Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: प्रवास

लेखक राघवेंद्र यांनी बुधवार, 01/02/2017 या दिवशी प्रकाशित केले.
aa बाबा म्हणायचे, उत्तरेकडे हिम असतो. त्यांच्या तरुण वयात तिकडे काम करत. सध्या इथे ना हाताला काम, प्यायला साधे पाणीपण नाही. रोज जिवंत परत येऊ की नाही याची शाश्वती नाही. एक दिवस घरी न सांगता निघालो, मिळेल ते वाहन पकडून आणि पोहचलो समुद्रकिनारी. इथून एका मोठया जमावामध्ये सामील झालो. आणि सुरु झाला जीवघेणा प्रवास. एक जुनाट जहाजवर, ना खायला पदार्थ, ना प्यायला पाणी. मुले रडत आहेत, लोक भांडत आहे , जहाज हेलकावत आहे. परतीचे रस्ते बंद झालेत…. कधी एकदा समुद्रकिनारी दिसेल असे झाले आहे........ आणि तब्बल काही आठवडयांनी किनारा दिसला. सर्वानी एकच जल्लोष करुन समुद्रकिनारी पाऊल ठेवले…. …………एकदाचा युरोपमध्ये पोहचलो सीरियातून
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2587
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

छान अगदी वेगळी कल्पना

याचा 'युरोपियन' दृष्टिकोनातून उत्तरार्ध टाका रे कोणीतरी!

छान

चांगलं आहे, वेगळं आहे. लिहत रहा

सुंदर शशक ! आवडली. स्पर्धे कालावधी दरम्यान प्रतिसाद द्यायचा राहिला होता.