माझ्या हवाईदलातील आठवणी - श्रीनगरच्या पहिल्या पोस्टींगमधे...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
22 May 2018 - 5:03 pm

मध्यंतरी एका स्पर्धेत एक आठवणीचा किस्सा पाठवला होता त्याला बक्षिस मिळाल्याचे आज कळले... अॅड गिमिक असावे असे दिसते कारण बक्षिस नक्की काय ते गुलदस्तात आहे...! तो इंग्रजीत होता... कधी वेळ मिळाला तर मराठीत लिहायचा प्रयत्न करेन....

1

मी हवाई दलात कसा प्रवेश केला आणि नंतर जीवनाला कसा कसा आकार घडत गेला यावर लेखन वेळ मिळाला की करतो...
त्यातला एक किस्सा सादर...

...हा प्लॅंचेट करतो ही बातमी काही मित्रांमार्फत बाहेर फुटली. त्यामुळे माझा भाव वधारला. विशेषतः सिनिअर आफिसर्सच्या बायका, ‘ये ना संध्याकाळी आम्हाला बघायचय काय असतं प्लॅंचेट ते.’ असं म्हणून गळ घालत आणि मी देखील, ‘हो-हो जरूर! का नाही? पण रात्रीच्या जेवणाचा बेत माझ्या आवडीचा असू दे’ असं म्हणून त्यांच्यावर थोडीफार हुकूमत गाजवत असे. माझ्या मित्रांना हा प्लॅंचेट करतो आणि सिनिअर आफिसरच्या घरी पार्ट्या झोडतो असा हेवा वाटून त्यांनी माझ्याबरोबर यायचे टाळायला सुरूवात केली. विशेषतः मी श्रीनगरला असताना प्लॅंचेटचे प्रस्थ फार झाले. एकदा तर माझे अकौंट्सचे वरिष्ठ, स्क्वाड्रन लीडर पीव्ही राव, जे कानडी होते, सिगरेट सुलकावत, माझ्याकडे न पाहताच बायकोने सांगितलयं म्हणून जरा तुच्छतेने, ‘आमच्या घरी ये बरं’ असं मोघम निमंत्रण देते झाले. ‘का सर?’ मी मुद्दाम विचारून खोदून पाहिले. ‘अरे ये तर खरं’, असं म्हणून प्लॅंचेट हा शब्द टाळून त्यांनी मला निमत्रंण दिले. रात्री मी त्यांच्या राजबाग या भागातील घरी पोहोचलो. पत्निने आल्या आल्या प्लॅंचेटचे नाव काढल्यावर आमच्या बॉसच्या कपाळाला आठ्या चढल्या. सभ्यतेचा शिष्टाचार म्हणून, ‘ओ आय सी’ असे खोटे खोटे उदगार काढून रोष ओठात दाबला. मी ही जरा आढ्यतेने, ‘सर जरा ते कॅलेंडर काढून द्याना’ असं म्हणून त्यांना कामाला लावले. ‘उद्या ऑफिसात ये तुला दाखवतो’ असे मनात कुढत त्यांनी नाइलाजाने कॅलेंडर काढून पुढ्यात ठेवले. आपला भाव वधारलेला पाहून व ते माझे वरिष्ठपण अकौंट्स ब्रांचचे असल्यामुळे मी चान्स घेत म्हटले, ‘सर मी प्लॅंचेट करीन पण एका अटीवर’, तेंव्हा त्यांच्या भुवया उंचावल्या. ‘तुम्ही आहात कानडी. मला कानडीचा गंध नाही आणि प्लॅंचेट करताना नेहमीच, हा ओक कपाचा कान पकडून त्याला हवी ती उत्तरे देतो असे माझ्या अपरोक्ष म्हटले जाते. म्हणून आपण एक प्रयोग करू या आणि मग पाहू काय होते ते.’
कानडीतून प्रयोग
‘ओके नो प्रॉब्लेम’ असे म्हणून त्यांनी नवी सिगरेट शिलकावली आणि त्यांनी कॅलेंडरच्या मागील भागावर कानडी अक्षरांचा एक तक्ता तयार केला व प्लॅंचेटला बसलो. कानडीमध्येच त्यांची नवरा-बायकोत थोडीफार बोलाचाली झाली आणि माझ्या वरिष्ठांनी पत्निच्या कानउघाडणी नंतर हातातली सिगारेट तात्पुरती टाकून, हात जोडून देवाला नमस्कार करून कपावर बोट टेकून ठेवले. एकदोन मित्र तोवर जमले. ते सगळे स्थानापन्न झाल्यावर पैकी एकाने कपावर बोट लावायला उत्सुकता दाखवली. शेवटी मी माझे बोट टेकवले आणि बॉसना ‘कोणा मृताला बोलावणार? असा प्रश्न केला. प्रश्न अनपेक्षित असल्यामुळे त्यांच्यात पुन्हा कानडीत चर्चा झाली. हळूहळू आवाज वाढला. आविर्भावावरून बॉस, 'हा काय फालतूपणा चालवलाय?' म्हणत असावेत. पण पत्नीच्या आग्रहाखातर गप्प बसून तो (मी) सांगतोय ते करायला काय हरकत आहे? असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे असावे. शेवटी मी मध्ये पडून म्हटलं, ‘ठीक आहे असु दे, ते तुम्ही नंतर ठरवा. सध्या मी अशा व्यक्तीला बोलावतो की ज्याला कानडी येत नाही’.
‘ओ येस, दॅटस् ओके’ असं म्हणून माझ्या सरांनी होकार सुचवला. मी मग मराठी व्यक्तिला आवाहन केले आणि त्याप्रमाणे खूपच पटकन कप हालला ‘हो’ म्हणून पुन्हा घरावर स्थिरावला. आता विचारा प्रश्न असं म्हटल्यावर ते एकमेकांच्याकडे पाहायला लागले. त्या बाईंनी म्हटले, ‘अहो, काय प्रश्न विचारायचे असतात, असं असतं का? मला तर माझ्या मैत्रिणीने सांगितले की ओक सगळी उत्तरं सांगतो. आता तुम्हीच प्रश्न विचारा आणि तुम्ही उत्तरं द्या.’ मला हसू यायला लागले. ‘अहो प्रश्न तुम्ही विचारायचा. त्याचे उत्तर प्लॅंचेटच्या तक्त्यावरून मिळते. मी प्रश्नांचे उत्तर देत नाही.’
‘ओ आय सी, साऊंड्स इंटरेस्टिंग’ असं म्हणून हातातला रमचा ग्लास बॉसनी खाली ठेवला. अती थंडीतील त्या दिवसात बुखारी नामक- शेगडीप्रमाणे घराचे तापमान गरम करायला कोळसे घालायच्या निमिताने ते उठून आपला व मित्रांचा रम पेग भरून खातिरदारी केली, माझ्यासमोर कोक पटकावला व मुंगफलीचे तबक सरकवले. सरांना आधी वाटले तितके प्रकरण फालतू नाही असे त्यांच्या हावभावातून जाणवत होते. कारण उशीरा आलेल्या मित्रांना ते समजाऊन सांगत होते की प्लॅंचेट म्हणजे काय ते!
मग पुढचे अर्धा ते पाऊण तास कानडीमधून प्रश्न विचारणे चालू होते. प्रश्न विचारला आणि तो कप हालू लागला. तो कप कुठे हलत होता हे मला तक्त्यावर दिसत होते, परंतु ती अक्षरे माझ्याकरता शून्य होती. कारण त्या अक्षरात कुठलं काय अक्षर आहे हेही माहित नव्हतं आणि त्या अक्षरातून निर्माण होणारा शब्द व वाक्य काय बनते आहे याची मला पुसटशी सुध्दा जाणीव नव्हती आणि मुख्य म्हणजे विचारलेला प्रश्न काय आहे जो कानडीत विचारला गेला त्या प्रश्नाचा काय रोख आहे, उत्तर काय हवय याचा मला पत्ता नव्हता. प्रश्न कानडीतून विचारले गेले. त्यानंतर कप हळूहळू कानडी अक्षरांवरून फिरु लागला. त्यातून काही अक्षरातून अर्थवाही वाक्ये येऊ लागली. त्या शब्दांचा काय अर्थ असेल असा पति-पत्नीत खल होई. त्यातून त्यांनी निर्वाळा दिला की आम्हाला कानडीत अर्थवाही उत्तरे मिळत आहेत.अधून मधून त्यांच्या बोलण्यात जेव्हा इंग्रजी शब्द येत त्यावरून मला थोडाफार अंदाज लागे. पण प्रश्न नक्की काय होता हे मला आधी समजत नव्हते. असे होता होता त्यांचे प्रश्न आणि उत्तरे संपली आणि तो कप उचलून मी त्या फूंक मारली आणि धन्यवाद असे म्हणून तो प्लॅंचेटचा डाव संपवला. त्यानंतर घडलेल्या चर्चेत असे लक्षात आले की त्यांनी कानडीतून प्रश्न विचारून मिळवलेली कानडी भाषेतून मिळालेली उत्तरे समर्पक होती. एकतर ज्या व्यक्तीशी संपर्क केला मृत व्यक्ती कानडी नव्हती त्यामुळे तिला कानडी येण्याचा प्रश्नच नव्हता. मला स्वतःला कानडी येत नाही. हे त्या कुटूंबियांना माहिती होते. तुझ्यामुळे कप फिरतो. त्याला गती येते हे नक्की. पण तू अक्षरे, शब्द, वाक्ये बनवत उत्तरे देतोय असे होत नाही असे खात्रीलायकपणे आम्ही सांगतो. आमचे संपुर्ण समाधान झाले की तू त्या उत्तरांना बनवून सूचित करत नाहीस! त्यामुळे मी प्रश्नांची उत्तरे देतो हा माझ्यावर नेहमी केला जाणारा आरोपही खोटा आहे असे स्वतः रावांनी मान्य केल्याने मला बरे वाटले. व संशोधन तऱ्हेने या विषयाला हाताळल्याचे समाधान मिळाले.
शेवटी डेंटिस्टच झाला!
असेच आणखी एकांच्याकडे मी प्लॅंचेट करीत असताना खूप मजा आली. किस्सा होता मेजर साठे यांच्या मिसेस बाबतचा. त्यांची ओळख झाली एयर ओपीच्या तेंव्हा कॅप्टन विनायक पाटणकरांच्या घरी. (मी तिसऱ्यांदा श्रीनगरच्या पोस्टींगला असताना ते कारगीलच्या युद्धाच्या प्रसंगी 15 कोअरचे कमांडर होते. २००२-३च्या सुमारास लेफ्ट्नंट जनरल रॅंकवर श्रीनगरहून महत्वाच्या पदावरून रिटायर झाले. आणि गड आणि किल्ले यांच्या संवर्धनासाठी माझ्या प्रयत्नात 2015 पासून त्यांच्याशी पुण्यात पुन्हा संपर्क आला!) एकदा आम्ही त्यांच्या गुपकार रोड वरील बंगलेवजा घरी एकत्र आलो होतो. माझी किर्ती ऐकून मिसेस साठ्यांनी मला त्यांच्या घरी बोलावले. त्यावेळेला ज्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली ती मी विसरून गेलो. परंतु काही वर्षानंतर त्यांची पुन्हा अचानक भेट झाली. त्यावेळी एकदम हस्तांदोलनाला हात पुढे करून त्यांनी म्हटले, ‘ओक, अरे तुला भेटले की मुद्दाम सांगायचे ठरवले होते. आठवतय का? आपण श्रीनगरमध्ये प्लॅंचेट केलं होतं? त्या प्लॅंचेटवर माझ्या मुलाला कॉलेज शिक्षणासाठी कुठली शाखा मिळेल असे मी विचारले होते? ते अगदी बरोबर आले बर का.’ मला गोड धक्का बसला. त्यांच्या मुलाला मेडिकलला जायचं होतं पण प्लॅंचेटवरून तो डेंटिस्ट होईल असे उत्तर आल्यामुळे त्या फार खट्टू झाल्या होत्या, पण शेवटी तो डेंटिस्टच झाला. हे त्यांच्या बरोबर लक्षात राहिले आणि त्यांनी माझी भेट होताच प्रथम उल्लेख केला त्या प्लॅंचेटचा व त्या उत्तराचा. असो.
.....

