शतशब्दकथा स्पर्धा२०१७: हत्त्या

Primary tabs

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जनातलं, मनातलं
3 Feb 2017 - 10:45 pm

aaaaaaa

"काय रे, आज चहा बदललास चक्क?" हॉटेलात आल्या आल्या पत्रकार अनिशने हसत आपल्या इन्स्पेक्टर मित्राला विचारले.

"हम्म..." किंचित उदास स्वरात उत्तर आले

"ऑल ओके?"

"हो" तोच स्वर

"ठीके, अरे परवाच्या त्या नवविवाहितेच्या हत्येच्या केसच काय झालं, काही प्रोग्रेस?" विषयाला हात घालत अनिश बोलला.

"कबुली जबाब दिलाय तिच्या नवऱ्याने आजच" खिन्न नजरेने त्याच्याकडे पाहत इन्स्पेक्टर देसाई बोलले.

"वाटलंच होत मला! लग्नानंतर महिन्याभरात हत्या म्हणजे... विवाहबाह्य संबंध की हुंडाबळी?" सहजपणे अनिश बोलून गेला

"कोवळी पोर होती रे... एकोणीस वर्षांची फक्त... पण चूक तिचीच होती..."

"म्हणजे??" काहीच न उमगलेला अनिश.

हातातल्या ब्लॅक टीचा एक कडवट घोट घशाखाली घेऊन देसाई बोलले," ती काळी होती..."

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

3 Feb 2017 - 11:19 pm | मराठी कथालेखक

छान

अत्रुप्त आत्मा's picture

4 Feb 2017 - 7:09 am | अत्रुप्त आत्मा

ठीक.

जव्हेरगंज's picture

4 Feb 2017 - 10:23 am | जव्हेरगंज

दम आहे!!
कलाटणी उत्तम!

पण काहीतरी मिसिंग आहे!!

अॅस्ट्रोनाट विनय's picture

4 Feb 2017 - 11:00 am | अॅस्ट्रोनाट विनय

भारतात मुलगी काळी आहे म्हणून सासरच्यांनी खून केला हे ऐकलं नाही अजून. मुलाची पसंती नव्हती तर त्याने आधीच काळ्या मुलीशी लग्न का केलं?

चिगो's picture

18 Feb 2017 - 4:09 pm | चिगो

'काळी आहे म्हणून पोरगी नाकारली' हे ऐकत आलोय, पण लग्न झाल्यावर काळेपणामुळे खून? थोडा पट्या नहीं..

ह्या जर कारणाने खून होत असतील तर मी माझ्या बायकोचा एकदा खून केला असता आणि तिने माझा दोनदा ...ह.घ्या

शब्दबम्बाळ's picture

27 Mar 2017 - 8:51 am | शब्दबम्बाळ

आता निकाल लागला आहे त्यामुळे स्पष्टीकरण देऊ शकतो! :)
तर, बऱ्याच लोकांनी कथेचा शब्दशः अर्थ घेतला आहे असे वाटतंय, अर्थात मग मीच कमी पडलो म्हणावं लागेल!

काही लोकांनी हि एका मध्यमवर्गीय मुलीची गोष्ट आहे असे मानले बहुतेक! जिथे मुलगी नाकारणे, मुलामुलींना पसंती विचारणे हे प्रकार व्यवस्थित होतात. पण समाजाच्या अशा वर्गामध्ये जिथे तुम्हाला निवडीला फार वावच नाही तिथे काय? लोकांच्या अपेक्षा काही संपत नाहीत...पण त्या पूर्ण होण्याची शक्यता पण वाटत नाही मग त्यातून निर्माण होणार राग, चीड कुठे जाणार?

आणि रंगरूप हे कोणाला मारण्याचे मुख्य कारण असू शकत नाही हे बरोबरही असू शकते, पण या सगळ्याची सुरुवात तिथून होते! मध्यंतरी कुठल्यातरी पाठ्यपुस्तकात "मुलगी कुरूप असेल तर हुंडा जास्त द्यावा लागतो" असे काहीसे विधान दिले गेले होते. त्यावर बराच गदारोळ माजला. पाठयपुस्तकात असे काही लिहिणे गैर आहेच पण म्हणून तो मुद्दा खरंच खोडून काढता येतो का? आपल्याकडे असे काही होतच नाही हे आपण सहजपणे म्हणतो पण खरंच ते सत्य आहे का? भारतात "रंग" हा अजूनही 'सौन्दर्याचा' प्राथमिक निकष बनून राहिला आहे कि नाही?
बऱ्याच गोष्टी आहेत काही पहिल्या देखील आहेत पण जास्त पण स्पष्टीकरण नको!
काही घटना भारतातच झालेल्या:
१. Man tries to kill wife over dark complexion
२. Tortured for being dark, woman ‘killed’ over dowry
३. telegraph article