माझ्या हवाईदलातील आठवणी - श्रीनगरच्या पहिल्या पोस्टींगमधे...
मी हवाई दलात कसा प्रवेश केला आणि नंतर जीवनाला कसा कसा आकार घडत गेला यावर लेखन वेळ मिळाला की करतो...
त्यातला एक किस्सा सादर...
...हा प्लॅंचेट करतो ही बातमी काही मित्रांमार्फत बाहेर फुटली. त्यामुळे माझा भाव वधारला. विशेषतः सिनिअर आफिसर्सच्या बायका, ‘ये ना संध्याकाळी आम्हाला बघायचय काय असतं प्लॅंचेट ते.’ असं म्हणून गळ घालत आणि मी देखील, ‘हो-हो जरूर! का नाही? पण रात्रीच्या जेवणाचा बेत माझ्या आवडीचा असू दे’ असं म्हणून त्यांच्यावर थोडीफार हुकूमत गाजवत असे. माझ्या मित्रांना हा प्लॅंचेट करतो आणि सिनिअर आफिसरच्या घरी पार्ट्या झोडतो असा हेवा वाटून त्यांनी माझ्याबरोबर यायचे टाळायला सुरूवात केली. विशेषतः मी श्रीनगरला असताना प्लॅंचेटचे प्रस्थ फार झाले. एकदा तर माझे अकौंट्सचे वरिष्ठ, स्क्वाड्रन लीडर पीव्ही राव, जे कानडी होते, सिगरेट सुलकावत, माझ्याकडे न पाहताच बायकोने सांगितलयं म्हणून जरा तुच्छतेने, ‘आमच्या घरी ये बरं’ असं मोघम निमंत्रण देते झाले. ‘का सर?’ मी मुद्दाम विचारून खोदून पाहिले. ‘अरे ये तर खरं’, असं म्हणून प्लॅंचेट हा शब्द टाळून त्यांनी मला निमत्रंण दिले. रात्री मी त्यांच्या राजबाग या भागातील घरी पोहोचलो. पत्निने आल्या आल्या प्लॅंचेटचे नाव काढल्यावर आमच्या बॉसच्या कपाळाला आठ्या चढल्या. सभ्यतेचा शिष्टाचार म्हणून, ‘ओ आय सी’ असे खोटे खोटे उदगार काढून रोष ओठात दाबला. मी ही जरा आढ्यतेने, ‘सर जरा ते कॅलेंडर काढून द्याना’ असं म्हणून त्यांना कामाला लावले. ‘उद्या ऑफिसात ये तुला दाखवतो’ असे मनात कुढत त्यांनी नाइलाजाने कॅलेंडर काढून पुढ्यात ठेवले. आपला भाव वधारलेला पाहून व ते माझे वरिष्ठपण अकौंट्स ब्रांचचे असल्यामुळे मी चान्स घेत म्हटले, ‘सर मी प्लॅंचेट करीन पण एका अटीवर’, तेंव्हा त्यांच्या भुवया उंचावल्या. ‘तुम्ही आहात कानडी. मला कानडीचा गंध नाही आणि प्लॅंचेट करताना नेहमीच, हा ओक कपाचा कान पकडून त्याला हवी ती उत्तरे देतो असे माझ्या अपरोक्ष म्हटले जाते. म्हणून आपण एक प्रयोग करू या आणि मग पाहू काय होते ते.’