प्रचिती द्या तर मानू.... आणखी एक घरगुती किस्सा...
पुढे कधीतरी सादर करेन...

मांडणीविरंगुळा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

22 May 2018 - 6:10 pm | टवाळ कार्टा

प्लँचेटकरुन आपण अतिरेक्यांची ठाणी नेमकी कुठे आहेत आणि ते कोणत्या दिवशी किती वाजता हल्ला करणार हे जाणून घेउ शकतो का?

जेम्स वांड's picture

22 May 2018 - 6:28 pm | जेम्स वांड

Laughter

प्राची अश्विनी's picture

22 May 2018 - 6:38 pm | प्राची अश्विनी

;););)
हो आणि टक्कुमक्कुचं लग्न सुद्धा.

टवाळ कार्टा's picture

22 May 2018 - 7:13 pm | टवाळ कार्टा

एका बाणात किती पक्षी मारणार ......ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ

जसे ब्रिज खेळात डाव संपला की त्यावरील गरमागरम चर्चा फार होते तसे प्रकार प्लॅंचेटचा व्हायला लागलेला पाहून मी ते प्रकरण आवरते घेतले. अशा कटकटीमुळे पुढे मी ब्रिजचा, रमी, पपलू-टिटलू, तीनपत्ती आदीचा नाद धरला नाही. आणि माझ्या प्लॅंचेटच्या विद्येबाबत जास्त वाच्यता केली नाही!

