अण्णा

बोबो's picture
बोबो in जनातलं, मनातलं
20 Nov 2017 - 11:50 am

अण्णा
---------

एम.बी.बी.एस. झाल्यावर मी निर्णय घेतला आता आपण प्रॅक्टिस करायची ती एखाद्या खेडेगावात. माझ्या या निर्णयाचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण मी माझ्या निश्चयावर ठाम होतो. आणि त्यानुसार कोकणातल्या त्या निसर्गरम्य खेड्यात मी डॉक्टरकीला सुरुवात केली. पैसा अर्थातच भरपूर नव्हता. पण पोटापुरतं मिळत होतं. पण विशेष म्हणजे शहराची धावपळ नव्हती. स्वस्थ निवांत आयुष्य चाललं होतं.
अशात एके दिवशी क्लिनिकवर रंगा बोलवायला आला. शेजारच्या वाडीत कुणीतरी वृद्ध गृहस्थ आजारी होते. मी नाव विचारलं.
“अण्णा दळवी”,रंगा म्हणाला.
“अण्णा दळवी?” मला नाव ओळखीचं वाटलं.
“अण्णा दळवी म्हणजे ते प्रसिद्ध लेखक 'श्री.ना. दळवी' का रे?”, मी रंगाला विचारलं.
"हो. तेच ते. शहराच्या वातावरणाला कंटाळून आले आहेत. आणि हे तर त्यांचं जन्म गाव."
"अच्छा."
"वय झालंय त्यांचं. आजकाल त्यांची तब्येत थोडी नरमच असते."
"काय त्रास होतोय त्यांना?"
"थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटलं."
"ठीक आहे.चला जाऊ या."
मी बाईक काढली.रंगा मागे बसला. रंगाने सांगितलेल्या मार्गाने आम्ही एका घराजवळ आलो. घर बर्‍यापैकी भारदस्त होतं. नुकतंच रिनोव्हेशन झाल्यासारखं वाटत होतं.
पडवीवर बरेच लोक बसले होते. बहुधा कसलीतरी मीटिंग चालली होती. एक तरुण अधिकारवाणीने काहीतरी सांगत होता आणि जमलेले लोक त्याचं बोलणं मनापासुन ऐकत होते. रंगाला पाहताच तो तरुण उठुन पुढे आला. त्याने आम्हाला नमस्कार केला
"हे कार्यसम्राट गणासाहेब. अण्णांचे सुपुत्र आणि आमच्या गावचे तरुण तडफदार नेते." रंगाने त्या तरुणाची ओळख करून दिली. मी नमस्कार केला.
गणा म्हणाला,"बरं झालं डॉक्टर, तुम्ही लगेच आलात.अण्णा आत आहेत. पलंगावर झोपले आहेत. तुम्ही व्हा पुढे. मी जरा ही मिटींग आटपुन आलोच."
मी अण्णांच्या खोलीचा दरवाजा हळूच उघडला. अण्णा पलंगावर झोपले होते. दाराचा आवाज ऐकून ते कुशीवर वळले. एका प्रसिद्ध लेखकाला आपण भेटतो आहोत या जाणीवेने मी हरखुन गेलो होतो.
"या डॉक्टर साहेब."ते अर्धवट उठत म्हणाले.
"उठू नका. आरामात पडून राहा."मी त्यांना म्हणत आत गेलो.
त्यांच्या बिछान्याच्या बाजूला बसत मी विचारलं,"कसे आहात अण्णा?"
"बरा आहे.अधून मधून जरा त्रास होतो. पण चालायचं.असं व्हायचंच वयोमानाप्रमाणे. अधून मधून गोष्टी,माणसं विसरायला होतात."
मी त्यांचं ब्लड प्रेशर बघितलं. ते थोडंसं वाढलं होतं.
"अण्णा, ब्लड प्रेशर वाढलं आहे थोडंसं. औषधं घ्या वेळेवर आणि पथ्य पाळा.थोडं हिंडा फिरायला सुरुवात करा. जर भेटा नातेवाईकांना,मित्रांना वगैरे.गप्पा मारा."
अण्णांचा चेहरा उजळला.
"बरं झालं तुम्ही म्हणालात म्हणून. जरा समजवा आमच्या गणाला. किती सांगतो त्याला जर मला ने माझ्या मित्रांकडे. बाबी,सदा,नारू. माझे जीवाभावाचे सोबती. एवढे दिवस झाले गावी येउन पण अजून काही योग आला नाही त्यांना भेटायचा. सांगून थकलो आमच्या गणाला.पण तो सारखा आळस करतो. आज जाऊ,उद्या जाऊ म्हणून चाल ढकल करतो. मला ठाऊक आहे, तो समाजकारणात बिझी आहे. पण स्वतःच्या बापासाठी थोडा वेळ काढायला नको का?
मी भेटायला जाईन म्हणता म्हणता परवा शेवटी जीजी मला भेटून गेला. तुम्ही ओळखत असालच त्याला."
"नाही अण्णा. मी तसा नवीन आहे या गावात."
"अहो जीजी म्हणजे एक वल्ली आहे. पण माणूस एकदम दिलदार.एकदम मेहनती. शिवाय धार्मिक माणूस. तुम्ही ते कोपऱ्यावरचं देऊळ पाहिलंच असेल रवळ नाथाचं. ते बांधण्यासाठी यानेच पुढाकार घेतला होता. काय काय खटपटी-लटपटी त्याने केल्या म्हणून सांगू तुम्हाला. मोठमोठ्या दानशूर माणसांना गाठून त्यांचं मन वळवलं. मोठमोठ्या देणग्या मिळवल्या.कित्येक महिने झटला आणि शेवटी ते देऊळ उभारलं. खरंच ते दिवसच वेगळे होते. परवा तो आला आणि तासभर तरी गप्पा मारत होता माझ्याशी. त्याच्या सहवासात वेळ कसा गेला तेच कळलं नाही."
