण त्यातून निदान चालत्या गाडीतून उडी मारायची तरी सोय होती असे त्यांना वाटे.

विजुभाऊ's picture

17 Apr 2019 - 10:02 am | विजुभाऊ

नॅनो ही खरेच एक चांगली गाडी होती.
माध्यमांनी तीला लो कॉस्ट कार म्हनून प्रपोगेट केले. तिथेच मोठी चूक झाली.
खरेतर तीला लेडीज कार किंवा यूथ कार म्हणून पुढे आणता आले असते. पण वेळ निघून गेली.
नॅनो इलेक्ट्रीक कार हाही एक पर्याय होता. पण गरीबांची किंवा स्वस्तातली गाडी हे बिरूद कोणालाच नको असते.
वैयक्तीक मला स्वतःला नॅनो चे डिझाईन खूपच आवडले होते
नॅनो मधे मागील बाजूस बसणे हा कंफर्टेबल अनुभव नाही पण टू सीटर कार म्हनून देखील नॅनो खूप चालली असती.
बजाज क्यूट ची आणि नॅनोची कुठेच तुलना होउ शकत नाही.
क्यूट कदाचित कंपनी आम्तर्गत वाहन म्हणून चालू शकेल. पण फुल फ्लेज कार म्हणून नाही.
शिवाय ती दिसायलाही खूप ओबडधोबड बेंगरूळ आहे.
क्यूट्ला लेडीज कार ( गरीबांची चारचाकी लूना) म्हणून प्रोजेक्ट केले तर चालू शकेल

मराठी कथालेखक's picture

17 Apr 2019 - 11:38 am | मराठी कथालेखक

१३.२ PS (HP) चे इंजिन आहे. (मारुती ८०० देखील ३५ की ३६ HP ची होती) AC नाहीये असं दिसतंय.. अशा गाडीचा खप होणं कठीणंच दिसतंय..

छान माहिती. गेली दोन तीन वर्षे ह्या गाडीच्या मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर ट्रायल सुरु असलेल्या पहिल्या होत्या, अपेक्षेपेक्षा बराच उशीर झाला बाजारात यायला.
पहिला व्हिडिओ पाहिला, त्यात म्हंटल्या प्रमाणे हि मोनो फ्युएल गाडी आहे सी.एन.जी. व्हेरीएंट मध्ये सी.एन.जी.+ पेट्रोल असा पर्याय नसल्याने थोडी गैरसोयीची वाटली. कुठल्याही कारणास्तव सी.एन.जी. मधेच संपला तर पेट्रोल प्रमाणे बाटली/कॅन मध्ये गॅस भरून आणण्याची सोय नसल्याने पंपापर्यंत गाडी ढकलत नेण्याची वेळ येऊ शकते. सद्यस्थितीत असलेली गॅस पंपांची संख्या आणि तिथे लागलेल्या लांबच लांब रांगा पहिल्या तर ह्या गाडीचा सी.एन.जी. व्हेरीएंट घेणे जिकीरीचे वाटते.
पेट्रोल मॉडेलला हौशी लोकांची पसंती मिळू शकेल पण तरुणाईला ही गाडी कितपत आकर्षित करू शकेल ह्याबद्दल शंका आहे.
वरती विजुभाऊनी लिहिल्या प्रमाणे नॅनो ही खरेच एक चांगली गाडी होती.

अभ्या जी खूप छान माहिती. नॅनो इंजिन, मागचा आकार सेम ठेवून तीन चाकी अर्धे दरवाजे असे बनवली असती तर सर्व रिक्षा बंद पडल्या असत्या.

भंकस बाबा's picture

18 Apr 2019 - 5:44 am | भंकस बाबा

थोड़ा वेगळा आहे. माझ्या माहितिप्रमाणे या गाडीला हायवेवर एंट्री नाही. मुंबई वा पुण्यातील पार्किंगची समस्या बघता ह्या गाडीला या शहरात प्रतिसाद मिळेल. सध्या या गाडीचे दोनच वेरियंट येत आहेत, जेव्हा भविष्यात इलेक्ट्रिक वेरियंट येईल तेव्हा हिची उपयुक्तता सिद्ध होईल.

पुणेकरांची वाहतूक शिस्त बघता या गाडीला जर ट्रॅफिक सिग्नल शी सिंक केले तर ती नक्की चालेले पुण्यात.

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2019 - 11:05 am | चौथा कोनाडा

ही क्वाड्रीसायकल गाडी बाजारात येणार म्हणून गे ली ८ वर्षे ऐकतो आहे, येणार आहे का बाजारात नक्की ?
(नॅनो नंतर याची देखील खूप चारचा सुरु झाली होती)

सुरुवातीला ही गाडी सध्याची तीन चाकी ऑटो रिक्षा असुरक्षित म्हणून ही चार चाकी तयार करायला घेतली.
ही रिक्षाच आहे.
नंतर नॅनोला स्पर्धा अशी देखील चर्चा सुरु झाली ( ऍक्च्युअली तांत्रिक स्पेसिफिकेशन नुसार दोन्हीचा वर्ग वेगळा आहे.)
ही गाडी बऱ्याचदा मुंबई पुणे रोडला रोड-टेस्टिंगसाठी फिरताना पाहिलीय.

हे उत्पादन चालणार नाही असे वाटते. यावर सविस्तर मुद्दे मा. अभ्या यांनी खूप सुंदर रित्या मांडलेले आहेत.

उगा काहितरीच's picture

18 Apr 2019 - 12:59 pm | उगा काहितरीच

नाही आवडली गाडी.