माझ्या हवाईदलातील आठवणी - श्रीनगरच्या पहिल्या पोस्टींगमधे...
लेखनप्रकार
मध्यंतरी एका स्पर्धेत एक आठवणीचा किस्सा पाठवला होता त्याला बक्षिस मिळाल्याचे आज कळले... अॅड गिमिक असावे असे दिसते कारण बक्षिस नक्की काय ते गुलदस्तात आहे...! तो इंग्रजीत होता... कधी वेळ मिळाला तर मराठीत लिहायचा प्रयत्न करेन....
मी हवाई दलात कसा प्रवेश केला आणि नंतर जीवनाला कसा कसा आकार घडत गेला यावर लेखन वेळ मिळाला की करतो...
त्यातला एक किस्सा सादर...
...हा प्लॅंचेट करतो ही बातमी काही मित्रांमार्फत बाहेर फुटली. त्यामुळे माझा भाव वधारला. विशेषतः सिनिअर आफिसर्सच्या बायका, ‘ये ना संध्याकाळी आम्हाला बघायचय काय असतं प्लॅंचेट ते.’ असं म्हणून गळ घालत आणि मी देखील, ‘हो-हो जरूर! का नाही? पण रात्रीच्या जेवणाचा बेत माझ्या आवडीचा असू दे’ असं म्हणून त्यांच्यावर थोडीफार हुकूमत गाजवत असे. माझ्या मित्रांना हा प्लॅंचेट करतो आणि सिनिअर आफिसरच्या घरी पार्ट्या झोडतो असा हेवा वाटून त्यांनी माझ्याबरोबर यायचे टाळायला सुरूवात केली. विशेषतः मी श्रीनगरला असताना प्लॅंचेटचे प्रस्थ फार झाले. एकदा तर माझे अकौंट्सचे वरिष्ठ, स्क्वाड्रन लीडर पीव्ही राव, जे कानडी होते, सिगरेट सुलकावत, माझ्याकडे न पाहताच बायकोने सांगितलयं म्हणून जरा तुच्छतेने, ‘आमच्या घरी ये बरं’ असं मोघम निमंत्रण देते झाले. ‘का सर?’ मी मुद्दाम विचारून खोदून पाहिले. ‘अरे ये तर खरं’, असं म्हणून प्लॅंचेट हा शब्द टाळून त्यांनी मला निमत्रंण दिले. रात्री मी त्यांच्या राजबाग या भागातील घरी पोहोचलो. पत्निने आल्या आल्या प्लॅंचेटचे नाव काढल्यावर आमच्या बॉसच्या कपाळाला आठ्या चढल्या. सभ्यतेचा शिष्टाचार म्हणून, ‘ओ आय सी’ असे खोटे खोटे उदगार काढून रोष ओठात दाबला. मी ही जरा आढ्यतेने, ‘सर जरा ते कॅलेंडर काढून द्याना’ असं म्हणून त्यांना कामाला लावले. ‘उद्या ऑफिसात ये तुला दाखवतो’ असे मनात कुढत त्यांनी नाइलाजाने कॅलेंडर काढून पुढ्यात ठेवले. आपला भाव वधारलेला पाहून व ते माझे वरिष्ठपण अकौंट्स ब्रांचचे असल्यामुळे मी चान्स घेत म्हटले, ‘सर मी प्लॅंचेट करीन पण एका अटीवर’, तेंव्हा त्यांच्या भुवया उंचावल्या. ‘तुम्ही आहात कानडी. मला कानडीचा गंध नाही आणि प्लॅंचेट करताना नेहमीच, हा ओक कपाचा कान पकडून त्याला हवी ती उत्तरे देतो असे माझ्या अपरोक्ष म्हटले जाते. म्हणून आपण एक प्रयोग करू या आणि मग पाहू काय होते ते.’
