चिमणी
अर्धी बोबडी चिमणी हाक
डोळ्यांमधली चिमणी झाक
अधुनमधुन फेंदारलेले
नकटे नकटे चिमणे नाक.......
चिमणे तोंड, चिमणे केस
चिमणे हात, चिमणा वेश
काही कारण नसतानाही
रागवण्याचा चिमणा आवेश
तुझे मन चिमणे चिमणे
असेच फुलवत राहेन मी
दोघेही राहु अगदि असेच....
चिमणी तु, चिमणा मी.....
वाचने
2197
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
वा!
मत्त मत्त कविता. आवल्ली
धन्यवाद पैसाताई आणी आत्मबंध
छान !
In reply to छान ! by सस्नेह
चिमणीचीच...
सुरेख