महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

Primary tabs

मृदुला's picture
मृदुला in काथ्याकूट
3 Oct 2008 - 4:17 am
गाभा: 

वनपर्वाच्या ३०७व्या अध्यायात सूर्य म्हणतो, "हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा धरू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. स्त्रिया व पुरूष यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत. यास्तव तू माझ्याशी समागम कर. ..."

- इतिहासाचार्य वि. का. राजवाडे. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

हे पुस्तक आज जालावर सापडले. त्या आधी नुक्तीच इथली आयपील चर्चा वाचली होती. चर्चेत काय काय नि कुठे कुठे लिहायचे, म्हणून या स्वतंत्र धाग्यात पुस्तकाची माहिती देते आहे. केवळ चाळीसेक पाने आहेत. जरूर वाचावे.

सध्याची भारतीय संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपासून प्रगती, अधोगती की चक्र फिरून पुन्हा त्याच जागी? तुम्हाला काय वाटते.
प्रगत संस्कृतीत काय घडत असावे/ घडायला हवे?

प्रतिक्रिया

एकलव्य's picture

3 Oct 2008 - 5:24 am | एकलव्य

ढळढळीत दाखला दिल्याबद्दल मृदुलाचे आभार!

(संस्कृतीरक्षक) एकलव्य

प्रियाली's picture

3 Oct 2008 - 5:35 am | प्रियाली

हे विनोदाने म्हणत आहे/नाही. :) सूर्याने कुंतीला बरोब्बर हेरले. पोरगी षोडशा आहे तिला भुरळ घातली तर बधेल बापडी! अशा हेतूतून सूर्याचे वक्तव्य असू शकते.

परंतु, भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासातील काही पर्णे पचवली आहेत आणि ती पचवायची ताकद ज्यांना नाही ते या पुस्तकांच्या वाट्यालाही जात नाहीत. पुस्तकाचा जालावरील दुवा देण्याबद्दल धन्यवाद.

असो. चर्चेबरोबरच हे पुस्तक सद्य संस्कृतीच्या चौकटीतील नसून सद्य-समजूतींनुसार अतिअश्लील मानले जाण्याची शक्यता आहे असा डिस्क्लेमर घालायला हवा होता काय? :)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Oct 2008 - 5:53 am | बिपिन कार्यकर्ते

प्रियाली, या पुस्तकाबद्दल ऐकले होते आणि ते पुस्तक मुद्दाम शोधायला तूच (उपक्रमावरील चर्चेतून) उद्युक्त केले होते. तेव्हा मला वाटते बहुतेक घाटपांडे काकांनी काही पाने स्कॅन करून टाकली होती. विस्फोटक होती. आता तर पूर्ण पुस्तक वाचायला मिळेल. फायरब्रिगेडचा बंबच बोलवावा लागतो आता इथे... ;)

पचनशक्ती जबराच पाहिजे मात्र...

बिपिन.

ऋषिकेश's picture

3 Oct 2008 - 9:30 am | ऋषिकेश

अच्छा! हेच का ते "यज्ञ आणि घोड्यांबद्दलचे" पुस्तक??!! ;)

फायरब्रिगेडचा बंबच बोलवावा लागतो आता इथे

सहमत :)

-ऋषिकेश
"अश्लिल पत्र.. अश्लिल पत्र.. मग मला ते वाचलेच पाहिजे": प्रो. बारटक्के, तरूण तुर्क म्हातारे अर्क :)

प्रकाश घाटपांडे's picture

4 Oct 2008 - 12:53 pm | प्रकाश घाटपांडे

यज्ञ व घोडे येथे चर्चा झाली होती
प्रकाश घाटपांडे

मदनबाण's picture

3 Oct 2008 - 6:44 am | मदनबाण

च्या मारी हे तर लय झंगाट हाय !!

(सुर्य जर महाडांबीस होता,तर इंद्र महावस्ताद होता !!!)
मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

पिवळा डांबिस's picture

4 Oct 2008 - 10:22 pm | पिवळा डांबिस

:S सूर्य महाडांबीस होता.
प्रेषक प्रियाली ( शुक्र, 10/03/2008 - 05:35) .
हे विनोदाने म्हणत आहे/नाही. सूर्याने कुंतीला बरोब्बर हेरले.

वरील अभिप्रायात "महा" ही अक्षरे लिहिल्याबद्दल प्रियालीचे लई आभार!!!
(नायतर इथे मिपावर लोकांना भलताच संशय यायचा!!!) :S

धम्मकलाडू's picture

3 Oct 2008 - 6:23 am | धम्मकलाडू

सध्याची भारतीय ही प्राचीन संस्कृतीपासून प्रगती, अधोगती की चक्र फिरून पुन्हा त्याच जागी? तुम्हाला काय वाटते.
सध्याची भारतीय ही संस्कृतीपासून प्रगती??? म्हणजे काय बरे नक्की?

प्रगत संस्कृतीत काय घडत असावे/ घडायला हवे?
प्रगत संस्कृतीची व्याख्या काय तुमची ते कळेल काय? ढोबळमानाने गेल्या १०० वर्षांत स्त्रियांची स्थिती जेवढी सुधारली आहे, तेवढी बहुधा कुठल्याच काळात नव्हती. मतदानाचा अधिकार, शिक्षणाची संधी, पुरुषप्रधान क्षेत्रांत रोजगाराची संधी मिळाली. बहुधा कुठल्याच काळाशी तुलना होऊ शकणार नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मृदुला's picture

4 Oct 2008 - 2:28 am | मृदुला

प्रगत संस्कृतीची व्याख्या काय तुमची ते कळेल काय?

माझी व्याख्येत शास्त्र, कला अश्या केवळ आनंदाच्या गोष्टींना संधी, सर्वांना समानधिकार, निकोप स्पर्धा अश्या अनेक गोष्टी आहेत.

प्रश्न विचारायचा उद्देश हाच की आपापल्या व्याख्येनुसार प्रगतीचे मूल्यमापन करावे.

ढोबळमानाने गेल्या १०० वर्षांत स्त्रियांची स्थिती जेवढी सुधारली आहे

अतिप्राचीन काळी जेव्हा स्त्री, पुरूष, मुले एव्हढेच वर्गीकरण होते तेव्हा स्त्रियांची स्थिती उत्तम असली पाहिजे. म्हणजे गेल्या १०० वर्षांच्या आधी स्त्रियांची स्थिती एव्हढी खालावली होती की १०० वर्षातली प्रगती लगेच नजरेत भरते आहे.

सध्याची भारतीय ही संस्कृतीपासून प्रगती???

भारतीय नंतरचा संस्कृती शब्द विसरला. आता सुधारले आहे. :-) धन्यवाद.

मुक्तसुनीत's picture

3 Oct 2008 - 6:49 am | मुक्तसुनीत

>>> सध्याची भारतीय ही प्राचीन संस्कृतीपासून प्रगती, अधोगती की चक्र फिरून पुन्हा त्याच जागी? तुम्हाला काय वाटते.
राजवाड्यांचे पुस्तक वाचले.

