शीर्षक वाचल्यावरच काही लोकांच्या कपाळाला आठ्या पडल्या असणार याची कल्पना आहे!
"साले हे मिपाकर कट्ट्याव्यतिरिक्त दुसरं करतात काय? एकत्र जमून खाणे-पिणे एवढंच यांना ठाऊक आहे! त्यापेक्षा एकत्र जमून एखादं समाजोपोयोगी काम का नाही करत?" वगैरे वगैरे ताना काही लोकं घेतील याची कल्पना आहे! :)
अहो पण मी काय म्हणतो, आधी मुळात मिपाकर हे एकमेकांना आपुलकीने भेटतात, एकत्र जमतात, हे काय कमी आहे? करतील की काही चांगली कामंही! गेल्या वर्षभरापासून नुकतीच कुठे कट्ट्यांना सुरवात झाली आहे. ठाणे, पुणे, अमेरिका, जर्मनी इत्यादी सर्वच ठिकाणी आता मिपा कट्टे होऊ लागले आहेत, तेव्हा आज ना उद्या या कट्ट्यांतून काही चांगले कार्यही उभे राहील असा आमचा विश्वास आहे! अहो पण प्रत्येक गोष्टीचा एक टाईम यावा लागतो, तोवर वाट पाहावी लागते!
नाय पण मी काय बोलतो, मुळात चार मराठी माणसांनी आपुलकीने एकत्र येणे, मौजमजा, गाणे-खाणे-पिणे करणे हादेखील एक चांगला सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम आहेच की! काय मंडळी, पटतंय ना माझं म्हणणं! अहो पटलंच पायजेल! द्या टाळी! :)
तर ठाण्यात काल अचानक जमून आलेल्या मिपा - दिवाळीकट्ट्याचा हा थोडक्यात सचित्र वृत्तांत -
आनंदयात्री आणि अद्वैत जोशी! दिवाळीच्या मुडात आहेत..
मेघना भुस्कुटे, यात्री आणि अद्वैत..
हम्म! काहितरी आंतरजालीय राजकारणी बेत मराठी राष्ट्रवादी आंतरजालाच्या शरदतात्या पवारने शिजवला आहे आणि १/६ चमत्कारिक अदिती खुश झाली आहे! :)
व्हेज क्रिस्पी आणि सिंगल माल्ट!
छ्या! या आंद्याला कुणाला गुरू करावा हा काही सेन्सच नाही! मला म्हणाला, "तात्या, एका हातात सिंगलमाल्टचा गिल्लास घेऊन एक हात माझ्या डोक्यावर ठेवा, फोटू काढूया!"
देवा, सांभाळ रे बाबा या आंद्याला वाईट संगतीपासून! :)
मराठी आंतरजाल जिंदाबाद! :)
असो,
कळावे, लोभ असावा.. :)
आपला,
(आंतरजालीय राजकारणी) शरदतात्या पवार.
प्रतिक्रिया
26 Oct 2008 - 5:52 pm | बिपिन कार्यकर्ते
च्यामारी, हे काय? कट्टा झाला पण? मी त्या चमत्कारिक ताईंना बजावून सांगितले होते, जमाल तेव्हा कळवा. आम्ही कॉल करून हजेरी लावू. :( चमत्कारिकच आहेत त्या, खरंच. आणि आंद्याचं माहित नाही, पण अद्वैतला काही संगत नक्कीच चांगली नाही लागलिये. पुरावा पाहिजे? चित्र क्रमांक २ बघा. ;)
बिपिन कार्यकर्ते
26 Oct 2008 - 9:09 pm | टारझन
पण अद्वैतला काही संगत नक्कीच चांगली नाही लागलिये. पुरावा पाहिजे? चित्र क्रमांक २ बघा.
=))
आयला हे झकास झालं राव..... बाकी कट्टा सुमडीत केलाय ...
वैधानिक इशारा : आम्ही कट्ट्याला आलो की चकना आमच्या चार हात लांब ठेवावा , नुसता सोमरस प्यावा लागल्यास मंडळ जबाबदार नाही.
टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
अरे बघता काय सामिल व्हा
26 Oct 2008 - 11:48 pm | फटू
बिपिनदा, खरंच की...
(खुप बारकाईनं पाहता बुवा तुम्ही फोटो... तुमचं "निरिक्षण कौशल्य" जबरदस्त दिसतंय ;) )
सतीश गावडे
मी शोधतो किनारा...
26 Oct 2008 - 5:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोस्तहो,
एका शब्दाने तर चर्चा करायची या कट्ट्याची, आम्हीही ठाण्यात होतो दोन-तीन दिवस काल तर पोहचलो स्वगृही.
तुमचे फोटो पाहुन कट्टा हुकल्याचे दु:ख वाटत आहे.
