आग रामेश्वरी, बंब.....

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
11 Oct 2008 - 9:43 pm

शुक्रवारची रम्य संध्याकाळ! हवेत बेताची थंडी!! पुढे आख्खा वीकांत मोकळा पडलेला.....

कामावरची अखेरची पाटी टाकून मी घरी येतो....
घरच्या वाटेवर ड्रायव्हिंग करत असतांनाही मस्त मराठी गाणी गुणगुणतो, "संथ वाह्ते, कृष्णामाई..." क्या बात है!!

नाहीतर एरवी मला कट करणार्‍या इतर ड्रायव्हर्सवर भकाराने सुरू होणार्‍या सशक्त मराठी शब्दांची बौछार चालू असते. (खरं सांगायला लाज कसली, तिच्यायला!!)

घरी येऊन झकास आंघोळ करून ताजातवाना झालो.....
किचनमधून मस्त वास येतोय, जरा तिथे डोकावलो....

"काय चाललंय?"
"पॅटिस करतेय खिम्याचे!" माझी पहिली बायको सांगते....

तिला तिच्या कार्यात सुयश चिंतून मी माझ्या अभ्यासिकेत आलो. मिनी-फ्रीज उघडला....
"किण्ण, किण्ण!" काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे पडले. त्यावर बेताची शिवास रीगल...
माझ्या त्या दुसर्‍या बायकोचे चुंबन घेत मी कालच लायब्ररीतून आणलेली कादंबरी उघडली.....

असा किती वेळ गेला कोण जाणे...

मी कादंबरीच्या कथानकात पूर्ण बुडालेला!!! दुसर्‍या बायकोच्या चुंबनांचाही दुसरा अध्याय चाललेला!!!

घरात दूर कुठेतरी फोन वाजला....
मी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं. कोण बाजीराव असेल तर ठेवेल मेसेज.....

ही एक जाणिवपूर्वक लावून घेतलेली सवय!
माझ्या मुलगा रांगण्याच्या वयाचा असतानाची!!

इथे तो डायपरमध्ये शीशी करून घरभर रांगतोय! ह्याला आता लगेच स्वच्छ केला नाही तर हा पांढरं कारपेट पिवळ्या रंगाने रंगवणार या काळजीत आम्ही!! धावपळ करून नवीन डायपर व इतर साहित्य गोळा करून मी त्याच्यामागे लागलोय!! त्याला आता डॅडी पकडापकडीचा खेळच खेळतोय असं वाटून तो माझ्या हातात लागायला तयार नाही!!! अशा आणीबाणीच्या प्रसंगी मी गुंतलेला असतांना फोन वाजायचा!! उचलला की पलीकडून कोणतरी मला काहीतरी विकायच्या प्रयत्नात!! असा राग यायचा (पुन्हा ते सशक्त मराठी शब्द!!!). शेवटी निर्णय घेतला की फोन उचलायचाच नाही, लोकांना मेसेज ठेवू देत, आपण नंतर त्यांना उलट कॉल करू!!! माझ्या सगळ्या परिचितांना हे सांगून ठेवलंय!! आता जरी माझ्या भावाने फोन केला तरी "दादा, जरा परत फोन कर" एव्हढंच बोलून तो बिचारा फोन ठेवतो!!

असो!! तर दूरवर फोन वाजला, मी दुर्लक्ष केलं....

काही मिनिटातच बायको (पहिली हो, दुसरी शेजारीच नाहिये का बसलेली!!) खोलीत आली....

तिने गरमागरम पॅटिस आणले असतील म्हणून मी तिच्याकडे आशेनं (आणि सस्मित चेहेर्‍यानं!!) पाहिलं.....
पण कर्म! पॅटिस नव्हते, हातात फोन होता....

माझ्या कपाळावरच्या आठ्या पाहूनच तिने तिच्या या अपराधाबद्दल स्पष्टिकरण दिलं...
"कोणीतरी अनोळखी पण इंडियन माणूस आहे. आवाजावरून वयस्कर वाटतोय, म्हणून कॉल घेतला..."

