Skip to main content

पास ऑन

लेखक ब्रिटिश यांनी बुधवार, 15/10/2008 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
ल्हानपनी ईतीहासाच पुस्तक उगडाचू न सपनाचे गावान शिराचू तवा वाटाच क जाम म्होट व्हाचा न आभालान फीराचा अमिताभ बच्चनसारका सांगाचा 'मेरे पास बंगला हय, गाडी हय और मां बी' माजी आय कामाला जायची ते शेट ला सांगाचा 'तूम ईस फ्याक्ट्री के पचास लाख मांगते तो दे देता वो बी ' बालासायबांसारकी भाशनं ठोकाची शिवाजी पार्कान लोकांसाटी आक्का आयुश्य कराचा कुरबान वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता नजर आढ्याला लावून जागीत व्हता त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
लेखनविषय:

वाचने 10000
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

जोरदार.. फारच मस्त ! कल्पना उत्तम आहेच आणि भाषेमुळे अजुनच मजा वाढली. कविता आवडली... -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

हेच म्हणतो ! कविता आवडली. खोलवर पोचली. भाषेमुळे खूप रंगत आली.

In reply to by लिखाळ

कल्पना उत्तम आहेच आणि भाषेमुळे अजुनच मजा वाढली. कविता आवडली... लिखाळ सारखेच म्हणते. स्वाती

मस्तच रे टींग्याभाऊ.. जबरदस्त आहे कविता. भाषेमुळे एकदम वेगळाच बाज निर्माण झाला आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by कुंदन

खराय, तुमी माजे न मी बी तुमचाच मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

In reply to by चतुरंग

जल्ला, तू काय करतो ते एकदम पार हसवतं तरी नाही तर अंतर्मुख! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जल्ला, तू काय करतो ते एकदम पार हसवतं तरी नाही तर अंतर्मुख!
पण लई भारी लिवतो. वाघबिळ, ठाण्याचा, टुकुल.

वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला खरां बोल्लास!! तो एक सल राह्यल्लाव रं अजून काळजामंदी... त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला कं बोल्ला, कं बोल्ला!!! लय झकास!!!! तुजा, डांबिसदादूस

>>पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय

>> पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय क्या बात है !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

कविता .. आवडली त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला ... मस्त .

का रं बाला, तू कविता इतक्या लै भारी लिव्तो, मना म्हाईतीच नव्हता बोल! :) जियो मेरे यार...! आपला, (मुंब्र्याहून गावठी दारूचे फुगे मुंबईला धाडणारा व गल्ल्यात सोन्याची चैन घालणारा) तात्या मोकल.

मस्त झालिये कविता. शिर्षक पण यथायोग्य आहे. तुमचे सगळेच लेखन वाचायला आवडते. आपलाच आंद्या भोईर

पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता नजर आढ्याला लावून जागीत व्हता त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला
मिथुनदा -- कविता आणि तिची भाषा लई आवडली!!

कविता मस्तच आहे. उत्तुंग स्वप्ने पुरी झाली नाहीत तरी त्यांच्याशी खेळण्यातही कोण मोठेपणा वाटतो. हि भव्य-दिव्य सप्नेच आयुष्य उजळून टाकतात. अभिनंदन. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय दादानु केवरं झ्यॅक लिवलय तुमी.

पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता नजर आढ्याला लावून जागीत व्हता त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला जबरा लिवलस दादुस बोल ! पन तु कुट हायस?

होबासराव, उत्खननाबद्दल आभार! ब्रिटिश इतरत्र उपस्थित आहेत, ते ब्लॉगवरही सापडले. त्यांची मनाव पायजे ही इथे मिपावर न वाचलेली विनोदी कथा ब्लॉगवर वाचायला मिळाली. त्यांनी मिपावर पुनरागमन करावं ही विनंती!

In reply to by बहुगुणी

सहमत... ब्रिटीशराव लिहिते व्हा... आगरी कथांची सुरस मेजवानी द्या...

In reply to by बहुगुणी

सहमत... ब्रिटीशराव लिहिते व्हा... आगरी कथांची सुरस मेजवानी द्या...

In reply to by बहुगुणी

सहमत... ब्रिटीशराव लिहिते व्हा... आगरी कथांची सुरस मेजवानी द्या...