मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अचानक मिपा कट्टा..!

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
शीर्षक वाचल्यावरच काही लोकांच्या कपाळाला आठ्या पडल्या असणार याची कल्पना आहे! "साले हे मिपाकर कट्ट्याव्यतिरिक्त दुसरं करतात काय? एकत्र जमून खाणे-पिणे एवढंच यांना ठाऊक आहे! त्यापेक्षा एकत्र जमून एखादं समाजोपोयोगी काम का नाही करत?" वगैरे वगैरे ताना काही लोकं घेतील याची कल्पना आहे! :) अहो पण मी काय म्हणतो, आधी मुळात मिपाकर हे एकमेकांना आपुलकीने भेटतात, एकत्र जमतात, हे काय कमी आहे? करतील की काही चांगली कामंही! गेल्या वर्षभरापासून नुकतीच कुठे कट्ट्यांना सुरवात झाली आहे. ठाणे, पुणे, अमेरिका, जर्मनी इत्यादी सर्वच ठिकाणी आता मिपा कट्टे होऊ लागले आहेत, तेव्हा आज ना उद्या या कट्ट्यांतून काही चांगले कार्यही उभे राहील असा आमचा विश्वास आहे! अहो पण प्रत्येक गोष्टीचा एक टाईम यावा लागतो, तोवर वाट पाहावी लागते! नाय पण मी काय बोलतो, मुळात चार मराठी माणसांनी आपुलकीने एकत्र येणे, मौजमजा, गाणे-खाणे-पिणे करणे हादेखील एक चांगला सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम आहेच की! काय मंडळी, पटतंय ना माझं म्हणणं! अहो पटलंच पायजेल! द्या टाळी! :) तर ठाण्यात काल अचानक जमून आलेल्या मिपा - दिवाळीकट्ट्याचा हा थोडक्यात सचित्र वृत्तांत - आनंदयात्री आणि अद्वैत जोशी! दिवाळीच्या मुडात आहेत.. मेघना भुस्कुटे, यात्री आणि अद्वैत.. हम्म! काहितरी आंतरजालीय राजकारणी बेत मराठी राष्ट्रवादी आंतरजालाच्या शरदतात्या पवारने शिजवला आहे आणि १/६ चमत्कारिक अदिती खुश झाली आहे! :) व्हेज क्रिस्पी आणि सिंगल माल्ट! छ्या! या आंद्याला कुणाला गुरू करावा हा काही सेन्सच नाही! मला म्हणाला, "तात्या, एका हातात सिंगलमाल्टचा गिल्लास घेऊन एक हात माझ्या डोक्यावर ठेवा, फोटू काढूया!" देवा, सांभाळ रे बाबा या आंद्याला वाईट संगतीपासून! :) मराठी आंतरजाल जिंदाबाद! :) असो, कळावे, लोभ असावा.. :) आपला, (आंतरजालीय राजकारणी) शरदतात्या पवार.

वाचन 12294 प्रतिक्रिया 0