शब्द मौनातले
मौनात काळजाला जी आर्त हाक जाई
शब्दातल्या छटेचा पारा उधाण जाई
शब्दात वार नाही, ना त्यास धार काही
का रक्त सांडतो जो, वाचावयास जाई
शब्दात सत्य जेव्हां, तेव्हां न दाद काही
शब्दात जो दिखावा, उत्स्फूर्त दाद जाई
जेव्हा कधीच कोणी, बोलावयास नाही
एकांत शब्द काही, शोधावयास जाई
शब्दात भेटती जे, ते अर्थ अंतरीचे
भेटीत अंतरीच्या, न्हाहून प्राण जाई
... संदीप लेले
वाचने
1924
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
चांगली कल्पना आहे
In reply to चांगली कल्पना आहे by ज्योति अळवणी
धन्यवाद ज्योती
वाह् व्वा संदिपजी! चांगला
In reply to वाह् व्वा संदिपजी! चांगला by सत्यजित...
धन्यवाद
शब्द मौनातले