"मी सांगून बघतो गणा भाऊंना. डॉक्टरचा सल्ला म्हणून तरी ते मनावर घेतील." मी हसत म्हटलं.
"बाकी आजकाल लिखाण कसं चाललंय तुमचं? गावच्या प्रसन्न वातावरणात नवीन काही सुचलं की नाही?" मी विचारलं.
"अरे वा. तुम्हाला माहिती दिसते माझ्याविषयी."
"अण्णा, तुम्हाला कोण ओळखत नाही? मराठी साहित्यात तुमचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. कोकणच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या तुमच्या कादंबऱ्या तर राष्ट्रीय पातळीवर नावाजल्या गेल्या. बऱ्याच भारतीय भाषांमध्ये त्याची भाषांतरं झाली. शिवाय लक्षणीय साहित्यासाठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कारसुद्धा मिळाला तुम्हाला."
"अरे वा, पेशाने डॉक्टर असलात तरी मराठी साहित्याबद्दल बरीच माहिती दिसते तुम्हाला. मराठी पुस्तकं वाचता असं दिसतं."
यावर मी ओशाळा हसलो,"अण्णा, तुमचं जास्त वाचलं नाही कारण माझा ओढ करमणूकप्रधान साहित्याकडे होता. रहस्यकथा,गुढकथा वगैरे.पण नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर ते वाचनसुद्धा सुटलं."
"ठीक आहे. काही तरी का होईना, पण वाचत होता हे काही कमी नाही."
"बरं आहे तर अण्णा. निघतो मी आता. काळजी घ्या तब्येतीची. आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवा.लिखाण चालू ठेवा.आवडत्या माणसांना भेटा."
"जरूर. तेवढं गणाला सांगायला विसरू नका, मला माझ्या मित्रांकडे घेऊन जायला सांगायचं."
"जरूर अण्णा. पुन्हा येईन मी उद्या तुम्हाला भेटायला."
अण्णांचा निरोप घेऊन मी त्यांच्या खोलीतून बाहेर आलो. बाहेर गणा अजुनही मिटींगमध्ये बोलत होता. मला बघून तो पुन्हा उठुन आला आणि म्हणाला,"एवढ्या लवकर आटपलंसुद्धा तुमचं? मी नेमका इथे बाहेर बोलत बसलो, ते आत यायला मिळालंच नाही. बाकी कशी आहे अण्णांची तब्येत?"
"तसं विशेष काळजी करण्याचं कारण नाही. ब्लड प्रेशर जरासं वाढलं आहे. या गोळ्या घेऊन या आणि त्यांना द्या आठवणीने जेवणानंतर सकाळ-संध्याकाळ."
मी कागदावर गोळ्यांची नावं लिहून तो कागद गणाकडे दिला.
"ठीक आहे. मी आताच बाजारातुन ही औषधं मागवुन घेतो. बरं, तुमची फी?"
मी फी सांगितली. गणाने खिशातुन कोर्‍या करकरीत नोटा काढुन माझ्या हातात ठेवल्या.
मी जायला निघालो.
अचानक आठवल्यामुळे वळलो आणि गणाला म्हणालो,"आणि हो गणाभाऊ, एक गोष्ट सांगायला विसरलो. औषधाबरोबरच आणखी एका गोष्टीची काळजी घ्या."
"कसली काळजी?" गणाने विचारलं.
"अण्णांना माणसांची आवड आहे. त्यांना नुसतं घरात ठेवू नका. आता या वयात त्यांच्या चित्तवृत्ती प्रसन्न राहायची गरज आहे. त्यांना त्यांच्या मित्रांमध्ये मिसळू द्या. त्यांचे काही मित्र इथेच गावात राहतात. त्यांच्याकडे घेऊन जा त्यांना भेटायला.काय बरं नावं सांगितली त्यांनी?" मी आठवू लागलो.
"बाबी, सदा, नारू, जीजी बद्दल सांगत होते का ते?" गणाने विचारले.
"अगदी बरोबर", मी म्हटलं.
गणा विषण्णपणे हसला आणि म्हणाला,"डॉक्टरसाहेब, तुम्ही अण्णांची पुस्तकं वाचलेली दिसत नाही."
"का? काय झालं?"मी गोंधळून विचारलं.
"डॉक्टर साहेब तुम्हाला सांगायला हरकत नाही. पण खरं सांगायचं तर, अण्णा सांगतात ती माणसंच अस्तित्वात नाहीत.”
“म्हणजे?”
“डॉक्टर साहेब. बाबी,सदा,नारू,जीजी ही सारी त्यांच्या कादंबर्‍यांमधली पात्रं. अण्णांची क्रिएटीव्हीटी म्हणजे त्यांचा शाप बनली आहे की काय असं कधीकधी मला वाटतं. वास्तव आणि कल्पनेतला फरकच आजकाल ते करू शकत नाहियेत."
गणा आणखीही बरंच काही सांगत होता आणि मी मात्र पुरता सुन्न झालो होतो..