त्या माणसाच्या वयामुळे त्याला क्षमा करत पण काहिश्या नाराजीनेच मी फोन कानाला लावला....

"हॅलो?"

(क्रमशः)

देशांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

नि३'s picture

11 Oct 2008 - 9:58 pm | नि३

"किण्ण, किण्ण!" काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे पडले. त्यावर बेताची शिवास रीगल...
.........मस्त..
खुपच छान सुरवात.. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत..

---नि३.

घाटावरचे भट's picture

11 Oct 2008 - 10:01 pm | घाटावरचे भट

सुरुवात तर उत्तम आहे...पण पुन्हा एकदा क्रमशः!!! :|

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

आनंदयात्री's picture

11 Oct 2008 - 10:10 pm | आनंदयात्री

डांबिस काकांना अंमळ मोकळा वेळ मिळालेला दिसतोय. येउद्या !

टारझन's picture

11 Oct 2008 - 10:12 pm | टारझन

त्या माणसाच्या वयामुळे त्याला क्षमा करत पण काहिश्या नाराजीनेच मी फोन कानाला लावला....

"हॅलो?"

(क्रमशः)

भ*.* .. च्यामारी या क्रमशःच्या ... आत्ता ष्टोरी ऐवजी गप्पाटपांत असा क्रमशः केला असताना ... काका असो वा काक विमाच काढला आसता ...

फतवा : २४ तासाच्या आत जर याचा फुडला भाग नाय आला ... तर .... क्रमशः

(कन्यारास : काका पहिल्या बायको ला पळवण्यासाठी मोबाईल वरून घरच्या फोनवर स्वतःच तर कॉल नाय ना करत ? का चक्क प्रभुदेवानं कॉल केला ?)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

विनायक प्रभू's picture

12 Oct 2008 - 12:04 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
टार्झटा मी वयस्कर नाही आहे. ट्रीग्नोमेट्री एकदम बरोबर आहे.

सखाराम_गटणे™'s picture

11 Oct 2008 - 10:12 pm | सखाराम_गटणे™

बस, काका
आम्हाला हेच हवे होते.
च्या आयला, वैताग आला होता.

आता जरा पहीली बायको आणि दुसरी बायको समजावुन सांगा,
बघुया काय फायदा झाला तर.

-----
आम्ही शिवजी चा प्रसाद खाउन्/पिउन संगणक आज्ञावली लिहीतो.
:)

प्राजु's picture

11 Oct 2008 - 10:17 pm | प्राजु

झालं.. ! नको तिथं संपवलं...!
असुदे.. बर्‍याच दिवसांनी काकांना वेळ मिळाला आहे. वाट पहावी लागणारच..
काका... क्रमशः जास्ती नकोत. लवकर लिहा आणि भाग मोठे लिहा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

11 Oct 2008 - 10:33 pm | स्वाती दिनेश

झालं.. ! नको तिथं संपवलं...!
प्राजुसारखेच माझ्याही मनात आले.
सुलेशबाबू.. लवकर लिहा पुढचा भाग.
स्वाती

इनोबा म्हणे's picture

11 Oct 2008 - 10:35 pm | इनोबा म्हणे

"किण्ण, किण्ण!" काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे पडले. त्यावर बेताची शिवास रीगल...
माझ्या त्या दुसर्‍या बायकोचे चुंबन घेत मी कालच लायब्ररीतून आणलेली कादंबरी उघडली.....

च्यायला ह्याला म्हणतात आयुष्य! मस्त मद्याचे घोट घेत घेत आवडतं पुस्तक वाचण्याची मजा काही वेगळीच...

काका, आता ते क्रमशः वर क्रमशः नका टाकत बसू.आणि जरा मोठे भाग लिहा ना! एकतर बर्‍याच दिवसांनी वाचायला मिळतंय तुमच्याकडून. :)

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

रेवती's picture

12 Oct 2008 - 2:42 am | रेवती

रंगतदार होताहोता आला तो क्रमशः.
पुढच्या भागाची वाट पहात आहे.

