कार जेव्हढी लहान तेवढी तिची चर्चा जास्त मोठी !
काही वर्षांपुर्वी टाटांनी नॅनो बाजारात आणली होती तेव्हा तिच्यावर टीका करणारा आणि तिच्या प्रेमात असणारा मोठा वर्ग होता. एक वेगळा प्रयोग म्हणून तिच्याकडे देशाने उत्सुकतेने पहात होता. आता नॅनोचे उत्पादन थांबविले गेले आहे पण तेव्हाच माझ्या मनात विचार आला की टाटांनी नॅनोला कार म्हणून विकण्यापेक्षा रिक्षा म्हणून विकले असते तर ?? असो.
तर हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे बजाज ऑटो एक नवीन गाडी घेऊन येत आहे "बजाज क्युट" !
बहुधा नॅनोच्या अपयशापासून बोध घेत आताच त्यांनी स्पष्ट सांगीतले आहे की ही कार नाहीये. ही आहे "क्वाड्रासायकल". हा एक नवीन वाहनप्रकार भारतात येऊ घातला आहे ज्यासाठी कार किंवा ऑटोरिक्षा पेक्षा वेगळे नियम लागू होतात.
गाडी बद्दल काही महत्वाची माहिती
गाडीचे इंजिन २१६.६ सीसी आहे.
पाच पुढील बाजूला जाणारे आणि एक मागील बाजूसाठी ( रीव्हर्स) गिअर्स
वजन : अंदाजे ४५० किलो (पेट्रोल) / ५०० किलो (सीएनजी)
केवळ चार व्यक्ती बसू शकतील
कमाल वेगमर्यादा : ताशी ७० किमी
कितना देती है (मायलेज) - पेट्रोल अंदाजे ३५ किमी प्रति लिटर / सीएनजी - अंदाजे ४३ किमी प्रति किलो.
किंमत : अंदाजे ३ ते ३.५ लाख
हे एक केवळ शहरी वाहन आहे आणि कारकडून असलेल्या अपेक्षा पुर्ण होऊ शकणार नाहीत. सध्या केवळ व्यापारी उपयोगासाठी परवानगी मिळालेली आहे मात्र लवकरच वैयक्तीक वापरासाठी परवानगी मिळू शकेल असे वाटते.
आता
१. रिक्षावाले एखादा लाख जास्त मोजून ही नवी रिक्षाकार विकत घेतील काय ?
२. टॅक्सीवाले सध्या च्या ५-७ लाखाच्या टॅक्सीऐवजी हिला पसंती देणार काय ?
३. लाखाची मोटरसायकल घेण्यापेक्षा ही तेवढाच मायलेज देणारी गाडी घेणारे मोटारसायकलस्वार ह्या गाडीचे स्वागत करतील काय ?
४. टोल नाक्यावर हिला रिक्षा म्हणून वागवणार की चारचाकी म्हणून तेव्हढाच टोल घेणार ?
५. की हि पण नॅनोच्याच र स्त्याने जाणार ?
हे येणारा काळच सांगेल.
१८ एप्रिल २०१९ ला हिचे अधिकृतपणे बाजारात आगमन होईल. बहुतेक हिचा खप वाढावा म्हणून बजाज हळूहळू रिक्षाचे उत्पादन थांबवतील.
अधिक माहितीसाठी खालील युट्युब दुवे बघण्याची शिफारस करतो.
दुवा १
दुवा २
दुवा ३
वाचने
17842
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक व्यक्ती/ प्रवासी एक मोठी
नविन माहिती बद्दल धन्यवाद.
बहुतेक हिचा खप वाढावा म्हणून बजाज हळूहळू रिक्षाचे उत्पादन थांबवतील.--- टाटांच्या क्वाड्रासायकलचा खप वाढावा म्हणून बजाज त्यांच्या ऑटोरिक्षाचे उत्पादन का थांबवतील?बजाजची क्वाड्रासायकल टाटा
In reply to नविन माहिती बद्दल धन्यवाद. by प्रसाद_१९८२
लिहिण्यात कोठे चुक झाली आहे काय ?