सेनेतील नोकरीत सुंदर सुंदर मुली पहायला ही मिळणे अशक्य होते. मात्र मला ती संधी ऐतीच आली. व्हायचे असे की आम्हाला पगार वाटपाला पैसे स्टेट बँकच्या लाल चौक शाखेतून काढायला वरचेवर जावे लागे. तिथल्या ऑफिसात एकाहून एक अती सुंदर गुलाबी गालाच्या, नितळ गोऱ्या गोऱ्या कांतीच्या मुली कामात गर्क असत. मी ऑफिसर म्हणून मला काऊंटरच्या आत बोलावून चहापाणी करायची रीत होती. भिभिरत्या नजरेने पोरीही मला पाहताना खूष व्हायला होई. त्यात होती एक टीटा. काश्मिर की कली म्हणावी अशीच. नजरानजर करून मी तिला थरथरत्या आवाजात हाय हॅलो करून म्हणे. ती ही मानेने होकार देत पुन्हा कामात दंग असल्याचा बहाणा करत आहे असा मला भास होई. मला धीटपणा शिकवायला माझे मित्र संध्याकाळी बारमधे बसून भरीला घालत, म्हणत ‘गटव तिला’.. ‘मी ही तावात, ‘हो हो’ म्हणून, ‘आता पहा पुढील भेटीत तिला मेसच्या पार्टीत बोलावतो’ म्हणून भाव खात असे. मात्र तसे घडले नाही. मी थोडासा उदास झालो श्रीनगर सोडताना तिला आठवून. ( 2012 मधील लेखनात घातलेली भर - नंतर 1977 ते 1979 मधे दुसऱ्यांदा पोस्टींगवर मी पुन्हा बँकेत कामाला गेलो तोवर तिला सिनियॉरिटीप्रमाणे केबीनमधे स्थान मिळाले होते. तिच्या कपाळावर माँग भरलेली होती. काश्मिरी पद्धतीचे कानांना लटकणारे सोन्याचे आभूषण तिच्या सौभाग्याची खूण सांगत होते. जुजबी शिष्टाचाराच्या गोष्टी बोलून मी हसून निरोप घेई. एकदा चहाचा कप मागवून तिने माझी जास्त विचारपूस केली. तेव्हा माझ्या जीवनात घडलेल्या उलथापालथीची कल्पना दिली, तेंव्हा तिला ते धक्कादायक वाटले. 1996 ते 1998 च्या माझ्या तिसऱ्या पोस्टींग मधे मला चकीत व्हायची वेळ आली. कारण पंडितांच्यावर जी भयानक देशोधडीला जायची पाळी आली त्यात तिचे कुटुंबिय श्रीनगर सोडून गाझियाबादला स्थलांतरित झाल्याचे कळले.)
1 हिंदी सिनेमातील हवाईदलात कार्यरत दाखवलेले हीरो - राजकपूर संगममधे, आराधनातला राजेश खन्ना आदी...निळ्या सेरिमोनियल ड्रेसमधे दिसतात. तर कधी कथानकाच्या सोईसाठी इंटरव्हलपर्यंत देशासाठी शहीद होऊन नायिकेला खऱ्या हीरोकडे आकर्षित करण्याला मदत करतात!

गामा पैलवान's picture

22 May 2018 - 11:00 pm | गामा पैलवान

टवाळ कार्टा,

अतिरेक्यांची ठाणी व हल्ला शोधणे ही समस्या नाहीये. समस्या वेगळीच आहे. त्यावर मोदी काम करताहेत. चिंता नसावी.

आ.न.,
-गा.पै.

कपिलमुनी's picture

22 May 2018 - 11:32 pm | कपिलमुनी

इथेपण मोदी ?

आवरा !
काव्य विभाग राहिला फक्त आता .

जेम्स वांड's picture

22 May 2018 - 11:43 pm | जेम्स वांड

Big headache

टवाळ कार्टा's picture

23 May 2018 - 10:40 am | टवाळ कार्टा

तुम्हाला आम्हा सामान्य माणसांपेक्षा जास्त समजते असे मानुया
नक्की समस्या काय त्याची चर्चा इथे नको, हवा तर दुसरा धागा काढा.....आणि माझी शंका धागा लेखकासाठी होती...तुम्हाला प्लांचेट येत नाही त्यामुळे तुमच्याकडून उत्तर नकोय

अवांतर - इतकी आंधळी व्यक्तिपूजा खांग्रेसीसुद्धा करत नाहीत

गामा पैलवान's picture

23 May 2018 - 11:39 am | गामा पैलवान

टवाळ कार्टा,

तुम्हांस फक्त लेखकाकडून उत्तर हवंय याची कल्पना आली नाही. त्याबद्दल क्षमा असावी.

तुमच्या प्रश्नाचं माझ्या मते उत्तर होय असं आहे. तरीपण तुम्ही लेखकास विचारून नक्की करून घेऊ शकता.

आ.न.,
-गा.पै.

टवाळ कार्टा's picture

23 May 2018 - 11:44 am | टवाळ कार्टा

म्हणजे प्लांचेट करून उत्तरे मिळत असतील तर आपले IB, RAW यांना बरखास्त करावे का?

गामा पैलवान's picture

23 May 2018 - 11:55 am | गामा पैलवान

टवाळ कार्टा,

हो, खुशाल करा. फक्त कारवाया करण्यासाठी वेगळा विभाग उघडा. रॉ व आयबी माहिती मिळवण्यासोबत कारवाया देखील करतात.

आ.न.,
-गा.पै.

टवाळ कार्टा's picture

23 May 2018 - 12:19 pm | टवाळ कार्टा

अर्थातच पण तेसुद्धा प्लांचेत करून मराठा आर्मितल्या मावळ्यांना बोलावून करता आले तर?

जेम्स वांड's picture

23 May 2018 - 6:11 pm | जेम्स वांड

ह्यावर अजून सांगा की थोडं!.

manguu@mail.com's picture

22 May 2018 - 7:50 pm | manguu@mail.com

आत्मा नवीन शरीरात जातो ना ? मग प्लॅनचेताला आत्मा पुन्हा कसा available होतो ?

हे हे ... हा मात्र प्वाईन्ट आहे बर का मंगूऍटमेलडॉटकॉम सर.

कदाचित जन्म घ्यायच्या वेटिंग लिस्ट मध्ये असलेले (लिम्बो म्हणतात ना त्याला?) आत्मे येत असतील.
त्यांचाही तेव्हडाच टाइम पास :)

manguu@mail.com's picture

23 May 2018 - 11:12 am | manguu@mail.com

पण कुणाचा पुनर्जन्म झालाय अन कोण लिंबो झालाय हे प्लॅनचेटवाल्याला आधी कसे समजेल ?

श्रिपाद पणशिकर's picture

23 May 2018 - 4:17 pm | श्रिपाद पणशिकर

मंगु चाऊस, त्या पाप्या औरंग्याला पुढिल जन्म डुकराचा दिसला व्हता म्हन... तु बि घे कि जानुन निदान पुढल्या जन्मात युनानि हकिम तरी होशिल का...काय मग ऊपवास सुरु असतिल नाहि साबुदाणा खिचडि खाऊन.

manguu@mail.com's picture

23 May 2018 - 6:01 pm | manguu@mail.com

बेशिकात लोच्या है

औरंग्याच्या धर्मात पुनर्जन्म नसतो.