************************** समाप्त **************************

वाङ्मयकथाkathaaलेख

प्रतिक्रिया

एस's picture

20 Nov 2017 - 1:10 pm | एस

कथा आवडली.

सिरुसेरि's picture

20 Nov 2017 - 1:35 pm | सिरुसेरि

छान कथा .

बोबो's picture

20 Nov 2017 - 1:52 pm | बोबो

धन्यवाद एस ,सिरुसेरी आवर्जून अभिप्राय दिल्याबद्दल

शलभ's picture

20 Nov 2017 - 2:21 pm | शलभ

छान आहे कथा..

अनन्त्_यात्री's picture

20 Nov 2017 - 3:45 pm | अनन्त्_यात्री

कथा आवडली.

निनाद आचार्य's picture

20 Nov 2017 - 4:54 pm | निनाद आचार्य

छान लिहिलय. आवडल.

वकील साहेब's picture

20 Nov 2017 - 10:36 pm | वकील साहेब

छान आहे कथा

जव्हेरगंज's picture

20 Nov 2017 - 10:50 pm | जव्हेरगंज

मस्त आहे!
वाढवू शकता...!

बोबो's picture

21 Nov 2017 - 6:50 am | बोबो

धन्यवाद शलभ,अनंत_यात्री,चार चार नव्वद, वकील साहेब, जव्हेरगंज.
जव्हेरगंज तुमच्या सुचनेवर आता पुढे डोकं चालवणं आलं. नक्की विचार करतो :-)

प्राची अश्विनी's picture

22 Nov 2017 - 6:02 pm | प्राची अश्विनी

कथा आवडली. खरी आहे का?

बोबो's picture

23 Nov 2017 - 9:55 am | बोबो
बोबो's picture

23 Nov 2017 - 9:55 am | बोबो

धन्यवाद प्राची अश्विनी.
काल्पनिक कथा आहे :)
पण कुण्या पाश्चिमात्य लेखकाचे बाबतीत असं घडलं असल्याचे हल्ली ऐकीवात आलं.

गंम्बा's picture

23 Nov 2017 - 11:05 am | गंम्बा

ट्विस्ट चांगला होता.

बोबो's picture

25 Nov 2017 - 12:08 am | बोबो
बोबो's picture

25 Nov 2017 - 12:09 am | बोबो

अभिप्रायाबद्दल धन्यवाद गंम्बा :)

बोबो's picture

25 Nov 2017 - 12:09 am | बोबो

अभिप्रायाबद्दल धन्यवाद गंम्बा :)

गामा पैलवान's picture

25 Nov 2017 - 11:41 pm | गामा पैलवान

बोबो,

कथा आवडली. वर जव्हेरगंज म्हणतात तशी वाढवता येईल. उदा. : अण्णांना डॉक्टर बोबो म्हणून नवं पात्र सापडलं. अण्णांनी त्यावर फर्मास कादंबरी लिहायला घेतली. मग अशा काही घटना घडल्या की डॉक्टर बोबो संकटात सापडला. जवळजवळ मरायलाच टेकला. अण्णाच्या कादंबरीतलं पात्र ना, मग जितं कसलं राहतंय. पण काहीतरी आयड्या लढवून पुढं अण्णाच्या (काल्पनिक ?!) तावडीतनं सुटतं खरं.