कानडीतून प्रयोग
‘ओके नो प्रॉब्लेम’ असे म्हणून त्यांनी नवी सिगरेट शिलकावली आणि त्यांनी कॅलेंडरच्या मागील भागावर कानडी अक्षरांचा एक तक्ता तयार केला व प्लॅंचेटला बसलो. कानडीमध्येच त्यांची नवरा-बायकोत थोडीफार बोलाचाली झाली आणि माझ्या वरिष्ठांनी पत्निच्या कानउघाडणी नंतर हातातली सिगारेट तात्पुरती टाकून, हात जोडून देवाला नमस्कार करून कपावर बोट टेकून ठेवले. एकदोन मित्र तोवर जमले. ते सगळे स्थानापन्न झाल्यावर पैकी एकाने कपावर बोट लावायला उत्सुकता दाखवली. शेवटी मी माझे बोट टेकवले आणि बॉसना ‘कोणा मृताला बोलावणार? असा प्रश्न केला. प्रश्न अनपेक्षित असल्यामुळे त्यांच्यात पुन्हा कानडीत चर्चा झाली. हळूहळू आवाज वाढला. आविर्भावावरून बॉस, 'हा काय फालतूपणा चालवलाय?' म्हणत असावेत. पण पत्नीच्या आग्रहाखातर गप्प बसून तो (मी) सांगतोय ते करायला काय हरकत आहे? असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे असावे. शेवटी मी मध्ये पडून म्हटलं, ‘ठीक आहे असु दे, ते तुम्ही नंतर ठरवा. सध्या मी अशा व्यक्तीला बोलावतो की ज्याला कानडी येत नाही’.
‘ओ येस, दॅटस् ओके’ असं म्हणून माझ्या सरांनी होकार सुचवला. मी मग मराठी व्यक्तिला आवाहन केले आणि त्याप्रमाणे खूपच पटकन कप हालला ‘हो’ म्हणून पुन्हा घरावर स्थिरावला. आता विचारा प्रश्न असं म्हटल्यावर ते एकमेकांच्याकडे पाहायला लागले. त्या बाईंनी म्हटले, ‘अहो, काय प्रश्न विचारायचे असतात, असं असतं का? मला तर माझ्या मैत्रिणीने सांगितले की ओक सगळी उत्तरं सांगतो. आता तुम्हीच प्रश्न विचारा आणि तुम्ही उत्तरं द्या.’ मला हसू यायला लागले. ‘अहो प्रश्न तुम्ही विचारायचा. त्याचे उत्तर प्लॅंचेटच्या तक्त्यावरून मिळते. मी प्रश्नांचे उत्तर देत नाही.’
‘ओ आय सी, साऊंड्स इंटरेस्टिंग’ असं म्हणून हातातला रमचा ग्लास बॉसनी खाली ठेवला. अती थंडीतील त्या दिवसात बुखारी नामक- शेगडीप्रमाणे घराचे तापमान गरम करायला कोळसे घालायच्या निमिताने ते उठून आपला व मित्रांचा रम पेग भरून खातिरदारी केली, माझ्यासमोर कोक पटकावला व मुंगफलीचे तबक सरकवले. सरांना आधी वाटले तितके प्रकरण फालतू नाही असे त्यांच्या हावभावातून जाणवत होते. कारण उशीरा आलेल्या मित्रांना ते समजाऊन सांगत होते की प्लॅंचेट म्हणजे काय ते!
मग पुढचे अर्धा ते पाऊण तास कानडीमधून प्रश्न विचारणे चालू होते. प्रश्न विचारला आणि तो कप हालू लागला. तो कप कुठे हलत होता हे मला तक्त्यावर दिसत होते, परंतु ती अक्षरे माझ्याकरता शून्य होती. कारण त्या अक्षरात कुठलं काय अक्षर आहे हेही माहित नव्हतं आणि त्या अक्षरातून निर्माण होणारा शब्द व वाक्य काय बनते आहे याची मला पुसटशी सुध्दा जाणीव नव्हती आणि मुख्य म्हणजे विचारलेला प्रश्न काय आहे जो कानडीत विचारला गेला त्या प्रश्नाचा काय रोख आहे, उत्तर काय हवय याचा मला पत्ता नव्हता. प्रश्न कानडीतून विचारले गेले. त्यानंतर कप हळूहळू कानडी अक्षरांवरून फिरु लागला. त्यातून काही अक्षरातून अर्थवाही वाक्ये येऊ लागली. त्या शब्दांचा काय अर्थ असेल असा पति-पत्नीत खल होई. त्यातून त्यांनी निर्वाळा दिला की आम्हाला कानडीत अर्थवाही उत्तरे मिळत आहेत.