सुबोध खरे's picture

23 May 2018 - 7:14 pm | सुबोध खरे

हा ना राव
औरंग्या झोपलाय थडग्यात खुल्दाबादला
कयामतची वाट बघत

manguu@mail.com's picture

23 May 2018 - 7:47 pm | manguu@mail.com

डुक्कर रूपात पुनर्जन्म कुणाचा होतो ते ' जशी आहे तशी' पुस्तकात सचित्र दिले आहे.

यशवंत पाटील's picture

22 May 2018 - 8:52 pm | यशवंत पाटील

जय जवान...
कवाची गोष्ट आहे म्हणायची ही तुमची.
तिकड सिमेवर जवान... असलं कायबाय म्हणत्यात लोकं. तर पार हवा काढुन घेतलीत की त्यातली राव तुमी.
सायेब आन् शिपाई यात तुमच्यातबी बराच भेदभाव असतोय की. तुमी राव भुताला बोलवत बसलाय.. उगा नाय त्या बीयेसयेफवाल्याला जेवणबी नीट मिळंना म्हणून व्हिडो काढायला लागला व्हता ते. जवानांची काळजी घ्या साहेब लोकांनो.

शाली's picture

23 May 2018 - 12:36 am | शाली

मला काहीच समजले नाही.

जेम्स वांड's picture

23 May 2018 - 8:00 am | जेम्स वांड

लेखक एअर फोर्स मध्ये होते
लेखक अकाउंटंट आहेत
लेखक दारू पित नाहीत
लेखक प्लॅनचेट वगैरे करण्यात वाकबगार आहेत
त्यांची ती कला वापरून त्यांनी ऑफिसर्स वाईफ मंडळात लै नाव कमावले होते
त्यावर त्यांचे मित्र जळत
एकदा असेच एका अकडू कानडी बॉसच्या मिसेसच्या आमंत्रणावरून त्यांनी प्लॅनचेट केलं
कानडी दाम्पत्याला प्रचिती आली

पुढं माझा बी दम सरला _/\_

प्रकाश घाटपांडे's picture

23 May 2018 - 11:56 am | प्रकाश घाटपांडे

प्लँचेट चे साहित्य आणि कृती जरा सविस्तर सांगा की! आणि तो मराठी आत्मा कानडीतले प्रश्नला कानडीतून उत्तरे कसे काय देत होता. त्याला कानडी येत होत का? तुम्ही तर येत नसाव अस म्हणताय.

टवाळ कार्टा's picture

23 May 2018 - 12:21 pm | टवाळ कार्टा

अगदी अगदी कृती लिहाच.... मला मर्लिन मन्रॉच्या आत्म्याला बोलावयाचे आहे ;)

चित्रगुप्त's picture

23 May 2018 - 8:59 pm | चित्रगुप्त

मला पण व्हिन्सेंट व्हॅन गॉगचा मृत्यु हा "कत्ल" होता की "खुदखुशी" हे जाणून घ्यायचे आहे. त्याने फ्रेंच भाषेत सांगितले तरी चालेल, किंवा चित्रकलेचे सामान ठेऊया जवळ. तो बहुतेक चित्र काढूनच सांगेल.
ओकसाहेब, घ्याच पुण्यात प्लान्चेटाची कार्यशाळा.
..

खटपट्या's picture

24 May 2018 - 2:31 pm | खटपट्या

ओ काका, आत्म्याला सर्व भाषा येतात.

रच्याकने - माझ्या रूम पार्ट्नरने टीवीचा रीमोट हरवला तो मिळेल का? त्याने तो घरी नेला असेल का? त्याच्या टीवीला तो चालत असेल का? अशा प्रश्नांची उत्तरे मिळता का?

प्रकाश घाटपांडे's picture

23 May 2018 - 12:33 pm | प्रकाश घाटपांडे

दाभोळकरांच्या आत्म्याला प्लँचेटवर बोलावून नेमके काय घडले हे विचारु या, म्हणजे त्या दिशेने तपास करता येईल. समजा यशस्वी झाले नाही तर एक प्रयत्न वाया गेला असे समजू.

यसवायजी's picture

23 May 2018 - 2:13 pm | यसवायजी

काय लोक आहेत एकेक!! पाकृ मागायला प्लँचेट म्हणजे काय मॅगी वाटली काय?

ओकसर, पुण्यात एखादा कट्टा करूयात का? लाईव्ह डेमोच द्या सगळ्यांना. बोलतीच बंद करा.

आमच्या पणजीने फडताळाची किल्ली कुठे ठेवलीय ते सांगेल का ती प्लँचेट वर येवून ?

टवाळ कार्टा's picture

23 May 2018 - 3:31 pm | टवाळ कार्टा

एव्हढं काय डबोलं लपवलय? कांदा चीरायला तलवार? तो कुठलासा मंत्र म्हटला की मिळेल की "की" :)

माहितगार's picture

23 May 2018 - 7:54 pm | माहितगार

ओह काल्पनिक किस्सेत होय !, आधी मला ओक साहेब खरेच असे काही करतात की काय वाटले, आणी मलेशियाचे ते विमान नेमक्या कोणत्या समुद्रात कोणत्या अक्षांश रेखांशावर पडले आणि आता ते समुद्रात नेमके कुठे आहे ते विचारणार होतो पण काल्पनिक आहे हे लक्षात आल्यावर आपलीच गोची झाल्याचे कळले . :(

manguu@mail.com's picture

23 May 2018 - 7:58 pm | manguu@mail.com

आठवणीतले किस्से म्हणजे खरेच ना ?

माहितगार's picture

23 May 2018 - 8:19 pm | माहितगार

नॅशनल स्टोरी काँपीटीशनला पाठवलेले आठवणीतले किस्से खरे सुद्धा असू शकतात नाही का :))

गामा पैलवान's picture

23 May 2018 - 8:22 pm | गामा पैलवान

टवाळ कार्टा,

अर्थातच पण तेसुद्धा प्लांचेत करून मराठा आर्मितल्या मावळ्यांना बोलावून करता आले तर?

फारंच उत्तम. तुमच्याकडे तंत्रज्ञान असेल तर तशा स्वरूपाची एखादी सेवा सुरू करा. नंतर तिचं व्यावसयीकरण करता येईल.

धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

टवाळ कार्टा's picture

23 May 2018 - 9:45 pm | टवाळ कार्टा

तंत्रज्ञानतर धागालेखकांकडे आहे ना

गामा पैलवान's picture

24 May 2018 - 3:16 am | गामा पैलवान

धागाकर्त्याकडे अपेक्षित तंत्रज्ञान नाही. केवळ मर्यादित तंत्रज्ञान आहे.

-गा.पै.

