मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पास ऑन

ब्रिटिश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ल्हानपनी ईतीहासाच पुस्तक उगडाचू न सपनाचे गावान शिराचू तवा वाटाच क जाम म्होट व्हाचा न आभालान फीराचा अमिताभ बच्चनसारका सांगाचा 'मेरे पास बंगला हय, गाडी हय और मां बी' माजी आय कामाला जायची ते शेट ला सांगाचा 'तूम ईस फ्याक्ट्री के पचास लाख मांगते तो दे देता वो बी ' बालासायबांसारकी भाशनं ठोकाची शिवाजी पार्कान लोकांसाटी आक्का आयुश्य कराचा कुरबान वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता नजर आढ्याला लावून जागीत व्हता त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

वाचने 9992 वाचनखूण प्रतिक्रिया 40

लिखाळ 15/10/2008 - 20:27
जोरदार.. फारच मस्त ! कल्पना उत्तम आहेच आणि भाषेमुळे अजुनच मजा वाढली. कविता आवडली... -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

मुक्तसुनीत 15/10/2008 - 20:32
हेच म्हणतो ! कविता आवडली. खोलवर पोचली. भाषेमुळे खूप रंगत आली.

In reply to by लिखाळ

स्वाती दिनेश 15/10/2008 - 20:39
कल्पना उत्तम आहेच आणि भाषेमुळे अजुनच मजा वाढली. कविता आवडली... लिखाळ सारखेच म्हणते. स्वाती

llपुण्याचे पेशवेll 15/10/2008 - 20:29
एक नंबर रे टिंग्या ! एक नंबर.. :) पुण्याचे पेशवे

प्राजु 15/10/2008 - 20:30
मस्तच रे टींग्याभाऊ.. जबरदस्त आहे कविता. भाषेमुळे एकदम वेगळाच बाज निर्माण झाला आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

ब्रिटिश 15/10/2008 - 20:32
मी टींग्या नाय बाबाव मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 15/10/2008 - 20:45
भाषा आणि कवितेतील कल्पना दोन्हीही मस्तच !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चन्द्रशेखर गोखले 15/10/2008 - 21:39
जल्ला काय लिवला..एकदम भारी

चतुरंग 15/10/2008 - 21:46
जल्ला काय कविता हाय रं बाला! एकदम घुसलीच की रं कालजाला!! चतुरंग

In reply to by चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती 15/10/2008 - 22:01
जल्ला, तू काय करतो ते एकदम पार हसवतं तरी नाही तर अंतर्मुख! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टुकुल 15/10/2008 - 22:33
जल्ला, तू काय करतो ते एकदम पार हसवतं तरी नाही तर अंतर्मुख!
पण लई भारी लिवतो. वाघबिळ, ठाण्याचा, टुकुल.

पिवळा डांबिस 15/10/2008 - 22:39
वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला खरां बोल्लास!! तो एक सल राह्यल्लाव रं अजून काळजामंदी... त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला कं बोल्ला, कं बोल्ला!!! लय झकास!!!! तुजा, डांबिसदादूस

चाकरमानि 16/10/2008 - 04:52
खल्लास मित्रा खाउन ताक्लस सगल्याना चाकरमानि ( साधि राहनि उच्च विचार सरनि)

झकासराव 16/10/2008 - 07:21
मस्तच आहे रे कविता. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

अनिल हटेला 16/10/2008 - 07:29
>> पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय क्या बात है !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मनीषा 16/10/2008 - 08:55
कविता .. आवडली त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला ... मस्त .

सुचेल तसं 16/10/2008 - 09:02
लै भारी!!!!!!!!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

सहज 16/10/2008 - 09:28
मिथुनदा कविता देखील. सलाम!!

ऋचा 16/10/2008 - 09:34
क भारी लिवतो रे तु!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विसोबा खेचर 16/10/2008 - 09:41
का रं बाला, तू कविता इतक्या लै भारी लिव्तो, मना म्हाईतीच नव्हता बोल! :) जियो मेरे यार...! आपला, (मुंब्र्याहून गावठी दारूचे फुगे मुंबईला धाडणारा व गल्ल्यात सोन्याची चैन घालणारा) तात्या मोकल.

आनंदयात्री 16/10/2008 - 10:46
मस्त झालिये कविता. शिर्षक पण यथायोग्य आहे. तुमचे सगळेच लेखन वाचायला आवडते. आपलाच आंद्या भोईर

मनिष 16/10/2008 - 10:55
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता नजर आढ्याला लावून जागीत व्हता त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला
मिथुनदा -- कविता आणि तिची भाषा लई आवडली!!

विनायक प्रभू 16/10/2008 - 11:41
http://vipravani.wordpress.com/ कुठेतरी माहित होत लपलेला खरा ब्रिटीश.

रामदास 16/10/2008 - 14:02
डोल्यान पानी आनला तू.

प्रभाकर पेठकर 16/10/2008 - 15:17
कविता मस्तच आहे. उत्तुंग स्वप्ने पुरी झाली नाहीत तरी त्यांच्याशी खेळण्यातही कोण मोठेपणा वाटतो. हि भव्य-दिव्य सप्नेच आयुष्य उजळून टाकतात. अभिनंदन. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

स्पृहा 16/10/2008 - 17:19
कविता फारच सुंदर आहे , येऊ द्या अशाच सुंदर कविता ! :)

वृषाली 16/10/2008 - 18:18
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय दादानु केवरं झ्यॅक लिवलय तुमी.

होबासराव 25/02/2016 - 20:05
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता नजर आढ्याला लावून जागीत व्हता त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला सगली सपन पास ऑन झालीन जल्ला जबरा लिवलस दादुस बोल ! पन तु कुट हायस?
होबासराव, उत्खननाबद्दल आभार! ब्रिटिश इतरत्र उपस्थित आहेत, ते ब्लॉगवरही सापडले. त्यांची मनाव पायजे ही इथे मिपावर न वाचलेली विनोदी कथा ब्लॉगवर वाचायला मिळाली. त्यांनी मिपावर पुनरागमन करावं ही विनंती!