शतशब्दकथा स्पर्धा २०१७: प्रवास

राघवेंद्र's picture
राघवेंद्र in जनातलं, मनातलं
1 Feb 2017 - 7:14 pm

aa

बाबा म्हणायचे, उत्तरेकडे हिम असतो. त्यांच्या तरुण वयात तिकडे काम करत.
सध्या इथे ना हाताला काम, प्यायला साधे पाणीपण नाही.
रोज जिवंत परत येऊ की नाही याची शाश्वती नाही. एक दिवस घरी न सांगता निघालो, मिळेल ते वाहन पकडून आणि पोहचलो समुद्रकिनारी.
इथून एका मोठया जमावामध्ये सामील झालो. आणि सुरु झाला जीवघेणा प्रवास.
एक जुनाट जहाजवर, ना खायला पदार्थ, ना प्यायला पाणी. मुले रडत आहेत, लोक भांडत आहे , जहाज हेलकावत आहे.
परतीचे रस्ते बंद झालेत….
कधी एकदा समुद्रकिनारी दिसेल असे झाले आहे........
आणि तब्बल काही आठवडयांनी किनारा दिसला. सर्वानी एकच जल्लोष करुन समुद्रकिनारी पाऊल ठेवले….

…………एकदाचा युरोपमध्ये पोहचलो सीरियातून

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

लोथार मथायस's picture

2 Feb 2017 - 4:46 am | लोथार मथायस

छान अगदी वेगळी कल्पना

तुषार काळभोर's picture

2 Feb 2017 - 11:04 am | तुषार काळभोर

याचा 'युरोपियन' दृष्टिकोनातून उत्तरार्ध टाका रे कोणीतरी!

मराठी कथालेखक's picture

2 Feb 2017 - 11:50 am | मराठी कथालेखक

छान

सूड's picture

2 Feb 2017 - 12:34 pm | सूड

बर्‍यापैकी जमलंय.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

4 Feb 2017 - 10:43 am | अॅस्ट्रोनाट विनय

चांगलं आहे, वेगळं आहे. लिहत रहा

राघवेंद्र's picture

31 May 2017 - 10:05 pm | राघवेंद्र

माझी शशक माझ्या नावाने दिसत आहे. :) :D :)

राघवेंद्र's picture

31 May 2017 - 10:07 pm | राघवेंद्र

पैलवान, मराठी कथालेखक, सूड, अॅस्ट्रोनाट विनय यांचे आभार. पहिलीच शशक लिहिली होती.

एस's picture

31 May 2017 - 10:58 pm | एस

मस्त.

चौथा कोनाडा's picture

2 Jun 2017 - 10:50 pm | चौथा कोनाडा

सुंदर शशक ! आवडली.

स्पर्धे कालावधी दरम्यान प्रतिसाद द्यायचा राहिला होता.