शतशब्दकथा स्पर्धा२०१७: हत्त्या
"काय रे, आज चहा बदललास चक्क?" हॉटेलात आल्या आल्या पत्रकार अनिशने हसत आपल्या इन्स्पेक्टर मित्राला विचारले.
"हम्म..." किंचित उदास स्वरात उत्तर आले
"ऑल ओके?"
"हो" तोच स्वर
"ठीके, अरे परवाच्या त्या नवविवाहितेच्या हत्येच्या केसच काय झालं, काही प्रोग्रेस?" विषयाला हात घालत अनिश बोलला.
"कबुली जबाब दिलाय तिच्या नवऱ्याने आजच" खिन्न नजरेने त्याच्याकडे पाहत इन्स्पेक्टर देसाई बोलले.
"वाटलंच होत मला! लग्नानंतर महिन्याभरात हत्या म्हणजे... विवाहबाह्य संबंध की हुंडाबळी?" सहजपणे अनिश बोलून गेला
"कोवळी पोर होती रे... एकोणीस वर्षांची फक्त... पण चूक तिचीच होती..."
"म्हणजे??" काहीच न उमगलेला अनिश.
हातातल्या ब्लॅक टीचा एक कडवट घोट घशाखाली घेऊन देसाई बोलले," ती काळी होती..."
वाचने
3677
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
प्रतिक्रिया
छान
ठीक.
दम आहे!!
भारतात मुलगी काळी आहे म्हणून
In reply to भारतात मुलगी काळी आहे म्हणून by अॅस्ट्रोनाट विनय
सहमत..
ह्या जर कारणाने खून होत असतील
ह्या जर कारणाने खून होत असतील
ह्या जर कारणाने खून होत असतील
ह्या जर कारणाने खून होत असतील
आता निकाल लागला आहे त्यामुळे