कार्टूननामा-०२ (संपुर्ण)

औरंगजेब's picture
औरंगजेब in जनातलं, मनातलं
6 Jul 2017 - 11:52 am

आधीच्या भागांची लिंक
http://www.misalpav.com/node/40059
http://www.misalpav.com/node/40097

टीप:-मागील भागात आलेल्या प्रतिक्रिया वाचून ह्या भागापासून मी ह्या लेखमालेचा ढाचा बदलणार आहे

नुकतीच भारतातील टॉप १० कार्टून्स ची लिस्ट प्रसिद्ध झाली आहे. ती खालीलप्रमाणे:-
०१: डोरेमॉन
०२: पोकेमॉन
०३: शिन चॅन
०४: बे-ब्लेड
०५:ड्रॅगन बॉल झी
०६:बेन १०
०७:निन्जा हत्तोरी
०८: सुपा स्टाईकर्स
०९:-टॉम अँड जेरी
१०: छोटा भीम

गम्मत म्हणजे ह्या यादीतील ६ आणि ९ आणि १० नंबरची कार्टून्स सोडली तर सगळीच जपानी आहेत. म्हणजेच जपानी कार्टून चा भारतीय मनावर चांगलाच पगडा बसला आहे. त्या संबंधित हा लेख आहे.

बहुतेक जपानी कार्टून मध्ये आजी-आजोबा- भाऊबहीण-आई-बाबा अशी फॅमिली दाखवली जाते. भारतीय कुटुंब व्यवस्थेसारखीच हि कुटुंब साखळी दाखवली जाते. त्यामुळे आपण त्याकडे चटकन आकर्षित होतो. ह्या कार्टून मधील पात्रे शाळेत जातात , घरी येऊन होमवर्क करतात , मित्र मैत्रिणींबरोबर खेळतात हे सगळं तर आपण शाळेच्या दिवसात रोजच करत असतो नाही का? आणि खरंतर मानवी मनाच्या दृष्टीने बघितलं तर जे आपण आधीच केलेलं असतं ते आपल्याला बघायला नक्कीच आवडतं. ह्या कार्टून मधील माणसांचे प्रॉब्लेम सुद्धा आपल्या सारखेच असतात ,गृहपाठ करत नाहीत , मित्र त्रास देतात ( डोरेमॉन मधेच फक्त बरका!) त्यामुळे ते आपले मित्रच वाटतात.

दुसरं म्हणजे हि पात्रे सतत काहीतरी नवीन करत असतात. आता कितेरेत्सु कार्टूनच उदाहरण घ्या. हा मुलगा सतत त्याचा डायाक्का पुस्तकातून काही ना काही नवीन बनवत असतो. अथवा आपला लाडका डोरेमॉन घ्या. नोबिताला तो नेहमीच काहीतरी करायला उद्युक्त करत असतो. नाही म्हणलं तरी ह्याचा २०% चांगला फरक तरी आपल्यावर पडतोच नाही का? ह्या कार्टून मध्ये दाखवलेली कुटुंब व्यवस्था , त्यांचे आपल्या कुटुंबावरचे प्रेम , छोट्या छोट्या गोष्टीत थँक यु म्हणणे आपल्याला वेगळे वाटते खरे पण ते आपल्या जीवनात करणे आवश्यक आहे. कित्येकदा ह्या कार्टून्स मधून जपानी संस्कृती विषयी माहिती पण मिळते. जसं शिन चॅन आणि डोरेमॉन च्या काही भागात टी-सेरेमनी आणि फ्लॉवर अरेंजमेंट विषयी माहिती मिळते. अथवा चिल्ड्रेन फेस्टिवल , चाईल्ड केअर दिवस , असे दिवस जे जपान मध्ये साजरे केले जातात त्या बद्दल पण माहिती मिळते.
मुळात जपानी कार्टून चे ढोबळ मानाने दोन प्रकार पडतात एक म्हणजे ॲनिमआणि दुसरा प्रकार कार्टून्स!

ॲनिम(anime) म्हणजे ऍनिमेशन कार्टून्स. हि पण कार्टूसच पण ऍनिमेटेड. ह्यात पोकेमॉन , डिजिमॉन , बे-ब्लड सारखी कल्पनाशक्ती वर आधारित कार्टून्स येतात. बाकी पोकेमॉनची क्रेझ काय वर्णावी महाराजा! पोकेमॉन गो आल्यावर आधी ओसरलेली क्रेझ परत सुरु झाली आहे. जगभरात लाखो लोकांनी हा गेम डाउनलोड केला. जी माणसे घरात बसून होती चालायचा कंटाळा करत होती त्या माणसांना ह्या गेम ने चालतं केलं. अमेरिकास्थित निआंटिक(Niantic) कंपनी ला ह्या गेम ने करोडोंचा फायदा करून दिला. Google Map वर आधारित Virtual Reality शी पहिली ओळख ह्या गेम नेच भारतीयांना करून दिली. बाकी त्याचे ८० % तोटे होते ती गोष्ट सोडा पण २० % तरी फायदा झाला.

