मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"अनिवासी" यांच्यासह पुणे कट्टा : रविवार, २७ ऑगस्ट '१७

डॉ सुहास म्हात्रे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे (१५ ऑगस्ट १९४७) प्रत्यक्ष साक्षीदार असलेले (संदर्भ : एक आठवण) आणि राणीदेशनिवासी ज्येष्ठ मिपाकर "अनिवासी" सद्या पुण्याला भेट देत आहेत. त्यांच्याबरोबर एक मिपाकट्टा करायचे योजले आहे. त्याचा तपशील असा आहे... दिवस : रविवार, २७ ऑगस्ट २०१७ वेळ : सकाळी ११ ते दुपारी दोन (किंवा अधिक :) ) भेटण्याची जागा : जंगली महाराज मंदीराजवळील पाताळेश्वर लेण्यासमोरील हिरवळ कार्यक्रम :    १) हिरवळीवर (पावासाने हजेरी लावल्यास, लेण्यामध्ये) गप्पा    २) जमलेल्या मिपाकरांनी सर्वानुमते ठरवलेल्या जवळच्या एका उपहारगृहात ("तू तेरा, मै मेरा" बेसिसवर) भोजन नवीन-जुन्या, (वयाने) लहान-मोठ्या, लेखक-वाचनमात्र, इतर मिपाकरांशी प्रत्यक्ष ओळख असलेल्या-नसलेल्या... म्हणजे एकंदरीत सर्वच आजी-माजी-भावी-हौशे-नवशे-गवशे मिपाकरांचे कट्ट्यामध्ये स्वागत आहे.

वाचन 17187 प्रतिक्रिया 0