रेवती

शाल्मली's picture

12 Oct 2008 - 2:31 pm | शाल्मली

सुरुवात छान झाली आहे.

रंगतदार होताहोता आला तो क्रमशः.
पुढच्या भागाची वाट पहात आहे.

असेच म्हणते.
--शाल्मली.

छोटा डॉन's picture

12 Oct 2008 - 3:07 am | छोटा डॉन

आमचे परममित्र आंद्यायात्री म्हणतात तसेच म्हणतो, बर्‍याच दिवसांनी वेळ मिळाला दिसतोय काकांना ...
होऊ जाऊ द्या काही तरी फक्कड !

"किण्ण, किण्ण!" काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे पडले. त्यावर बेताची शिवास रीगल...
माझ्या त्या दुसर्‍या बायकोचे चुंबन घेत मी कालच लायब्ररीतून आणलेली कादंबरी उघडली.....

क्या बात है, क्या बात है !
अगदी डोळ्यात भराव असं आयुक्ष आहे, नाहीतर आमची, जाऊ दे बोलुन दाखवुन कशाला चारचौघात हसे करुन घ्यायचे ?
स्वगत : काकांनी हे २ बायकांचे जमवले ? एकदा निवांत वेळी फोन मारुन सल्ला घ्यायला हवा ....
आत्तापासुनच तयारी हवी ना !

बाकी पहिला भाग सुरेख, ज्या ठिकाणी ( आमचे नावडते) क्रमश : लिहलेत ती जागा ही अचुक !
लवकरात लवकर पुढचा भाग येऊ द्यात, आम्ही वाट पाहतो आहे ....
बाकी त्या " एन नंबर ऑफ बायका" बद्दल बोलु सवडीने आपपसात ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मदनबाण's picture

12 Oct 2008 - 3:37 am | मदनबाण

ह्म्म्..दोन दोन बायका !! ??....चालुध्या..वाचतोय आम्ही..
पुढचा भाग लवकर लिहा..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

टुकुल's picture

12 Oct 2008 - 5:09 am | टुकुल

एवढ छान वाचत असताना, आलं क्रमशः....... :W
काका, जरा जास्त येवुद्या ना.

(तुमची दोन नंबर बायको आम्हाला पण खुप आवडते हो. ;) )

टुकुल.

मुक्तसुनीत's picture

12 Oct 2008 - 6:12 am | मुक्तसुनीत

गाण्याच्या भाषेत सांगायचे तर नोमतोम झालीय. अजून रंग भरायचाय. पण गायक आवडीचा आहे. सॅटीस्फ्याक्शन ग्यारंटीड ! त्यामुळे निवांत बैसोन वाट पहातो !

नंदन's picture

12 Oct 2008 - 8:01 am | नंदन

पहिल्या भागात वातावरणनिर्मिती छान झाली आहे. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Oct 2008 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिल्या भागात वातावरणनिर्मिती छान झाली आहे. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत

पुर्वजन्मी आपण कोणता गुन्हा केला असेल बॉ या क्रमशः वाल्यांचा, त्यामुळेच त्याचे फळ आता भागावे लागत आहे. :)

-दिलीप बिरुटे

घाटावरचे भट's picture

12 Oct 2008 - 1:20 pm | घाटावरचे भट

नोमतोम झाली?? अहो आत्ता कुठे षड्ज भरायला आणि मंद्रात खेळायला सुरुवात केलिये.....अजून बरंच काही बाकी असावं असं दिसतंय...

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

झकासराव's picture

12 Oct 2008 - 7:19 am | झकासराव

त्याला आता डॅडी पकडापकडीचा खेळच खेळतोय असं वाटून तो माझ्या हातात लागायला तयार नाही>>>>
:)

दोन दोन बायका.........
किण किण
मस्त सुरु आहे. भाग जरा मोठे टाका हो काकाश्री.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर's picture

12 Oct 2008 - 9:57 am | विसोबा खेचर

डांबिसा,

वाचतो आहे.. :)

येऊ द्या अजून, वाट पाहतो...

तात्या.