कानडीतून प्रयोग
‘ओके नो प्रॉब्लेम’ असे म्हणून त्यांनी नवी सिगरेट शिलकावली आणि त्यांनी कॅलेंडरच्या मागील भागावर कानडी अक्षरांचा एक तक्ता तयार केला व प्लॅंचेटला बसलो. कानडीमध्येच त्यांची नवरा-बायकोत थोडीफार बोलाचाली झाली आणि माझ्या वरिष्ठांनी पत्निच्या कानउघाडणी नंतर हातातली सिगारेट तात्पुरती टाकून, हात जोडून देवाला नमस्कार करून कपावर बोट टेकून ठेवले. एकदोन मित्र तोवर जमले. ते सगळे स्थानापन्न झाल्यावर पैकी एकाने कपावर बोट लावायला उत्सुकता दाखवली. शेवटी मी माझे बोट टेकवले आणि बॉसना ‘कोणा मृताला बोलावणार? असा प्रश्न केला. प्रश्न अनपेक्षित असल्यामुळे त्यांच्यात पुन्हा कानडीत चर्चा झाली. हळूहळू आवाज वाढला. आविर्भावावरून बॉस, 'हा काय फालतूपणा चालवलाय?' म्हणत असावेत. पण पत्नीच्या आग्रहाखातर गप्प बसून तो (मी) सांगतोय ते करायला काय हरकत आहे? असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे असावे. शेवटी मी मध्ये पडून म्हटलं, ‘ठीक आहे असु दे, ते तुम्ही नंतर ठरवा. सध्या मी अशा व्यक्तीला बोलावतो की ज्याला कानडी येत नाही’.
‘ओ येस, दॅटस् ओके’ असं म्हणून माझ्या सरांनी होकार सुचवला. मी मग मराठी व्यक्तिला आवाहन केले आणि त्याप्रमाणे खूपच पटकन कप हालला ‘हो’ म्हणून पुन्हा घरावर स्थिरावला. आता विचारा प्रश्न असं म्हटल्यावर ते एकमेकांच्याकडे पाहायला लागले. त्या बाईंनी म्हटले, ‘अहो, काय प्रश्न विचारायचे असतात, असं असतं का? मला तर माझ्या मैत्रिणीने सांगितले की ओक सगळी उत्तरं सांगतो. आता तुम्हीच प्रश्न विचारा आणि तुम्ही उत्तरं द्या.’ मला हसू यायला लागले. ‘अहो प्रश्न तुम्ही विचारायचा. त्याचे उत्तर प्लॅंचेटच्या तक्त्यावरून मिळते. मी प्रश्नांचे उत्तर देत नाही.’
‘ओ आय सी, साऊंड्स इंटरेस्टिंग’ असं म्हणून हातातला रमचा ग्लास बॉसनी खाली ठेवला. अती थंडीतील त्या दिवसात बुखारी नामक- शेगडीप्रमाणे घराचे तापमान गरम करायला कोळसे घालायच्या निमिताने ते उठून आपला व मित्रांचा रम पेग भरून खातिरदारी केली, माझ्यासमोर कोक पटकावला व मुंगफलीचे तबक सरकवले. सरांना आधी वाटले तितके प्रकरण फालतू नाही असे त्यांच्या हावभावातून जाणवत होते. कारण उशीरा आलेल्या मित्रांना ते समजाऊन सांगत होते की प्लॅंचेट म्हणजे काय ते!
मग पुढचे अर्धा ते पाऊण तास कानडीमधून प्रश्न विचारणे चालू होते. प्रश्न विचारला आणि तो कप हालू लागला. तो कप कुठे हलत होता हे मला तक्त्यावर दिसत होते, परंतु ती अक्षरे माझ्याकरता शून्य होती. कारण त्या अक्षरात कुठलं काय अक्षर आहे हेही माहित नव्हतं आणि त्या अक्षरातून निर्माण होणारा शब्द व वाक्य काय बनते आहे याची मला पुसटशी सुध्दा जाणीव नव्हती आणि मुख्य म्हणजे विचारलेला प्रश्न काय आहे जो कानडीत विचारला गेला त्या प्रश्नाचा काय रोख आहे, उत्तर काय हवय याचा मला पत्ता नव्हता. प्रश्न कानडीतून विचारले गेले. त्यानंतर कप हळूहळू कानडी अक्षरांवरून फिरु लागला. त्यातून काही अक्षरातून अर्थवाही वाक्ये येऊ लागली. त्या शब्दांचा काय अर्थ असेल असा पति-पत्नीत खल होई. त्यातून त्यांनी निर्वाळा दिला की आम्हाला कानडीत अर्थवाही उत्तरे मिळत आहेत.