अधून मधून त्यांच्या बोलण्यात जेव्हा इंग्रजी शब्द येत त्यावरून मला थोडाफार अंदाज लागे. पण प्रश्न नक्की काय होता हे मला आधी समजत नव्हते. असे होता होता त्यांचे प्रश्न आणि उत्तरे संपली आणि तो कप उचलून मी त्या फूंक मारली आणि धन्यवाद असे म्हणून तो प्लॅंचेटचा डाव संपवला. त्यानंतर घडलेल्या चर्चेत असे लक्षात आले की त्यांनी कानडीतून प्रश्न विचारून मिळवलेली कानडी भाषेतून मिळालेली उत्तरे समर्पक होती. एकतर ज्या व्यक्तीशी संपर्क केला मृत व्यक्ती कानडी नव्हती त्यामुळे तिला कानडी येण्याचा प्रश्नच नव्हता. मला स्वतःला कानडी येत नाही. हे त्या कुटूंबियांना माहिती होते. तुझ्यामुळे कप फिरतो. त्याला गती येते हे नक्की. पण तू अक्षरे, शब्द, वाक्ये बनवत उत्तरे देतोय असे होत नाही असे खात्रीलायकपणे आम्ही सांगतो. आमचे संपुर्ण समाधान झाले की तू त्या उत्तरांना बनवून सूचित करत नाहीस! त्यामुळे मी प्रश्नांची उत्तरे देतो हा माझ्यावर नेहमी केला जाणारा आरोपही खोटा आहे असे स्वतः रावांनी मान्य केल्याने मला बरे वाटले. व संशोधन तऱ्हेने या विषयाला हाताळल्याचे समाधान मिळाले.
शेवटी डेंटिस्टच झाला!
असेच आणखी एकांच्याकडे मी प्लॅंचेट करीत असताना खूप मजा आली. किस्सा होता मेजर साठे यांच्या मिसेस बाबतचा. त्यांची ओळख झाली एयर ओपीच्या तेंव्हा कॅप्टन विनायक पाटणकरांच्या घरी. (मी तिसऱ्यांदा श्रीनगरच्या पोस्टींगला असताना ते कारगीलच्या युद्धाच्या प्रसंगी 15 कोअरचे कमांडर होते. २००२-३च्या सुमारास लेफ्ट्नंट जनरल रॅंकवर श्रीनगरहून महत्वाच्या पदावरून रिटायर झाले. आणि गड आणि किल्ले यांच्या संवर्धनासाठी माझ्या प्रयत्नात 2015 पासून त्यांच्याशी पुण्यात पुन्हा संपर्क आला!) एकदा आम्ही त्यांच्या गुपकार रोड वरील बंगलेवजा घरी एकत्र आलो होतो. माझी किर्ती ऐकून मिसेस साठ्यांनी मला त्यांच्या घरी बोलावले. त्यावेळेला ज्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली ती मी विसरून गेलो. परंतु काही वर्षानंतर त्यांची पुन्हा अचानक भेट झाली. त्यावेळी एकदम हस्तांदोलनाला हात पुढे करून त्यांनी म्हटले, ‘ओक, अरे तुला भेटले की मुद्दाम सांगायचे ठरवले होते. आठवतय का? आपण श्रीनगरमध्ये प्लॅंचेट केलं होतं? त्या प्लॅंचेटवर माझ्या मुलाला कॉलेज शिक्षणासाठी कुठली शाखा मिळेल असे मी विचारले होते? ते अगदी बरोबर आले बर का.’ मला गोड धक्का बसला. त्यांच्या मुलाला मेडिकलला जायचं होतं पण प्लॅंचेटवरून तो डेंटिस्ट होईल असे उत्तर आल्यामुळे त्या फार खट्टू झाल्या होत्या, पण शेवटी तो डेंटिस्टच झाला. हे त्यांच्या बरोबर लक्षात राहिले आणि त्यांनी माझी भेट होताच प्रथम उल्लेख केला त्या प्लॅंचेटचा व त्या उत्तराचा. असो.
.....
प्रचिती द्या तर मानू.... आणखी एक घरगुती किस्सा...
पुढे कधीतरी सादर करेन...
