॥ कार्तिक कृष्ण पंचमी॥

सूड's picture
सूड in जे न देखे रवी...
8 Nov 2017 - 1:07 am

आज कार्तिक पंचमी
आज पंचमी कार्तिक
उठा उठा चला आता
चला सारेच आर्तिकं

आज वार बुधवार
आज वार वार बुध
गॅस करा आता मंद
जाई ऊतू बघा दूध

आज मिथूनही रास
आज रास ही मिथून
तळ्यातल्या गणेशाला
फेर्‍या इथून तिथून

उद्या वार गुरुवार
उद्या वार वार गुरु
झाली आजची कविता
करा उद्याचीही सुरु

औषधी पाककृतीकालवणऔषधोपचार

प्रतिक्रिया

सूड's picture

8 Nov 2017 - 1:09 am | सूड

वात्रटांकित (सूडातार)

प्रचेतस's picture

8 Nov 2017 - 6:48 am | प्रचेतस

आरारारारा. =))

प्राची अश्विनी's picture

8 Nov 2017 - 8:25 am | प्राची अश्विनी

:):):)

प्राची अश्विनी's picture

8 Nov 2017 - 8:29 am | प्राची अश्विनी

याला म्हणतात कोरड्यावर आसूड ओढणे;)

नाखु's picture

8 Nov 2017 - 8:48 am | नाखु

एकदम "सूड"दिसलाच

अनन्त्_यात्री's picture

8 Nov 2017 - 9:18 am | अनन्त्_यात्री

-बघितले (कालनिर्णयची कृपा). त्यानुसार पुढील दोन विषयांवर स्वतंत्र अथवा एकत्रित काव्यरचना करावी ही नम्र विनंती:
(१) || कार्तिक कृष्ण षष्ठी || आणि (२) || गुरुपुष्यामृत योग ||
-आमचेकडिल क्यालेंडरात फक्त ३६५ दिवस असल्याने उर्वरित कविता तयार ठेवल्यास त्या वाचण्याची मानसिक तयारी आगाऊ करणे शक्य होईल.
:)

पगला गजोधर's picture

8 Nov 2017 - 9:46 am | पगला गजोधर

सर्व तिथ्या, सण, योग, नक्षत्रे, ग्रह, तारे, गण, मुहूर्त, यावर आपण प्रत्येकी एक श्लोक लिहून महाकाव्य रचण्याची विनंती आपणास करू शकतो काय ? शिवाय प्रत्येक सण वार तिथीनुसार प्रत्येकी एक, अशी प्रसादासाठी/कार्यासाठी पा कृ ही द्यावी....

अनन्त्_यात्री's picture

8 Nov 2017 - 9:58 am | अनन्त्_यात्री

सूडकाव्य असेही नामभिदान देणे तर्कसुसंगत ठरेल. मात्र पा. कृ. ना काय नाव द्यावे हे समजत नाही.

आम्ही सगळं लिहीलं तर आपल्या प्रेरणादायी कवींना लिहायला काहीतरी राहायला हवं ना!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Nov 2017 - 10:04 am | ज्ञानोबाचे पैजार

उद्या कार्तिक षष्ठी
उद्या कार्तिक षष्ठी
सांगून गोड गोष्टी
संस्कारांची वृष्टी

उद्या कार्तिक षष्ठी
उद्या कार्तिक षष्ठी
गावात नाही येष्टी
म्हणून आम्ही दू:खी कष्टी

उद्या कार्तिक षष्ठी
उद्या कार्तिक षष्ठी
विस्फारुन दृष्टी
पाहूया रे सृष्टी

उद्या कार्तिक षष्ठी
उद्या कार्तिक षष्ठी
प्रहार करुन पॄष्ठी
उडवू मधली यष्टी

उद्या कार्तिक षष्ठी
उद्या कार्तिक षष्ठी
ताटे विसळा उष्टी
उघडा बंद मुष्टी

पृष्ठांकीत (पैबु सुतार)

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

8 Nov 2017 - 11:07 am | प्रचेतस

मेलो मेलो, ठार झालो बुवा =))

सूड's picture

8 Nov 2017 - 11:41 am | सूड

उद्या कार्तिक षष्ठी
उद्या कार्तिक षष्ठी
ताटे विसळा उष्टी
उघडा बंद मुष्टी

हे भारी!!

