कबिनीकाठचे हती

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
28 Oct 2008 - 5:59 pm

कारापुर हे कर्नाटकातील एक छोटेसे खेडे. बंगलोर पासून २२० किमी तर म्हैसूर पासून ८० किमी अंतरावरचे हे छोटेसे गाव नागरहोळ्ळे अभयारण्याच्या दक्षिण पूर्वेस वसलेले आहे. इथे एका खाजगी विश्रामगृहात एक दिवस मुक्काम करून आम्ही पुढे मडिकेरीला जाणार होतो. मुख्य रस्ता सोडल्यावर सुमारे २० किमी सामसूम भागातून प्रवास केल्यावर आम्ही मुक्कामावर पोचलो. खरेतर आमचा १० जणांचा चमू होता. आम्ही बंगलोरहून म्हैसूर व तिथुन कूर्गला जाणार होतो, पण मेव्हण्याच्या एका मित्राने आम्हाला कबिनी विषयी आग्रहाने सांगितले. वास्तविक अशा ठिकाणी जायचे म्हणजे मला पर्वणी! भ्रमणध्वनीच्या लहरी खर्‍या अर्थाने 'लहरीनुसार' पोचणार, सुसज्ज विश्रामगृहात दूरचित्रवाणी संच नामक नतद्रष्ट प्रकार नाही आणि कसलीही खरेदीची जागा व पर्यायाने गर्दीही नाही अशा ठिकाणी जाणे म्हणजे सुखाची सर्वोच्चा कल्पना. मात्र बरोबर पत्नी, मुलगा, मावशी, मावसबहिणी, त्यातल्या एकीचा नवरा व छोटा मुलगा, माझी बहिण व तिची मुलगी (मेहुणा काही कारणास्तव उशीरा म्हणजे थेट मडिकेरीला सामिल होणार होता) असा प्रचंड काबिला असल्याने व्यक्ति तितक्या प्रकृती या उक्तिनुसार कुणाला हे कितपत आवडेल या विषयी मी जर साशंकच होतो. पण नेहेमीच प्रेक्षणिय स्थळांचे धावते दर्शन, वेळापत्रक, रांगा यापेक्षा एक दिवस आणि दूरदर्शन व कलकल याव्यतिरीक्त एक रात्र घालवायची कल्पना सगळ्यांनाच पसंत पडली.

आम्ही पोचलो जरा उशीराच (म्हैसूर मध्ये साड्या, उदबत्त्या, चंदनी देव्हारे/ भेटवस्तू मिळतात.). उशीरा निघाल्यावर उशीराच पोचणार! विश्रामगृहाच्या परिसरात दाखल होताच सेवकवर्गाने सामान ताब्यात घेत सर्वांना 'स्वगतपेय' दिले. भर उन्हातून आल्यावर गवताने शाकारलेल्या गोलाकार कुटीत बसून शहाळे पिण्याची कल्पना फारच सुखावणारी होती. आपापली कुटी ताब्यात घेउन जेवायला आलो तेव्हा तीन वाजले होते. जेवत असतानाच जंगल सफर आयोजक सांगत आले की पाच वाजता दोन तासांचा अभयारण्याचा फेरफटका आहे. जीप व यांत्रिक होडी असे दोन पर्याय होते. आम्ही होडीतून जायचे ठरवले. नेहेमीपेक्षा जरा वेगळे म्हणुन. म्हणजे आपण पाण्यात व प्राणी किनार्‍यालगतचा जंगलात असा जरा वेगळा अनुभव.

कबिनी ही कावेरीची उपनदी. मे महिन्यात देखिल निळ्या पाण्याचे विस्तिर्ण पात्र पाहुन मी हरखुन गेलो. या नदीतुन दोन तास प्रवास केला तर तामिळनाडु, केरळ व कर्नाटक अशा तीन राज्यांची सफर होते. कबिनी परिसर हा एकेकाळचा म्हैसूरच्या महाराजांचा शिकारीचा आवडता भाग. सध्या हा भाग अभयारण्यात येतो. या भागात गौरेडा, हरणे, सांबरे, बिबटे, वाघ, जंगली कुत्रे असे अनेक प्राणी वास्तव्य करुन असले तरी हा भाग हत्तींसाठी प्रसिद्ध. नदीतुन आत खोलवर दाट जंगलाच्या किनार्‍याने गेले तर नदीकाठी मुक्तपणे विहरणार्‍या हत्तींचे कळप पुष्कळ दिसतात असे ऐकले होते. हत्ती दिसताच नावाडी गती संथ करीत मोक्याची जागा हेरतो आणि पाण्याच्या खोलिचा अंदाज घेत नाव किनार्‍याच्या शक्यतो जवळ नेउन यंत्र बद करतो आणि नाव स्थिर करतो. एका ठिकाणचे हत्ती बघुन झाले की दुसरीकडे. खरेतर हा दोन तासांचा नौकाविहार म्हणजे एक सुंदर अनुभव आहे, पण त्याविषयी पुन्हा कधीतरी. आज फक्त हत्ती!