पुस्तकाचा गोषवारा सांगायचा तर , वेगवेगळ्या संस्कृतींमधे , हजारो वर्षांपूर्वी लैंगिक संबंधांच्या बाबतीत आई-बहिणीपासून कुठल्याही नात्यापर्यंत कसलीही बंधने नव्हती हे अनेक प्रमाणे देऊन दर्शविले आहे. पुराणे, कहाण्या, महाकाव्ये यांतून आलेले ऋषिमुनींपासून देवदेवतांचे दाखले इथे येतात.

या सार्‍याचा संबंध प्रगती/अधोगतीशी कसा लावता येईल ? अशी अमुक अमुक मूल्ये अस्तित्त्वात होती (किंवा नव्हती) आणि आता ती अस्तित्त्वात आहेत एव्हढे जरूर म्हणता येईल. भौतिक प्रगतीचा संबंध ज्ञानाशी , तंत्रज्ञानाशी , मानवी अधिकारासारख्या गोष्टींशी जसा लावता येईल तसा उपरोल्लेखित बाबीशी कसा जोडता येईल ?

मृदुला's picture

4 Oct 2008 - 2:21 am | मृदुला

या सार्‍याचा संबंध प्रगती/अधोगतीशी कसा लावता येईल ? अशी अमुक अमुक मूल्ये अस्तित्त्वात होती (किंवा नव्हती) आणि आता ती अस्तित्त्वात आहेत एव्हढे जरूर म्हणता येईल.

मान्य.
पुष्कळदा वादात प्राचीन भारतीय संस्कृती किती प्रगत होती किंवा सध्याची संस्कृती किती प्रगत आहे असा मुद्दा असतो. त्यावरून मी प्रश्न लिहिला आहे. काळाप्रमाणे संस्कृतीत बदल होतो आहे, प्रगती/ अधोगती दृष्टिकोनासापेक्ष असे माझे(ही) मत आहे.

नीधप's picture

3 Oct 2008 - 7:51 am | नीधप

एका निखालस प्रामाणिक पुस्तकाचा दुवा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार. ५-६ वर्षांपूर्वी पारायणे केली होती या पुस्तकाची.
संस्कृतीच्या नावाने गळे काढणार्‍यांना थोडा तरी डोळसपणा यायला हरकत नाही हे वाचून.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विसोबा खेचर's picture

3 Oct 2008 - 8:16 am | विसोबा खेचर

"हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा धरू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. स्त्रिया व पुरूष यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत. यास्तव तू माझ्याशी समागम कर. ..."

आयला!, हे बरं आहे सूर्याचं! :)

आपला,
(चालू!) तात्या.

आणि समागमानंतर जे पोर जन्माला येईल त्याच्या कपाळावर "हरामी" असा शिक्का मारून,टोपलीत भरून त्याला काय पाण्यात सोडून द्यायचं काय रे गधड्या?" असं वास्तविक कुंतीने सूर्याला विचारायला हवं होतं! :)

आपला,
(सूर्याची नाजायज औलाद असलेल्या कर्णाचा प्रेमी!) तात्या.

विसोबा खेचर's picture

3 Oct 2008 - 8:20 am | विसोबा खेचर

कर्ण कधी सूर्याला भेटला की नाही हे माहीत नाही परंतु जर भेटला असता तर,

"हां! कुंती मेरी मा है और आप मेरे नाजायज बाप हो..!"

असं त्रिशूल शिणेमात अमिताभ जसं हरीभाईला म्हणतो तसं कर्णानेही म्हटलं असतं! :)

आपला,
(हिंदी सिनेमा प्रेमी) तात्या.

भडकमकर मास्तर's picture

15 Oct 2008 - 12:44 am | भडकमकर मास्तर

आणि समागमानंतर जे पोर जन्माला येईल त्याच्या कपाळावर "हरामी" असा शिक्का मारून,टोपलीत भरून त्याला काय पाण्यात सोडून द्यायचं काय रे गधड्या?" असं वास्तविक कुंतीने सूर्याला विचारायला हवं होतं!
अहाहा...
अगदी अगदी.... :)

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्त्रिया व पुरूष यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून...

हे बोलणे "कुंतीनेच" ठरवायचे किती सिरीयसली घ्यायचे. लैंगीक आजार, नात्यातील गुंतागुंत, दुष्परिणाम, उदभवणार्‍या परिस्थीतीला * कसे सामोरे जायचे ह्याचा सर्व विचार केला असला पाहीजे व आपली जबाबदारी दोघांना कळायला हवी. तसेच आजच्या संदर्भात तरी कायद्याने सज्ञान असणे जरुरीचे.

कुठे प्रगती म्हणावी तर कुठे अधोगती. कुठे "आहे तसे" चित्र, वाटु शकते. व्यक्ती-परिस्थीतिसापेक्ष.

आजवरच्या अनुभवातुन, आकलनातुन, विज्ञानातुन जे काही समजले आहे. त्याला अनुसुरुन आपापल्या बुद्धीनुसार लोक निर्णय घेतात व घेत रहातील. इतर लोक त्याच न्यायाने काय बरोबर काय वाईट खल करत रहातील.

कुठल्याही नात्यात अन्याय, अत्याचार नसावा. बाकी सगळे सापेक्ष.

* -
"इन्सेस्ट" मधे वैद्यकिय कॉम्पिकेशन्स, तसेच सामाजीक परिणाम काय होतील याचा संबधीतांनी विचार केला पाहीजे.
"घरुन विरोध" विवाहात प्रेमीयुगलांनी ह्याचा विचार केला पाहीजे की आपल्या घरचे काय पातळीचे लोक आहेत. म्हणजे कित्येक वेळा वर्तमानपत्रात वाचायला मिळते की अमुक जातीच्याने दुसर्‍या जातीच्या वस्तीला, कुटुंबाला जाळले, अमुक लोक मृत्युमुखी इ. ह्याची जबाबदारी प्रेमीयुगलाने घेतलीच पाहीजे. त्यांच्या विवाहाला विरोध नाही पण आपल्या विवाहाने जे काही विपरीत घडू शकेल ते थांबवण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे का? आपल्या निर्णयाने तिसर्‍याचा जीव जावा का?

एकलव्य's picture

3 Oct 2008 - 9:48 am | एकलव्य

"घरुन विरोध" विवाहात प्रेमीयुगलांनी ह्याचा विचार केला पाहीजे की आपल्या घरचे काय पातळीचे लोक आहेत. म्हणजे कित्येक वेळा वर्तमानपत्रात वाचायला मिळते की अमुक जातीच्याने दुसर्‍या जातीच्या वस्तीला, कुटुंबाला जाळले, अमुक लोक मृत्युमुखी इ. ह्याची जबाबदारी प्रेमीयुगलाने घेतलीच पाहीजे. त्यांच्या विवाहाला विरोध नाही पण आपल्या विवाहाने जे काही विपरीत घडू शकेल ते थांबवण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे का? आपल्या निर्णयाने तिसर्‍याचा जीव जावा का?

