अडनिडी मुलं-३

जेडी's picture
जेडी in जनातलं, मनातलं
17 Dec 2018 - 10:50 pm

दहावी होऊन मुलांना चांगले मार्क्सही मिळाले पुढे ११ वी साठी मुलांनी मिळेल तिथे ऍडमिशन घेतले . सीबीएस्सची कॉलेजेस जास्त नाहीत आणि स्टेट वाल्याना आदी प्रेफरेन्स म्हणून आणखीच गोंधळ . शिवाय त्यांची स्टेट बोर्डच्या सिलॅबस मुळे तिकडे मन असे रमतच नाही. लेकीला आर्ट्स विथ मॅथ्स घ्यायचे होते , पुण्यासारख्या शहरात ५ कॉलेज फक्त . एसपी , फर्ग्युसन ला मिळाले तरच आर्टस् ला घ्यायचे नाहीतर सायन्स असे ठरले . पण ते मिळाले नाही. एकाच कॉलेजला सायन्स आणि आर्ट्ससाठी नंबर लागला . मग सायन्स ला घेतले ऍडमिशन . चारच दिवसात म्हणे , मला इथे ऍडमिशन नकोय, तिकडे एसपी , फर्ग्युसन ला मिळतंय का बघ नाहीतर मी कॉलेजला जाणार नाही . किंवा इथेच आर्ट्सला घे . इथलया शिक्षकांना काहीच येत नाही , कसले फालतू कॉलेज आहे . मी म्हणाले, आगं फी भरलीय आता ती मिळणार नाही तर तू अकरावी सायन्स कर आणि मग आर्टस् ला घे तर म्हणे नाही मी काहीही अभ्यास करणार नाही, क्लासला तर मुळीच जाणार नाही . मी माझ्या मतावर ठाम आणि ती तिच्या . झाले , अकरावी कशी बशी पास झाली. रिझल्ट बघून मी म्हणाले आता आर्टस् ला घे. तर म्हणे जमणार नाही, काय व्हायचे ते होऊदे पण मी आता आर्ट्सला ऍडमिशन घेणार नाही आणि अभ्यासही करणार नाही . क्लास लावणार नाही. तूच शिकवायचे . मी म्हणाले तू क्लास लाव मला आता तुला मॅथ्स शिकवायला जमणार नाही . तर म्हणे दहावीपर्यंत कशी शिकवत होतीस आणि आता का नाही जमणार ? फेसबुक , मिसळपाव ह्यातून टाइम मिळेल तेंव्हा मला शिकवशील ना ? मला खरेच ते व्याप जमणार नव्हते म्हणून मी कशालाही भीक न घालता ठाम नकार दिल्यावर १ लाख भरून क्लासला ऍडमिशन घेतले पण कोणत्याच क्लासला ना नीट गेली , ना नीट अभ्यास केला. काही म्हणाले तर तूच सायन्स ला ऍडमिशन घ्यायला लावलय, माझी इच्छा नवहती , आता तू बघच . वर्षभर मी अक्षरशः भीतीच्या
सावटात काढले. पोरीने काहीही अभ्यास केला नाही . सर्व करून पाहिले - प्रेमाने, धमकवून, पण काहीही उपाय नाही . फक्त एवढेच, तू नुसत्या अकरावीच्या फीचा एवढा विचार का केलास ? वाया गेली असती तर काय होणार होते? प्रॅक्टिकल कधी असायची ते हि माहीत नव्हते . इथले सर्व गावंढळच आहेत, त्यांना नीट इंग्लिशच बोलता येत नाही ... टीचर ला पण इंग्लिश बोलता येत नाही आणि मी कॉलेजलाही जाणार नाही आणि क्लासला हि जाणार नाही . अगदी कौन्सेलर ची मदत घेऊनही पहिली पण काहीच उपयोग नाही . अजून एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटतेय ती म्हणजे , माझी लेक कॉलेजला जायला नाही म्हणत होती कारण कोणीच बरोबर नवहते, सर्व कपल्स आहेत म्हणाली. माझ्या मैत्रिणींना पण आता बॉयफ्रेंड भेटलेत म्हणे . ते रोज कोठे ना कोठे फिरायला जातात , मी त्यांच्याबरोबर गेले कि माझी सिच्युएशन ऑकवर्ड होते . मी आपली समाजवात राहायचे , तू जा . त्यांच्यात मिक्स हो . एकदा सर्व पाषाण लेक ला गेले , तिथे माझी लेक एकटी बाहेर बसून राहिली. बाकी सर्व आत झाडी झुडपात जोडी जोडीने बसायला गेले . ती हताशपणे एकटी बाहेर बसून राहिली . बाकीच्या मुलींना त्यांचे बॉयफ्रेंड सिगारेट ओढायला लावत , नाही म्हणले कि , "बस क्या यार , इतना भी प्यार नाही करती क्या मेरेसे ?" असे म्हणत ." तेंव्हापासून तर लेकीने मित्र मैत्रीचे नावच टाकले .