टवाळ कार्टा's picture

25 May 2018 - 1:22 pm | टवाळ कार्टा

अपेक्षीत तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय काय अपेक्षित असायला हवे?
धागाकर्त्याकडे कोणते तंत्रज्ञान आहे याची माहिती तुमच्याकडे कशी?
धागाकर्त्याकडे असलेल्या तंत्रज्ञानात कोणत्या गोष्टी नाहीत ज्यामुळे तुम्हाला समजले की ते मर्यादीत आहे?

गामा पैलवान's picture

25 May 2018 - 6:07 pm | गामा पैलवान

टवाळ कार्टा,

धागालेखकाकडे तंत्रज्ञान आहे असा तुमचा दावा आहे. तस्मात या प्रश्नांची तुम्हीच उत्तरं द्यावी ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

टवाळ कार्टा's picture

26 May 2018 - 1:55 pm | टवाळ कार्टा

जरा नीट वाचत जा हो.....असा दावा माझा नाही.....धागालेखकाचा आहे

गामा पैलवान's picture

29 May 2018 - 2:50 am | गामा पैलवान

धागालेखकाचा कुठलाही दावा करीत नाही. रॉ व आयबी ऐवजी प्लांचेट करायची कल्पना तुमची आहे.

-गा.पै.

टवाळ कार्टा's picture

29 May 2018 - 11:44 am | टवाळ कार्टा

धागालेखकाचा दावा आहे कि त्यांना प्लँचेट येते

गामा पैलवान's picture

29 May 2018 - 12:07 pm | गामा पैलवान

टवाळ कार्टा,

रॉ व आयबी चं काम करून देण्याचा दावा नाही. ती तुमची कल्पना आहे.

आ.न.,
-गा.पै.

टवाळ कार्टा's picture

30 May 2018 - 5:42 pm | टवाळ कार्टा

होच्च मुळी....प्लँचेट करून जर प्रश्नांची उत्तरे मिळत असतील तर अज्जून त्याचा वापर का केला जात नाहीये का आत्मे फक्त आर्मी ऑफिसर्सच्या बायकांनी आठवण काढली तरच येतात? बाकी इतक्या हिरीरीने प्लँचेटसारख्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टीची पाठराखण करण्यापेक्शा जरा इथे तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची जमत असतील तर उत्तरे सांगा अथवा उत्तरे येत नाहीत हे मान्य करा की....

गामा पैलवान's picture

31 May 2018 - 2:12 am | गामा पैलवान

टवाळ कार्टा,

आयबी व रॉ यांचं कार्य प्लांचेटकडून करवून घेण्याची कल्पना तुमची आहे. माझी नाही. तेव्हा तुम्हीच सांगा कसं करायचं ते. जमत असतील तर उत्तरे सांगा अथवा उत्तरे येत नाहीत हे मान्य करा की....

आ.न.,
-गा.पै.

चित्रगुप्त's picture

23 May 2018 - 9:15 pm | चित्रगुप्त

पुढला मिपा कट्टा असा करूया (ओळखा पाहू कोण कोण आहेत)
.

हौशी कट्टेकरी असे 2 करेक्टर्स लगेच ओळखू आले.

टवाळ कार्टा's picture

23 May 2018 - 11:07 pm | टवाळ कार्टा

मी २ **हिथांना ओळखले :ड

शशिकांत ओक's picture

23 May 2018 - 10:44 pm | शशिकांत ओक

मित्रांनो,
धागा इतका धावतोय हे पाहून प्लँचेट बरेच जणांची उत्सुकता ताणतो याची मजा वाटली...
पकाकाका, चित्रगुप्त आदि पुरान्यांना स्वाभाविकपणे लिहायला सुरसुरी आली आहे हे ही नसे थोडके! सैन्यदलात असेही चाळे(?) चालतात याचे नवल वाटणे साहजिक आहे. प्लँचेटने काय साध्य होते किंवा मिळवायचे याचा तारतम्याने विचार हवा. परंतु या सारख्या विधातून मृतात्म्यांशी संपर्क साधला जाऊ शकतो याचा प्रत्यय मला प्लँचेट शिवाय ऑटोरायटींग या प्रकारातून अनुभवायला मिळाला आहे.
ते असो.
मी धागा ज्या साठी काढला तो पॉइंट मागे पडला! मातृभारती या साईटवर आपले लेखन फुकट सादर करायची सोय आहे हे मला जसे पारितोषिक मिळून कळले ते इतरांनाही प्रेरणादायी व्हावे असे वाटत होते...
त्यामधे मी सादर केलेल्या पारितोषिक लेखातून सेनादलातील वेगळ्या पैलूंवर प्रकाश पडतो... त्या लेखाची विचारणा केली गेली जाईल असे वाटले होते...
त्या निमित्ताने हवाईदलातील व्यक्ती कशा संवेदनशील असतात याचा प्रत्यय यावा हा उद्देश होता पण एकेकाचे प्रतिसाद वाचून मला माझ्याकडून त्या महत्वाच्या लेखमालेला प्लँचेट विषयाशी जोडून काहीच्या काहीच झाले असे वाटते...

चित्रगुप्त's picture

24 May 2018 - 3:38 am | चित्रगुप्त

एकेकाचे प्रतिसाद वाचून मला माझ्याकडून त्या महत्वाच्या लेखमालेला प्लँचेट विषयाशी जोडून काहीच्या काहीच झाले असे वाटते...

छे छे , उलट एक नवा, वेगळा विषय चर्चेला आला हे छानच झाले. मारकसपंतांना आलेले अनुभव त्यांनी अवश्य इथे द्यावेत, आणि धागाकर्त्याने पुण्यात (वा पिंपरी-चिंचवड, डोबीवली, ठाणे, नाशीक, सोलापूर वगैरे कुठेही) खास प्लानचेट कट्टा करावा. (पुणे एवढ्यासाठी म्हटले की हाकेसरशी दहा-वीस विद्वान-विदुषी सहज उपलब्ध होतील)

शशिकांत ओक's picture

25 May 2018 - 12:42 am | शशिकांत ओक

चित्रगुप्त, भरीला घालायला तुमचा हात धरणारा कोणी नसावा! असो
यावरून किस्सा काव्य कट्ट्याच्या आठवला! ! सारसबागेच्या रम्य संध्याकाळी नाडीग्रंथातील काव्याच्या रसग्रहणाचा कट्टा ४ चौघात चालला होता. आसपास बागडणाऱ्या चिमुकल्यांनी लाथाडलेल्या चेंडूचे धक्के कधी पाठीवर तर कधी डोक्यावर घेऊन प्रेमळपणे पाहून त्यांच्या बरोबर आलेल्या आजोबांच्या डोळ्यातले कौतुक पहात, खाऱ्या दाण्याच्या कागदी सुरळ्या सोडत काव्यानंद आवरता घेऊन शेजारच्या खाबू चौपाटीवरील हाटेलातील कलकलीत कट्ट्याची सांगता झाली...
असेच एकदा आत्मा प्रत्येक कट्टेकरीच्या मनगटावर त्यांच्या आवडत्या सुगंधी अत्तराचा ठिपका देण्यात गर्क, काही प्लेटमध्ये कुठले पदार्थ आहेत, यामधे कट्ट्याच्या विषयांतरून, 'चला लांब जायचय चलतो' अशी घाई अनुभवायला मिळाली! असो.
प्लँचेट हे प्रकरण गूढ राहिलेले बरे...!

