कोवळे काही ऋतू...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
26 Mar 2018 - 5:13 pm

कोवळे काही ऋतू अंगावरुन गेले...
मोहराने रान सारे बावरुन गेले!

लालिमा चढला कसा शब्दांस आज माझ्या?
गीत माझे कोणत्या ओठावरुन गेले!

राहिले आहेत काटे सोबतीस,बाकी
पाकळ्यांचे झुंड या देठावरुन गेले!

हे कसे आले अचानक या नदीस भरते?
दोन तृष्णे'चे बळी काठावरुन गेले!

वेदनेवर वासना जेथे उभार घेते
शब्द माझे आज त्या कोठ्यावरुन गेले!

—सत्यजित

gajhalमराठी गझलशांतरसकवितागझल

प्रतिक्रिया

अभिजीत अवलिया's picture

26 Mar 2018 - 5:44 pm | अभिजीत अवलिया

छान

किसन शिंदे's picture

27 Mar 2018 - 3:00 am | किसन शिंदे

सुंदर लिहिली आहे.

प्रसाद गोडबोले's picture

28 Mar 2018 - 1:18 am | प्रसाद गोडबोले

काहीही

गरीब कविता एकदम !

पहिल्या कडव्यावरुन तर काहीतरी अश्लील असल्या सारखे वाटल.

आपण मला जो अभिप्राय दिलात त्याबद्दल मी समजू शकतो कि मी शब्दांत/शब्दरचनेत गरीब आहे .. पण सत्यजितरावांसारख्या कसलेल्या कवीला हा अभिप्राय म्हणजे हद्द झाली ... नक्की आपले धोरण काय आहे ? कि भानामती शिकण्याच्या नादात कुठेतरी भोंदूबाबाकडे आपली मती गहाण ठेवून आला आहात ?
काय अश्लील आहे पहिल्या कडव्यात ? ऋतू येतात आणि जातात आणि ठरलेल्या ऋतू मध्येच मोहोरसुद्धा येतात . अश्लील या शब्दाची व्याख्या तरी काय आहे नेमकी ? इथे संस्थळावर नको पण व्यनि केला तरी चालेल ,, या गरिबाला ...

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रसाद गोडबोले's picture

2 Apr 2018 - 7:32 pm | प्रसाद गोडबोले

पण सत्यजितरावांसारख्या कसलेल्या कवीला हा अभिप्राय म्हणजे हद्द झाली ... नक्की आपले धोरण काय आहे ?

ख्या ख्या ख्या .
आम्ही प्रतिसाद अभिप्राय हा कवितेला देत असतो , कवीला नाही , उद्या सत्यजित म्हणाले की सदर कविता कुसुमाग्रजांची आहे तरीही आमचा प्रतिसाद हाच राहिल.
धोरण हेच आहे कि - देतो तीक्ष्ण उत्तरे | पुढे व्हावया बरें ||

श्रीमंत मार्कस ऑरेलियसराव पेशवे साहेब ...
>>> आम्ही खुद्द सीझर असताना तुम्ही आमची सेवक असलेल्या पेशव्यांची तुलना करता .... ह्म्म्म , आता तुमच्यावर विशेष लक्ष द्यायला हवे !

नक्की नाव काय आहे आपलं ? सीझर कि शिरमंत मार्कस ऑरेलियसराव ... रोममध्ये अजून असे नमुने आहेत का ? नाही ,,, म्हणजे आम्ही ,, बाई आधीच बघितलीय ,, काय असते ते ? तुमच्यासारखे अजून काही आहेत का ?
परत एकदा कुठेतरी मोठा दगड बघून व्यवस्थित डोकं आपटून घ्या आणि मग लिहा .. आधी स्वतःच नाव नीट पक्के करा , ते आम्हाला कळवा मग आपण पुढले बोलू ... काय आहे तुम्ही लिहिता मार्कस ऑरेलियस आणि आज सांगता कि मी सीझर आहे उद्या बोलाल मी गिजर आहे परवा बोलाल मी गाजर आहे तेरवा बोलाल मी रोहित गुजर आहे अस्सं करत करत स्वतःच्या नावाचंच तेरावं घालाल ... त्याच काय आहे या आभासी जगात ,, अभिप्राय द्यावेत पण ते योग्य नावानिशी ... सारखं सारखं बदलू नये .. तेव्हा आधी नाव ठरवा, ते नीट कळवा मगच आपण पुढलं बोलू .. काय .......

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रसाद गोडबोले's picture

3 Apr 2018 - 7:00 pm | प्रसाद गोडबोले

उगी उगी !

रडुन काही उपेग नाही बाळा ! कोणी काय नाव घ्यायचं अन काय अभिप्राय द्यायचे ते ज्याचं त्याचं बघुन घेईल !

तु चांगल्या कविता पाडण्यावर फोकस कर पाहु , आपण त्यावर बोलु !

उगी उगी =))))