In reply to प्लँचेटकरुन आपण अतिरेक्यांची by टवाळ कार्टा
In reply to प्लँचेटकरुन आपण अतिरेक्यांची by टवाळ कार्टा
In reply to ;););) by प्राची अश्विनी
In reply to एका बाणात किती पक्षी मारणार . by टवाळ कार्टा
जसे ब्रिज खेळात डाव संपला की त्यावरील गरमागरम चर्चा फार होते तसे प्रकार प्लॅंचेटचा व्हायला लागलेला पाहून मी ते प्रकरण आवरते घेतले. अशा कटकटीमुळे पुढे मी ब्रिजचा, रमी, पपलू-टिटलू, तीनपत्ती आदीचा नाद धरला नाही. आणि माझ्या प्लॅंचेटच्या विद्येबाबत जास्त वाच्यता केली नाही!सेनेतील नोकरीत सुंदर सुंदर मुली पहायला ही मिळणे अशक्य होते. मात्र मला ती संधी ऐतीच आली. व्हायचे असे की आम्हाला पगार वाटपाला पैसे स्टेट बँकच्या लाल चौक शाखेतून काढायला वरचेवर जावे लागे. तिथल्या ऑफिसात एकाहून एक अती सुंदर गुलाबी गालाच्या, नितळ गोऱ्या गोऱ्या कांतीच्या मुली कामात गर्क असत. मी ऑफिसर म्हणून मला काऊंटरच्या आत बोलावून चहापाणी करायची रीत होती. भिभिरत्या नजरेने पोरीही मला पाहताना खूष व्हायला होई. त्यात होती एक टीटा. काश्मिर की कली म्हणावी अशीच. नजरानजर करून मी तिला थरथरत्या आवाजात हाय हॅलो करून म्हणे. ती ही मानेने होकार देत पुन्हा कामात दंग असल्याचा बहाणा करत आहे असा मला भास होई. मला धीटपणा शिकवायला माझे मित्र संध्याकाळी बारमधे बसून भरीला घालत, म्हणत ‘गटव तिला’.. ‘मी ही तावात, ‘हो हो’ म्हणून, ‘आता पहा पुढील भेटीत तिला मेसच्या पार्टीत बोलावतो’ म्हणून भाव खात असे. मात्र तसे घडले नाही. मी थोडासा उदास झालो श्रीनगर सोडताना तिला आठवून. ( 2012 मधील लेखनात घातलेली भर - नंतर 1977 ते 1979 मधे दुसऱ्यांदा पोस्टींगवर मी पुन्हा बँकेत कामाला गेलो तोवर तिला सिनियॉरिटीप्रमाणे केबीनमधे स्थान मिळाले होते. तिच्या कपाळावर माँग भरलेली होती. काश्मिरी पद्धतीचे कानांना लटकणारे सोन्याचे आभूषण तिच्या सौभाग्याची खूण सांगत होते. जुजबी शिष्टाचाराच्या गोष्टी बोलून मी हसून निरोप घेई. एकदा चहाचा कप मागवून तिने माझी जास्त विचारपूस केली. तेव्हा माझ्या जीवनात घडलेल्या उलथापालथीची कल्पना दिली, तेंव्हा तिला ते धक्कादायक वाटले. 1996 ते 1998 च्या माझ्या तिसऱ्या पोस्टींग मधे मला चकीत व्हायची वेळ आली. कारण पंडितांच्यावर जी भयानक देशोधडीला जायची पाळी आली त्यात तिचे कुटुंबिय श्रीनगर सोडून गाझियाबादला स्थलांतरित झाल्याचे कळले.) 1 हिंदी सिनेमातील हवाईदलात कार्यरत दाखवलेले हीरो - राजकपूर संगममधे, आराधनातला राजेश खन्ना आदी...निळ्या सेरिमोनियल ड्रेसमधे दिसतात. तर कधी कथानकाच्या सोईसाठी इंटरव्हलपर्यंत देशासाठी शहीद होऊन नायिकेला खऱ्या हीरोकडे आकर्षित करण्याला मदत करतात!
