शब्द मौनातले

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
17 Jul 2017 - 9:06 am

मौनात काळजाला जी आर्त हाक जाई
शब्दातल्या छटेचा पारा उधाण जाई

शब्दात वार नाही, ना त्यास धार काही
का रक्त सांडतो जो, वाचावयास जाई

शब्दात सत्य जेव्हां, तेव्हां न दाद काही
शब्दात जो दिखावा, उत्स्फूर्त दाद जाई

जेव्हा कधीच कोणी, बोलावयास नाही
एकांत शब्द काही, शोधावयास जाई

शब्दात भेटती जे, ते अर्थ अंतरीचे
भेटीत अंतरीच्या, न्हाहून प्राण जाई
... संदीप लेले

कवितागझल

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

17 Jul 2017 - 10:30 pm | ज्योति अळवणी

चांगली कल्पना आहे

संदीप-लेले's picture

18 Jul 2017 - 8:27 pm | संदीप-लेले

धन्यवाद ज्योती

सत्यजित...'s picture

18 Jul 2017 - 12:21 am | सत्यजित...

वाह् व्वा संदिपजी! चांगला प्रयत्न आहे!
कृपया एकदा 'काफिया'बद्दल अजून वाचून घ्यावे,ही विनंती!

>>>जेव्हा कधीच कोणी, बोलावयास नाही
एकांत शब्द काही, शोधावयास जाई>>>उत्तम खयाल!

संदीप-लेले's picture

18 Jul 2017 - 8:27 pm | संदीप-लेले

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद, सत्यजित ! :)

Swapnaa's picture

21 Jul 2017 - 10:42 pm | Swapnaa

खूप छान