...असे आजोबा!

हृषीकेश पतकी's picture
हृषीकेश पतकी in जे न देखे रवी...
24 Jun 2017 - 11:08 am

काल उघडले कपाट तेव्हा
पुन्हा भेटले मला आजोबा |
असण्याहूनही नसण्यामध्ये
नवे वाटले मला आजोबा ||१||

शुभ्र साजि-या वस्त्रांमधूनी
होते लपले असे आजोबा |
इंचघडीतून अलगद ज्यांनी
आम्हा जपले असे आजोबा ||२||

पुस्तकातल्या श्लोकांमधला
सुस्पष्ट असा तो ध्वनी आजोबा |
पत्ररुपाने अक्षर होऊन
अन् भिडणारे मनी आजोबा ||३||

कधी हास्याची झुळूक आणि
कधी गोष्टींची लाट आजोबा |
आकार आम्हाला देताना
शिस्तीचा परिपाठ आजोबा ||४||

कधी दुपारी बहरुन यावा
तो संवादिनीचा सूर आजोबा |
पण सायंकाळी सात वाजता
चिंतेचे काहूर आजोबा ||५||

कपाट केले बंद तरीही
आठवणींचे ठसे आजोबा |
विचार करता काव्य स्फुरावे
होते आमचे असे आजोबा ||६||

जपून ठेवू सदैव ज्या, त्या
अस्तित्त्वाच्या खुणा आजोबा |
एका जन्मी कसे पुरावे,
हवे आम्हाला पुन्हा आजोबा ||७||

भावकविताकविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

24 Jun 2017 - 12:49 pm | चांदणे संदीप

कविता आवडली!

Sandy

पद्मावति's picture

24 Jun 2017 - 1:50 pm | पद्मावति

खुप छान. कविता आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jun 2017 - 6:33 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह व्वा! छानच!

सानझरी's picture

25 Jun 2017 - 2:13 pm | सानझरी

सुंदर कविता.. आवडली!

हृषीकेश पतकी's picture

27 Jun 2017 - 11:03 am | हृषीकेश पतकी

आपल्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!

विचित्रा's picture

27 Jun 2017 - 1:40 pm | विचित्रा

आवडली कविता.

विचित्रा's picture

27 Jun 2017 - 1:43 pm | विचित्रा

आवडली कविता.