हा जंगलचा कायदा झाला. कायदा/सुव्यवस्था सांभाळणे आणि नागरिकाचे न्याय्य अधिकार (प्रेमीयुगुलाचा लग्नाचा आणि इतर कुटुंबीयांचा जगण्याचा) सांभाळण्याचे काम सरकारचे आहे.

कोणाला काय वाटेल याचा जरूर विचार करावा. अगदी उच्छाद मांडावा असे नाही. पण थोरामोठांचे चुकीचे वाटत असेल तर बिन्धास्त पाऊल पुढे टाकावे. मला हुंडा नको पण घरचे म्हणतात त्याला काय करू? हा नवरदेवासमोरचा प्रश्न नाही तर त्याने केलेला कांगावा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Oct 2008 - 9:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे बोलणे "कुंतीनेच" ठरवायचे किती सिरीयसली घ्यायचे... कुठल्याही नात्यात अन्याय, अत्याचार नसावा. बाकी सगळे सापेक्ष.
मलाही असंच वाटतं.

मला असं वाटतं की लग्न करावं का न करावं हा सर्वस्वी त्या दोन लोकांचा प्रश्न असतो. त्या दोन व्यक्ती जर पुढच्या सर्व चांगल्या आणि मुख्यत्त्वे वाईट प्रसंगांना वेळप्रसंगी एकेकट्याही सामोरी जायला, तयार असतील तर त्या दोघांनी लग्न केलं आहे का नाही, त्यांची संतती "हरामी" आहे का नाही याची चर्चा, (गॉसिप या अर्थी) समाजाने का करावी? अर्थात, कुंती आणि सूर्याच्या बाबतीत त्या दोघांनीही कर्णाची जबाबदारी घेतली नाही आणि त्याला वार्‍यावर (पाण्यात) सोडून दिलं तेव्हा मी जे आधी विधान केलं आहे ते कुंती-सूर्याला लागू पडत नाही.

"घरुन विरोध" विवाहात प्रेमीयुगलांनी ह्याचा विचार केला पाहीजे की आपल्या घरचे काय पातळीचे लोक आहेत. म्हणजे कित्येक वेळा वर्तमानपत्रात वाचायला मिळते की अमुक जातीच्याने दुसर्‍या जातीच्या वस्तीला, कुटुंबाला जाळले, अमुक लोक मृत्युमुखी इ. ह्याची जबाबदारी प्रेमीयुगलाने घेतलीच पाहीजे. त्यांच्या विवाहाला विरोध नाही पण आपल्या विवाहाने जे काही विपरीत घडू शकेल ते थांबवण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे का? आपल्या निर्णयाने तिसर्‍याचा जीव जावा का?
"घरुन विरोध" करणारे घरचे, त्यापुढे जाऊन जाळपोळ सुरू करणारे इतर "आप्तस्वकीय" हे किती समजूतदार असतात आणि त्यांच्या मूर्खपणासाठी कोणी किती किंमत चुकवावी? काही लोकांच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयामुळे इतर लोकांचा मृत्यु होत असेल किंवा इतरांना त्रास होत असेल तर आपण एक समाज म्हणून किती प्रगत झालो आहोत, हा प्रश्न फक्त दोनच लोकांच्या त्यागाने सुटणार आहे का असे इतर प्रश्न महत्त्वाचे नाहीत का? त्या दोन प्रेमींनीच याची किंमत का द्यावी?
दोघांच्या प्रेमापायी तिसर्‍याचा बळी जाऊ नये हे मान्य, पण ही मानसिकता का बदलत नाही?

(अवांतरः मी स्वतः आंतरजातीय लग्न केलं नाही, पण म्हणून मला निवडीचा जो अधिकार मिळाला तो दुसर्‍यांनाही मिळावा म्हणून धडपड)

(स्वतःच्या स्वातंत्र्याएवढीच दुसर्‍याच्याही स्वातंत्र्याला किंमत देणारी) अदिती

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Oct 2008 - 9:35 am | llपुण्याचे पेशवेll

"घरुन विरोध" विवाहात प्रेमीयुगलांनी ह्याचा विचार केला पाहीजे की आपल्या घरचे काय पातळीचे लोक आहेत. म्हणजे कित्येक वेळा वर्तमानपत्रात वाचायला मिळते की अमुक जातीच्याने दुसर्‍या जातीच्या वस्तीला, कुटुंबाला जाळले, अमुक लोक मृत्युमुखी इ. ह्याची जबाबदारी प्रेमीयुगलाने घेतलीच पाहीजे. त्यांच्या विवाहाला विरोध नाही पण आपल्या विवाहाने जे काही विपरीत घडू शकेल ते थांबवण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे का? आपल्या निर्णयाने तिसर्‍याचा जीव जावा का?

१००% सहमत.

(आंतरजातीय विवाहास प्रतिकूल)
पुण्याचे पेशवे

विजुभाऊ's picture

3 Oct 2008 - 10:09 am | विजुभाऊ

हे पुस्तक www.marathipustake.org इथे ही मिळु शकेल.
त्यातील वैदीक लाजाहोम बद्दल माहिती वाचल्यावर लाजा(ह्या) होम सारखा तद्दन फालतु प्रकाराला आपण किती मूर्खासारखे महत्व देतो ते कळते.
ज्या काळातले हे दाखले आहेत त्या काळात प्रजोत्पादन हे महत्वाचे सामाजीक कार्य मानले जात असायचे.
वैदीक संस्कृतीचे नियम हे काही विशिष्ठ वर्गाने त्यांच्या फायद्यासाठी बनवले होते. हे मात्र खरे.

पळुन जाउन, न पळता, लपुन छपून कसेही करा पण लग्न करा. त्यामुळे नाजायज मुलांच्या प्रश्नाना उत्तरे देण्याचे प्रसंग येणार नाहीत

अवलिया's picture

3 Oct 2008 - 11:41 am | अवलिया

पुरातन संस्कृतमधील अनेक ठिकाणी विविध परस्परसंबंध नसलेले दाखले आढळतात. तरीही लग्नसंस्था ही सतत बदलत आलेली आहे तसेच पुढेही बदलेल. आजही अनेक जातींमधे (विशेषतः आदिवासी समाज संबंधित) लग्न ही विशेष गांभिर्याने घेण्याची गोष्ट समजली जात नाही.

कोणत्याही काळातली संस्कृती ही कुठल्या ना कुठल्या वर्गाने आपल्या फायद्यासाठीच बनवलेली असते व कोणितरी पुढाकार घेवुन ती मोडतो व स्वतःच्या फायद्याची बनवतो. चालायचेच... म्हणायला पुढारलेले वगैरे पण अजुनही जंगल कायदाच आहे बरे सगळीकडे... हर ताकदवर अपनेसे कमजोर को मारकर जिंदा रहता है...