अधून मधून त्यांच्या बोलण्यात जेव्हा इंग्रजी शब्द येत त्यावरून मला थोडाफार अंदाज लागे. पण प्रश्न नक्की काय होता हे मला आधी समजत नव्हते. असे होता होता त्यांचे प्रश्न आणि उत्तरे संपली आणि तो कप उचलून मी त्या फूंक मारली आणि धन्यवाद असे म्हणून तो प्लॅंचेटचा डाव संपवला. त्यानंतर घडलेल्या चर्चेत असे लक्षात आले की त्यांनी कानडीतून प्रश्न विचारून मिळवलेली कानडी भाषेतून मिळालेली उत्तरे समर्पक होती. एकतर ज्या व्यक्तीशी संपर्क केला मृत व्यक्ती कानडी नव्हती त्यामुळे तिला कानडी येण्याचा प्रश्नच नव्हता. मला स्वतःला कानडी येत नाही. हे त्या कुटूंबियांना माहिती होते. तुझ्यामुळे कप फिरतो. त्याला गती येते हे नक्की. पण तू अक्षरे, शब्द, वाक्ये बनवत उत्तरे देतोय असे होत नाही असे खात्रीलायकपणे आम्ही सांगतो. आमचे संपुर्ण समाधान झाले की तू त्या उत्तरांना बनवून सूचित करत नाहीस! त्यामुळे मी प्रश्नांची उत्तरे देतो हा माझ्यावर नेहमी केला जाणारा आरोपही खोटा आहे असे स्वतः रावांनी मान्य केल्याने मला बरे वाटले. व संशोधन तऱ्हेने या विषयाला हाताळल्याचे समाधान मिळाले.
शेवटी डेंटिस्टच झाला!
असेच आणखी एकांच्याकडे मी प्लॅंचेट करीत असताना खूप मजा आली. किस्सा होता मेजर साठे यांच्या मिसेस बाबतचा. त्यांची ओळख झाली एयर ओपीच्या तेंव्हा कॅप्टन विनायक पाटणकरांच्या घरी. (मी तिसऱ्यांदा श्रीनगरच्या पोस्टींगला असताना ते कारगीलच्या युद्धाच्या प्रसंगी 15 कोअरचे कमांडर होते. २००२-३च्या सुमारास लेफ्ट्नंट जनरल रॅंकवर श्रीनगरहून महत्वाच्या पदावरून रिटायर झाले. आणि गड आणि किल्ले यांच्या संवर्धनासाठी माझ्या प्रयत्नात 2015 पासून त्यांच्याशी पुण्यात पुन्हा संपर्क आला!) एकदा आम्ही त्यांच्या गुपकार रोड वरील बंगलेवजा घरी एकत्र आलो होतो. माझी किर्ती ऐकून मिसेस साठ्यांनी मला त्यांच्या घरी बोलावले. त्यावेळेला ज्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली ती मी विसरून गेलो. परंतु काही वर्षानंतर त्यांची पुन्हा अचानक भेट झाली. त्यावेळी एकदम हस्तांदोलनाला हात पुढे करून त्यांनी म्हटले, ‘ओक, अरे तुला भेटले की मुद्दाम सांगायचे ठरवले होते. आठवतय का? आपण श्रीनगरमध्ये प्लॅंचेट केलं होतं? त्या प्लॅंचेटवर माझ्या मुलाला कॉलेज शिक्षणासाठी कुठली शाखा मिळेल असे मी विचारले होते? ते अगदी बरोबर आले बर का.’ मला गोड धक्का बसला. त्यांच्या मुलाला मेडिकलला जायचं होतं पण प्लॅंचेटवरून तो डेंटिस्ट होईल असे उत्तर आल्यामुळे त्या फार खट्टू झाल्या होत्या, पण शेवटी तो डेंटिस्टच झाला. हे त्यांच्या बरोबर लक्षात राहिले आणि त्यांनी माझी भेट होताच प्रथम उल्लेख केला त्या प्लॅंचेटचा व त्या उत्तराचा. असो.
.....
प्रचिती द्या तर मानू.... आणखी एक घरगुती किस्सा...
पुढे कधीतरी सादर करेन...

वाचने
22567
वाचनखूण
प्रतिक्रिया
90
प्लँचेटकरुन आपण अतिरेक्यांची
In reply to प्लँचेटकरुन आपण अतिरेक्यांची by टवाळ कार्टा
______/\______
In reply to प्लँचेटकरुन आपण अतिरेक्यांची by टवाळ कार्टा
;););)
In reply to ;););) by प्राची अश्विनी
एका बाणात किती पक्षी मारणार .
