राधा

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
23 Mar 2017 - 4:08 pm

कृष्ण जाणून घेण्यासाठी,
तुला राधा व्हावं लागेल,
रुक्मिणीच्या महाली त्याच,
येणं जाणं पाहावं लागेल..

पण एकदा तू हे जाणलस कि,
सदैव सचैल भिजत राहशील
या महालांच्या कोलाहलात
पावा होऊन वाजत राहशील..

-शैलेंद्र

भावकविताकविता

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

23 Mar 2017 - 4:55 pm | पद्मावति

सुरेख! खुप आवडली कविता.

माहितगार's picture

23 Mar 2017 - 5:07 pm | माहितगार

पहिल कडव वाचताना सोप वाटते हे खरे, पण अद्याप नीट समजले असेही वाटत नाही, कुणी अर्थ सांगू शकेल ?

कृष्ण जाणून घेण्यासाठी,
तुला राधा व्हावं लागेल,
रुक्मिणीच्या महाली त्याच,
येणं जाणं पाहावं लागेल..

माहितगार's picture

23 Mar 2017 - 5:09 pm | माहितगार

रुक्मिणीच्या महाली त्याच,
येणं जाणं पाहावं लागेल..

म्हणजे नेमके काय ?

शैलेन्द्र's picture

24 Mar 2017 - 10:16 am | शैलेन्द्र

इथे कृष्ण हे तुमच्या इच्छा आकांक्षाचे, आयुष्यातील आनंदाचे प्रतीक आहे, बऱ्याचदा आपल्याला होणारी दुःख, मला एखादी गोष्ट मिळाली नाही या कारणापेक्षा, इतरांना ती मिळतेय पण मला नाही या कारणाने अधिक असतात, सुखाची आसक्ती असणं हा एक भाग पण इतरांच्या सुखाबद्दल असूया असणं हा दुसरा,
मला वाटतं, हे लक्षात घेतल्यास आता तुम्हांला हि कविता सहज समजेल.

माहितगार's picture

24 Mar 2017 - 12:06 pm | माहितगार

कल्पना सुरेखचं आहे, कृष्ण या कल्पनेस वेगळ्या प्रतिकात पहाण्याचा दृष्टीकोण वेगळा आणि मस्तच.

:रुक्मिणीच्या महाली कृष्णाची उपस्थिती हि असुयेचे कारण असेल तर कृष्णाच्या रुक्मिणीच्या महाली येण्या जाण्याची तुलना मनास शिवू नये हे पहावे लागेल असे नको का ? पण मग तुमच्या कडव्याची शेवटची ओळतर म्हणते, 'येणं जाणं पाहावं लागेल..' मी अर्थ लावण्यात कुठे चुकतो आहे का ?

रुक्मिणीच्या महाली त्याच,
येणं जाणं पाहावं लागेल..

माहितगार's picture

24 Mar 2017 - 12:08 pm | माहितगार

येणं जाणं पाहावं लागेल.

मध्ये सहन कराव लागेल असे म्हणावयाचे आहे ? म्हणजे असुया असेल तर असू देत पण राधा हो म्हणजे झाले असे काहीसे ?

शैलेन्द्र's picture

24 Mar 2017 - 1:50 pm | शैलेन्द्र

Sorry, have to write in english due to technical problem

" येणं जाणं पाहावं लागेल." means you will have to see others enjoying, and you still aspiring for it.. You have to remain wanting for that pleasure, and mould yourself so that you are still happy.. read next para for further understanding.

माहितगार's picture

24 Mar 2017 - 3:29 pm | माहितगार

हम्म,

still aspiring for it.. You have to remain wanting for that pleasure, and mould yourself so that you are still happy.. read next para for further understanding.

ह्यात वेगळीच अर्थछटा प्रतीत होते. राधेला स्पर्धक बनवून यशाच्या अजूनही संधी असल्याचे सुचवू इच्छिते असे दिसते.

..उत्तरांची घाई नाही. भाषाबदलाने कदाचित अभिप्रेत अर्थछटेत फरक पडू शकेल.

प्राची अश्विनी's picture

24 Mar 2017 - 7:31 am | प्राची अश्विनी

आवडली.

पैसा's picture

24 Mar 2017 - 11:25 am | पैसा

सुरेख कविता!

जव्हेरगंज's picture

24 Mar 2017 - 12:30 pm | जव्हेरगंज

नाइस वन!!!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Mar 2017 - 6:09 am | अत्रुप्त आत्मा

प्लस वन!!!

'त्याचं' म्हणायचे आहे का?

रुक्मिणीच्या महाली नंतरचा ना ? तुम्ही म्हणता तसे, बहुधा 'त्याचं' हे उच्चारण अभिप्रेत असावे असा माझा अंदाज, म्हणजे मी तरी तसे वाचले.

शैलेन्द्र's picture

25 Mar 2017 - 8:15 pm | शैलेन्द्र

yes "HIS"

Dr prajakta joshi's picture

25 Mar 2017 - 9:02 pm | Dr prajakta joshi

छान कविता