अत्रुप्त आत्मा's picture

9 Nov 2017 - 10:59 am | अत्रुप्त आत्मा

@उद्या कार्तिक षष्ठी
उद्या कार्तिक षष्ठी
प्रहार करुन पॄष्ठी
उडवू मधली यष्टी >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying-with-laughter.gif वारल्या गेलो आहे.

अनन्त्_यात्री's picture

8 Nov 2017 - 10:13 am | अनन्त्_यात्री

रचण्याची अघोषित स्पर्धा अमावास्या उजाडल्यावर (की अंधारल्यावर) (तरी) वाचकांच्या हाती अमूल्य काव्यसुमने देवून संपो !

पुंबा's picture

8 Nov 2017 - 11:08 am | पुंबा

ठ्ठो!!!
हहपुवा

दुर्गविहारी's picture

8 Nov 2017 - 12:25 pm | दुर्गविहारी

मेलो !!!! हा हा हा ______/\_______

मिपा वर तिथी काव्यस्पर्धा आयोजित करावी लागणार ! मग, तिथी काव्यस्पर्धा विशेषांक !

संमं, होशियार, रहा तयार !

नाखु's picture

8 Nov 2017 - 10:05 pm | नाखु

मी पणा http://www.misalpav.com/comment/697844#comment-697844 करू नये असं मिपा पुराणात सांगितले आहे, आणि म्हणूनच आम्हीं "मी" गुप्त केला त्याबद्दल माफी करणे

परवा कार्तिक सप्त
परवा कार्तिक सप्त
थोडके घेऊन बसु दस्त
यमके पेरून करु फस्त

परवा कार्तिक सप्त
परवा कार्तिक सप्त
गज काव्यांत राहु सुस्त
निज होवो वाचक त्रस्त

परवा कार्तिक सप्त
परवा कार्तिक सप्त
समिक्षकांची असता गस्त
कोपचा गाठु मस्त

परवा कार्तिक सप्त
परवा कार्तिक सप्त
काव्यांजली करुन जप्त
होत नाही काव्यप्रतिभा लुप्त

परवा कार्तिक सप्त
परवा कार्तिक सप्त
दारी अष्टमी लावी दस्त
उघडा लेखणी कवाडं चुस्त

सुप्तांकित (नाखु भुसार)

अनन्त्_यात्री's picture

9 Nov 2017 - 9:26 am | अनन्त्_यात्री

आता एकादशी, द्वादशी....चतुर्दशी वगैरेवर काव्यरचना करताना काय काढण्याचा विचार आहे?
उत्तराच्या व काव्यसुमनांच्या बेताब प्रतिक्षेत

प्रश्नांकित ( ||शहाण्यालाशब्दाचामार ||)

प्रचेतस's picture

9 Nov 2017 - 9:34 am | प्रचेतस

अगगगगगगगा, नाखुन अंकल,
पिसे काढायलात राव तुम्ही ==))

अत्रुप्त आत्मा's picture

9 Nov 2017 - 11:03 am | अत्रुप्त आत्मा

प्लस वण टू आगोबा.. http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Nov 2017 - 9:43 am | ज्ञानोबाचे पैजार

हा हा हा
"मी"गुप्त नाखु काकांनीही मोठा शड्डू ठोकत आखाड्यात उडी मारली आहे.
पैजारबुवा,

सतिश गावडे's picture

9 Nov 2017 - 10:59 am | सतिश गावडे

त्या त्रिपुरारी पोर्णिमेच्या कवितेचं काय झालं?

अत्रुप्त आत्मा's picture

9 Nov 2017 - 11:04 am | अत्रुप्त आत्मा

सुडत्ने काव्याचे कणं रगडिता
इडंबनंही गळे... ! ;)

तुमच्यासारखा महान विडंबक अजून कसा काय मैदानात उतरला नाही म्हणे?

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2017 - 11:07 am | अत्रुप्त आत्मा

तुम्मी असताना आम्मी कशाला उतरायला पायजे म्हणे? :p