अखिल नागरहोळ्ळस्थ हत्तींचे विराट संमेलन

एक दुर्मिळ दृश्य - हत्तीबाळाचे दुग्धपान

'मुखसुद्धी?' बहुधा भोजनोत्तर मुखशुद्धीखातर हे महाशय तृणांकूर चघळीत असावेत

'आपल्याच मस्तीत दंग' असलेले हे नर्तनमुद्रेतले गजराज

आमच्या कॅमेर्‍यासाठीच हे महाशय जणु 'चल टिप लवकर' अशा आविर्भावात उभे ठाकले होते

थंडाव्यासाठी दूर्वास्नानात रंगलेले हे महाशय

'आम्ही दोघे आणि आमचे दोघे'

'सुरक्षा कवच' - हत्ती सारखा महाकाय प्राणी, त्याचे बाळही महाकाय. पण तरीही हत्ती आपल्या बाळाला नेहेमी मधे घेउन चालतात

जर पिल्लू भरकटु लागले तर आई-बाबा त्याला पुन्हा मधे घेतात

प्रवासछायाचित्रणआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

28 Oct 2008 - 6:04 pm | श्रावण मोडक

क्रमांकाची छायाचित्रे पाहून 'मदुमलाईच्या जंगलात'ची आठवण झाली. त्यात उल्लेखिलेले हत्ती हेच की काय? पूर्ण सुळ्यांचे. त्यातही पाचव्या क्रमांकाच्या छायाचित्रातील हत्ती त्या पुस्तकातील एका छायाचित्रातील हत्तीशी अगदी मिळताजुळता.
सु रे ख छायाचित्रे.

मीनल's picture

28 Oct 2008 - 6:14 pm | मीनल

मला मम्मा मम्मा करत आईच्या पाठी मागून फिरणारी हत्ती पिल्ल आवडतात.
आपण पिल्लू म्हटलं की छोटूस्स गोंडस रूप डोळ्यासमोर येत आणि हत्ती म्हटल की अजस्त्र रूप.
`हत्ती पिल्ल` म्हणजे मजेशीर विरोधाभास.

फोटोत तेच शोधत होते.थोडे दिसलेही!

मीनल.

सहज's picture

28 Oct 2008 - 6:38 pm | सहज

मस्त! इतक्या मोठ्या संख्येने हत्तींचा कळप पाहून छान वाटले.

वीरप्पनच्या गच्छंतीनंतर वन्यजीवांची सुरक्षा वाढली असावी अशी आशा.

अजुन इतर प्राणी व प्रवासवर्णन येउ द्या साक्षीजी.

सहज's picture

28 Oct 2008 - 6:38 pm | सहज

मस्त! इतक्या मोठ्या संख्येने हत्तींचा कळप पाहून छान वाटले.

वीरप्पनच्या गच्छंतीनंतर वन्यजीवांची सुरक्षा वाढली असावी अशी आशा.

अजुन इतर प्राणी व प्रवासवर्णन येउ द्या साक्षीजी.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Oct 2008 - 6:42 pm | बिपिन कार्यकर्ते

हत्ती हा तसाही माझा आवडता प्राणी. साक्षीदादा फोटो छानच काढतात. हे इतके हत्ती पाहून खूपच मस्त वाटलं.

ते सुळेवाले बघून 'कुडकोंबनच्या दादा'ची आठवण झाली. कृष्णमेघ कुंटेच्या मदुमलाईवर लिहिलेल्या पुस्तकात या सुळेवाल्याबद्दल खूप लिहिलंय त्याने. वर मोडकांनी लिहिलं आहे तसे तेच हे हत्ती नसावेत कारण पुढे तो दादा आणि त्याचा साथीदार दोघेही गायब झाले आणि सगळ्या सुळेवाल्यांचं जे काही होतं तेच प्राक्तन त्यांच्याही नशिबात असल्याचा संशय खुद्द कृष्णमेघनेच नमूद केला आहे. आणि त्याला आता खूपच वर्षे झाली असतिल. पण हा हत्ती बघून एकदम तीच आठवण आली हे मात्र खरे.

साक्षीदादा, फक्त हत्तींचीच छायाचित्रं काढली की अजूनही काही प्राणी आहेत?

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

28 Oct 2008 - 7:00 pm | श्रावण मोडक

ते नव्हेतच. पण हे पाहिल्यानंतर त्यांची आठवण झाल्यानं मनात एकदम निर्माण झालेला तो प्रश्न होता. यापैकी पाचव्या छायाचित्रातील हत्तीच्या सुळ्यांची लांबी त्या पुस्तकात अशाच पोझमध्ये असलेल्या हत्तीच्या सुळ्यांच्या लांबीपेक्षा थोडी कमीच वाटते. म्हणजे हा हत्ती वेगळाच आहे. चौथ्या छायाचित्रातील हत्तीच्या सुळ्यांची लांबी थोडी अधिक आहे, पण त्याला तितकासा बाक असल्याचे दिसत नाही. कृष्णमेघच्या त्या पुस्तकातील हत्तींच्या निरिक्षणाला आता बरीच वर्षे (किमान पाच तरी खचितच) झाली आहेत आणि मला ते वाचूनही दोनेक.
बिपिनराव, हा खुलासा सहजच केला आहे.