In reply to प्लँचेटकरुन आपण अतिरेक्यांची by टवाळ कार्टा
In reply to अतिरेक्यांची ठाणी व हल्ला by गामा पैलवान
In reply to अतिरेक्यांची ठाणी व हल्ला by गामा पैलवान
In reply to अतिरेक्यांची ठाणी व हल्ला by गामा पैलवान
In reply to तुम्हाला आम्हा सामान्य by टवाळ कार्टा
In reply to क्षमा असावी by गामा पैलवान
In reply to म्हणजे प्लांचेट करून उत्तरे by टवाळ कार्टा
In reply to म by manguu@mail.com
In reply to हे हे ... हा मात्र प्वाईन्ट आहे बर का मंगूऍटमेलडॉटकॉम सर. by चामुंडराय
In reply to पण by manguu@mail.com
In reply to पण कुणाचा पुनर्जन्म झालाय अन.... by श्रिपाद पणशिकर
In reply to छान by manguu@mail.com
In reply to हा ना राव by सुबोध खरे
In reply to मला काहीच समजले नाही. by शाली
In reply to प्लँचेट चे साहित्य आणि कृती by प्रकाश घाटपांडे
In reply to अगदी अगदी कृती लिहाच.... मला by टवाळ कार्टा

In reply to प्लँचेट चे साहित्य आणि कृती by प्रकाश घाटपांडे
In reply to आमच्या पणजीने फडताळाची किल्ली by सस्नेह
In reply to ओह काल्पनिक किस्सेत होय !, by माहितगार
In reply to खरे आहेत by manguu@mail.com
अर्थातच पण तेसुद्धा प्लांचेत करून मराठा आर्मितल्या मावळ्यांना बोलावून करता आले तर?फारंच उत्तम. तुमच्याकडे तंत्रज्ञान असेल तर तशा स्वरूपाची एखादी सेवा सुरू करा. नंतर तिचं व्यावसयीकरण करता येईल. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.
In reply to सेवा सुरू करावी by गामा पैलवान
In reply to तंत्रज्ञानतर धागालेखकांकडे by टवाळ कार्टा
In reply to नाहीये by गामा पैलवान
In reply to अपेक्षीत तंत्रज्ञान म्हणजे by टवाळ कार्टा
In reply to उत्तरं माहीत नाहीत :-( by गामा पैलवान
In reply to जरा नीट वाचत जा हो.....असा by टवाळ कार्टा
In reply to धागालेखकाचा दावा by गामा पैलवान
In reply to धागालेखकाचा दावा आहे कि by टवाळ कार्टा
In reply to रॉ व आयबी by गामा पैलवान
In reply to होच्च मुळी....प्लँचेट करून जर by टवाळ कार्टा

In reply to पुढला मिपा कट्टा असा करूया by चित्रगुप्त
In reply to पुढला मिपा कट्टा असा करूया by चित्रगुप्त
In reply to कोणाचे काय तर कोणाचे काय! by शशिकांत ओक
एकेकाचे प्रतिसाद वाचून मला माझ्याकडून त्या महत्वाच्या लेखमालेला प्लँचेट विषयाशी जोडून काहीच्या काहीच झाले असे वाटते...छे छे , उलट एक नवा, वेगळा विषय चर्चेला आला हे छानच झाले. मारकसपंतांना आलेले अनुभव त्यांनी अवश्य इथे द्यावेत, आणि धागाकर्त्याने पुण्यात (वा पिंपरी-चिंचवड, डोबीवली, ठाणे, नाशीक, सोलापूर वगैरे कुठेही) खास प्लानचेट कट्टा करावा. (पुणे एवढ्यासाठी म्हटले की हाकेसरशी दहा-वीस विद्वान-विदुषी सहज उपलब्ध होतील)
In reply to प्लानचेट कट्टा कराच. by चित्रगुप्त
In reply to प्लानचेट कट्टा कराच. by चित्रगुप्त
In reply to कोणाचे काय तर कोणाचे काय! by शशिकांत ओक
सादर केलेल्या पारितोषिक लेखातून सेनादलातील वेगळ्या पैलूंवर प्रकाश पडतो... त्या लेखाची विचारणा केली गेली जाईल असे वाटले होते...
