शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पैलतीर

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
3 Feb 2017 - 10:48 pm

aa

“या वयात असली थेरं?" सुनेचे जळजळीत शब्द आठवून आजोबांना कससंच झालं. बायकोच्या माघारी इकडंतिकडं न बघता मुलाला एकट्यानं समर्थपणं वाढवलं या कौतुकावर, अभिमानावर एका क्षणात पाणी पडलं असं वाटून राहिलं.

मुलानं त्यांना पंचाहत्तरीला कौतुकानं स्मार्टफोन दिला होता. नातवानं कसा वापरायचा शिकवला आणि त्यांच्यासाठी नवीन विश्वाचं दार उघडलं. गेली चाळीस वर्षं मन मारून जगणार्या आजोबांना आता हक्काचं मनोरंजन मिळालं.

कधी नव्हे तो आज त्यांनी नातवाला गेम खेळायला आपला मोबाईल दिला आणि ...

घरच्यांच्या नजरेला नजर देणं आता आपल्याला जमणार नाही हा विचार काही मनातून जाईना. लाजिरवाणं जगणं पटेना. त्यांना घरी परत जावसंच वाटेना.

त्या दिवशी किनार्यावर आजोबांच्या परतीची पावलं ऊमटलीच नाहीत.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

4 Feb 2017 - 7:09 am | अत्रुप्त आत्मा

नै जम्या!

जव्हेरगंज's picture

4 Feb 2017 - 10:17 am | जव्हेरगंज

+१

अॅस्ट्रोनाट विनय's picture

4 Feb 2017 - 11:03 am | अॅस्ट्रोनाट विनय

जम्या रे जम्या. मस्तच

नमकिन's picture

6 Feb 2017 - 9:45 am | नमकिन

हल्ली कायप्पा समूहातून काहीही येत रहाते, ते काढून टाकायचे म्हणजे १ मोठेच काम. बिचारे आजोबा.

चिगो's picture

18 Feb 2017 - 4:12 pm | चिगो

मला आवडली.. +१..

तिमा's picture

19 Feb 2017 - 11:30 am | तिमा

+१, अगदी सजेस्टिव्ह तरीही बरंच काही सांगून जाणारी.

अजया's picture

22 Feb 2017 - 5:35 pm | अजया

+१