लिखाळ's picture

28 Oct 2008 - 10:38 pm | लिखाळ

वा !
हत्तींची चित्रं मस्तच ! असे कळपाने असलेले हत्ती पाहायला काय मजा आली असेल !
त्यात सुळेवाला नर पाहायची संधी मिळाली म्हणजे भाग्यच !
एकदम एखाद्या मंदिराच्या भिंतीवरील कोरीव कामाची आठवण झाली.

पुण्यात कधी रस्त्यावर हत्ती आला की मी आ वासून पाहायचो ! हत्तीच्या चालीकडे पाहून तबल्यामध्ये एक 'मत्त ताल' आहे. मत्त ताल एका श्रेष्ठ-ज्येष्ठ तबलजींच्या तोंडुन ऐकायला मिळाला होता :)
--लिखाळ.

बेसनलाडू's picture

28 Oct 2008 - 10:47 pm | बेसनलाडू

आवडली.
(प्रेक्षक)बेसनलाडू

भाग्यश्री's picture

28 Oct 2008 - 11:18 pm | भाग्यश्री

काय क्युट हत्ती आहेत?!! मला तो फोटो साठी पोझ देणारा हत्ती खूप आवडला.. आणि हम दो हमारे दो पण एकदम मस्त आहे!!
मला हत्ती खूप आवडतो.. रस्त्यावरून जायला लागला की बघत राहावंस वाटतं!

नंदन's picture

28 Oct 2008 - 11:26 pm | नंदन

हत्तींची छायाचित्रे आवडली. कबिनीकाठच्या सफरीची माहितीही मस्तच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चतुरंग's picture

29 Oct 2008 - 12:20 am | चतुरंग

गजराज! काय सुरेख शब्द आहे ना?
खरोखरच राजा असतो हा. एकदम दिमाखदार, आपल्या सामर्थ्याविषयी पूर्ण खात्री असलेला तरिही कुणाच्या उगाच वाटेला न जाणारा!
सर्वसाक्षी, तुम्ही साक्षात गजांतलक्ष्मीचे दर्शन एवढ्या मोठ्या स्वरुपात तेही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिलेत, आपल्याला किती म्हणून धन्यवाद देऊ? अलभ्य लाभ!
(पाचव्या चित्रातला तो सुळेवाला पहा काय डौल, काय दिमाख, काय अधिकार! छ्या..केवळ अशक्य!)
(आणि शेवटच्या चित्रातले ते इवलेसे पिल्लू! वा फारच गोंडस!)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

29 Oct 2008 - 12:41 am | विसोबा खेचर

साक्षीदेवा,

सगळेच हत्ती लै भारी रे! त्याला पाहून आम्हाला आमच्या एलिफन्ट गॉडची आठवण झाली! :)

अर्रे, लालबागच्या राजाचा बिजय असो.....

(सरळ चालणारा) तात्या.

मदनबाण's picture

29 Oct 2008 - 4:47 am | मदनबाण

व्वा,सुरेख्..एकदम कोल्हापुर च्या रंकाळा तलावावर फिरणार्‍या हत्तीणीची आठवण झाली..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

ऋषिकेश's picture

29 Oct 2008 - 8:19 am | ऋषिकेश

वा! चांगले फोटो..
हत्तीचे सुळे शिल्लक असल्याचे बघून आनंद झाला.. :)
मात्र पहिल्यांदाच इतके "काटकुळे" हत्ती पाहिले. अगदी बर्‍याच जणांच्या बरगड्या/हाडांची टोके दिसताहेत.. ते बघून वाईट वाटले. :(

-(संमिश्र) ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2008 - 8:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वच हत्तींचे फोटो झकास !!!

अनिल हटेला's picture

29 Oct 2008 - 9:12 am | अनिल हटेला

हत्तींची चित्रं मस्तच !

येउ द्यात अजुनही प्रवास वर्णन !!

(कळपातला )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सर्वसाक्षी's picture

29 Oct 2008 - 12:33 pm | सर्वसाक्षी

यांच्या पुस्तकाविषयी कुतुहल निर्माण झाले आहे, आता वाचलेच पाहिजे.

अभिप्रायाबद्दल आणि माहितीबद्दल मिपाकरांचे सप्रेम आभार.

झकासराव's picture

31 Oct 2008 - 2:18 pm | झकासराव

मस्त आहेत हत्ती.
अजुन काहि वेगळ्या प्राण्यांचे फोटु असतील तर टाका. :)
................
बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय.
http://picasaweb.google.co.in/zakasrao