चखणा आणि कोणत्या तरी रंगात पाणी टाकणारे दृष्य रसिक माणसाला वेड लावते,कमीत-कमी असे दृष्य तर वगळायची ;)
26 Oct 2008 - 5:57 pm | विनायक प्रभू
बर बर
मला उगाच्च वाटत होते की मी ठाण्याला राह्तो.
26 Oct 2008 - 7:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काका, सॉरी! मला सुचायला हवं होतं तुम्हाला फोन करायला. :-(
26 Oct 2008 - 7:57 pm | ऋषिकेश
काय हे!.. आधी सांगायचं तरी :(
असो.. बरं वाटलं कट्टा बघुन :) पुढे मुंबईत ठाण्यात भेटलात तर नक्की कळवा :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
26 Oct 2008 - 8:10 pm | प्रभाकर पेठकर
हा कसला कट्टा? हा तर मिपाच्या परंपरेला 'बट्टा'. आधी कळविले असतेत तर आम्हीही आलो असतो. हे काही ठिक नाही केलेत.
असो. अभिनंदन.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
26 Oct 2008 - 8:52 pm | मदनबाण
बर बर
मला उगाच्च वाटत होते की मी ठाण्याला राह्तो.
तात्या आता ठाणेकरांनाच विसरायला लागले आहेत असे दिसतय.!!
अभिनंदन..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
26 Oct 2008 - 9:10 pm | सर्वसाक्षी
तात्या हल्ली ठाणेकराना विसरायला लागला असे दिसते आहे.
तात्या, हे बरे नव्हे हो, हाक दिली असतीस तर आलो असतो की.
27 Oct 2008 - 8:16 am | देवदत्त
हा अन्याय आहे.
केव्हा झाला होता हा कट्टा?
आम्हालाही कळविले असते तर आम्ही ही यायचा प्रयत्न केला असता. (वेळेवरून कितपत साध्य झाला असता हे वेगळे )
:? माझाही फोन नंबर घेऊन ठेवा रे.
असो,
दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना. :)
26 Oct 2008 - 8:22 pm | सखाराम_गटणे™
तात्या
आंद्या बहुतेक अजितदादा होणार
ह. घेणे.
>>तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
26 Oct 2008 - 9:13 pm | प्राजु
गुड गोइंग..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Oct 2008 - 9:18 pm | प्रकाश घाटपांडे
आम्ही अदृष्य रुपाने तिथे येउन गेलो. हुंगुन आनंद जाहला. अगदी भुभ्यांनी गार गार नाकाने हुंगल्यावर अंगावर सहर्ष रोमांच उठतात तस्सा!
(भुभार्डा)
प्रकाश घाटपांडे
26 Oct 2008 - 9:20 pm | मुक्तसुनीत
या निमित्ताने अनेक प्रियजनांचे दर्शन झाले. खूप आनंद झाला. दिवाळीत आपल्या आप्तेष्टांना भेटल्यासारखे वाटले.
(एक एक्स्-ठाणेकर म्हणून इतर ठाणेकरांची वेदना समजू शकतो ! :-) )
27 Oct 2008 - 10:49 pm | स्वाती दिनेश
दिवाळीत आपल्या आप्तेष्टांना भेटल्यासारखे वाटले.
(एक एक्स्-ठाणेकर म्हणून इतर ठाणेकरांची वेदना समजू शकतो! ) :)
मुक्तसुनीतांसारखेच म्हणते,:)
स्वाती
27 Oct 2008 - 7:56 am | आनंदयात्री
>>छ्या! या आंद्याला कुणाला गुरू करावा हा काही सेन्सच नाही! मला म्हणाला, "तात्या, एका हातात सिंगलमाल्टचा गिल्लास घेऊन एक >>हात माझ्या डोक्यावर ठेवा, फोटू काढूया!"
गुरुमहात्म्य आम्हास कित्येक वर्षांपासुन ठाउक आहे, सिंगल माल्ट साधनेची ओढ परममित्र आणी आपला आद्यशिष्य धमाल मुलामुळे लागली, तो एकदा म्हणाला होता "बंधो, संत तात्याबांकडुन सिंगलमाल्ट दिक्षा ही एक प्रिमियम दिक्षा फार कमी लोकास मिळते ती मिळाली तर बघ, आंतरजालिय मनःशांती लाभेल ! " :)
बाकी विप्र काका आणी बाकी ठाणे मित्रवर्ग, कृपया माफ करा, ठाण्यात येणे खुपच घाई गडबडीत झाले होते, तात्या अन आम्ही लोक सुद्धा फार कमी वेळ भेटलो.