In reply to बजाजची क्वाड्रासायकल टाटा by शाम भागवत
ओह सॉरी,
In reply to लिहिण्यात कोठे चुक झाली आहे काय ? by धर्मराजमुटके
या गाड्या उबेर ओला साठी असतील
nistich lokana aawadel.
nistich lokana aawadel.
nistich lokana aawadel.
फ्लॉप शो
नवीन माहिती मिळाली. पण गाडीत
तो ही एक प्रश्न आहेच
In reply to नवीन माहिती मिळाली. पण गाडीत by सिक्रेटसुपरस्टार
नॅनो ही खरेच एक चांगली गाडी
१३.२ PS (HP) चे इंजिन आहे.
छान माहिती. गेली दोन तीन वर्षे ह्या गाडीच्या मुंबई पुणे एक्स्प्
अभ्या जी खूप छान माहिती. नॅनो
क्यूट हा कॉन्सेप्ट
पुणेकरांची वाहतूक शिस्त बघता
ही क्वाड्रीसायकल गाडी बाजारात
नाही आवडली गाडी.
त्यापेक्षा प्युगाॅट कंपनीची
हीच का ती ?
In reply to त्यापेक्षा प्युगाॅट कंपनीची by शाम भागवत
अशीच अजुन एक आहे...
In reply to हीच का ती ? by चौथा कोनाडा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bumbro... :- Mission Kashmirक्वाड्रोपण चांगली आहे.
In reply to अशीच अजुन एक आहे... by मदनबाण
५१% शेअर्स महिंद्रकडे आहेत.
In reply to क्वाड्रोपण चांगली आहे. by शाम भागवत
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Main Vari Vari... :- Mangal Pandey: The Risingक्वाड्रो४ खतरी दिसतेय !
In reply to अशीच अजुन एक आहे... by मदनबाण
पण होण्डा फोर्झा हाय एण्ड
In reply to क्वाड्रो४ खतरी दिसतेय ! by चौथा कोनाडा
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Dil De Diya Hai... :- Cover by Sampreet Dutta [ Masti ]या स्टायलिश बाईकची लो एंड
In reply to पण होण्डा फोर्झा हाय एण्ड by मदनबाण
मॅक्सी स्कूटर किंवा टूरिंग
In reply to या स्टायलिश बाईकची लो एंड by चौथा कोनाडा
अभ्या तुझ्या प्रतिसादाशी सहमत
In reply to मॅक्सी स्कूटर किंवा टूरिंग by अभ्या..
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Tu Hi Hai Aashiqui... :- Dishkiyaoonही का?
In reply to मॅक्सी स्कूटर किंवा टूरिंग by अभ्या..
नाही, हि वेगळी.
In reply to ही का? by शाम भागवत
व्वा
In reply to नाही, हि वेगळी. by अभ्या..
मात्र पुढची दोन्ही चाके
In reply to नाही, हि वेगळी. by अभ्या..
हो. हीच.
In reply to हीच का ती ? by चौथा कोनाडा
रिक्षा ही भारतात वैयक्तीक
काही लोक वापरतात. पण "पत"
In reply to रिक्षा ही भारतात वैयक्तीक by विजुभाऊ
एका दुचाकी वर ५ जणांचे कुटुंब
यातली कुठलीही गाडी भारतात
एकदा एनफिल्डवर बसून बघा, सुख
In reply to यातली कुठलीही गाडी भारतात by सुबोध खरे
एनफिल्डवर वरचा आनंद
In reply to एकदा एनफिल्डवर बसून बघा, सुख by प्रचेतस
कुठल्याही दुचाकीवर मागच्या
In reply to एनफिल्डवर वरचा आनंद by चौकस२१२
म्हशीवर कोण बसणार?
In reply to एकदा एनफिल्डवर बसून बघा, सुख by प्रचेतस
खरे काका,
In reply to यातली कुठलीही गाडी भारतात by सुबोध खरे