मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पास ऑन

ब्रिटिश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ल्हानपनी ईतीहासाच पुस्तक उगडाचू न सपनाचे गावान शिराचू तवा वाटाच क जाम म्होट व्हाचा न आभालान फीराचा अमिताभ बच्चनसारका सांगाचा 'मेरे पास बंगला हय, गाडी हय और मां बी' माजी आय कामाला जायची ते शेट ला सांगाचा 'तूम ईस फ्याक्ट्री के पचास लाख मांगते तो दे देता वो बी ' बालासायबांसारकी भाशनं ठोकाची शिवाजी पार्कान लोकांसाटी आक्का आयुश्य कराचा कुरबान वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता नजर आढ्याला लावून जागीत व्हता त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

वाचने 9992 वाचनखूण प्रतिक्रिया 40

लिखाळ Wed, 10/15/2008 - 20:27
जोरदार.. फारच मस्त ! कल्पना उत्तम आहेच आणि भाषेमुळे अजुनच मजा वाढली. कविता आवडली... -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

स्वाती दिनेश Wed, 10/15/2008 - 20:39
कल्पना उत्तम आहेच आणि भाषेमुळे अजुनच मजा वाढली. कविता आवडली... लिखाळ सारखेच म्हणते. स्वाती

प्राजु Wed, 10/15/2008 - 20:30
मस्तच रे टींग्याभाऊ.. जबरदस्त आहे कविता. भाषेमुळे एकदम वेगळाच बाज निर्माण झाला आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग Wed, 10/15/2008 - 21:46
जल्ला काय कविता हाय रं बाला! एकदम घुसलीच की रं कालजाला!! चतुरंग

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टुकुल Wed, 10/15/2008 - 22:33
जल्ला, तू काय करतो ते एकदम पार हसवतं तरी नाही तर अंतर्मुख!
पण लई भारी लिवतो. वाघबिळ, ठाण्याचा, टुकुल.

पिवळा डांबिस Wed, 10/15/2008 - 22:39
वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला खरां बोल्लास!! तो एक सल राह्यल्लाव रं अजून काळजामंदी... त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला कं बोल्ला, कं बोल्ला!!! लय झकास!!!! तुजा, डांबिसदादूस

अनिल हटेला गुरुवार, 10/16/2008 - 07:29
>> पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय क्या बात है !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मनीषा गुरुवार, 10/16/2008 - 08:55
कविता .. आवडली त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला ... मस्त .

सुचेल तसं गुरुवार, 10/16/2008 - 09:02
लै भारी!!!!!!!!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

ऋचा गुरुवार, 10/16/2008 - 09:34
क भारी लिवतो रे तु!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विसोबा खेचर गुरुवार, 10/16/2008 - 09:41
का रं बाला, तू कविता इतक्या लै भारी लिव्तो, मना म्हाईतीच नव्हता बोल! :) जियो मेरे यार...! आपला, (मुंब्र्याहून गावठी दारूचे फुगे मुंबईला धाडणारा व गल्ल्यात सोन्याची चैन घालणारा) तात्या मोकल.

आनंदयात्री गुरुवार, 10/16/2008 - 10:46
मस्त झालिये कविता. शिर्षक पण यथायोग्य आहे. तुमचे सगळेच लेखन वाचायला आवडते. आपलाच आंद्या भोईर

मनिष गुरुवार, 10/16/2008 - 10:55
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता नजर आढ्याला लावून जागीत व्हता त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला
मिथुनदा -- कविता आणि तिची भाषा लई आवडली!!

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/16/2008 - 15:17
कविता मस्तच आहे. उत्तुंग स्वप्ने पुरी झाली नाहीत तरी त्यांच्याशी खेळण्यातही कोण मोठेपणा वाटतो. हि भव्य-दिव्य सप्नेच आयुष्य उजळून टाकतात. अभिनंदन. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

वृषाली गुरुवार, 10/16/2008 - 18:18
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय दादानु केवरं झ्यॅक लिवलय तुमी.

होबासराव गुरुवार, 02/25/2016 - 20:05
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता नजर आढ्याला लावून जागीत व्हता त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला जबरा लिवलस दादुस बोल ! पन तु कुट हायस?

बहुगुणी गुरुवार, 02/25/2016 - 20:48
होबासराव, उत्खननाबद्दल आभार! ब्रिटिश इतरत्र उपस्थित आहेत, ते ब्लॉगवरही सापडले. त्यांची मनाव पायजे ही इथे मिपावर न वाचलेली विनोदी कथा ब्लॉगवर वाचायला मिळाली. त्यांनी मिपावर पुनरागमन करावं ही विनंती!