शेवटी एक महत्वाचे पुर्वी काय होते किंवा पुढे काय असेल याचा विचार न करता प्रचलित व्यवस्थेतच राहुन तिचा आपल्याला हवा तसा फायदा करुन घेणे हेच खरे.

भिंगरि's picture

4 Oct 2008 - 4:52 am | भिंगरि

एका चांगल्या पुस्तकाचा दुवा उप्लब्ध करुन दिल्याबद्दल धन्य्वाद. ह्या पुस्तकाबद्दल खुप ऐकलय. बाकि मुद्द्यांवर पुस्तक वाचुनच मत देइन.

आनंदयात्री's picture

4 Oct 2008 - 12:30 pm | आनंदयात्री

पुस्तक वाचतोय. पचायला जड जातेय.

इनोबा म्हणे's picture

6 Oct 2008 - 3:49 pm | इनोबा म्हणे

या आधी एकदा वाचले होते. तरीही परत एकदा वाचून काढतोय.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

वेताळ's picture

4 Oct 2008 - 3:23 pm | वेताळ

थोडे क्लिष्ट आहे समजायला.
वेताळ

विनायक प्रभू's picture

4 Oct 2008 - 6:40 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
लय गरम हाय बाबा तुम्ही. ह्यासाटी का तुम्हाला बघुन पाणी सोडतात. सकाळी सकाळी तुम्ही कुठेही घुसता परवानगी न घेता. लय भारी डाय्लॉग बाबा कूंतीला. आता सर्व पोरीच्या नावातले क्रिप्टिक अर्थ काढायला हवे. मग आय पील झिंदाबाद

श्रावण मोडक's picture

4 Oct 2008 - 7:07 pm | श्रावण मोडक

असे वाचू नये. कॉम्रेड डांगे यांची प्रस्तावना असलेले पुस्तक वाचावे. ते माझ्या माहितीप्रमाणे लोक वाङ्मय प्रकाशन गृहाने काढले असून उपलब्ध आहे. उपरोक्त दुव्यावर नुसती प्रकरणे आहेत. त्या पुस्तकात त्याचा थोडा इतिहास, राजवाड्यांचा अभ्यासामागील दृष्टिकोन हा तपशील आहे आणि पुस्तक समजून घेण्यासाठी तो अधिक उपयुक्त ठरतो.
मुळात हे पुस्तक अपुरे आहे. राजवाड्यांची ही लेखमाला अपुरी आहे. पुढचे लेखन बहुदा झाले नाही किंवा काही गडबड झाली त्या काळात.

प्रमोद देव's picture

4 Oct 2008 - 10:11 pm | प्रमोद देव

कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे ह्यांची प्रस्तावना असणारे ते हेच पुस्तक आहे.
ही माहीती मला खुद्द टंकलेखिकेने दिलेय.
त्यांची संमती मिळाली तर मी तो भाग इथे जरूर चढवीन.

श्रावण मोडक's picture

5 Oct 2008 - 6:48 pm | श्रावण मोडक

बरोबर. या पुस्तकाच्या उपरोक्त दुव्यात मला डांग्यांची प्रस्तावना दिसली नाही, त्यामुळे हे पुस्तक असे वाचू नये या आशयाचा प्रतिसाद दिला. बाकी प्रकरणे तीच असावीत. पण डांग्यांच्या प्रस्तावनेसह पुस्तक वाचणे हे महत्त्वाचे इतकीच माझी सूचना आहे. आणि ते पुस्तक मु्द्रित स्वरूपात उपलब्ध आहे ही माहिती.

माझी दुनिया's picture

6 Oct 2008 - 12:51 pm | माझी दुनिया

माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)

सदर पुस्तकाचे टंकन मी केलेले आहे. ठाण्याच्या 'संवाद' या संस्थेने कालबाह्य झालेल्या किंवा मुद्रित प्रती उपलब्ध नसलेल्या पुस्तकांचे युनिकोडमध्ये टंकन करून, वाचकांना ती मोफत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. अजून बाल्यावस्थेतल्या या संकेतस्थळावर सध्या तीन पुस्तके आहेत. कोणीही ती फुकटात उतरवून घेऊन वाचू शकतो. ह्या संकेतस्थळाचे उद्‍घाटन २८ संप्टेंबर रोजी ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल इथे झाले. या प्रसंगी एक कार्यकती / स्वयंसेवक म्हणून मी स्वत: उपस्थित होते.

या तीन पुस्तकांपैकी एक पुस्तक मी स्वत: टंकायचे काम केले आहे. ते म्हणजे इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांचे ’भारतीय विवाह-संस्थेचा इतिहास’. भयंकर स्फोटक विधानं असलेल्या या पुस्तकाचे टंकन करताना माझ्या मनात आलेल्या शंकांविषयी मी एक प्रस्तावना; माझी बाजू मांडण्याकरता लिहिली होती. काही तांत्रिक कारणास्तव ती पुस्तकाबरोबर उपलब्ध होऊ शकली नाही. पण ती अशी होती की :

प्रस्तावना

सर्वप्रथम ई संवाद या संस्थेने मला हे पुस्तक टंकण्याकरिता सोपविले त्याबद्दल त्यांचे आभार.

मध्यंतरी महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात एक आवाहनवजा बातमी वाचली की, ’जुनी मराठी पुस्तके,जी आज सहजगत्या उपलब्ध नाहीत, ती वाचकांसमोर यावीत या सद्‌हेतूने ठाण्याच्या ई संवाद या संस्थेने ; ही पुस्तके युनिकोडमध्ये टंकीत करून, संगणकावर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम चालू केला आहे’. त्यात संस्थेने वेगवेगळ्या पातळीवर स्वयंसेवकाची गरज असल्याचे उल्लेखिले होते.मराठी भाषा आणि पुस्तके हे दोन्ही जिव्हाळयाचे विषय असल्याकारणाने ; मी त्यांच्याशी संपर्क
साधून, युनिकोडमध्ये टंकन करण्याकरता समर्थता दर्शविली. त्याप्रमाणे त्यांनी पुस्तक सोपविल्यावर कामाला सुरूवात झाली.

मला, इतिहासाचार्य कै.वि.का.राजवाडे यांचे; कै.श्रीपाद अमृत डांगे (कॉम्रेड डांगे) यांची प्रस्तावना लाभलेले ’भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास; हे पुस्तक सोपविण्यात आले. त्याबरोबर पाठवलेल्या टाचणात संस्थेचा ’ पुस्तकात अनेक संस्कृत शब्द असल्याने आणि मला युनिकोड टंकनाचा सराव
असल्याने, हे पुस्तक सोपवित असल्याचा उल्लेख करून नेमके कोणत्या पानापासून सुरूवात करायची हे सांगितले होते.