मिसळपावकर आपल्या मित्रांनो, पारितोषिक विजेते लेखन प्रसिद्ध झाले आहे. आपण देखील काही आपले लेखन सादर करुन पहावे...
In reply to सादर केलेल्या पारितोषिक लेखातून सेनादलातील वेगळ्या पैलूंवर by शशिकांत ओक
In reply to प्लॅन्चेट by कपिलमुनी
In reply to कांदा लसुण न टाकता हि रेसिपी by श्रिपाद पणशिकर
In reply to जैन by कपिलमुनी
In reply to अरे त्या पकाकाकांना बोलवा रे... by शशिकांत ओक
In reply to पुर्वी मी अशी पुस्तके वाचायचो by प्रकाश घाटपांडे
In reply to अतिंद्रिय सामर्थ्य (वाल्या बाई) by चित्रगुप्त
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- देवाक काळजी रे... :- रेडूIn reply to पल्यांचेट, सुंदर मुली by यशोधरा
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
In reply to प्लॅंचेटसारख्या प्राचीन by टवाळ कार्टा
.....प्राचीन भारतीय तंत्रविद्येबद्दल-----तथाकथित तंत्रविद्या 'प्राचीन भारतीय' असल्या बद्दल कोण कोणते संदर्भ आपल्याकडे उपलब्ध आहेत , ते कृ. सादर करावेत आ. न. माहितगार
In reply to संदर्भ हवेत by माहितगार
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
पाचकळठार निषेध ! दुत्त दुत्त ! पुढल्यावेळेस प्लँचेटाकरुन दर्पणसुंद्री ची मुर्ती बनवताना जिला मॉडेल म्हणुन उभी केलेली तिला बोलवुन तिच्याकरवी तुमचा णिशेध करण्यात येईल !
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
In reply to धाग्याचे नाव वाचून कदाचित by सतिश गावडे
In reply to धाग्याचे नाव वाचून कदाचित by सतिश गावडे
काहीतरी चांगलं वाचायला मिळू शकेल" ... "
धाग्याचं शिर्षक काय आणि आपण त्यात लिहीतोय काय" मित्रा, हवाईदलातील पोस्टींग्ज मधील आठवणीत राहिलेल्या घटना वेळ मिळेल तसे लिहित असतो. त्यातील श्रीनगरच्या पोस्टींग मधील काही संक्षिप्त भाग सादर केला आहे. तो आपल्याला असंबद्ध वाटला... कदाचित पूर्ण लेखन सलग वाचायला शक्य झाले तर ते असंबद्ध वाटणार नाही... हवाईदलातील रेल्वे प्रवासातील किस्से, आणि दरवाजा तोंडावर बंद झाला..., Cpl Pandey GS..., वगैरे कथाभाग तुकडे यातील आहेत..
In reply to धाग्याचे नाव वाचून कदाचित by सतिश गावडे
In reply to सुंदर मुली नाहीत कसं काय? by कंजूस
In reply to हवाई दलाच्या सुंदरी by शशिकांत ओक
In reply to पुढील किस्सा हवाई दलविषयक आणि by यशोधरा
In reply to हल्ली कमांडरसाहेब नाडीबद्दल by नितिन थत्ते
In reply to ओक काका तुमच्या पेशन्सला सलाम by Ram ram
विज्ञानाच्या दृष्टीकोनातून ... पुस्तकातील या विषयावर प्रकरण 4 मधे 19 पानातून विशेष चर्चा प्रा. अद्वयानंद गळतगे यांनी केली आहे. त्यातील काही मुद्दे सादर करत आहे.१. प्लँचेटचा एक विलक्षण अनुभव २. परदेशातील एक दाखला ३. प्लँचेटवर 'मृतात्मे' येतात या कल्पनेची पार्श्वभूमी 4. मृतात्मा प्रत्यक्ष दिसला! 5. प्लँचेटवर कादंबरीताल पात्राचा 'मृतात्मा' आला! 6. भारतीयांचे अनुभव 7. प्लँचेट हा एक भानामतीचा प्रकार 8. भानामतीतील मनःशक्तीचा नियंत्रित प्रयोग 9. प्लँचेटवर खरोखर कोण येते? 