चौकटराजा's picture

1 Jun 2018 - 2:48 pm | चौकटराजा

मी तिसरीत असेन. स्थळ वाई. आमच्या वडिलानी प्लॅन्चेटचा प्रयोग घरी करून पहाण्याचे ठरवले. आता प्रश्न काय विचारला ते आता आठवत नाही पण लोकमान्य टिळक यान्च्या आत्म्याला बोलवले होते हे पक्के आठवते. मधे एक मोठा पाट त्यावर इन्ग्लीश मधे लिहिलेली मुलाक्षरे. मधोमधे एक काचेचा ग्लास उपडा ठेवलेला . आम्ही चौघांनी चार बाजूने ग्लासवर एकेक बोट ठेवलेले . जराशाने ग्लास हलू लागला . या मुळाक्षरावरून त्या मुळाक्षराकडे प्रवास करू लागला . मी आजच्या इतका त्यावेळी चिकित्सक नव्हतो . तिसरीतील मुल त्याला काय आयुष्याचे टक्के टोणपे माहीत असणार ? आज असे वाटते हा प्रयोग पुन्हा करुन आताच्या चिकित्सक मनाचे समाधान होते का ? की चार माणसे आपापल्या हाताने जो जोर त्या ग्लास वर लावतात त्याचा रिझल्टन्ट म्हणून काहीतरी एक अक्षराकडे ग्लास जातो बाकी आत्मा बित्मा काही नाही असे दिसून येते.? असो. अजून करून काही पाहिलेले नाही.

बाकी विषय तो नाही एका सैनिकाचे एक अनुभव कथन म्हणून मला लेख आवडला .

सादर केलेल्या पारितोषिक लेखातून सेनादलातील वेगळ्या पैलूंवर प्रकाश पडतो... त्या लेखाची विचारणा केली गेली जाईल असे वाटले होते...

1
मिसळपावकर आपल्या मित्रांनो, पारितोषिक विजेते लेखन प्रसिद्ध झाले आहे. आपण देखील काही आपले लेखन सादर करुन पहावे...

ओक काका तुम्ही दिलेल्या दुव्यावर गेलो तर ते अमुक तमुक आयडी ने साईन इन करा म्हणतय . आम्हाला सरळसोट चाचण्यासारखे काहीतरी कराना जसे की ब्लॉगबीगवर पब्लिश करा अथवा इथेच अधिक व्य्वस्थित गोषवारा द्या; म्हणजे अमुक साईन इन तमुक साईन न करता सगळ्यांना अभ्यासणे सुलभ होईल .

प्रसाद गोडबोले's picture

24 May 2018 - 12:36 am | प्रसाद गोडबोले

प्लॅन्चेट खरेच असते ,

मी स्वतः करुन पाहिले आहे ! अगदी अविश्वसनीय रित्या खरे ! नो किडिंग !!

कपिलमुनी's picture

24 May 2018 - 4:03 pm | कपिलमुनी

प्लॅन्चेट कसे करावे याची कृती द्या !

( व्हेजीटेरियन आत्मे शोधणे आले )

श्रिपाद पणशिकर's picture

24 May 2018 - 4:22 pm | श्रिपाद पणशिकर

कांदा लसुण न टाकता हि रेसिपी झणझणित कशी करता येईल.

कपिलमुनी's picture

24 May 2018 - 6:37 pm | कपिलमुनी

जैन हॉट मॉडेल ला बोलवायला लागेल :)

टवाळ कार्टा's picture

25 May 2018 - 1:17 pm | टवाळ कार्टा

Sarah Jain चालेल का?

रच्चाकने, प्लँचेट सह कट्टा झाला SSS च पायजेले

सर्व आजी - माजी, भौतिक - अधिभौतिक, उपस्थितीत - आंजापस्थित (व्हिडो कॉन्फरन्स द्वारे) मिपाकरांसह प्लँचेट कट्टा झालाच पायजेले.

ओक काका, काही मान्यवर मिपात्म्यांना प्लँचेट द्वारे या कट्टयाला आमंत्रित करता येईल का? मला वाटते ते आनंदाने येतील.

शशिकांत ओक's picture

25 May 2018 - 2:33 pm | शशिकांत ओक
प्रकाश घाटपांडे's picture

26 May 2018 - 10:35 am | प्रकाश घाटपांडे

पुर्वी मी अशी पुस्तके वाचायचो. आता गतस्मृती चा भाग म्हणून परत वाचू लागलो आहे.
मृत्यु नंतरचे जीवन- लेखक रेमंड मूडी

सतिश गावडे's picture

31 May 2018 - 12:24 am | सतिश गावडे

कुणी डॉक्टरेट झालेल्या एक मराठी बाईही या विषयावर व्याख्याने देतात आणि त्यांचेही काहीशा अशाच नावाचे पुस्तक आहे.

मला आता त्यांचे नाव आठवत नाही.

अमच्या लहानपणी इमारतीतल्या तमिळ कुटुंबाकडे प्लांचेट व्हायचं. त्यांच्याकडची दोन मुलं (आठवी नववीतली) बरोबरची होती त्यांनी दाखवल्याप्रमाणे मे महिन्याच्या सुटीत दुपारी करायचो. एक ठरिविक नातेवाइकाला तो बोलवायचा. एक पत्र्राचे झाकण वापरायचो. झाकण फिरायचे. उत्तरे काही खास नसायची. वीसेक मिनिटांनी आत्मा थकायचा. व्यसनच लागले. पण एकदा ते झाकण असे काही गरागरा फिरायला लागले की पळालो आणि खेळ बंद पडला.
फार पावरफुल आत्मा असला तर पितळी स्टोव वापरतात म्हणे.
प्लांचेट अति करून लोक वेडे झाल्याने तो प्रकार कमी झाला.

पण आता डाइनमो जादुगाराच्या जादू पाहिल्यावर हे शक्य आहे असे वाटू लागले.

प्रकाश घाटपांडे's picture

26 May 2018 - 10:44 am | प्रकाश घाटपांडे

या वैद्यकीय डॉक्टर बाई अतिंद्रिय सामर्थ्य या विषयात पण डॉक्टर आहेत. त्यांना विचारायच का?
https://drive.google.com/open?id=1QCMn2fAtMbsPsfqtDY5Se_0HrcjQQnwL

चित्रगुप्त's picture

26 May 2018 - 4:30 pm | चित्रगुप्त

अतिंद्रिय सामर्थ्यवाल्या बाईंबद्दल वाचले. त्या बातमीत बाईंचा ईमेल दिलेला आहे. संपर्क करून बघायला हवे. कोणी करायचा ? काय विचारायचे ?