मी टंकनाला सुरूवात केली खरी, पण पहिल्या पानापासूनच भयंकर अस्वस्थ झाले. याचे कारण,पहिल्याच प्रकरणाचा विषय स्त्री-पुरूष समागमसंबंधक कित्येक अतिप्राचीन आर्ष चाली असा होता.एकतर ह्या विषयावर लिहिलं गेलेलं खाजगीत चवीने वाचलं जात असले तरी ते उघडपणे चारचौघांत न दाखवण्याचा संभावितपणा समाजात सर्रास आढळतो. दुसरं असं की हे पुस्तक इंटरनेटच्या माध्यमातून जगभर कुठेही उपलब्ध होऊ शकणार होतं, आणि ते टंकणार्‍याचे नाव छायाचित्रासह त्यात घातले जाणार होते. ही गोष्ट माझ्या आत्तापर्यंतच्या महाजालावरच्या कमावलेल्या अबाधित स्थानाला धक्का बसवू शकली असती. आस्थेने माझे लेखन वाचणारा माझा मित्रपरिवार, वाचकवर्गकदाचित या गोष्टीमुळे गमावण्याची वेळ माझ्यावर या गोष्टीमुळे येऊ शकली असती. केवळ सुरूवातीच्या पानांतच नव्हे तर संपूर्ण पुस्तकांत आर्यपूर्वजांविषयी अनेक स्फोटक विधाने आहेत.आता प्रत्यक्ष लेखकाची मात्तबरी आणि त्याला खास लाभलेली कॉम्रेड डांग्यांची प्रस्तावना यामुळे पुस्तकाची पत कमी खचितच होत नाही, पण मग आपण कामसूत्र सारखे वैषयिक विषयाला वाहिलेले पुस्तक तर टंकीत नाही ना असा विचार मनात यायला लागला. ही कोंडी कशी फोडावी याचा विचार सुरू झाला. तसे संस्थेने मला दुसरे पुस्तक घेण्याची मुभा दिली होती. पण मुळातच आपला अमूल्य वेळ खर्च करून, युनिकोडमध्ये पूर्ण पुस्तक टंकन करणार्‍यांची वानवा आहे. त्यावर उपाय म्हणून; मी पुढचे टंकन करायच्या आधी पुस्तक वाचून काढायचा निर्णय घेतला. आश्चर्य म्हणजे कॉम्रेड डांग्यांच्या प्रस्तावनेतून ह्या पुस्तकाचा धक्कादायक इतिहास कळला, त्याचा सारांश त्यांच्याच शब्दांत असा की:-

या ग्रंथाचे पहिले प्रकरण १९२३ च्या मे महिन्यात पुण्याच्या सुप्रसिद्ध ’ चित्रयमजगत‌‌‌‌‌‍’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. पण या पहिल्याच प्रकरणाने महाराष्ट्रातील वाचकांत, विशेषत:विद्वानांत, भयकंर वादळ उठले. त्यांनी चित्रमयजगतचे मालक वासुकाका जोशी यांना पत्रे पाठवून आणि काठी दाखवून धमकी दिली की पुढचे भाग प्रसिद्ध कराल तर तुमचा छापखाना आम्ही जाळू. पुस्तक छापणे थांबले. हे पुस्तक अथवा विवेचन समाजशास्त्राच्या मांडणीला, विशेषत: मार्क्स-एंगल्सच्या इतिहासविषयक सिद्धान्ताला , कच्चा माल या नात्याने किती उपयुक्त ठरेल हे माझ्या लक्षात येऊन मला आनंद वाटला. हा ग्रंथ मी छापयचा असे ठरविले. राजवाड्यांशी बोलल्यावर ते म्हणाले ” तुम्ही बरेच धाडसी दिसता. हा ग्रंथ छापलात तर कर्मठ मंडळी तुमचा छापखाना जाळतील. पण तुमचा निश्चय असल्यास मी एक तोड सुचवितो. मी हा ग्रंथ अद्याप पूर्ण लिहिलेला नाही. तेव्हा मी त्याचे क्रमश: सोळा पानांचा फॉर्म होईल असे एक एक प्रकरण तुमचेकडे पाठवीन. तो फॉर्म छापून तुम्ही मला पाठवा म्हणजे मी पुढचा भाग तुम्हाला पाठवीन. तुमच्याकडून छापील फॉर्म आलानाही तर मी समजेन की हा ग्रंथ तुम्हालाही झेपत नाही. किंवा हा व्याप करता तुमचे दिवाळेनिघाले आहे. हे समजून मी पुढचे प्रकरण लिहिणारही नाही. आणि पाठवणारही नाही.”

राजवाडे यांनी आपली प्रतिज्ञा पूर्णपणे पाळली होती. मी जेव्हा एक फॉर्म छापून पाठवीत असे तेव्हाच ते दुसरा लिहीत. चौथ्या प्रकरणाचा भाग छापण्यापूर्वीच मी मार्च १९२४ मध्ये कैदेत गेल्यामुळे व माझ्या सहकार्‍यांकडून त्यांना त्या प्रकरणाची छापील प्रत न मिळाल्यामुळे त्यांनी पुढचा भाग लिहीण्याचे सोडून दिले. मी १९२७ साली सुटून आलो तोपर्यंत ते दिवंगत झाले होते.

यामुळे या ग्रंथाची केवळ चारच प्रकरणे उपलब्ध आहेत.

प्रत्यक्ष पुस्तक वाचून तर आर्यकालीन अशा बर्‍याच चालीरितींची माहीती मिळाली जी आजच्या स्वैराचार बोकाळलेल्या काळातही आपण सहज पचवू शकणार नाही. एकूण मला विषय खटकत असला तरी, आर्यकालीन चालिरितींची रोचक माहिती या पुस्तकाद्वारे मिळते या निर्णयाद्वारे मी टंकन पुढे चालू ठेवायचे ठरविले आणि आज आपल्याला हे पुस्तक उपलब्ध होऊ शकले.

टीप : टंकीत पुस्तकातले शुद्धलेखन ( ‍र्‍ह्स्व, दीर्घ ) हे मुद्रित पुस्तकाबरहुकुम आहे.

सौ. श्रेया देवेंद्र रत्नपारखी

काही मुद्यांचा खुलासा :
१) धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे मुद्रित शोधन व्हावयास हवे, परंतु त्या संदर्भात असलेली टीप मी खाली लिहिलेली आहेच. शिवाय मी केलेले टंकन, 'संवाद' ने मुद्रित शोधन करूनच प्रकाशित केलेल आहे.