In reply to एका बाणात किती पक्षी मारणार . by टवाळ कार्टा
सेनेतील नोकरीत सुंदर सुंदर मुली पहायला ही मिळणे अशक्य!
In reply to प्लँचेटकरुन आपण अतिरेक्यांची by टवाळ कार्टा
अतिरेक्यांची ठाणी व हल्ला
In reply to अतिरेक्यांची ठाणी व हल्ला by गामा पैलवान
इथेपण ??
In reply to अतिरेक्यांची ठाणी व हल्ला by गामा पैलवान
काय राव गापै!
In reply to अतिरेक्यांची ठाणी व हल्ला by गामा पैलवान
तुम्हाला आम्हा सामान्य
In reply to तुम्हाला आम्हा सामान्य by टवाळ कार्टा
क्षमा असावी
In reply to क्षमा असावी by गामा पैलवान
म्हणजे प्लांचेट करून उत्तरे
In reply to म्हणजे प्लांचेट करून उत्तरे by टवाळ कार्टा
हो.
In reply to हो. by गामा पैलवान
अर्थातच पण तेसुद्धा प्लांचेत
In reply to हो. by गामा पैलवान
सहीच
म
In reply to म by manguu@mail.com
हे हे ... हा मात्र प्वाईन्ट आहे बर का मंगूऍटमेलडॉटकॉम सर.
In reply to हे हे ... हा मात्र प्वाईन्ट आहे बर का मंगूऍटमेलडॉटकॉम सर. by चामुंडराय
पण
In reply to पण by manguu@mail.com
पण कुणाचा पुनर्जन्म झालाय अन....
In reply to पण कुणाचा पुनर्जन्म झालाय अन.... by श्रिपाद पणशिकर
छान
In reply to छान by manguu@mail.com
हा ना राव
In reply to हा ना राव by सुबोध खरे
जशी आहे तशी
जय जवान...
मला काहीच समजले नाही.
In reply to मला काहीच समजले नाही. by शाली
मला समजले ते असे की
प्लँचेट चे साहित्य आणि कृती
In reply to प्लँचेट चे साहित्य आणि कृती by प्रकाश घाटपांडे
अगदी अगदी कृती लिहाच.... मला
In reply to अगदी अगदी कृती लिहाच.... मला by टवाळ कार्टा
"कत्ल" की "खुदखुशी"
In reply to प्लँचेट चे साहित्य आणि कृती by प्रकाश घाटपांडे
ओ काका, आत्म्याला सर्व भाषा
दाभोळकरांच्या आत्म्याला
काय लोक आहेत एकेक!! पाकृ
आमच्या पणजीने फडताळाची किल्ली
In reply to आमच्या पणजीने फडताळाची किल्ली by सस्नेह
एव्हढं काय डबोलं लपवलय? कांदा
ओह काल्पनिक किस्सेत होय !,
In reply to ओह काल्पनिक किस्सेत होय !, by माहितगार
खरे आहेत
In reply to खरे आहेत by manguu@mail.com
नॅशनल स्टोरी काँपीटीशनला
सेवा सुरू करावी
In reply to सेवा सुरू करावी by गामा पैलवान
तंत्रज्ञानतर धागालेखकांकडे
In reply to तंत्रज्ञानतर धागालेखकांकडे by टवाळ कार्टा
नाहीये
In reply to नाहीये by गामा पैलवान
अपेक्षीत तंत्रज्ञान म्हणजे
In reply to अपेक्षीत तंत्रज्ञान म्हणजे by टवाळ कार्टा
उत्तरं माहीत नाहीत :-(
In reply to उत्तरं माहीत नाहीत :-( by गामा पैलवान
जरा नीट वाचत जा हो.....असा
In reply to जरा नीट वाचत जा हो.....असा by टवाळ कार्टा
धागालेखकाचा दावा
In reply to धागालेखकाचा दावा by गामा पैलवान
धागालेखकाचा दावा आहे कि
In reply to धागालेखकाचा दावा आहे कि by टवाळ कार्टा
रॉ व आयबी
In reply to रॉ व आयबी by गामा पैलवान
होच्च मुळी....प्लँचेट करून जर
In reply to होच्च मुळी....प्लँचेट करून जर by टवाळ कार्टा
प्लांचेटचा वापर करणेविषयी
पुढला मिपा कट्टा असा करूया
In reply to पुढला मिपा कट्टा असा करूया by चित्रगुप्त
हौशी कट्टेकरी असे 2 करेक्टर्स
In reply to पुढला मिपा कट्टा असा करूया by चित्रगुप्त
मी २ **हिथांना ओळखले :ड
कोणाचे काय तर कोणाचे काय!