नमस्कार अतींद्र सामर्थ्यवाल्या मेहर किंवा मेहरा श्रीखंडे बाई माझ्या संपर्कात पुर्वी होत्या. कारण त्यांना ऑटोरायटिंग संदर्भात अनुभव ऐकायला आवडत असावे...नंतर त्यांनी पीएचडी केल्याचे दिसते....
ऑटोरायटिंग मधील माझे संपर्क गुरू मेहेर बाबांवरून त्यांचे नाव पडले किंवा ठेवले असावे का हे माहित नाही...
हवाईदलातील एक ऑफिसरचे पहिले नाव मेहेर असे त्याच्या आई-वडिलांनी मेहेरबाबांच्या आठवणी खातर ठेवले होते. तसेच काही असेल तर माहीत नाही.
या त्यावेळच्या फ्लाईंग ऑफिसर मेहर बरोबर घडलेला ऑटोरायटिंगचा किस्सा नंतर कधीतरी ....

मदनबाण's picture

27 May 2018 - 10:05 am | मदनबाण

वाचतोय... आपले अनुभव लिहीत रहा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- देवाक काळजी रे... :- रेडू

सिरुसेरि's picture

28 May 2018 - 7:24 am | सिरुसेरि

फोटो पाहिल्यावर स्केलेटन की मधल्या हुडुची आठवण झाली .

यशोधरा's picture

30 May 2018 - 6:48 pm | यशोधरा

पल्यांचेट, सुंदर मुली ह्याचबरोबर हवाई दलाबद्दल, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल, हवाई दलाने बजावलेल्या विविध युद्ध आणि इतर परिस्थितीमध्ये - उदा. पूरसदृश्य स्थिती वगैरे - बजावलेली कामगिरी ह्याबद्दल वाचायला अधिक आवडेल.

अशावेळी तुमचेही योगदान असेल, त्याबद्दल वाचायलाही आवडेल.

प्रचेतस's picture

30 May 2018 - 6:55 pm | प्रचेतस

सहमत आहे.
ओककाकांनी असले काही पाचकळ लिहीत बसण्यापेक्षा त्यांचे हवाईदळातील युद्धविषयक किंवा तत्सम अनुभव लिहावेत. वाचायला नक्कीच आवडेल.

टवाळ कार्टा's picture

30 May 2018 - 7:48 pm | टवाळ कार्टा

प्लॅंचेटसारख्या प्राचीन भारतीय तंत्रविद्येबद्दल लिहिलेले पाचकळ??? निषेध

माहितगार's picture

30 May 2018 - 9:10 pm | माहितगार

.....प्राचीन भारतीय तंत्रविद्येबद्दल-----

तथाकथित तंत्रविद्या 'प्राचीन भारतीय' असल्या बद्दल कोण कोणते संदर्भ आपल्याकडे उपलब्ध आहेत , ते कृ. सादर करावेत

आ. न. माहितगार

टवाळ कार्टा's picture

31 May 2018 - 12:04 am | टवाळ कार्टा

एका बंगाली बाबाच्या एकशे तेराव्या पिढीतल्या पूर्वजाने प्लांचेत करताना येऊन सांगितले तसे....

प्रसाद गोडबोले's picture

30 May 2018 - 9:01 pm | प्रसाद गोडबोले

पाचकळ

ठार निषेध ! दुत्त दुत्त ! पुढल्यावेळेस प्लँचेटाकरुन दर्पणसुंद्री ची मुर्ती बनवताना जिला मॉडेल म्हणुन उभी केलेली तिला बोलवुन तिच्याकरवी तुमचा णिशेध करण्यात येईल !

शशिकांत ओक's picture

2 Jun 2018 - 9:54 pm | शशिकांत ओक

आपल्या फर्माईश बद्दल.

सतिश गावडे's picture

31 May 2018 - 12:19 am | सतिश गावडे

धाग्याचे नाव वाचून कदाचित काहीतरी चांगलं वाचायला मिळू शकेल अशा हेतूने धागा उघडला होता.

मात्र दुर्दैवाने या धाग्यातही धागा लेखकांनी आपल्या ख्यातीला जराही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली. धाग्याचं शिर्षक काय आणि आपण त्यात लिहीतोय काय याचे धागा लेखकांस मुळीच भान राहिलेलं नाही. :(

माहितगार's picture

31 May 2018 - 6:41 pm | माहितगार

मंत्रालयात एवढे शिर्षक वाचून उघडावे आणि उंदीर मारल्याची बातमी वाचावयास मिळावी असे होते कधी कधी ;) धिस टाईम हार्ड लक, बेस्ट लक पुढच्यावेळी :))

"

काहीतरी चांगलं वाचायला मिळू शकेल

"
...
"

धाग्याचं शिर्षक काय आणि आपण त्यात लिहीतोय काय

"
मित्रा,
हवाईदलातील पोस्टींग्ज मधील आठवणीत राहिलेल्या घटना वेळ मिळेल तसे लिहित असतो. त्यातील श्रीनगरच्या पोस्टींग मधील काही संक्षिप्त भाग सादर केला आहे. तो आपल्याला असंबद्ध वाटला... कदाचित पूर्ण लेखन सलग वाचायला शक्य झाले तर ते असंबद्ध वाटणार नाही...
हवाईदलातील रेल्वे प्रवासातील किस्से, आणि दरवाजा तोंडावर बंद झाला..., Cpl Pandey GS..., वगैरे कथाभाग तुकडे यातील आहेत..

आदूबाळ's picture

6 Jun 2018 - 7:49 pm | आदूबाळ

+१

"गानकोकिळेला चटणी वाटताना बघण्यात काय हशील?" असं काहीसं पुल म्हणाले होते. त्याची आठवण झाली.

सुंदर मुली नाहीत कसं काय?
मिस वल्ड/युनिवस इत्यादी स्पर्धेसाठी येणाय्रा बय्राच स्पर्धक सेनाविभागातल्या कर्मचाय्रांच्या मुलीच असतात. तुमच्या पोस्टिंग जागेचं ब्याडलक.

शशिकांत ओक's picture

2 Jun 2018 - 10:15 pm | शशिकांत ओक

फिल्म जगतात चमकतात... फरीदाबादला माझ्या मुलाच्या केंद्रिय विद्यालयात शिकणारी सुश्मिता सेन, माझे पहिले इन्स्ट्रक्टरांची तेंव्हा जन्मलेली मुलगी, आएशा जुल्का, तर दुसर्‍या एका सरदारांच्या जुळ्या मुली झाल्या महाभारत सिरीयल मधे कलाकार. याच श्रीनगरच्या पोस्टींगच्या पुढील कथनातून येथे ती स्क्वाड्रन लीडर अमरीक सिंगांची चुलबुली मुलगी. ती व मी गुलमर्गच्या गंडोल्यात एकत्र बसताना मस्त वाटले. तीच पुढे 'नूरी' सिनेमात काश्मिरी तरुणीच्या रोल मधे 'पुनम धिलौं' म्हणून श्रीनगरच्या लालचौकातील पॅलाडियम थिएटरमध्ये बसून पाहताना मजा वाटली...
असो... वो किस्सा फिर कभी...