२) कॉम्रेड डांग्यांची प्रस्तावना या पुस्तकात हवी होती हे खरेच, त्याबाबतही मी योग्य वाटलेला मजकूर माझ्या प्रस्तावनेत टाकलेला होता. प्रत्यक्ष संकेतस्थळ प्रकाशन सोहळ्याच्या वेळी बोलण्याच्या ओघात कळले की , स्वतः राजवाडयांनी त्यांच्या स्वतःच्या साहित्याबाबत स्वामित्व अधिकार ठेवलेला नाही. परंतु कॉम्रेड डांग्यांची प्रस्तावना पुस्तकात घालायची झाल्यास त्यांची (वारसांची) परवानगी लागेल, जी संस्थेकडे नाहीये.

असो, गेल्याच आठवडयात प्रकाशित झालेल्या या संकेतस्थळाची म्हणावी तशी प्रसिद्धी झालेली नसतानाही, इतक्या थोडया कालावधीत , इतक्या लोकांसमोर हे संस्थ यावे ही बाब अचंबित करणारी आहे. :)

प्रकाश घाटपांडे's picture

6 Oct 2008 - 1:20 pm | प्रकाश घाटपांडे

आपला सहभाग व भुमिका दोन्ही आवडल
प्रकाश घाटपांडे

ऋषिकेश's picture

6 Oct 2008 - 1:32 pm | ऋषिकेश

+१
असेच म्हणतो.. आपली प्रस्तावना मस्त

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 1:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही!

श्रावण मोडक's picture

6 Oct 2008 - 3:29 pm | श्रावण मोडक

१. सर्वप्रथम या पुस्तकाचे जालासाठी टंकन केल्याबद्दल अभिनंदन. त्याहून हे टंकन करताना तुम्ही आधी ते पुस्तक समजून घेतलेत हे अधिक महत्त्वाचे.
२. तुमची भूमिका पटते आहेच. इतरांनीही तसे म्हटले आहेच. पण मी दिलेल्या प्रतिसादातून उपस्थित होणारा मुद्दा तुमच्यासंदर्भात नाही. ज्या संस्थेने हा प्रकल्प हाती घेतला आहे त्या संस्थेच्या प्रकल्पामागील, प्रकल्पातील प्रत्येक पुस्तकाच्या प्रकाशनामागील भूमिकेचा आहे. त्यादृष्टीने तुम्ही डांग्यांची प्रस्तावना महत्त्वाची मानता हे तुम्ही लिहिलेल्या, पण पुस्तकासोबत न येऊ शकलेल्या, प्रस्तावनेतून दिसून येते. आता प्रश्न असा येतो की, डांग्यांच्या प्रस्तावनेचा उल्लेख या पुस्तकाच्या संकेतस्थळ आवृत्तीवर का केला नाही? तो व्हावा यासाठी माझ्यातर्फे आपण संस्थेला विनंती कराल का? हे लिहिण्यामागे माझा कोणताही आरोप नाही. अशा मोठ्या कामात या तपशीलाच्या, पण तशाही महत्त्वाच्या, बाबी राहून जातात हा अनुभव आहे.
३. तुम्ही लिहिलेली भूमिका (आपण तिला प्रस्तावना म्हणूया नको) पुस्तकासोबत का गेली नाही हे कोडे आहे. ती गेली असती तरी, त्यातून आपोआप डांग्यांच्या प्रस्तावनेचा उल्लेख झाला असता आणि दिशा मिळून गेली असती.
४. या पुस्तकाची प्रकरणे, त्या लेखनामागील भूमिका समजून न घेता, नुसतीच वाचली गेली तर हे पुस्तक मुळात समाजशास्त्रीय अभ्यासाचे आहे हेच समजून न येण्याचा धोका आहे. त्या दृष्टीने अशी नुसती प्रकरणे प्रसिद्ध करणे धोक्याचे आहे. नव्या वाचकांचा समज काय होईल? तुम्ही 'कामसूत्र'चा उल्लेख केला आहे. तो तर ग्रंथ झाला. इतरांची, 'चवी'ने वाचण्याचे पुस्तक, अशी समजूत झाली तर भयंकरच.
यास्तव मी उपरोक्त प्रतिसाद दिले होते.

माझी दुनिया's picture

6 Oct 2008 - 3:57 pm | माझी दुनिया

श्रावण, तुमचे म्हणणे (डांग्यांच्या प्रस्तावने संदर्भातले ) मी संस्थेला कळवेन. अर्थात निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.

माझी प्रस्तावना बहुदा पुस्तक अपडेट होईल तेव्हा दिसेल, अजूनही पुस्तक पूर्ण झालेले नाही....राजवाडयांची या संदर्भातली टीपणे आणि या विषयाहून वेगळ्या संदर्भातला एक निबंध असे जवळपास ५०-६० मुद्रित पानांचे टंकन चालू आहे.

आपणा सगळ्यांच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद :-)

माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)

विनायक प्रभू's picture

4 Oct 2008 - 7:10 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
कुंती ह्या शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश बघा. सुर्याजी रावाना इंग्रजी येत असावे. जगभर प्रवास करतात. इथे काम संपले की अमेरिकेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Oct 2008 - 7:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कुंती ह्या शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश बघा. सुर्याजी रावाना इंग्रजी येत असावे. जगभर प्रवास करतात. इथे काम संपले की अमेरिकेत.

तेव्हा अमेरिकेत कुठे हो इंग्लीश बोलायचे? इंग्लंडातसुद्धा तेव्हा इंग्रजी नसेल!
अवांतरः भावना पोचल्या!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Oct 2008 - 11:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहासाच्या दुव्याबद्दल आभारी !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धनंजय's picture

6 Oct 2008 - 6:33 am | धनंजय

प्रथम वाचनात जाणवले की संहिता-ऋचांचे काही प्रमाणात सुयोग्य वाचन, आणि काही प्रमाणात कल्पनाविलास यांची सरमिसळ झालेली दिसते.

काही ठिकाणी शब्दांची व्युत्पत्ती प्रमाण म्हणून सांगितलेली आहे, (उदा : भ्रातृ/भर्तृ यांचे मूळ एकच, वगैरे) त्या ठिकाणी व्युत्पत्ती ठीक नाही असे वाटते.

अश्वमेधाच्या वेळी करायच्या नाटकाचे वर्णन, आणि त्यावरून काढलेला अर्थ ठीक असावा, असे वाटते. ठिणग्यांनी अग्नी निर्माण करायचे तंत्र मिळाल्यानंतरही विशिष्ट कर्मासाठी लाकडे घासून अग्नी पेटवायची प्रथा कशी काय असावी याबद्दल राजवाड्यांचे मत रोचक आहे, आणि पटण्यासारखे आहे.

दुवा दिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद. मुद्रितसंशोधन (प्रूफे तपासणे) पुन्हा करणे अत्यावश्यक आहे. शिवाय डांगे यांची प्रस्तावना वाचण्यास मिळाली तर आवडेल, याला माझा दुजोरा.

(वेद हे लोकसाहित्य आहे, असे वि. का. राजवाड्यांचे मत असावे, ते मला पटते.)

