कार्टूननामा-०१(1/2)

औरंगजेब's picture
औरंगजेब in जनातलं, मनातलं
23 Jun 2017 - 4:19 pm

अत्यंत वाह्यात , भयंकर वांड अशा शिनोसुके बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याचं वय आहे ५ वर्षे. हा जपानच्या कासुकाबे शहरात राहतो.  ह्याच्या आईच नांव मित्सी(मिसाई) आणी वडलांचे नांव हॕरी(हिरोशी). ह्याला एक धाकटी बहीण पण आहे , तिचं नाव हिमा(हिमावारी).

तुम्ही आत्तापर्यंत ओळखलंच असेल की मी आपल्या लाडक्या शिनचॕनबद्दल लिहिलं आहे.
ब-याच जणांच्या लहानपणच्या आठवणींचा बराचसा भाग ह्याने व्यापलेला आहे. ह्याच्या व्रात्यपणा मधे हसवण्याची कला दडलेली आहे.

शिनचॕनचे मित्र म्हणजे कझामा , नॕनी , मसाउ आणि सुझूकी. 

ह्याचे अडल्ट प्रँक्स काही काही लोकांना वैतागवाणे वाटले होते. म्हणून भारत सरकारच्या सेन्साॕर बोर्डाने शिनचॕनचे प्रसारण रौखलेही होते. पण आता आक्षेपार्ह भाग वगळून प्रसारण सुरु आहे.

खरंतर ह्या व्रात्य मुलाच्या आगाऊ आणि तरीही हसवत ठेवणार्या गोष्टीमागे एक दुख:द किनार आहे. 

खरोखरच्या शिनचॕनची आई शेजारणीशी एकदा बोलत होती. हिमावारी तितक्यात रांगत रांगत रस्त्यावर गेली. वेगात येणार्या गाडीखाली आपली बहीण जाते आहे हे पाहुन शिनचॕन तिला वाचवायला धावला. पण दुर्दैवाने ह्या अपघातात त्या दोघांचाही जीव गेला. पोटच्या पोरांचा हा भीषण अंत पाहून मिसाई कोसळली.

मिसाईला अतीव धक्क्याने हॉस्पिटलमध्ये अॕडमिट करावं लागलं . बरी हौऊन आल्यावर तिने शिनचॕनबद्दल काही पेन्सिल स्केचेस बनवली. त्यातुनच पुढे गौरोगोरो कॉमिक आणि आसाही टिव्हीने शिनचान सिरीज सुरू केली. आज जगभरात शिनचॕनचे लाखो फॕन्स आहेत.

जपान सरकारने ह्या अपघाताची दखल घेउन रस्ते सुरक्षा ट्रेनिंग सर्व शाळांमधे आनिवार्य केले. 

तर अशी आहे शिनचॕनची कहाणी. पुढील भागात आपण शिनचॕन व्यतिरिक्त अजून पात्रांची ओळख करुन घेऊ.

मौजमजालेख

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

23 Jun 2017 - 8:00 pm | पद्मावति

मस्तच. पु.भा.प्र.

कानडाऊ योगेशु's picture

23 Jun 2017 - 9:39 pm | कानडाऊ योगेशु

तुमचा धागा वाचल्यानंतर प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे नेटवर सर्च मारले व परस्परविरोधी विदा मिळाला. विकिपेज वर तर तुम्ही उल्लेख शिनचॅन सिरियल च्या पार्श्वभूमीचा तुम्ही जो उल्लेख केला आहे तो अजिबात नाही आहे. त्यामुळे ह्या माहीतीवर विश्वास ठेवावा कि ठेवु नये ह्या संभ्रमात पडलो आहे.

तो उल्लेख खरा नसेल तर फार बरं होईल.

औरंगजेब's picture

23 Jun 2017 - 11:40 pm | औरंगजेब

शिनचानबद्दल माहिती whatsapp वर आली होती.ती पून्हा चेक करूनच लेख लिहिला आहे. कार्टूनमधे शिनचानचा म्रूत्यू डोंगरावरून पडून दाखवाला गेला आहे ( Banned,episode)

प्रचेतस's picture

24 Jun 2017 - 7:07 am | प्रचेतस

म्हणजे तुम्ही व्हाट्सअपवर आलेल्या माहितीनुसार लेख लिहिता?

फक्त रेफरन्स घेतला आहे. बाकी सगळे लेखन माझेच असणार आहेत.

अभ्या..'s picture

24 Jun 2017 - 11:15 am | अभ्या..

म्हणजे बाकी सगळे तुम्ही मनानेच लिहिणार ह्या कार्टूनविषयी?

संजय पाटिल's picture

24 Jun 2017 - 4:45 pm | संजय पाटिल

अरे काय हे? आधी लिहुतर दे त्यांना...

अभ्या..'s picture

24 Jun 2017 - 5:03 pm | अभ्या..

=)) =))
सॉरी पाटीलबाबा

औरंगजेब's picture

25 Jun 2017 - 3:32 pm | औरंगजेब

नाही हो मनाचे काहीही नाही.

जेम्स वांड's picture

24 Jun 2017 - 4:47 pm | जेम्स वांड

तरीच म्हणले एखादी आई आपल्या मयत (ते पण दुःखद) झालेल्या मुलावर एखादे कार्टून पात्र बेतते इतपत स्वीकारार्ह आहेच पण तिनेच त्या पात्राच्या कथेत 'ऍडल्ट प्रॅन्क' चितारावेत हे गणित काहीकेल्या सुटत नाही. अगदी माझी मानसिकता टीपीकल भारतीय म्हणाली अन पाश्चात्य/जापनीज मानसिकता वेगळी म्हणाली तरी वात्सल्य तरी वैश्विक मानवी गुण असावा असा आमचा आपला एक अंदाज बघा.

औरंगजेब's picture

25 Jun 2017 - 3:31 pm | औरंगजेब

मिसाई ने अडल्ट प्रँस चितारलेले नाहीत तो असाही टिव्हीचा खौडसाळपणा आहे मुळात मिसाईच्या पैन्सिल स्केचेस वर ही सिरिज आधारित आहे बाकी इतर मसाला असाही टीव्हीचा आहे.