पुढील किस्सा हवाई दलविषयक आणि संबंधित कामगिरीचा टाका ना जरा बदल म्हणून.

शशिकांत ओक's picture

4 Jun 2018 - 9:26 am | शशिकांत ओक

समजली. जेंव्हा आठवणी त्या टप्प्यावर येथील तेंव्हा सादर करेन...

नितिन थत्ते's picture

7 Jun 2018 - 9:42 am | नितिन थत्ते

हल्ली कमांडरसाहेब नाडीबद्दल काही लिहीत नाहीत का?

प्रकाश घाटपांडे's picture

7 Jun 2018 - 9:45 am | प्रकाश घाटपांडे

तुम्ही त्यांच्यासोबत नाडी पहायला गेलात तर कदाचित लिहितील त्यावर :)

शशिकांत ओक's picture

7 Jun 2018 - 10:07 pm | शशिकांत ओक

नमस्कार,
पकाकाका आणि त्यांच्या स्वर्गवाशी मित्रांनी जे केले नाही ते इतरांना परस्पर भरीला घालायला आवाहन करताना मजा वाटली. तोंड देखले नाडी केंद्रांमध्ये गेलो म्हणायला जातात पण पट्टी शोधून त्यावर लिहिलेली नावे व अन्य माहिती मिळवली होती का यावर उत्तर देताना दिसत नाहीत.

1) https://shashioak.weebly.com<
2) https://play.google.com/store/apps/details?id=naadi.project.com.rationalist

blockquote>हल्ली कमांडरसाहेब नाडीबद्दल काही लिहीत नाहीत का?

या धाग्यावर तो विषय नाही. पण विचारले म्हणून वरील लिंकवरून काम काय सुरू आहे ते कळेल.

ओक काका तुमच्या पेशन्सला सलाम. you are very cool.

प्लँचेट हे प्रकरण सध्या विचारणेत आहे.

विज्ञानाच्या दृष्टीकोनातून ... पुस्तकातील या विषयावर प्रकरण 4 मधे 19 पानातून विशेष चर्चा प्रा. अद्वयानंद गळतगे यांनी केली आहे. त्यातील काही मुद्दे सादर करत आहे.

१. प्लँचेटचा एक विलक्षण अनुभव
२. परदेशातील एक दाखला
३. प्लँचेटवर 'मृतात्मे' येतात या कल्पनेची पार्श्वभूमी
4. मृतात्मा प्रत्यक्ष दिसला!
5. प्लँचेटवर कादंबरीताल पात्राचा 'मृतात्मा' आला!
6. भारतीयांचे अनुभव
7. प्लँचेट हा एक भानामतीचा प्रकार
8. भानामतीतील मनःशक्तीचा नियंत्रित प्रयोग
9. प्लँचेटवर खरोखर कोण येते?
10. काल्पनिक भूत देहधारी बनले!
11. *बॅचेल्डार व ब्रुकीस-स्मिथ यांचे प्लँचेट विषयीचे शास्त्रीय प्रयोग
12. कृत्रिम भूत निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग
13 ** या शास्त्रीय सशोधनाचा निष्कर्ष

या प्रकरणाच्या शेवट करताना प्राचार्य अद्वयानंद गळतगे एक सावधगिरीचा इशारा देतात. ते म्हणतात, "शास्त्रीय संशोधन व प्रयोग एकाद्या गोष्टीतील सत्य शोधण्यासाठी केले जातात. या संशोधनातून व प्रयोगातून पूर्ण सत्य कळले असे समजण्याची चूक मात्र कधीच करू नये. भौतिक वा जड वस्तूंविषयीचे सत्य सुद्धा शास्त्रज्ञांना त्याविषयी असंख्य प्रयोग व संशोधन करूनही अजून कळालेले नाही. तर मानवी मना विषयीचे व अतींद्रिय घटनांविषयींचे सत्य अशा प्रयत्नातून कळेल ही आशा दूरच. या प्रत्येक घटनेला अनेक कारणे असतात अनेक बाजू असतात. त्याविषयी कोणताही एकच निष्कर्ष काढणे धोक्याचे असते.
प्लँचेटवर नेहमी मृतात्माच येतो या समजुतीतील एकांगीपणा असा संशोधनातून उपयोगी पडतो. पण म्हणून दुसऱ्या टोकाला जाऊन प्लँचेट वा सीयन्स मध्ये घडणाऱ्या घटनांचे कारकत्व मानवी मनाला देणे ही चुकीचे आहे. हा सुद्धा शास्त्रीय संशोधनाचा एकांगीपणाच आहे. मृतात्मे प्लँचेटवर येतात कि नाही, केंव्हा येतात या विषयीचा सर्व सामान्य निकर्ष कधीच काढता येत नाही. हे ज्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. अनाहूतपणे येणारे संदेश खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात (त्यांना drop-on म्हणतात) जीवंत व्यक्तींना त्यांच्या जीवनात सहाय्यभूत ठरणारे संदेश हे खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात. अपुऱ्या राहिलेल्या इच्छा तृप्त करण्यासाठी काही मृतात्मे येतात. वासनेमुळे पिशाच झालेले मृतात्मे जिवंत व्यक्तींना निष्कारण छळतात हे ही खरे आहे. मोठे सत्पुरूष, महात्मे, इतकेच नव्हे तर कोणताही मृतात्मा आपण बोलवू तेंव्हा येतो असे समजणे म्हणजे ते मृतात्मे आपल्या इच्छेच्या आधीन असलेले नोकर आहेत असे समजणे होय. कर्मसिद्धांताला छेद देणारी ही समजूत आहे. प्रत्येक आत्मा स्वतःच्या कर्माने बांधला गेला आहे. इतरांच्या कर्माने वा इच्छेने नाही. त्याच वेळी नोकरा प्रमाणे वागणारी वासनेमुळे पृथ्वीवर भटकणारी (earth bound) पिशाचे, व नैसर्गिक (सुष्ट वा दुष्ट) शक्ती (elementals) या जगात आहेत. हे ही सत्य आहे (त्यांना क्षूद्र देवता म्हणतात) पण म्हणून कोणतीही अतींद्रिय घटना घडली की ती मृतात्म्यामुळेच वा अशा शक्तींमुळेच घडली असे मानणे चुकीचे आहे.शेवटी मनुष्य हा ही पिशाचच (आत्माच) आहे. तो मृत नसून जीवंत आहे इतकेच. जे मृतात्मे (मृतात्म्यांची मने) करतात ते जीवंत आत्मे- (त्यांची मने) - का करू नयेत? आणि हेच सत्य शास्त्रीय संशोधनातून उघड झाले असून फिलीप हा त्याचा साक्षी आहे.

* Ref. Journal of the Society for Psychical research 1966, 4the** The laws of he spirit world by Bhavnagaris part 3