अन्नदाता सुखी भव (क्रमशः)

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
24 Dec 2017 - 2:19 am


या आधीचे संबंधित लेखन
भाग १: http://www.misalpav.com/node/32554
भाग २: http://www.misalpav.com/node/32709
भाग ३: http://misalpav.com/node/32801
भाग ४: http://misalpav.com/node/33012
भाग ५: http://www.misalpav.com/node/33371
भाग ६: http://www.misalpav.com/node/33829

अन्नदाता सुखी भव भाग ६ - आज काय बरे खावे - सामिष का निरामिष? का पुठ्ठा किंवा गवतच बरे ? (नवीन प्रतिसाद)
फॉर्मालिन …… पुढे चालू (च)
21 Aug 2017 - 11:30 am | शेखरमोघे

ही लेखमालिका काही काळ "गायब" होती. ती पुनः चालू करण्याच्या विचाराने पुढील प्रतिसाद २१ ऑगस्ट २०१७ ला लिहिलेला होता . बहुतेक जाणकारांच्या नजरेतून सुटलेला दिसतो. त्यामुळे भाग ७ प्रकाशित करण्याआधी पूर्णपणे तोच प्रतिसाद आधीच्या लिखाणाशेवटी लिहिण्याऐवजी नवीन लिखाण असल्यासारखा लिहितो आहे म्हणजे भाग ७ करता यथोचित वातावरण निर्मिती होऊन जाईल.

फॉर्मालिन …… पुढे चालू (च)

मी लिहिलेले लिखाण आणि त्यावरच्या प्रतिक्रिया पुन्हा अभ्यासल्यावर वाटले की माझ्या लिहिण्याचा अनेकांनी (त्यात डॉक्टर आणि डॉक्टरीणबाई आहेत) असा अर्थ लावलेला दिसतो आहे.

१. कोणीतरी मूर्ख कोंबडीविके, सोललेल्या कोबड्या घेतात आणि विकण्या आधी बादलीभर फॉर्मालिनमध्ये बुचकळत बुचकळत त्या कोंबड्यांची अवस्था cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे आहे त्यासारखी करून टाकतात.

२. हे मूर्ख कोंबडीविके त्यानंतर अशी कोंबड्यासारखीच वाटणारी cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे आहे, ते विकत घेणारी भोट माणसे भेटतील आणि हा "माल" विकत घेतील अशी वाट बसतात.

३. या मूर्ख कोंबडीविक्याना अशी भोट गिऱ्हाईके मिळतात देखील आणि अशी कोंबड्यासारखीच वाटणारी cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे अशा वस्तू ते कोंबडी म्हणून बिनबोभाट विकत घेतात.

मी लिहिलेले लिखाण आणि त्यावरची टिप्पणी वाचल्यावर असा मतितार्थ लक्षात यायला हवा.

१. कोणीही मूर्ख नसतो - ना कोंबडीविके ना विकत घेणारे. जिथे कोम्बडीविक्याला refrigeration ची मदत नसते आणि सोललेल्या कोबड्या काही तास विकल्या न जाण्याची धास्ती असते, तेव्हां त्याला त्याचे होणारे नुकसान टाळण्याकरता "काही तरी" करण्याची जरूर वाटते. त्याने खरोखरच बादलीभर फॉर्मालिनमध्ये बुचकळत बुचकळत त्या कोंबड्यांची अवस्था cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे आहे त्यासारखी करून टाकली आणि त्यामुळे कोंबड्या indefinitely टिकवल्या तर त्या कोणीच घेणार नाही हे त्याला नक्की माहीत असते. त्याला फक्त preservative वापरून त्याचा "माल" विकण्यासारख्या अवस्थेत काही तास ठेवण्याची तजवीज करायची असते.

२. हे कोम्बडीविके अशी तजवीज करण्याकरता फॉर्मालिन वापरून जॆ काही करतात ( म्हणजे काय/ कसे याबद्दलचा माझा शोध चालू, संपल्यावर details देईन) ते त्यांच्याकडच्या unrefrigerated विकाऊ कोंबड्या साधारण इतर कोंबड्यासारख्याच वाटतील आणि विकत घेणारी माणसे फ़सतील इतपतच असते.

३. या तऱ्हेची फसवणूक चालते (कधी कधी न जमल्याने उजेडातही येते) हा इशारा मी दिलेल्या वेगवेगळ्या स्रोतात आहे.

"मिपा" हा मंच कोण मूर्ख आणि कोण गाढव या शोधाकरता नसून आपले अनुभव आणि विचार यांची देवाण घेवाण करण्याकरता आहे अशी माझी धारणा आहे.

पुढील संदर्भ आणखी अशाच तऱ्हेची माहिती देतात - आखिर पसंद अपनी अपनी.

https://en.wikipedia.org/wiki/Roxarsone

http://womansenergy.com/fda-finally-proved-that-the-chicken-meat-contain...

https://www.bloomberg.com/news/articles/2017-07-20/poultry-farms-in-indi...

काही काळ स्थगित असलेली "अन्नदाता सुखी भव" ही मालिका पुन्हा सुरु करण्याचा बेत आहे - कालोद्भवाणि पुष्पाणि समर्पयामि I

भाग ७ लौकरच येणार !

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

ठीक आहे. येऊद्यात पुढचा भाग.