कार्टूननामा-०१(२/२)

औरंगजेब's picture
औरंगजेब in जनातलं, मनातलं
26 Jun 2017 - 9:36 pm

मागील भागाता आपण शिनचॕनबद्दल जनरल माहिती घेतली. आता आपण शिनचॕन मधील इतर पात्रांचा परिचय घेऊ.

*शिनचानची फॕमिली*

*हिरोशी*- शिनचानचे बाबा टोक्योतल्या एका खासगी कंपनीत काम करतात. हा माणुस एकदम स्त्रीलंपट आहे. ह्याच्या ३२ वर्षे फेडणे असलेल्या लोनचा उल्लेख हा ह्याचा विकपॉईंट. याला गोल्फ खेळायला आवडते.

*मित्सी*- शिनचानची आई. ही एक गृहिणी आहे. हिला शाॕपिंग आणी आरामाची आवड आहे. शाॕपिंसाठी पैसे नसतील तर ही बया पार्ट टाईम जॉब करते आणी त्या पैशातुन शॉपिंग करते.

*आजोबा-आज्जी*- अकिता शहरात राहणारे हिरोशीचे बाबापण त्याच्यासारखेच आहेत. क्युशू शहरात राहणारे मित्सीचे बाबा तसे एकदम सिरायस कॕरॕक्टर आहेत. यांनापण मजा करायला आवाडते पण ते दाखवायचं नसतं शिनचानच्या दादाजींचे हे आजोबा सॉफ्ट टार्गेट आहेत. शिनचानच्या आजींबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही बहुदा हे पात्र फक्त एक डमी म्हणून आहे.

*हिमावारी*- ही शिनचानची धाकटी बहिण. हीला आई सारखीच शॉपिंगची आवड आहे.

*शाळेतील स्टाफ*

*मिस योशिनागा*- शिनचानच्या सनफ्लाॕवर ग्रुपची टिचर. हिचे लग्न मिस्टर ईशिझाकाशी झाले आहे. तसे हिला रविवार मोकळा हवा असतो पण शिनचान आणी त्याचे मित्र नेहमीच तिचा खासगी वेळ अचानक जाऊन वाया घालवतात.

*मिस मात्सुझाका*- रोझ ग्रुपची टिचर. आणी मिस योशिनागाची मुख्य प्रतिस्पर्धी. ही अविवाहीत आहे. हिलाही शिनचानच्या आईसारखच शॉपिंग करायला आवडतं.

*प्रिन्सिपल सर*- शिनचानच्या भाषेत गँगलिडर सर. ह्यांचा लुक खरतर एका गँगलिडर सारखाच आहे. ह्यांना सगळीच मुले खुप आवडतात. ह्यांच व्यक्तिमत्व फणसारखं आहे बाहेरुन काटेरी आतुन गोड!

*शिनचानचे मित्र*

*कझामा*- हा मुलगा अत्यंत ज्ञानी आहे. आहे ५ वर्षाचाच पण अवेळी सज्ञान असं हे पात्र आहे. शिनचानचा हा मुलगा एकदम सॉफ्ट टार्गेट आहे.

*बो चान* - अत्यंत अबोल आसं बोचान चे पात्र. हा ही अत्यंत
चतुरस्त्र आहे. गंमत म्हणजे ह्याचे आई-बाबा अख्या शिनचान
सिरिज मधे कुठेही दाखवलेले नाहीत.

*नॕनीचान* - खतरनाक , रागीट, तरीही मनमिळावू अशी नॕनीचान शिनचानच्या ग्रुपमधील दोनमधील एक मुलगी आहे. हिला घरघर खेळायला खूप आवडतं. शिनचानचे मित्र नेहमीच यापासुन वाचायचा प्रयत्न करतात. पण तो नेहमीच फसतो.

*मसाऊ*- हा अत्यंत घाबरट आहे. नॕनीचानचा मसाऊ हा सॉफ्ट टार्गेट आहे.

*आईचान*- शिनचानच्या ग्रुपमधील दुसरी मुलगी. ही गर्भश्रिमंत घरातून आली आहे. हिचेही आईबाबा सिरिचमध्ये कधीच दाखवलेले नाहीत. पण ही नेहमीच एका बॉडीगार्ड बरोबर असते. मवाली भाषेत सांगायचं तर ही शिनचानवर लाईन मारत असते. पण शिनचान तिला अजीबात भाव देत नाही.

ही सगळीच शिनचानची अगदी जवळची मंडळी आहेत. ही सगळीच शिनचानबद्दल तेवढीच काळजी करताना दाखवली आहेत.

पुढील भागात आपण अजुन कार्टुन्सविषयी माहिती घेऊ.

कथा

प्रतिक्रिया

मितान's picture

26 Jun 2017 - 10:36 pm | मितान

पण कथा कुठं आहे ??

जेनी...'s picture

26 Jun 2017 - 10:50 pm | जेनी...

पण मला हे सगळं ऑल्रेडी माहितिय ... व्हेरे इस थे स्तोर्य ??