27 Oct 2008 - 8:26 am | विसोबा खेचर
बाकी विप्र काका आणी बाकी ठाणे मित्रवर्ग, कृपया माफ करा, ठाण्यात येणे खुपच घाई गडबडीत झाले होते, तात्या अन आम्ही लोक सुद्धा फार कमी वेळ भेटलो.
सहमत आहे. हा कट्टा अगदीच अचानक आणि फार थोड्या वेळापुरताच झाला. त्यामुळे कुणाला मुद्दाम फोन करून बोलावून घायचे सुचले नाही..
असो, लौकरच पुन्हा एकवार सगळे ठाण्यामध्ये भेटू.. :)
तात्या.
27 Oct 2008 - 8:55 am | अमोल केळकर
मी ही ठाण्याजवळच राहतो.
मिपाकरांना भेटण्यास उत्सुक
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
27 Oct 2008 - 9:04 am | संताजी धनाजी
वा एकदम झकास! पुण्यातहि कट्टा करायचा का? काय म्हणता मंडळी? जमतिल तेव्हढे भेटुयात :)
एक दिवस सिंह म्हणून जगण्यापेक्षा दोन दिवस सिंह म्हणून जगावे: टिपू सुलतान
- पु.लं.ची गोळाबेरीज
[http://www.madhurmulay1978.blogspot.com]
27 Oct 2008 - 11:23 am | मन्जिरि
बरेच दिवसानि अद्वैतला बघित्ले .
27 Oct 2008 - 7:46 pm | चन्द्रशेखर गोखले
तुम्ही अम्हाला बोलवल नाही.. हे बर नाही.. तुमच्याशी कट्टा फू..!!!!
27 Oct 2008 - 7:52 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
बिपिन कार्यकर्ते
27 Oct 2008 - 8:44 pm | baba
व्हेज क्रिस्पी आणि सिंगल माल्ट!!
मिसळिशिवाय मिपा कट्टा.. ये बात कुछ हजम नही हुयी... :(
"मुळात चार मराठी माणसांनी आपुलकीने एकत्र येणे, मौजमजा, गाणे-खाणे-पिणे करणे हादेखील एक चांगला सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम आहेच की! "
हे मात्र १००% पटल..
..बाबा
29 Oct 2008 - 12:57 pm | विजुभाऊ
आनन्दयात्री ठाण्यात येणार म्हणून एक मोट्ठा बॅनर लावला होता. ठाणे स्ठेशनात. ऐन वेळेस म न पा ने तो काढुन नेला.
काही पुणेकर ठाण्यात येउन कट्टा कर्तात हे वाचून आनन्द झाला.
अवांतर : पुणे ते औरंगाबाद मार्ग ठाण्यावरुन जातो हे शहाळे विक्रेत्यांवरुन लक्षत येते. ( यालाच मराठीत कोणाचे तरी "शहाळे करणे" असे म्हणतात)
:::::::: आनन्दयात्रेकरुच्या यात्रेत आनन्द मानणारा विजुभौ
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
29 Oct 2008 - 2:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अवांतर : पुणे ते औरंगाबाद मार्ग ठाण्यावरुन जातो हे शहाळे विक्रेत्यांवरुन लक्षत येते. ( यालाच मराठीत कोणाचे तरी "शहाळे करणे" असे म्हणतात)
याला मराठीत मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी कष्ट घेणे असं म्हणतात विजाभौ! आता तुम्हाला सिंगल मॉल्ट मिळाली नाही म्हणून इनो हवंय का? ;-)
29 Oct 2008 - 2:45 pm | विजुभाऊ
इनो हा सिन्गल माल्ट पर्याय होऊ शकतो हे म्हैत नव्हते.
असो....( लोक काय काय प्रयोग करतील देव जाणे)
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
15 Nov 2015 - 12:58 pm | जव्हेरगंज
वा!
हा जुना धागा साप्ड्ला .
चेहरे जसे वाटले होते, त्यपेक्शा जास्तच फरक आहे!!!
15 Nov 2015 - 1:02 pm | बिपिन कार्यकर्ते
कसे वाटले होते?
15 Nov 2015 - 2:27 pm | जव्हेरगंज
अहो त्या दोघी निगरगट्ट असतील असं वाटलं होतं!
पण भलत्याच साध्याभोळ्या निघाल्या की!!
:)
16 Nov 2015 - 6:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ते बाळपणातले फोटो आहेत. अद्वैत आणि विक्षिप्त अदिती, दोघांच्याही डोक्यावर तेव्हा (बरेच) केस होते.
16 Nov 2015 - 6:56 am | अत्रुप्त आत्मा
आणि अता!?
15 Nov 2015 - 8:06 pm | विजुभाऊ
ऑ!!!!!
15 Nov 2015 - 8:34 pm | टवाळ कार्टा
अरे या धाग्यावर कात्री चालवली??