चिमणी

तिरकीट's picture
तिरकीट in जे न देखे रवी...
17 Jan 2017 - 3:42 pm

अर्धी बोबडी चिमणी हाक
डोळ्यांमधली चिमणी झाक
अधुनमधुन फेंदारलेले
नकटे नकटे चिमणे नाक.......

चिमणे तोंड, चिमणे केस
चिमणे हात, चिमणा वेश
काही कारण नसतानाही
रागवण्याचा चिमणा आवेश

तुझे मन चिमणे चिमणे
असेच फुलवत राहेन मी
दोघेही राहु अगदि असेच....
चिमणी तु, चिमणा मी.....

कविताबालगीत

प्रतिक्रिया

पैसा's picture

17 Jan 2017 - 10:22 pm | पैसा

खूपच आवडली कविता!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jan 2017 - 2:00 pm | अत्रुप्त आत्मा

मत्त मत्त कविता. आवल्ली खूप.

धन्यवाद पैसाताई आणी आत्मबंध

सस्नेह's picture

18 Jan 2017 - 3:06 pm | सस्नेह

ही 'चिमणी'ची कविता आहे की 'चिमणा-चिमणी'ची ?

तिरकीट's picture

18 Jan 2017 - 4:20 pm | तिरकीट

चिमणीचीच...

किरण कुमार's picture

18 Jan 2017 - 4:55 pm | किरण कुमार

गो(ल्)ड कविता