आता कार्टून म्हणजे जादुई दुनिया , ऍनिमेटेडच पण जरा वेगळी ह्या मध्ये डोरेमॉन , शिन चॅन , कोचीकामे , निन्जा हत्तोरी , चिबी मारुको चॅन .... हि लिस्ट ना संपणारी आहे .
ह्यात अपवादात्मक दृष्ट्या लहान मुलांनी बघु नयेत अश्या गोष्टी असतात ( अपवाद:-शिन चॅन ). बाकी हि सगळी कुटुंब , त्यांच्या समस्या , मित्रांच्या समस्या , शाळा , जपानी नागरी जीवन , आदी कमी खतरनाक गोष्टींविषयी असतात. मग तो डोरेमॉन असुदे नाहीतर आणि कोणी हि कार्टून आपल्या जीवनाशी चटंकन जोडली जातात. खरंतर ह्याच श्रेणीतली कार्टून्स भारतात दाखवावीत अश्या मताचा मी आहे.

जपानी कार्टून्स भारताच्या खूप पुढे आहेत. म्हणजे स्पष्ट सांगायचं तर आपण बैल गाडीत आहोत आणि ते स्पोर्ट्स कार मध्ये. ह्याला करणे म्हणजे आपल्या कडे चांगले ऍनिमेशन स्टुडिओस नाहीत , ग्राफिक्स च्या नावाने बोंब आहे . जपानी कार्टून डिटेलिंग वर जास्त भर देतात. हा फरक तुम्हाला नक्कीच जाणवला असेल नाकी का? छोट्याला छोटी गोष्ट ते बघतात . म्हणजे एखाद्या कार्टून मध्ये पात्राचा पातळ पदार्थ खातानाचा सिन असेल तर बशीत थोडा पदार्थ उरलेला दाखवतात अथवा बशीच्या बाजूला थोडा लागलेला दाखवतात हे डिटेल्स महत्वाचे असतात नाही का?
जपानी आणि भारतीय कार्टून्स ह्यातला फरक मिटवायचा असेल तर आपल्याला हि दरी सांधणे महत्याचे आहे .
ह्या वर आपले मत काय ? कृपया प्रतिसादात नक्की नोंद करावी .
बोनस माहिती
ज्यांची लहान मुले आहेत त्यासाठी दोन कार्टून च्या वेब-साईट मी येथे देत आहे. इथे सगळी कार्टून्स उपलब्ध आहेत
सगळी कार्टून्स फ्री मध्ये बघता येतात पण कार्टून्स इंग्लिश मधेच उपलब्ध आहेत
http://kissanime.ru/
http://kisscartoon.so/

कथालेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 Jul 2017 - 12:29 pm | प्रचेतस

आमचं प्रेम फक्त डिस्नेच्या मिकी माउस, प्लूटो, गुफी, डोनाल्ड डक आणि एमजीएमच्या टॉम अँड जेरीवर

सारेच लेख उत्तम आहेत.. पण ही आत्ताची कार्टूनं आजीबात आवडत नाहीत. कार्टून नेटवर्कचं तर जे काही झालंय ते बघूण किव येते. डोरेमॉन, कितरेत्सू वगैरे कार्टूनं भाचरांना, पुतण्यांना आवडतात म्हणून बघावी लागतात.. पण मन रमत नाही..
बेबी लूनी टून्स, टिमॉन अँड पुंबा, द मास्क, मि. बिन, जॉनी ब्राव्हो, डेक्स्टर्स लॅबोरेटॉरी, पॉवरपफ गर्ल्स, मि. मगू, टॉम अँड जेरी, रोडरनर, लूनी टून्समधली पात्रे मध्यवर्ती असणारे बग्ज बनी, डकटेल्स, लायन किंग, ग्रिक देवतांच्या कथांवर आधारीत कार्टून मालिका येत असे ती, पोपॉय, थॉमस अँड हिज फ्रेंडस ही जाम आवडणारी कार्टून्स आता बघायला मिळत नाहीत याचीच खंत वाटते..

सौरा आणि प्रचेतस खालच्या दोन लिंक आहेत त्यात आहेत तुमचूया आवडीची कार्टून्स.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jul 2017 - 1:20 pm | अमरेंद्र बाहुबली

बग्स बनी आपलं आवडतं!

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jul 2017 - 1:20 pm | अमरेंद्र बाहुबली

बग्स बनी आपलं आवडतं! :-)