इतिहासाचं वर्तमान

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
4 Jan 2018 - 9:35 am

वज्रलेप इतिहासावर उभा आश्वासक वर्तमान?

निळ्या-भगव्या दगडांचे भागधेय सेम
भगव्या-निळ्या डोक्यांवर बिनचूक नेम

खळ्ळ खटॅक- खळ्ळ खटॅक : किडुकमिडुक चक्काचूर
भक्क पिवळा आगडोंब : काळा धूर सर्वदूर

१४४ कलमाच्या निगराणीला खाकी बंदूकदस्त्यांचे कुंपण
पांढर्‍या बगळ्यांच्या अश्रुंचे इथेतिथे मतलबी शिंपण

आलबेल इतिहासखपली कोण आत्ता खरवडतंय?
सांभाळा, खाली आरपार सडकं वर्तमान वाहतंय

कविता माझीकवितामुक्तकसमाज

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

4 Jan 2018 - 12:15 pm | पगला गजोधर

चांगला प्रयत्न....
फक्त एकांगी वाटू नये म्हणून खालील सुझाव....

पांढर्‍या बगळ्यांच्या अश्रुंचे इथेतिथे मतलबी शिंपण

पांढऱ्या बरोबर, भगवा हिरवा निळा सुद्धा बगळ्यात...

आलबेल इतिहासखपली कोण आत्ता खरवडतंय?

बाबरी मस्जिद, पद्मावती अश्या अनेक खपल्या आहेत, तूर्तास इतकेच....

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jan 2018 - 9:39 am | ज्ञानोबाचे पैजार

ऐतिहासिक जखमा कुरवाळात राहिल्या की सडणारच
सडणार्‍या जखमा झाकून ठेवल्या की वाढणारच

हळुहळु मग एक दिवस ही कीड सार्‍या अंगभर पसरणार
त्यावेळी गिधाडांच्या स्वाधिन होण्याशिवाय गत्यंतर नसणार

सडका भाग कापायला मोठ्या विवेकाची आणि धैर्याची गरज आहे
पण विवेकाचा गळा घोटण्यामधेच आमचे सारे शौर्य सामावलेले आहे

पैजारबुवा,

sagarpdy's picture

5 Jan 2018 - 10:43 am | sagarpdy

__/\__

अनंत यात्री आणि पैजारबुवा,
विषण्ण करणारी काव्ये दोन्हीही. दंडवत स्विकारावा.

गामा पैलवान's picture

5 Jan 2018 - 6:51 pm | गामा पैलवान

अनन्त्_यात्री,

कविता ठीकठाक. पण आलबेल इतिहासखपली म्हणजे काय? काश्मिरी हिंदूंच्या जखमांवर खपली धरली आहे काय? माझी गत काश्मिरी हिंदूंसारखी होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे? केरळातला मणी नामे कम्युनिस्ट नेता रास्व संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या केल्याचं जाहीर सभेत उघडपणे सांगतो. मग जखमांवर खपली धरेल कशी? कवितेचा आशय सेक्युलर अॅपॉलॉजिस्ट आहे.

आ.न.,
-गा.पै.