ऋषिकेश's picture

12 Oct 2008 - 10:08 am | ऋषिकेश

चला! मस्त पात्रसज्जता झाली आहे.. ष्टोरी पुढं चालू होऊ द्यात :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

यशोधरा's picture

12 Oct 2008 - 11:02 am | यशोधरा

>>(क्रमशः)>>

भ्यां.... :''( ~X( :''(

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Oct 2008 - 12:04 pm | बिपिन कार्यकर्ते

बर्‍याच दिवसांनी डांबिस गुर्जीनी एन्ट्री मारली आहे. झकास. वाट बघतच आहोत. आणि मला (सध्यातरी) क्रमशः बद्दल ओरडायचा काहिही नैतिक अधिकार नाहिये ;) पण लवकर लवकर येऊ दे हो पुढचे भाग...

बिपिन.

अनिल हटेला's picture

12 Oct 2008 - 12:34 pm | अनिल हटेला

सुरुवात खिळवून ठेवतेय !!

लवकर लवकर येऊ दे हो पुढचे भाग...

प्रतीक्षेत .............
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अवलिया's picture

12 Oct 2008 - 1:09 pm | अवलिया

आता दुस-या बायकोचे चुंबनच घेत बसु नका व लवकरात लवकर पुढील भाग येवु द्या.

(अवांतर - तुमची दुसरी बायको ती आमची पहिली व एकमेव बायको बरका! फारच प्रेमळ कधीच भांडत नाही)

नाना

शितल's picture

12 Oct 2008 - 6:20 pm | शितल

काका,
सुरूवात मस्त झाली आहे,
फोन वर काय संभाषण झाले असेल ह्या विचारात आहे ~X(
तुम्हाला पुढचा भाग लिहायला लवकर वेळ मिळो .:)

धमाल मुलगा's picture

13 Oct 2008 - 11:13 am | धमाल मुलगा

..आणि डांबिसकाका परतुनि आले! :)

"पॅटिस करतेय खिम्याचे!" माझी पहिली बायको सांगते....

खिमा पॅटीस???? =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~
काका, तुमच्या पोटात दुखणार आता!

"किण्ण, किण्ण!" काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे पडले. त्यावर बेताची शिवास रीगल...

आ हा हा.... क्या बात है|
आयला, सोत्ताच्या घरात बसुन, दुसर्‍या बायकोशी असा मस्त लडिवाळपणा करताना, पहिली बायको सोत्ताच्या हातानं चखणा बनवून देते????? आणि तेही खिमा पॅटीस????
नशीब...नशीब लागतं बरं ह्याला! पुर्वजन्मीची मोठी पुण्याई पाठीशी दिसत्ये!

कोण बाजीराव असेल तर ठेवेल मेसेज.....

हे लै लै भारी!

त्याला आता डॅडी पकडापकडीचा खेळच खेळतोय असं वाटून तो माझ्या हातात लागायला तयार नाही!!!

हम्म...म्हणजे छोटा डांबिस म्हणायचं की हो ह्याला ;)

स्वगत : काकांनी हे २ बायकांचे जमवले ? एकदा निवांत वेळी फोन मारुन सल्ला घ्यायला हवा ....

डान्या...स ह म त्त आहे रे!!!!

अवांतरः आता फार तर फार चार सहा महिने शिल्लक आहेत तोवर भडकमकर मास्तरांना काय करायचे फोन करुन घ्यावेत, नंतर तेही फोन घ्यायचे नाहीत बहुतेक ;)

धनंजय's picture

13 Oct 2008 - 10:06 pm | धनंजय

हम्म...म्हणजे छोटा डांबिस म्हणायचं की हो ह्याला

नाही "छोटा पिवळा डांबीस" (डायपर बदलेपर्यंत तरी)

धमाल मुलगा's picture

14 Oct 2008 - 11:30 am | धमाल मुलगा

=))

हे लय भारी!

दिपक's picture

10 Feb 2012 - 1:26 pm | दिपक

पिंडाकाका ऍट हीज बेस्ट. :-)
दुसरा भाग इथे.