In reply to कोणाचे काय तर कोणाचे काय! by शशिकांत ओक
प्लानचेट कट्टा कराच.
In reply to प्लानचेट कट्टा कराच. by चित्रगुप्त
भरीला घालायला
In reply to प्लानचेट कट्टा कराच. by चित्रगुप्त
माझा प्लॅन्चेटचा अनुभव ..
In reply to कोणाचे काय तर कोणाचे काय! by शशिकांत ओक
सादर केलेल्या पारितोषिक लेखातून सेनादलातील वेगळ्या पैलूंवर
In reply to सादर केलेल्या पारितोषिक लेखातून सेनादलातील वेगळ्या पैलूंवर by शशिकांत ओक
पारोतोषकप्राप्त वस्तु पहाणे अवघड का ?
प्लॅन्चेट खरेच असते ,
प्लॅन्चेट
In reply to प्लॅन्चेट by कपिलमुनी
कांदा लसुण न टाकता हि रेसिपी
In reply to कांदा लसुण न टाकता हि रेसिपी by श्रिपाद पणशिकर
जैन
In reply to जैन by कपिलमुनी
Sarah Jain चालेल का?
रच्चाकने, प्लँचेट सह कट्टा झाला SSS च पायजेले
अरे त्या पकाकाकांना बोलवा रे...
In reply to अरे त्या पकाकाकांना बोलवा रे... by शशिकांत ओक
पुर्वी मी अशी पुस्तके वाचायचो
In reply to पुर्वी मी अशी पुस्तके वाचायचो by प्रकाश घाटपांडे
कुणी डॉक्टरेट झालेल्या एक
अमच्या लहानपणी इमारतीतल्या
अतिंद्रिय सामर्थ्य
अतिंद्रिय सामर्थ्य (वाल्या बाई)
In reply to अतिंद्रिय सामर्थ्य (वाल्या बाई) by चित्रगुप्त
त्यांना ऑटोरायटिंग संदर्भात अनुभव ऐकायला आवडत असावे.
वाचतोय... आपले अनुभव लिहीत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- देवाक काळजी रे... :- रेडूफोटो पाहिल्यावर स्केलेटन की
पल्यांचेट, सुंदर मुली
In reply to पल्यांचेट, सुंदर मुली by यशोधरा
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
प्लॅंचेटसारख्या प्राचीन
In reply to प्लॅंचेटसारख्या प्राचीन by टवाळ कार्टा
संदर्भ हवेत
In reply to संदर्भ हवेत by माहितगार
एका बंगाली बाबाच्या एकशे
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
पाचकळ
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
धन्यवाद...
धाग्याचे नाव वाचून कदाचित
In reply to धाग्याचे नाव वाचून कदाचित by सतिश गावडे
धिस टाईम हार्ड लक :(
In reply to धाग्याचे नाव वाचून कदाचित by सतिश गावडे
आपल्या ख्यातीला जराही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली.
In reply to धाग्याचे नाव वाचून कदाचित by सतिश गावडे
+१
सुंदर मुली नाहीत कसं काय?
In reply to सुंदर मुली नाहीत कसं काय? by कंजूस
हवाई दलाच्या सुंदरी
In reply to हवाई दलाच्या सुंदरी by शशिकांत ओक
पुढील किस्सा हवाई दलविषयक आणि
In reply to पुढील किस्सा हवाई दलविषयक आणि by यशोधरा
फर्माईश
हल्ली कमांडरसाहेब नाडीबद्दल
In reply to हल्ली कमांडरसाहेब नाडीबद्दल by नितिन थत्ते
तुम्ही त्यांच्यासोबत नाडी
परस्परम समर्पयामी...
ओक काका तुमच्या पेशन्सला सलाम
In reply to ओक काका तुमच्या पेशन्सला सलाम by Ram ram
प्लँचेट हे प्रकरण सध्या विचारणेत आहे.