विकास's picture

15 Oct 2008 - 5:29 am | विकास

वर श्रावण मोडक यांच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे राजवाड्यांची हे पुस्तक लिहीण्यामागची भूमिका निश्चित न कळल्याने, राजवाडे स्वतः, त्यांनी दिलेल्या संदर्भातील सूर्याप्रमाणेच विविध माहीती देत ज्याला संस्कृती बाह्य असे समजले गेले त्याचे उदात्तीकरण तर करत नाहीत ना अशी शंका आली. :-)

वरील वाक्यातील थट्टा दूर राहूंदेत, पण एकंदरीत राजवाडे हे जसे इतिहासाचार्य होते तसेच परंपरांचे आणि संस्कृतीचे उदात्तीकरण करणार्‍यांच्या विरोधातील असावे असे वाटणारे होते. म्हणूनच एक रामदासांचा अपवाद सोडल्यास आपल्याकडील तमाम संतांचा उल्लेख ते "जंजाळे" म्हणल्यासारखा "संताळे" असा करीत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या संस्कृतीत गुंतून राहील्याने आपण परकीय शक्तींकडून मार खाल्ला. ते कुणालाही मान्य होईल असेच विधान असले तरी, वास्तवीक त्याला जबाबदार संत नव्हते अथवा ज्याला आपण भारतीय संस्कृती म्हणतो ती नव्हती असे मला वाटते. कारण अर्थातच होते ते समाजातून र्‍हास झालेला वीररस, राजसीक वृत्ती, खोट्या सात्वीकतेच्या पदराखाली दडलेली वास्तवातील तामसी वृत्ती... ही तामसी वृत्ती.

भारतीय विवाह संस्थेचा इतिहास असे जरी पुस्तकाचे नाव असले तरी त्यात अनेक परकीय उदाहरणे देखील असल्याने ते पुर्वीच्या काळातील समाजसंस्था अथवा तीचा अभाव दाखवत आहे असे वाटले. महाभारत या संदर्भात वाचले तर सर्व सावळा गोंधळच आहे. तरी देखील कुंतीच्या बाबतीत सूर्याला तीनेच आवाहन केले (दुर्वासमुनींनी दिलेल्या मंत्राचा उपयोग करून बघायची हौस म्हणून) हे ही सत्य आहे. (यात मी सूर्याची बाजू घेत नाही आहे, केवळ कथा काय आहे इतकेच लिहीत आहे). नियोग पद्धती (स्त्रीचा प्रजोत्पादनासाठी विवाहबाह्य संबंध) देखील समाजमान्य होती. तरी देखील त्यात सहभागी असलेला पुरूष हा पूर्णपणे अलीप्त असावा अशा पद्धतीचे नियम देखील होते. म्हणूनच अंबिका, अंबालीकांच्या संबंधात व्यासांना पाचारण केले होते.

आता ह्या पुस्तकाला कॉ. डांग्यांनी प्रस्तावना दिलेली आहे आणि वर प्रतिसादात आल्याप्रमाणे, ते म्हणतातः " पुस्तक अथवा विवेचन समाजशास्त्राच्या मांडणीला, विशेषत: मार्क्स-एंगल्सच्या इतिहासविषयक सिद्धान्ताला , कच्चा माल या नात्याने किती उपयुक्त ठरेल हे माझ्या लक्षात येऊन मला आनंद वाटला." याचा थोडक्यात अर्थ राजवाड्यांनी कशासाठी पण लिहीले असले तरी डांग्यांना मार्क्सवादी विचारसरणीचे उदात्तीकरण करण्यासाठी या पुस्तकाचा भारतीय संस्कृतीचे (किमानपक्षी जनमानसाच्या नजरेतील) खच्चीकरण करण्यासाठी उपयोग नक्कीच वाटला असावा. कारण न पेक्षा धर्म न मानणार्‍याला, देव न मानणार्‍याला महाभारत, ब्रम्हदेव, सूर्य मनुष्यरूपात बरा पटला. ( हे म्हणजे सध्यस्थितीतील युपिए सरकारसारखे झाले: आधी म्हणणार राम नव्हता तेंव्हा सेतू बांधण्याचा प्रश्नच नाही. त्यात मार खाल्यानंतर कोर्टापुढे म्हणणार की लंकेतून येताना रामानेच सेतू उध्वस्त केला!)

आता त्या पुस्तकात जे काही म्हणले त्याने भारतीय संस्कृती कमीजास्त होण्याऐवजी राजवाड्यांच्या काळातच आणि त्या आधी पण काही शतके ज्या पद्धतीने पुरूषी संस्कृती आणि "लूज मॉरल" याला समाजमान्यता होती ती पाहील्यास जास्त वैषम्य वाटते. याच काळात जरठबाला विवाह होते, बालविधवांवर अत्याचार होत, आणि अंगवस्त्रे पण सर्रास होती. अत्र्यांचे "आम्ही फार चावट होतो" वाचा.

हे सर्व लिहायचे कारण म्हणजे चर्चेतील मूळ प्रश्नः सध्याची भारतीय संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपासून प्रगती, अधोगती की चक्र फिरून पुन्हा त्याच जागी? तुम्हाला काय वाटते. प्रगत संस्कृतीत काय घडत असावे/ घडायला हवे?

चर्चेची सुरवात (कुंती-सूर्य संवाद) आणि राजवाड्यांचे ४१ पानी पुस्तक इतकीच आपली संस्कृती मर्यादीत आहे का? संस्कृतीसमृद्ध समाज (प्रगत संस्कृती) अथवा संस्कृतीहीन समाज ह्या कशातही केवळ स्त्री-पुरूष संबंध इतकेच घडत असते का? तरी देखील कुठल्याही काळातील समाज बघितला तर त्यात सर्वप्रकारचे लोक प्रकर्षाने आढळतात, जे स्वतःला संस्कृती रक्षक समजतात असे, जे स्वतःला क्रांतीकारी (प्रस्थापीत संस्कृतीच्या विरोधात आवाज उठवणारे या अर्थी) समजतात असे आणि बरेचसे दोन्ही बाजूनी प्रवाहपतीत.

संस्कृती प्रगत आहे का नाही, हे त्या संस्कृतीतील समाज प्रगल्भ आहे का नाही यावरून ठरवावे असे मला वाटते. प्रगल्भ व्यक्ती अथवा समाज ह्या दोहोंमधे स्वतःच्या कृती आणि विचार यांच्यासंदर्भात एक आत्मविश्वास असतो. केवळ हा आत्मविश्वास स्त्री-पुरूष संबंधापुरता मर्यादीत नसतो. तर "कृण्वंतू विश्वम आर्यम" (we wil make the world noble place) ही महत्वाकांक्षा बाळगणारा असतो. तो आत्मविश्वास संपादण्यासाठी त्यांना (व्यक्ती/समाजाला) इतरांना कमी लेखण्याची, गरज भासत नाही. भारतीय संस्कृती राजवाड्यांनी सांगीतलेली उदाहरणांसहीत आत्मविश्वासी होती. त्यामुळे त्यातील त्यातील ज्या गोष्टी कालसापेक्ष होत्या (या लेखा संदर्भात - स्त्री-पुरूष संबंध) त्या कथाम्हणून राहील्या. त्याला आचरणात आणण्यासाठी आदर्श मानल्या गेल्या नाहीत. तर त्यातील या गोष्टी कालातीत होत्या - मुख्यत्वे कर्तव्य आणि विजिगिषू वृत्ती याच्या सभोवताली संस्कृती गुंफली गेली असे वाटते.

