मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पैलतीर

प्राची अश्विनी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
aa “या वयात असली थेरं?" सुनेचे जळजळीत शब्द आठवून आजोबांना कससंच झालं. बायकोच्या माघारी इकडंतिकडं न बघता मुलाला एकट्यानं समर्थपणं वाढवलं या कौतुकावर, अभिमानावर एका क्षणात पाणी पडलं असं वाटून राहिलं. मुलानं त्यांना पंचाहत्तरीला कौतुकानं स्मार्टफोन दिला होता. नातवानं कसा वापरायचा शिकवला आणि त्यांच्यासाठी नवीन विश्वाचं दार उघडलं. गेली चाळीस वर्षं मन मारून जगणार्या आजोबांना आता हक्काचं मनोरंजन मिळालं. कधी नव्हे तो आज त्यांनी नातवाला गेम खेळायला आपला मोबाईल दिला आणि ... घरच्यांच्या नजरेला नजर देणं आता आपल्याला जमणार नाही हा विचार काही मनातून जाईना. लाजिरवाणं जगणं पटेना. त्यांना घरी परत जावसंच वाटेना. त्या दिवशी किनार्यावर आजोबांच्या परतीची पावलं ऊमटलीच नाहीत.

वाचने 2398 वाचनखूण प्रतिक्रिया 7

नमकिन 06/02/2017 - 09:45
हल्ली कायप्पा समूहातून काहीही येत रहाते, ते काढून टाकायचे म्हणजे १ मोठेच काम. बिचारे आजोबा.

तिमा 19/02/2017 - 11:30
+१, अगदी सजेस्टिव्ह तरीही बरंच काही सांगून जाणारी.