आ.न.,
-गा.पै.

बोबो's picture

26 Nov 2017 - 6:43 pm | बोबो

धन्यवाद गा.पै. :)
कमाल आहे तुमच्या कल्पनाशक्तीची

बबन ताम्बे's picture

26 Nov 2017 - 8:46 pm | बबन ताम्बे

आवडली.

गम्मत-जम्मत's picture

26 Nov 2017 - 9:39 pm | गम्मत-जम्मत

सुरवातीला वाटलं व्यक्ती चित्रण आहे, शेवटी एकदम कलाटणी मिळाली! छान लिहिले आहे.

शित्रेउमेश's picture

28 Nov 2017 - 8:48 am | शित्रेउमेश

एकदम मस्त...
दिलीप प्रभावळकर अभिनित, "रात्र-आरंभ" ची आठवण आली.....

बोबो's picture

28 Nov 2017 - 10:50 am | बोबो

अभिप्रायाबद्दल धन्यवाद बबन तांबे, गम्मत-जम्मत,शित्रेउमेश :)
शित्रेउमेश - रात्रआरंभ सुरेख चित्रपट आहे, असं ऐकलंय.
मिळवून पाहतो :)

तुंबाडचे खोत चे दोन मोठे खंड वाचून झाल्यावर पुढचे २-३ महिने वाचक म्हणून त्या पात्रांमधून बाहेर येण अवघड झालेल. लेखक म्हणून तर काय होत असेल खरंच. कथा जरूर वाढवा.

रुस्तुम's picture

5 Dec 2017 - 10:05 pm | रुस्तुम

पडघवली वाचून झाल्यावर असेच पडघवलीतुन बाहेर येणे ३-४ दिवस कठीण झ

बोबो's picture

6 Dec 2017 - 7:57 pm | बोबो

धन्यवाद रुस्तुम :)

नाखु's picture

30 Nov 2017 - 9:30 am | नाखु

कलाटणी

हेच कथाबीज घेऊन तीन चार मिपाकरांनी साखळी कथा मालिका लिहायला सुरुवात करावी

मिपा वाचक नाखु

जागु's picture

30 Nov 2017 - 11:24 am | जागु

कथा छानच लिहीली आहे.

बोबो's picture

1 Dec 2017 - 10:29 am | बोबो
बोबो's picture

1 Dec 2017 - 10:30 am | बोबो

धन्यवाद जागु,नाखु, कबीरा :)
कबीरा - तुम्ही म्हणताय त्यात नक्कीच तथ्य आहे. तुंबाडचे खोत सारखा विशाल पट असेल तर लेखकाच्या मनावर प्रचंड ताण येऊ शकतो.
नाखु - साखळी कथा सुरू करायला नक्कीच हरकत नाही :)

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Dec 2017 - 10:55 pm | अमरेंद्र बाहुबली

आवडली

बोबो's picture

2 Dec 2017 - 4:00 pm | बोबो

साक्षात बाहुबलिंना माझी कथा आवडली. और क्या चाहिये!
आयुष्याचं सार्थक झालं वगैरे वगैरे.
मनापासून धन्यवाद अमरेंद्रजी :)

पैसा's picture

2 Dec 2017 - 4:37 pm | पैसा

शेवटची कलाटणी उत्तम! नेहमीचा फॅमिली ड्रामा असावा असे वाटेपर्यंत जोर का झटका मिळाला!

बोबो's picture

3 Dec 2017 - 3:17 am | बोबो
बोबो's picture

3 Dec 2017 - 3:17 am | बोबो

धन्यवाद पैसा ताई. तुम्हाला कथा विशेषतः कलाटणी आवडली याचा आनन्द आहे :)

रुस्तुम's picture

5 Dec 2017 - 10:00 pm | रुस्तुम

मस्त लेख,....कथेला अनपेक्षित कलाटणी छान होती...रात्र आरंभची आठवण झाली.

बोबो's picture

6 Dec 2017 - 7:55 pm | बोबो
बोबो's picture

6 Dec 2017 - 7:55 pm | बोबो

धन्यवाद रुस्तुम.
शिंत्रेउमेश यांनीदेखील रात्रआरंभचा उल्लेख केलाय.
माझं कुतूहल देखील वाढलंय :)

रंगीला रतन's picture

7 Dec 2017 - 3:42 pm | रंगीला रतन

चांगली कथा. जव्हेर भाउंच्या सुचने प्रमाणे खरच वाढवा...

बोबो's picture

8 Dec 2017 - 7:38 am | बोबो

धन्यवाद रंगीला रतन!
पुढे नेण्यासाठी नक्की प्रयत्न करेन :)