तिच्या वर्गात अजून एक शाळेपासूनची मैत्रीण होती. तिला एस वाय बीकॉम झालेला बॉयफ्रेंड मिळला . कॉलेजचे नाव सांगून त्यांच्यबरॊबर हि अकरावीची पोरगी नुसती फिरणार . बड्डे पार्टीला आपलय दोनच मैत्रिणी बोलावल्या मॅक डीला , त्यात माझी लेक आणि दुसरी एक मैत्रीण बाकी सर्व त्या मुलाचे मित्र . ह्या दोघी चार वाजताच निघून आल्या आणि हि त्या मुलांबरोबर कोठेतरी फिरायला गेली. तिच्या आईने फोन करून विचारल्यावर आमच्या घरी जात आहे असे तिने घरी सांगितले. तिच्या आईचा वाट पाहुन माझ्या लेकीला फोन . लेकीने सरळ सांगितले, आम्ही कधीच चार वाजतच घरी निघून आलोय म्हणून परत त्या मैत्रिणीचा लेकीला फोन, काहीही कर माझ्या आईला तू माझ्याबरोबर असल्याचे सांग. लेक अगदीच गोंधळून गेली. त्याच दिवशी त्या पोरीचा रात्री आठ वाजता छोटा अपघात झाला . सर्व ढोपरे फुटली. तिची आई माझ्या लेकीला झाप झाप झापली , कोठे गेला होतात म्हणून ?

नंतर तिच्या वडिलांनी तिला बड्डे गिफ्ट महागडा फोन घेऊन दिला होता , ती कोठेतरी बॉयफ्रेंड बरोबर फिरायला गेली होती तेंव्हा तो हरवला . तिने आईला आमच्याकडे नोटबुक घ्यायला गेल्यावर बॅग स्कुटरला तशीच राहिली आणि त्यातून कोणी काढून घेतला असे सांगितले. तिच्या आईचा परत लेकीला फोन, तुमच्या सोसायटीत फोन हरवलाय तर आईला सांगून सीसी टीव्ही बघा म्हणे, वॉचमन असताना माझ्या लेकीचा फोन गेलाच कसा म्हणे ? माझ्या लेकीचे मला फोन वर फोन , तू लवकर घरी ये, मी तिच्या आईला खरे काय ते सांगतेय . होऊदे दे तिचे कॉलेज बंद . मी लेकीला म्हणले , तू थोडा वेळ थांब मी येऊन काय करायचे ते बघते .

घरी गेल्यावर मी तिच्या आईला फोन केला आणि सांगितले कि तुमच्या मुलीचा फोन आमच्या सोसायटीत नाही हरवला . ती कोठेतरी बाहेर गेल्यावर हरवलाय पण भीतीपोटी तिने तुम्हाला मनघडत सांगितले आहे . तुम्ही तिला मारू नका पण नीट विचारलेत तर ती तुम्हाला सर्व सांगेल. बाप आय टी मध्ये मोठ्या पदावर . आई खास मुलींच्या शिक्षणासाठी घरीच. चांगल्या सोसायटीत फ्लॅट , कशाचीही कमी नाही. काय करणार आई बाप? मी तिच्या आईला , उद्या पॅरेण्ट टीचर मीट वेळी भेटू आणि मला तुम्हाला काही सांगायचे आहे असे सांगितले. मी गेले होते , सर्व तयारी करून पण पोरीने आईला माझ्याकडे फिरकून पण दिले नाही आणि आईही फिरकली नाही. काय बोलणार ?
काय करायच्या या मुलांचे ?