आज (यात राजवाड्यांचे लेखनपण आले) मात्र , स्वतःला हवे तसे वागण्याचे स्वातंत्र्य मिळवण्याच्या धडपडीत जुन्या कथांमधील कालबाह्य गोष्टींना वर आणून, "हे काही नवीन आणि गैर नाही", असे म्हणायचा प्रयत्न करत आहे असे वाटते. मध्ययुगात, मीच वर म्हणल्याप्रमाणे आपण वरकरणी सात्विकतेच्या पदराखाली स्वतःची तामसी वृत्ती लपवत होतो, आता खोट्या राजसीकतेच्या पदराआड तामसीकच तर रहात नाही आहोत ना असे वाटते. या अर्थाने ही नवसंस्कृती अधोगतीस गेली नसली तरी इंग्रजी भाषेत संस्कृती म्हणून "नॉन स्टार्टर" वाटते!

हे उत्तर जरी प्रश्नासंदर्भात भारतीय संस्कृतीपुरते मर्यादीत असले तरी त्यातील मूळ मुद्दा इतर संस्कृतींना पण कमी अधिक फरकाने लागू होऊ शकतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Oct 2008 - 9:50 am | llपुण्याचे पेशवेll

तुमचा प्रतिसाद शब्दशः पटला. एकदम संयत प्रतिसाद.
+१

मला तर असे वाटते की एकूणच राजवाड्यानी जसे वर्णन केले आहे त्याप्रमाणेच बघायला गेले तर आत्ताची संस्कृती ही उत्क्रांत होत होत त्यात आता रुढ असलेल्या गोष्टी आल्या आहेत. नैतिकतेच्या कल्पनाही अशाच वर्षानुवर्षाच्या शिक्षणातून रूढ होत होत जशा आताच्या आहेत तशा बनल्या असाव्यात असे वाटते . जसे आर्षकालात मुक्त लैंगिकसंबंध होते त्यापासून उत्क्रांत होत होत एक समूह त्यापासून एक पुरुष व एक स्त्री असलेले जोडपे अशाप्रकारे उत्क्रांत होत होत आताची विवाह संस्था उदयास आली ज्यात एकाच जातीचे पण भिन्न गोत्राचे वधू वर यांच्यात विवाह लावले जातात. शक्यतो पतीपत्नी एकमेकांशी एकनिष्ठ असतात.

त्यामुळे आर्यकालातील चालिरितींचे दाखले देऊन आजची विवाहसंस्था एकदम चूक ठरवणे अयोग्य वाटते.

पुण्याचे पेशवे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Oct 2008 - 10:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विकासराव आणि पेशव्यांशी!

याच पुस्तकात राजवाड्यांनी पहिल्या प्रकरणातच असं लिहिलं आहे की "आपल्या" स्त्रीबद्दल मालकी भावना होती, पण आपल्या मित्राला आपली स्त्री एका रात्रीपुरती देताना पुरूषांमधे द्वेषभावना उत्पन्न होत नसे; जी आज कोणत्याही (स्त्री आणि) पुरूषाच्या मनात सहज उत्पन्न होते. अर्थात ज्या समाजाचं राजवाड्यांनी वर्णन केलं आहे तो समाज आजच्या समाजापासून फारच भिन्न असणार. म्हणूनच पेशव्यांचं "त्यामुळे आर्यकालातील चालिरितींचे दाखले देऊन आजची विवाहसंस्था एकदम चूक ठरवणे अयोग्य वाटते.", हे वाक्य एकदम पटतं.

अदिती

मन१'s picture

15 Sep 2012 - 2:03 am | मन१

महाभारत वगैरे विषयावर शेकडो धाग्यांवर वाचायला मिळत असतं, कधीकधी कंटाळा येइपर्यंत.
पण हे जsssरा "हट के" वाटलं.
मृत्युंजय, वल्ली व इतर महाभारतप्रेमींच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

धन्या's picture

9 Mar 2013 - 8:50 am | धन्या

मृत्युंजय, वल्ली व इतर महाभारतप्रेमींच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

हे दोघे महाभारतातील श्लोक तोंडावर फेकतील आणि ते तसंच घडलं आहे असं गृहीत धरुन पुढचं सारं महाभारत सांगत बसतील. ;)

त्यापेक्षा तुम्ही ईरावती कर्वेंचं "युगांत" वाचा. महाभारताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन त्यांनी दिला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2013 - 2:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यापेक्षा तुम्ही ईरावती कर्वेंचं "युगांत" वाचा. महाभारताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन त्यांनी दिला आहे.
+१०००

प्राचीन भारतीय लेखन कसे अभ्यासावे आणि समजून घ्यावे याचा एक मानदंड "युगांत" मध्ये ईरावतीबाईंनी निश्चीत केला आहे. शिवाय त्यांच्या लेखनाची पद्धत एवढी समतोल, सोपी आणि सुसुत्र आहे की हे पुस्तक प्राचीन साहित्यावरची टीका असूनही शेवटपर्यंत हातातून खाली ठेवणे जमले नव्हते.

मन१'s picture

9 Mar 2013 - 7:18 am | मन१

नुकताच होउन गेलेला आंतरराष्ट्रिय महिलादिन व हा धागा; महाभारतकालीन समाज, महिलांविषायक समज.....

आशु जोग's picture

9 Mar 2013 - 4:27 pm | आशु जोग

मृदुला,

आपण नुसती लिंक दिलीत.

आपले भाष्य नाही लिहिलेत.

इनिगोय's picture

8 Sep 2014 - 7:08 am | इनिगोय

उत्तम चर्चा.
माझी दुनिया, श्रामो आणि विकास यांचे प्रतिसाद विशेष वाचनीय.

मार्कस ऑरेलियस's picture

8 Sep 2014 - 12:53 pm | मार्कस ऑरेलियस

खतरनाक धागा ! पुस्तकही वाचले आहे , हिंदुधर्माविषयी गोड गैरसमज असणार्‍यांसाठी हे पुस्तक म्हणजे झणझणीत अंजनच आहे !

हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा धरू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. स्त्रिया व पुरूष यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत. यास्तव तू माझ्याशी समागम कर.

हे अर्ग्युमेन्ट तर सुपर लॉजिकल वाटले ... पुढे मागे कधी योग आला तर नक्की वापरण्यात येईल !! *give_rose*