10. काल्पनिक भूत देहधारी बनले! 11. *बॅचेल्डार व ब्रुकीस-स्मिथ यांचे प्लँचेट विषयीचे शास्त्रीय प्रयोग 12. कृत्रिम भूत निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग 13 ** या शास्त्रीय सशोधनाचा निष्कर्ष या प्रकरणाच्या शेवट करताना प्राचार्य अद्वयानंद गळतगे एक सावधगिरीचा इशारा देतात. ते म्हणतात, "शास्त्रीय संशोधन व प्रयोग एकाद्या गोष्टीतील सत्य शोधण्यासाठी केले जातात. या संशोधनातून व प्रयोगातून पूर्ण सत्य कळले असे समजण्याची चूक मात्र कधीच करू नये. भौतिक वा जड वस्तूंविषयीचे सत्य सुद्धा शास्त्रज्ञांना त्याविषयी असंख्य प्रयोग व संशोधन करूनही अजून कळालेले नाही. तर मानवी मना विषयीचे व अतींद्रिय घटनांविषयींचे सत्य अशा प्रयत्नातून कळेल ही आशा दूरच. या प्रत्येक घटनेला अनेक कारणे असतात अनेक बाजू असतात. त्याविषयी कोणताही एकच निष्कर्ष काढणे धोक्याचे असते. प्लँचेटवर नेहमी मृतात्माच येतो या समजुतीतील एकांगीपणा असा संशोधनातून उपयोगी पडतो. पण म्हणून दुसऱ्या टोकाला जाऊन प्लँचेट वा सीयन्स मध्ये घडणाऱ्या घटनांचे कारकत्व मानवी मनाला देणे ही चुकीचे आहे. हा सुद्धा शास्त्रीय संशोधनाचा एकांगीपणाच आहे. मृतात्मे प्लँचेटवर येतात कि नाही, केंव्हा येतात या विषयीचा सर्व सामान्य निकर्ष कधीच काढता येत नाही. हे ज्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. अनाहूतपणे येणारे संदेश खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात (त्यांना drop-on म्हणतात) जीवंत व्यक्तींना त्यांच्या जीवनात सहाय्यभूत ठरणारे संदेश हे खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात. अपुऱ्या राहिलेल्या इच्छा तृप्त करण्यासाठी काही मृतात्मे येतात. वासनेमुळे पिशाच झालेले मृतात्मे जिवंत व्यक्तींना निष्कारण छळतात हे ही खरे आहे. मोठे सत्पुरूष, महात्मे, इतकेच नव्हे तर कोणताही मृतात्मा आपण बोलवू तेंव्हा येतो असे समजणे म्हणजे ते मृतात्मे आपल्या इच्छेच्या आधीन असलेले नोकर आहेत असे समजणे होय. कर्मसिद्धांताला छेद देणारी ही समजूत आहे. प्रत्येक आत्मा स्वतःच्या कर्माने बांधला गेला आहे. इतरांच्या कर्माने वा इच्छेने नाही. त्याच वेळी नोकरा प्रमाणे वागणारी वासनेमुळे पृथ्वीवर भटकणारी (earth bound) पिशाचे, व नैसर्गिक (सुष्ट वा दुष्ट) शक्ती (elementals) या जगात आहेत. हे ही सत्य आहे (त्यांना क्षूद्र देवता म्हणतात) पण म्हणून कोणतीही अतींद्रिय घटना घडली की ती मृतात्म्यामुळेच वा अशा शक्तींमुळेच घडली असे मानणे चुकीचे आहे.शेवटी मनुष्य हा ही पिशाचच (आत्माच) आहे. तो मृत नसून जीवंत आहे इतकेच. जे मृतात्मे (मृतात्म्यांची मने) करतात ते जीवंत आत्मे- (त्यांची मने) - का करू नयेत? आणि हेच सत्य शास्त्रीय संशोधनातून उघड झाले असून फिलीप हा त्याचा साक्षी आहे. * Ref. Journal of the Society for Psychical research 1966, 4the** The laws of he spirit world by Bhavnagaris part 3

प्लँचेटकरुन आपण अतिरेक्यांची