क्रमशः

समाजजीवनमानलेखअनुभव

प्रतिक्रिया

पहिले दोन लेख मी दहावीचा रेसुलत लागल्यावर लगेचच ऐसी अक्षरे लिहिले होते पण पुढे काही लिहिणे झालेच नाही, वरचे सर्वच प्रतिसाद अतिशय मौल्यवान असून मी नंतरचा लेख तेंव्हाच का लिहिला नाही याचे मला वाईट वाटत आहे .

मनापासून धन्यवाद , सर्वच प्रतिसादातून मला खूप काही शिकायला मिळत आहे, मिळेल . माझ्यासारख्या असंख्य पालकांना पण खूप शिकायला मिळेल . विशेष करून दोन्ही डॉक्टरांचे प्रतिसाद मी पुन्हा पुन्हा वाचले , माझ्या मुलीच्या भवितव्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल ह्यावर खूप विचार करतीय . ह्या दोन चार दिवसात काही प्रतिसाद मी तिला तसेच्या तसे वाचून दाखवलेत. तिच्या वागण्यात फरक होतोय हे मी अनुभवतेय . इथूनपुढेपण तिचे निरीक्षण करेन . पुन्हा ये रे मागल्या झालेच तर घोड्याला पाणयापर्यंत आणायची तयारीही ठेवेन . पूर्वी मला नुसत्या डोळ्यांना धारा लागत आणि तिचे मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस सुरु होई . आता तसे होणार नाही याची काळजी घेईन .

यशोधरा ताई आणि सुधीर कांदळगावकर यांचेही प्रतिसाद मी बारकाईने वाचले आणि मी कोठे कमी पडले ह्यावर पुन्हा एकदा चिंतन केले . चुका झाल्याचं आहेत , सुधारण्याचा नक्की प्रयत्न कारेन .

गामांची व्यावसायिक शिक्षणासाठीचा एखादा कोर्स करण्याविषयीच्या सूचनेचा पण विचार केला आहे .

पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

इथूनपुढच्या लेखातही मी इतर अनेक मित्र मैत्रीचे किस्से सांगणार होते पण ते सांगावे कि नको ह्याबद्दल मनात संभ्रम आहे कारण ह्याच धाग्यात अतिशय उपयुक्त सूचना मिळालेल्या आहेत .

संवेदनशील विषय मांडला तुम्ही, मला व माझ्या सारख्या सूपातल्या पालकांना चर्चेचा खुप उपयोग होणार आहे. प्लिज पुढचा लेख नक्की लिहा . पुलेशु.

स्मिता.'s picture

22 Dec 2018 - 5:56 pm | स्मिता.

आमच्यासारख्या सुपातल्यांच्या विचारांना चालना मिळतेय.

आंबट गोड's picture

24 Dec 2018 - 12:31 pm | आंबट गोड

बाब म्हणजे.. हल्ली मुले अजिबातच एकमेकांच्या घरी जात नाहीत....सदैव 'बाहेर' भेटायचे ठरवितात...? असे का? घरी म्हणे तुम्ही 'स्टेअर ' करता, अनावश्यक (रीडः भोचक!) प्रश्न विचारता...इ. पण त्या मुळे आम्हाला मुलांचे मित्रच माहिती नाहीत.
मी मुलाला व मुलीलाही कितीदा म्हणते...की अरे तुमच्या मित्र-मैत्रिणींना घरी बोलवा..आपण चांगले काही खायला करु , तुम्ही वेगळे गप्पा मारत बसा हवे तर.. पण नाहीच!
कुणी नाही येत म्हणे!
तुमचा काय अनुभव?